अनुभव – चैतन्य पाटील

हा प्रसंग मी आणि माझ्या ५ मित्रांसोबत नोव्हेंबर २०१९ मध्ये घडला होता. हिवाळा असल्यामुळे आम्ही महाबळेश्वर ला ट्रीप प्लॅन केली होती. आम्ही सकाळी साधारण १० वाजता निघालो. महामार्गावर खूप ट्रॅफिक असल्यामुळे आम्हाला खूप उशीर झाला. साधारण ७ वाजता आम्ही पाचगणी ला पोहोचलो. थंड हवेचे ठिकाण असल्यामुळे कमालीची थंडी वाजत होती. त्यात या काळात फिरायला येणाऱ्यांचे प्रमाण जास्त असल्याने आम्हाला कुठे ही रूम मिळत नव्हती. बराच वेळ बरेच लॉज फिरून झाले पण कुठे ही रूम्स मिळत नव्हत्या. शेवटी एके ठिकाणी चौकशी केल्यावर कळले की शहरापासून लांब एक बंगला आहे तो रेंट वर मिळेल. बरीच रात्र झाली होती आणि त्या बंगल्यावर जाण्यावाचून आमच्याकडे दुसरा काही पर्याय नव्हता. तसे आम्ही त्यांच्याकडून पत्ता घेतला आणि त्यांचे आभार मानून तिथून निघालो. हळू हळू आम्ही वस्ती पासून दूर जाऊ लागलो आणि डोंगराळ भागात आलो. 

रस्ता ही अगदी अरुंद होत चालला होता. त्यात गडद अंधार. मला तर शंका येऊ लागली की इतक्या आतल्या भागात तो बंगला असेल की आपण रस्ता भरकटलो आहोत. मी मित्रांना काही सांगणार तितक्यात आम्हाला त्या रस्त्यावर एक मुलगी चालत जाताना दिसली. तिला पाहून आम्ही जरा चकित च झालो की एवढ्या रात्री ते ही या निर्मनुष्य रस्त्यावर ती काय करत असेल. आम्ही तिच्या जवळ जाऊन गाडी थांबवली आणि विचारले की तुम्हाला मदत हवी आहे का.. आम्ही तुम्हाला कुठे पुढे रस्त्यात सोडू का.. तसे तिने फक्त मान डोलावून होकार दिला आणि आमच्या गाडीत येऊन बसली. ती काहीच बोलत नव्हती. आम्ही सगळे मित्र ही अगदी गप्प होतो. एवढ्या वेळ चालणाऱ्या गप्पा ही आम्ही थांब वल्या होत्या. काही अंतर पुढे गेलो आणि समोरचे दृश्य पाहून आमची वाचाच बंद झाली. तीच मुलगी रस्त्यात उभी होती. मी झटकन बाजूला वळून पाहिले. ती आमच्या गाडीतून दिसेनाशी झाली होती. आम्ही प्रचंड घाबरलो. मी मित्राला म्हणालो अरे विचार कसला करतोय गाडीचा वेळ वाढव. 

त्याने रस्त्यात चालत असलेल्या मुलीच्या अगदी बाजूने गाडी काढली आणि आम्ही पुढे निघून गेलो. काय घडलं ते कळलं नाही. पुढच्या काही मिनिटात आम्ही त्या बंगल्या जवळ येऊन पोहोचलो. पटापट गाडीतून उतरून गेट मधून आत शिरलो. तितक्यात एक व्यक्ती भेटला. बहुतेक मालक किंवा केअर टेकर होता, नीट से आठवत नाहीये. त्यांनी आमचे चेहरे पाहून विचारले काही प्रोब्लेम झालाय का. तसे आम्ही रस्त्यात घडलेला भयानक प्रकार सांगितला. त्यावर त्याने काही सांगितले नाही फक्त रेंट बद्दल सांगितले आणि म्हणाला की आज अमावस्या आहे आत जाऊन झोपा. आम्ही आधीच घाबर लो होतो त्यामुळे जास्त विचार न करता रूम मध्ये निघून गेलो. त्या रात्री कोणाला ही झोप लागत नव्हती. आणि त्यात आमच्यासोबत घडलेला प्रकार एवढ्यावर च थांबणार नव्हता. रात्री आम्हाला बंगल्याच्या बाहेरून चित्र विचित्र आवाज येऊ लागले. रडण्याचा, किंचाळण्याचा. भास तर नक्कीच नव्हता कारण आम्हाला सगळ्यांना ते आवाज ऐकू येत होते. ती रात्र कशी बशी काढली. दुसऱ्या दिवशी सकाळीच आम्ही त्या एका रात्री चे रेंट देऊन तिथून बाहेर पडलो. 

सकाळी आमच्या नशिबाने आम्हाला दुसरी रूम ही मिळाली. पण आमच्यातले दोन मित्र रोहित आणि कुणाल ला ताप भरला होता. त्यामुळे संपूर्ण ट्रीप चा बट्ट्या बोळ झाला. नंतर आम्ही पुढचे प्लॅन्स रद्द करून घरी परतलो.

Leave a Reply