मी एका हॉस्पिटलमध्ये नाईट टेक्निकल सपोर्ट म्हणून कॉन्ट्रॅक्टवर काम करत होते – सिस्टिम्स, मशीन डेटा, रिपोर्ट्स हँडल करायचं काम. हे हॉस्पिटल शहरापासून थोडं दूर होतं – एक जुनं सरकारी हॉस्पिटल. रात्री नाईट शिफ्टमध्ये तिथं फक्त एक डॉक्टर, दोन नर्स, एक सिक्युरिटी गार्ड आणि मी असायचे. मी लॅब डेस्कवर बसलो होते. माझं काम म्हणजे मशीन रिपोर्ट्स मॉनिटर करणं आणि एखादी इमरजन्सी असेल तर ती लॉग करणं. त्या रात्री हॉस्पिटल शांत होतं. थोड्या वेळाने एक नर्स आली – सिमी नावाची. ती हलक्या आवाजात म्हणाली: “तू पहिल्यांदाच इथे नाईट शिफ्टला आली आहेस..! सर्जिकल वॉर्ड ३ च्या बाजूचा कॉरिडॉर टाळ बरं का… तिथं काय ‘प्रॉब्लेम’ आहे हे कुणालाच माहीत नाही.”
मी हसले… वाटलं, ‘ही सिमी मला फक्त घाबरवायला बघतेय..” रात्री एक च्या सुमारास सर्व्हर चेक करताना मला एक अॅलर्ट आला – “Heart Monitor Error – Ward 3”. Ward 3 म्हणजेच सर्जिकल वॉर्ड ३. जिथं एकही पेशंट नव्हता.
मी उठले आणि तो मॉनिटर पाहायला निघाले. कॉरिडॉर अंधारलेला होता.सर्जिकल वॉर्ड ३ चं दार बंद होतं, पण आतून लाईट दिसत होता.
मी दार हळूच ढकललं… आणि ते कर्कश आवाज करत उघडलं.
आत सर्व मॉनिटर्स चालू होते. मशीन बीप करत होती. आणि एका बेडवर कोणी तरी झोपलेलं दिसत होतं… पांढऱ्या चादरीत गुंडाळलेलं.
पण तिथं कुणी अॅडमिट नव्हतं! मग त्या बेडवर..
मी हळूहळू पुढे गेले.
“Hello… कुणी आहे का?” – मी विचारलं.
आणि तेव्हा… बेडवरचे ते चादरीत गुंडाळालेलं हललं.
मी इतकी घाबरले की मागे वळून सरळ धाव घेतली. मी कंट्रोल रूममध्ये आले. हात थरथरत होते. पण तरीही CCTV फीड उघडली…
१:०५ ते १:०८ च्या फूटेजमध्ये चेक करू लागले – वॉर्ड ३ मध्ये एक स्त्री, पांढऱ्या चादरीतून उठताना दिसत होती. आणि…सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे ती थेट कॅमेऱ्याकडे पाहत होती.
दुसऱ्या दिवशी मी सिमीला विचारलं – “काय होतं त्या वॉर्ड ३ मध्ये?”
ती थोडावेळ गप्प राहिली. मग म्हणाली:
“पाच वर्षांपूर्वी, एका गर्भवती स्त्रीवर तिथं शस्त्रक्रिया झाली होती. डॉक्टरची चूक झाली… आणि दोघंही वाचले नाहीत. त्या नंतर… तिथे असं वाटतं की कुणीतरी अजूनही बेडवर आहे …
आजही जेव्हा मी रात्रभर नाईट शिफ्ट ला जागते तेव्हा त्या वॉर्ड मधून मशीनचं बीप ऐकू येतात.