तारीख 22 मे 2015. मी आणि माझी फॅमिली पालघर हुन ताई कडे पूजे साठी निघालो होतो. प्रवास खूप छान सुरू झाला. दादा ड्राइव्ह करत होता आणि मी, मॉम, डॅड सगळे खूप च एन्जॉय करत होतो. अहमदाबाद हाय-वे क्रॉस केला आणि आम्ही नाशिक हाय-वे ला लागलो. छान घाट लागत होते आणि आम्ही खूप च एन्जॉय करत होतो. 

दुपार झाली आणि आम्ही थोडा हॉल्ट घेऊन मग पुढचा प्रवास करायचे ठरवले. दुपारी जेवण उरकले , थोडा आराम ही झाला आणि आम्ही संध्याकाळी पुढच्या प्रवासाला निघालो. GPS  वापरत असल्यामुळे आम्हाला अपेक्षेपेक्षा जरा जास्तच उशीर झाला. रात्रीचे 12.30 होऊन गेले होते आणि आम्ही कसारा घाटात येऊन पोहोचलो. डॅड ना झोप येत होती म्हणून मी त्यांना म्हंटले की तुम्ही मागे येऊन बसा मी दादा सोबत पुढे बसते. दादा ने गाडी थांबवली आणि आम्ही उतरून जागा बदलली. दादा आणि मी मस्त गप्पा मारत चाललो होतो. हळू आवाजात गाणी ही चालू होती पण मॉम आणि डॅड ना गाढ झोप लागली होती म्हणून मी गाणे बंद केले.

घाट सुरू झाला होता. मी बाहेर बघत होते आणि दादा ड्राइव्ह करत होता. घाटात काळाकुट्ट अंधार होता आणि स्मशान शांतता पसरली होती. कार हेड लाईट्स चा प्रकाश जिथे पडेल तोच परिसर दिसत होता. त्या व्यतिरिक्त काहीच नजरेस पडत नव्हते. अचानक दादा मला म्हणाला “छोटी तुला वाटत नाही का आपण एकाच ठिकाणी पुन्हा पुन्हा येतोय आणि तिथेच फेऱ्या मारतोय”. मी म्हणाले “नाही रे दादा अस काय बोलतोयस”. दादा नंतर काहीच बोलला नाही. बहुतेक मी घाबरेन असे त्याला वाटले असावे. 

तेवढ्यात आमचे बोलणे ऐकून डॅड जागे झाले आणि त्यांनी विचारले “काय झालं. आपण रस्ता चुकलोय का?.” दादा म्हणाला “नाही.. पण आपण एकाच एकाच ठिकाणी येऊन पोहोचतोय. किती वेळ झाला मी ड्राइव्ह करतोय पण हा सरळ रस्ता संपतच नाहीये. एखादे तरी वळण यावे पण असे वाटतेय की आपण पुन्हा त्याच ठिकाणी येतोय. आमच्या बोलण्याने आई ला ही जाग आली. मी आणि माझी आई आम्ही खूपच भित्रे आहोत त्यामुळे आई खूपच घाबरली होती. तिने डॅड ना सांगायला सुरुवात केली “अहो काय झालं.. मी म्हणत होते कुठे तरी थांबुयात पण तुम्ही ऐकले नाही.. आता हे काय झालंय”

दादा म्हणाला मी बघतो काय झालं ते. डॅड ना कळून चुकले होते की नक्की काय झालंय. ते म्हणाले “गाडी बंद करू नकोस आणि खाली ही उतरू नकोस, आपण बघूया किती वेळ असे होतेय”. भीती निघून जावी आणि होणाऱ्या प्रकारा कडे दुर्लक्ष व्हावे म्हणून मी कानात इअर फोन्स टाकले आणि काही तरी ऐकत बसले. पण कसले काय, मनात सतत तेच विचार येत होते म्हणून मी इअर फोन्स काढून पुन्हा त्यांचे बोलणे ऐकत बसले.

माझा दादा ही घाबरला होता पण तो अजिबात तसे दाखवत नव्हता. अचानक एक ठिकाणी आल्यावर गाडी ला कसला तरी जोरात झटका बसला. आम्ही सगळेच दचकलो. आता मात्र A.C. ऑन असूनही मला घाम सुटला. माझे लक्ष बाहेरच होते. कार च्या हेड लाईट्स चा प्रकाश एका झाडावर पडला. तिथे एक लहान मुलगी उभी असल्याचा मला भास झाला आणि माझ्या अंगावर सरर्कंन काटा उभा राहिला.

मी दादा ला म्हणाले की बघ तिकडे कोणी तरी आहे. दादाच लक्ष नव्हते म्हणून गियर वर ठेवलेल्या हातावर मी मारत पुन्हा म्हंटले “तिकडे बघ काय तरी आहे”. बाबा ओरडले आणि आई ही बोलली “बघू नकोस”. पण दादा आणि मी ते नक्की काय आहे हे बघण्याच्या नादात होतो. आम्हाला कळलं होतं की ते काय बोलतील आणि दादा ला तसे ही या गोष्टींवर अजिबात विश्वास नव्हता. तो म्हणाला “काय बाबा, भूत वैगरे काही नसते.. एखाद जनावर असेल.. तुम्ही उगीच बोलताय बघू नका वैगरे.. उगाच आई ला आणि छोटी ला घाबरवताय”.. दादा ने ही त्या मुलीला पाहिले होते. 

जेव्हा त्याने त्या झाडाकडे हेड लाईट्स चा फोकस नेला तेव्हा ती मुलगी दिसेनाशी झाली आणि पुढच्याच क्षणी गाडी समोर उभी राहिली. दादा आणि मी इतक्या जोरात ओरडलो की तो आवाज, ती भीती, तो क्षण आजही विसरलो नाही. गाडी तिच्या जवळ येई पर्यंत ती आम्हाला नुसती पाहत होती. दादा ला कसलेच भान राहिले नव्हते. त्याने गाडी accelerate केली आणि जोरात घेतली. आम्ही सगळे देवाला प्रार्थना करत होतो. मी गाडीतल्या गणपती च्या लहान मूर्तीला हातात घट्ट धरले होते. ताई चे घर येई पर्यंत दादा भलताच घाबरला होता. आई झालेल्या प्रकारा बद्दल सगळ्यांना खूपच ओरडली. बाबा ही जास्त काही बोलले नाहीत.

एक क्षणी वाटून गेले की भीती पोटी आई ला काही तरी होईल पण गणपती बाप्पाची कृपा. आम्ही ताई कडे पोहोचलो. ताई कडे पूजा होती. आम्ही फ्रेश झालो, पूजा आटपली. मला अजूनही आठवतेय दुपारी जेवल्यावर आम्हा दोघांना भयंकर ताप भरला होता. अचानक असे काय झाले याचे कारणही उमगले नव्हते. आम्ही घडलेला प्रसंग ताई आणि जीजू ना सांगितला. अमावस्या असूनही आम्ही वेळेचं गांभीर्य लक्षात घेतले नाही आणि त्यामुळेच हा विचित्र अनुभव वाट्याला आला असे वाटल. त्यानंतर कधी ही अमावस्या आली की अजूनही तो प्रसंग आठवतो आणि अंगावर काटा उभा राहतो. आजच्या काळात या गोष्टींवर विश्वास ठेवणे कठीणच पण आम्ही जे अनुभवलं ते तर कधीच विसरू शकणार नाही. खरच कधीही निसर्गाशी खेळू नये कारण जर चांगल्या गोष्टी अस्तित्वात आहेत तश्या वाईट ही..

This Post Has 2 Comments

  1. Ira Ughade

    Great story

  2. वैष्णवी

    Nice story . कुठलीही गोष्ट वाचण्यात एक वेगळीच मजा येते . कदाचित गोष्ट वाचताना आपण एक वेगळ्या जगात प्रवेश करतो . त्या कथेत आपण स्वतःला कुठे तरी शोधू लागतो. तुम्ही आम्हाला स्टोरी वाचण्यासाठी उपलब्ध करून दिल्या बद्दल धन्यवाद .

Leave a Reply to Ira Ughade Cancel reply