अनुभव – तन्मय

मी IT मध्ये काम करतो. एका मोठ्या फिनटेक कंपनीत. तसं ऑफिस कल्चर भारी आहे, पण एक गोष्ट नेहमी खटकते – नाईट शिफ्ट. तेव्हाचं बोलतोय, जेव्हा मला २ आठवड्यांसाठी रात्री ११:१५ ते सकाळी ८ पर्यंतची शिफ्ट मिळाली होती. पहिल्या दोन रात्री छान गेल्या. ऑफिसमध्ये मोजकाच स्टाफ, शांतता, आणि थोडा वेगळाच एकांत. पण तिसऱ्या रात्री… काहीतरी घडलं. जे मी या आधी कधीच अनुभवलं नव्हतं.  ती रात्र मला अजूनही पूर्ण आठवते. वेळ होती रात्री २:४० ची. मी लॅपटॉपवर लॉग्स मॉनिटर करत होतो. त्याच वेळी, टॉयलेटला जावसं वाटलं. आमच्या फ्लोअरवर त्या वेळेस मी एकटाच होतो.

बाकी टीम दुसऱ्या सेक्शनमध्ये होती. टॉयलेटच्या कॉरिडॉरमध्ये नेहमी एक हलकासा आवाज असतो- AC चा, किंवा वॉटर ड्रिपचा. पण त्या दिवशी एक विचित्र शांतता होती. कदाचित रात्र असल्यामुळे जास्तच शांतता जाणवत असावी. जसा मी आत शिरलो… मला वेगळाच थंडावा जाणवला, ऑफिस AC पेक्षा ही जास्त.. मी वॉशरूम ला जाऊन आलो आणि वॉशबेसिन मध्ये हात धुवत होतो. तितक्यात मागून दरवाजा उघडून आत आलं. मी आरशात पाहिलं… पण मागे तर काहीच नव्हतं. पण त्या आरशाच्या कोपऱ्यात, एक हलकीशी हालचल जाणवली – जणू कुणाचं सावट आरशात आहे… पण ते दिसत नाहीये. मी पटकन बाहेर पडलो. मी माझ्या डेस्कवर परत आलो. 

वेळ रात्री ३:१५

लॅपटॉपमध्ये एरर अलर्ट होता. एक production लॉग अचानक disconnect झाल्याचा – ते server सेक्शन फक्त आमच्या कंपनीतल्या जुन्या बिल्डिंगमध्ये होतं, जिथं आता कोणी जात नव्हतं. तरी पोलिसायस नुसार मला तिथं जावं लागलं. त्या बिल्डिंगमध्ये जायचा रस्ता खूप शांत आणि आंधरलेला आहे. Security कार्ड swipe करून मी आत गेलो. त्या सेक्शनमध्ये पाऊल टाकताच एक दाट, धूळकट वास आला. लाईट्स फ्लिकर होत होत्या. म्हणून मी फोनचा फ्लॅश लाईट सुरु केला. ज्याठिकाणी server रूम आहे, तिथं पोचल्यावर मला जाणवलं की दरवाजा अर्धवट उघडा आहे – जो नेहमी लॉक असायचा.. मी हळूहळू आत गेलो. मशीन ठीक होती. पण log-in करताना लक्षात आलं की keyboard वर धूळ साचलेली नाही होती जणू कोणीतरी नुकताच वापर केलाय.

तेवढ्यात माझ्या पाठीमागे खुर्ची सरकल्याचा आवाज झाला आणि मी दाचकलो. कारण त्या रूम मध्ये कोणीही नव्हते आणि दरवाजा माझ्या समोर होता. धड धडत्या काळजाने मी मागे वळून पाहिलं तर एक काळसर धूसर आकृती उभी होती. फारसं स्पष्ट नाही, पण चक्क माझ्याकडे पाहतंय अशी भावना झाली. मी ओरडलो पण भीतीमुळे तोंडातून आवाज निघालाच नाही. मी तिथून धावत बाहेर आलो. माझ्या सेक्शन मध्ये येउन सरळ लॉगऑऊट केलं, बॅग उचलली आणि घरी निघून आलो. दुसऱ्या दिवशी कोणीही काही बोललं नाही. पण त्या लॉग्समध्ये एक विचित्र timestamp होता – रात्री ३:१३ चा. आणि user ID? “admin_old”.

आमचा admin ३ वर्षांपूर्वी त्या सेक्शनमध्ये काम करत होता आणि त्याचा अपघात… तेव्हाच झाला होता. त्यानंतर मी नाईट शिफ्ट पुन्हा कधीच घेतली नाही. पण कधी कधी, सकाळी लवकर ऑफिसमध्ये गेलो, तरी वाटतं… तो अजूनही तिथं आहे. आजही त्या बिल्डिंगमध्ये कोणी एकट जात नाही.

Leave a Reply