अनुभव – हंजला तांबोली
मी एका मुस्लिम कुटुंबात जन्मलेलो आहे. तसा मी खूप धाडसी आहे. पण माझा एक प्रॉब्लेम आहे की मी पायाळू आहे आणि मला भूत, अनामवीय शक्ती लगेच जाणवतात. मी बऱ्याचदा झोपेत ओरडत असतो असे माझे आई वडील म्हणतात. त्यांचं म्हणणं आहे की माझे स्टार्स खूप वीक आहेत. आणि त्यामुळे आजपर्यंत माझ्या सोबत खूप प्रसंग घडले आहेत.. पण त्यातला सगळ्यात भयानक आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत जो माझ्या डोक्यात राहणार तो एकच किस्सा. ऑक्टोबर 2019 चा. मी तेव्हा नुकताच 10 विची परीक्षा संपून काही दिवस उलटले होते. मी एके सकाळी सहज इंस्टाग्राम फीड स्क्रॉल करत होतो. आणि मित्राची एक स्टोरी पाहिली. रेस्ट इन पीस. त्याने आमच्या ग्रुप मधल्या एका मित्रासाठी स्टोरी ठेवली होती. मी त्या मित्राचे नाव डिस्कोझ करू इच्छित नाही. मी ती स्टोरी पाहून एकदम शॉक झालो.
पटकन त्याच्या स्टोरी ला रिप्लाय करून विचारले की काय झाले. तर त्याचा मेसेज आला “ त्याने सुसाईड केलं, तो गेला आपल्याला कायमचा सोडून.. “ आत्महत्या.. हे कस शक्य आहे. कारण तो मित्र माझ्या शाळेतला खूप जवळचा मित्र होता. पुढे उच्च शिक्षणासाठी आम्ही वेगळे मार्ग आणि वेगळी कॉलेजेस निवडली. त्यामुळे मग इतका कॉन्टॅक्ट नव्हता. पण आमच्यात खूप घट्ट आणि चांगली मैत्री होती. त्यामुळे ही बातमी कळल्यानंतर आम्हा शाळेतल्या मित्रांचा ग्रुप त्याच्या घरी गेलो. पोस्टमोर्टेम ला नेलेली त्याची बॉडी अजून आणली नव्हती. आम्ही सगळे मित्र त्याच्या घरा खाली थांबलो होतो. त्याची आई खूप रडत होती, असे आपल्या मुलाला पाहून कोणत्याही आईचे काळीज तुटेलच. तिचं रडणं पाहून मला ही खूप गहिवरुन आलं. आम्ही त्याच्या वडिलांना भेटलो. त्यांची ही अवस्था खूप वाईट होती. त्यांच्यासाठी जणू सगळं काही संपलं होतं ते फक्त एकच वाक्य म्हणाले “ माहित नाही त्यानं असं कां केलं..” मला त्यांना काय बोलाव कशी सांत्वना द्यावी तेच कळत नव्हतं.
काही नातेवाईकांकडून कळले की त्याचे अंत्यविधी उद्या सकाळी होणार आहेत. काही वेळ थांबून आम्ही घरी जायला निघालो. संध्याकाळ झाली होती. खरं सांगायचं तर माझ्यासाठी हा खूप मोठा आघात होता. घरी आल्यावर अंघोळ करायचे ही विसरून गेलो. जेवायची अजिबात इच्छा नव्हती म्हणून सरळ झोपायला गेलो. आमच्या घरी 2 वेगळे बेडरूम आहेत. एक हॉल ला जॉईंट आहे आणि हॉल मधून बेडरूम मध्ये जाण्यासाठी एक दरवाजा आहे. मी झोपायला गेलो आणि माझे आई बाबा हॉल मध्ये टीव्ही पाहत होते. झोपायच्या आधी मी पाहिले की एक खुर्ची माझ्या बेड च्या बाजूला ठेवली आहे. मी लक्ष न देता झोपून गेलो. जवळपास साडे बारा किंवा एक च्या दरम्यान मला एक स्वप्न पडलं की मी माझ्या त्याच बेड वर झोपलोय आणि बेडच्या बाजूला तिच खुर्ची आहे जी माझ्या दिशेने आहे. पण त्यावर कोणी तरी पांढऱ्या शुभ्र कपड्यात बसलं आहे.
चेहरा पाहण्याचा प्रयत्न केला पण तो स्पष्ट दिसत नव्हता. चेहरा खूप प्रखर भासत होता त्यामुळे कदाचित मला कळत नव्हतं कोण आहे. ते जे काही होतं त्यानं माझ्याकडे बघितलं आणि मान वाकवून काहीच न बोलता फक्त जवळ येउन एक विचित्र हास्य केलं. मला चेहरा दिसत नसला तरी चेहऱ्यावरचे हास्य मात्र स्पष्ट दिसले. मला आता उठायचं होतं पण उठताच येत नव्हतं. मी खूप प्रयत्न करत होतो पण मला शक्य होतं नव्हतं. शेवटी मी सगळी ताकद लावून ओरडलो “ अब्बा ये देखो मेरे बाजू मे आकर बैठा है ये.. उठाओ इसको.. “ माझे असे झोपेत बोलणे ऐकूण बाबा धावत आले आणि विचारू लागले “कौन बैठा है..? कहा है..?” मी त्या खुर्ची कडे बोट दाखवत इशारा केला तसे त्यांनी ती खुर्ची उचलून थेट बाल्कनीत नेऊन फेकली. आता पर्यंत मला वाटत होतं की जे घडलं ते स्वन होतं. पण नाही.. कारण काही वेळा पूर्वी घडलेला प्रसंग प्रत्यक्षात घडला होता. करण माझ्या बाबांच्या चेहऱ्यावरची भीती मला सगळे काही सांगून गेली.
ते लगेच जाऊन एक उदी घेऊन आले आणि काही तरी बोलून माझ्यावर फुंकले. तेव्हा कुठे मला शांत झोप लागली. पण हे सगळं इतक्यात संपणार नव्हतं. खरा भयाण प्रसंग तर पुढे घडणार होता. दुसऱ्या दिवशी सकाळी मी त्या मित्राच्या अंत्य विधी ला गेलो. आणि आदल्या रात्रीचा प्रसंग जवळ जवळ सगळं विसरून गेलो एखादे वाईट स्वप्न समजून. माझा तो मित्र क्रिश्चन असल्यामुळे चर्च मध्ये मास झाले, प्रेयर्स झाले. त्याची बॉडी कॉफ़ीन मध्ये होते. चर्च चे फादर म्हणाले की लास्ट राईट्स आहेत, तुम्हाला पाहायचे असेल तर त्याला पाहून घ्या. तेव्हा आम्ही उठलो आणि जवळ जाऊ लागलो. मी जस जसे जवळ जाऊ लागलो तसे मला खूप उग्र वास येऊ लागला. माहित नाही कसला. पण तो वास यायला सुरुवात झाली आणि माझी दृष्टी धूसर होऊ लागली. पण स्वतःला सावरात कसे तरी त्याच्या जवळ गेलो. आणि जसे त्याच्या बॉडीला पाहिले तसे मी जागेवरच स्तब्ध झालो. डोक्यात झिंण झिण्या येऊ लागल्या, तोंडातून शब्द चं फुटत नव्हते.
कारण त्याची बॉडी संपूर्ण पांढऱ्या रंगाच्या सूट मध्ये होती. चर्च च्या भिंती आतून पांढऱ्या त्यात कॉफीन आतून पांढरे असल्यामुळे खूप प्रखर उजेड जाणवत होता. आणि त्यामुळे त्याचा चेहरा अगदी प्रखर जाणवत होता. अगदी तसाच जसा काल रात्री त्या खुर्चीवर बसलेल्या त्या.. मला काहीच सुचत नव्हतं. म्हणजे काल रात्री खरंच माझा मित्र माझ्या रूम मध्ये आला होता..? सगळे आटोपल्यावर मी सरळ बाबांकडे गेलो आणि त्यांना सगळं सांगितले. ते मला एका मानलेल्या मौलाना कडे घेऊन गेले. मी त्यांच्या समोर जाऊन बसलो. त्यांनी मला पाहिलं आणि हसले. मग म्हणाले की तू शेवट पर्यंत थांब. सगळ्यांचे झाल्यावर बोलतो तुझ्याशी. तिथे बरीच लोकं आली होती. सगळ्यांचे होई पर्यंत रात्री चे 12 वाजत आले. जसा माझा नंबर आला मी काही बोलण्याच्या आधीच त्यांनी मला विचारले “आया था ना वो कल रात को तेरे घर पे..? दिखा था ना तेरेको..?”
इतक बोलून त्यांनी एक स्मित हास्य केलं आणि बोलले “ वो तेरेको मिलने आया था क्योंकी तू उसका अच्छा दोस्त था ना.. आखिरी मुलाकात लेने आया था वो तेरी.. आज के बाद नही सतायेगा तेरेको.. तू आराम से घर जा.. “ ते असे बोलल्यावर मी घरी आलो. त्या नंतर तो मला कधीच दिसला नाही पण आज ही कधी कधी मला वाटत की तो माझ्या आस पास च आहे.