अनुभव क्रमांक – १ – महेंद्र झुजम

अनुभव २०१३ सालचा आहे. आम्ही गावी नवीन घर बांधले होते आणि त्यासाठीच पूजा ठेवली होती. तसे गावात आधी आमचे जुने घर होते पण आम्ही ते तोडून त्या ठिकाणी नवीन घर बांधले होते. अजुन घराचे बरेच काम बाकी होते पण तात्पुरते राहायला म्हणून आम्ही पूजा घालून घेतली. सगळे कार्य नीट योग्य रित्या पार पडले. संध्याकाळी गावची सगळी मंडळी येऊन तीर्थ प्रसादाचा लाभ घेत होते. मी पूजेच्या ठिकाणी सकाळपासून बसून होतो. मला तहान लागली तसे मी आमच्या घराच्या मागच्या खोलीत पाणी प्यायला गेलो. 

मी पाणी पितच होतो तितक्यात तिथे मागच्या दारातून एक बाई आली आणि माझ्याकडे खुणा वून पाणी मागितले. मी त्यांना लगेच पाण्याचा एक ग्लास भरून दिला. त्या ते पाणी प्यायला आणि पुन्हा मागच्या दाराने निघून गेल्या. १-२ मिनिट होत नाहीत तितक्यात त्या पुन्हा आल्या आणि माझ्याकडे पाणी मागू लागल्या. मी पुन्हा त्यांना पाणी दिले. पण पुन्हा तेच. साधारण २-३ मिनिटाच्या अंतरावर त्या पुन्हा आल्या. तसे मी त्यांना विचारले “काय हो.. तुम्हाला तिखट वैगरे लागले का काही जेवणात?”. त्यांनी माझे बोलणे ऐकून न ऐकल्या सारखे केले आणि तिथून निघून गेल्या.

मला जरा विचित्रच वाटलं पण मी जास्त काही लक्ष दिलं नाही. दुसऱ्या दिवशी मी आमच्या घरा मागे असलेल्या काकूंच्या अंगणात खेळायला गेलो होतो. तसे तर रोजच त्यांच्या अंगणात खेळायला म्हणून आम्ही सर्व मित्र जमायचो पण त्या दिवशी खूप वेळ खेळून मला तहान लागली होती. म्हणून मी त्यांच्या घरात पाणी पिण्यासाठी गेलो आणि तेव्हा माझे लक्ष त्यांच्या घरात लागलेल्या प्रतीमेकडे गेले आणि मी काही क्षण स्तब्धच झालो. माझ्या सर्वांगाला घाम फुटू लागला कारण ती त्याच बाईची प्रतिमा होती जीला मी काल पाणी दिले होते. मी काहीच न बोलता थेट धावत घरी आलो आणि अंथरुणात पडून रडू लागलो. 

भीतीमुळे मला ताप भरून आला होता. आई ने मला विचारल्यावर मी सगळा घटनाक्रम तिला सांगितला. त्यावर ती मला काहीच बोलली नाही. पण लगेच तिने हा प्रकार शेजाऱ्यांच्या कानावर घातला आणि ते सर्व जण लगेचच आमच्या घराजवळ असलेल्या विहिरीवर गेले. तिथे जाऊन त्यांनी नारळ दिला. साधारण २-३ दिवसांनी माझा ताप निवळल्यावर आईने मला सगळे सांगितले. काही वर्षांपूर्वी त्या बाईंनी जवळच्या विहिरीत उडी मारून जीव दिला होता त्यामुळे त्या विहिरीवर नारळ द्यावा लागला, आता घाबरायचे काही कारण नाही. तू आता घाबरु नकोस. पण माझ्या सोबत घडलेला प्रकार भयानक होता त्यामुळे पुढचे बरेच दिवस मी त्या गोष्टीचा धसका घेतला होता. मात्र त्या नंतर त्या बाई मला आज पर्यंत कधीच दिसल्या नाहीत आणि पुन्हा दिसुही नयेत अशीच अशा करतो. 

अनुभव क्रमांक – २ – सौरभ श्रीनिवास

मी माझ्या गावी गेली होतो. गावात शेतीचे काम बाकी होते म्हणूनच मला माझ्या वडिलांनी गावाला बोलावले होते. त्या वेळी बाजरी ची शेती करायचो. बाजरीचे पीक संपूर्ण कापून शेतात ठेवले होते. ज्या दिवशी मी गावात पोहोचलो त्याच्या दुसऱ्या दिवशी माझे बाबा आणि काका बियाणे आणायला शहरात निघून गेले. शेतात लक्ष द्यायला दुसरे कोणीही नव्हते म्हणून मी माझ्या आजीला म्हणालो की मी आज रात्री शेतावर जातो. तसे आजी काळजीपोटी म्हणाली “आज नको जाऊस.. आज अमावस्या आहे.. आणि आपल्या गावात अमावस्येला रात्री कोणी शेतावर जात नाही”. 

तसे मी हसतच आजीला म्हणालो “काय ग आजी.. असे काही नसते.. मी शहरात राहतो आणि या अश्या गावाकडच्या गोष्टी मला पटत नाही तुला माहितीये.. आणि जे व्हायचे असेल ते होऊ दे पण मी आज रात्री जाणारच..”. गावातल्या भागात अंधार पडला की लगेच शुकशुकाट व्हायला लागतो. मी जेऊन घेतले आणि सोबत थोडे जेवण पार्सल ही करून घेतले. म्हणजे शेतात जाऊन रात्री भूक लागली तर निवांतपणे खाता यावे. साधारण ८-८.१५ ला निघालो असेन. अर्ध्या तासात शेतात येऊन पोहोचलो. मित्राला फोन लावला आणि गप्पा करत बसलो. बोलून झाल्यावर ११ वाजता मी फोन ठेवला. पुन्हा भूक लागली होती म्हणून पार्सल आणलेले जेवण खाल्ले आणि मोबाईल मध्ये मूवी पाहू लागलो. 

शेतात थंडगार वारा वाहत होता. पोटभर जेवलो ही होतो त्यामुळे झोप कधी लागली कळलेच नाही. मध्यरात्र उलट ली असावी. अचानक मला एक आवाज ऐकू येऊ लागला. तो आवाज माझ्या अगदी शेजारी कोणी तरी बसले आहे आणि आवाज देतेय असे वाटू लागले. गाढ झोपेत असल्यामुळे डोळे उघडत नव्हते. पण तरीही मी मोबाईल मध्ये वेळ पहिली आणि खाडकन डोळे उघडले. रात्रीचे दीड वाजून गेले होते. माझे लक्ष शेजारी गेले आणि माझी वाचाच बंद झाली. माहीत नाही माझी बाजूला कोण उभ होत. पण त्याच्या चेहऱ्यातून प्रचंड रक्तस्त्राव होत होता. ते रक्त त्याच्या जवळजवळ शरीरभर पसरले होते. 

असे वाटत होते की एखाद्या हिंस्र जंगली श्वाप दाने आपल्या धार धार नख्यानी त्याच्या चेहऱ्यावर वार केले आहे. चेहऱ्यावरच्या त्वचेचे अक्षरशः लचके लोंबकळत होते. मी काय पाहतोय तेच कळत नव्हते. मी खाटेवर झोपलो होतो पण हा भयानक प्रकार पाहून मी खाटेवरून खाली पडलो. पुढे कसलाही विचार न करता मी सरळ माझ्या घराच्या दिशेने धाव घेतली. धपडपत धापा टाकत मी सतत धावत होतो. मला त्या भागातून जमेल तितके लांब जायचे होते आणि घरी पोहचा यचे होते. पण मला वाटेत एक देऊळ दिसले आणि मी जास्त विचार न करता त्या देवळात जाऊन पडलो. 

धावत आल्यामुळे मला इतकी धाप लागली होती की माझा घसा संपूर्ण कोरडा पडला होता. पोटात कळ येत होती. त्यात मी इतका घाबरलो होतो की मे काही क्षणात बेशुध्द झालो. सकाळ झाली तेव्हा आजूबाजूच्या आवाजाने जाग आली तसे मी पुन्हा धावतच घरी गेलो. आजी ला जाऊन मिठीच मारली आणि घडलेला सगळा प्रकार सांगितला. तेव्हा आजीने मला समजावून सांगितले. मी तुला म्हणत होते की जाऊ नकोस पण तू माझे अजिबात ऐकले नाहीस. ते जे काही आहे ना ते दर अमावस्येला नेहमी दिसते. म्हणून आपल्या गावात त्या रात्री कोणीही शेतावर जात नाही. 

त्या रात्री मुळे मला अश्या अनेक गोष्टींवर विचार करायला भाग पाडले की अश्या गोष्टी ही या जगात आहेत. 

अनुभव क्रमांक – ३

साधारण २० वर्षांपूर्वीची ची गोष्ट आहे. २००० सालची. माझे वडील त्या काळी रिक्षा चालवायचे. त्या दिवशी ते दुपारी लवकर आले होते. त्यामुळे रात्री ची ट्रीप मारायची असे ठरवले. रात्री जेवायला बसलो होतो तेव्हा काही दिवसांपूर्वी झालेल्या एका भिषण अपघाताचा विषय निघाला. आमच्या भागात एका पुलावरून लग्नाला चाललेल्या वरातीच्या बस चा पुलावरून खाडीत पडून अपघात झाला होता. बरेच लोक जागीच मरण पावले होते. अचानक असे काही होईल याची पुसटशी कल्पनाही त्यांना नव्हती. मी जास्त विचारपूस करू लागलो तसे वडिलांनी विषय बदलला. 

जेवण वैगरे आटोपले तसे माझे वडील रिक्षा घेऊन ट्रीप मारायला निघाले. आमच्या कॉलनी तून बाहेर पडले आणि त्यांना लगेच एक भाडे मिळाले. जाताना काही वाटले नाही पण त्यांना परत यायला बरीच रात्र झाली. येताना त्या पुलावरून यावे लागणार होते. काही वेळापूर्वी झालेले संभाषण आठवले आणि त्यांच्या मनात एक अनामिक भीती निर्माण झाली. रिक्षा जस जशी त्या पुलाजवळ जवळ येऊ लागली तसे त्यांना घाम फुटू लागला. पुढे जे दिसले त्याची त्यांनी कधी कल्पनाही केली नव्हती.

त्या पुलावर जवळपास १०-१५ माणसं, बायका आणि लहान मूल उभी होती. रिक्षा ला हात दाखवून थांबवत होते. सगळ्यात विचित्र गोष्ट म्हणजे रात्री चे २ वाजले होते आणि त्या पुलाच्या परिसरात जवळपास २-३ किलोमीटर जवळ साधी वस्ती ही नव्हती. पण मग इतके सगळे लोक कुठून आणि कसे आले हेच कळत नव्हते. सगळे अगदी नवीन कपडे वैगरे परिधान करून रस्त्या कडेला उभे होते. त्यांना पाहून ते प्रचंड घाबरले. त्यांनी ठरवले की काही झाले तरी रिक्षा थांबवायची नाही. ते त्या पुलावरून त्यांच्या समोरून जाऊ लागले. तसे ते सगळे त्यांच्या रिक्षासोबत धावत येऊ लागले. त्यांचे रूप बदलले होते. 

त्यांनी देवाचे नाव घेत रिक्षाचा वेग वाढवला आणि सुसाट त्या रस्त्यावरून निघाले. पण ते सगळे अतिशय वेगात धावत रिक्षाच्याही पुढे जाऊन लागले आणि समोर येऊ लागले. पण एखाद्या सावली सारखे ते अदृश्य होत होते. त्यांना कळतच नव्हते की आपल्या सोबत हे काय घडतंय. पुढच्या काही सेकंदात ते त्या पुलावरून बाहेर पाडले आणि त्यांनी रिक्षाच्या दोन्ही आरश्यातून मागे पाहिले. पण मागे दिसला तो फक्त निर्मनुष्य पुल.. त्या पुलावर एक चिटपाखरूही नव्हते. घरी आल्यावर माझे वडील आजारी पडले होते. ही घटना सांगताना माझ्या वडिलांचा चेहरा मला आजही अगदी स्पष्ट आठवतोय. त्या नंतर चे काही दिवस आम्ही भीती च्याच सावटाखाली घालवले. पण हळु हळू काळ पुढे सरकत गेला तसा त्या गोष्टीचा विसर पडत गेला. पण आजही ती रात्र आठवली आणि सगळ्या आठवणी अगदी नजरें समोरून जश्याच्या तश्या उभ्या राहतात. 

Leave a Reply