लेखिका – स्नेहा जाधव

आज पुन्हा एकदा मला शाळेत जायला उशीर झाला. शाळा सकाळची असल्यामुळे लवकर उठायला लागायचे. पण आज मात्र ऊठायला खूप ऊशीर झाला. तरीही कशीबशी ऊठले आणि पटापट तयार झाले, काही न खाता तसेच निघाले. शाळा लांब असल्यामुळे  झपाझप पावले टाकत निघाले. इतक्यात मागुन थॉमस अंकलनी हाक दिली आणि गाडी थांबवून मला म्हणाले, चल बस तुला सोडतो शाळेत… मी ही बसले आणि आम्ही काही मिनीटातचं शाळेत पोहचलो. अंकलना थॅंक्स म्हणुन मी धावतचं शाळेत गेले, नंतर तेही गेले. आमच्या कॉलनीत थॉमस अंकल सर्वांचे आवडते… आम्हा लहान मुलांना नेहमी काही ना काही खायला द्यायचे. ते परदेशात कामाला असल्यामुळे त्यांच इथे कधी तरीच येणं व्हायचे. पण जेव्हा यायचे तेव्हा आम्हाला परदेशातून भरपूर खाऊ आणायचे. त्यांच्या घरी ते, त्यांची बायको जेनी आणि त्यांच छोटसं बाळ… असे ते तिघं गुण्यागोविंदाने राहायचे. आंटी ही स्वभावाने मनमिळाऊ… मी तर शाळेतून आले की त्यांच्याच घरी जायचे आणि त्यांच्या बाळाशी खेळायचे. ख्रिसमसला तर ते सगळ्या कॉलनीला मोठी पार्टी द्यायचे, सगळे जण खूप मज्जा करायचे.

                   त्यांनी सर्वांना आपलसं केलं होत. कॉलनीतल्या सगळ्यांशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते. पण नियतीच्या मनात मात्र काही तरी वेगळचं होतं. अंकलना त्यांच्या कामामुळे घरी वेळ देता येत नसे, जास्त करुन ते परदेशातचं असायचे. त्यामुळे जेनी आंटीही कंटाळायची. या कारणांनी दोघा नवरा – बायको मध्ये खटके ऊडायचे. कधी कधी तर क्षुल्लक कारणावरुन त्यांचे वाद होत असतं. त्यांच्या हसत्याखेळत्या घराला कुणाची तरी नजर लागली असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही. हळु हळु त्यांच्यात होणारी रोजची भांडणं आजुबाजुच्या लोकांना कळायला लागली. काहीनी तर दोघांना समजावले सुद्धा पण दोघां पैकी कुणी ही ऐकायला तयार नव्हते. या दोघांच्या भांडणांत त्या बाळाचे खूप हाल व्हायचे, त्या बाळाकडे कुणाचेचं लक्ष नव्हते.

                    शेवटी एक दिवस त्यांचा असाच एक क्षुल्लक वाद विकोपाला गेला. संध्याकाळची वेळ होती. थॉमस अंकलच्या घरातून मोठमोठ्याने भांडणाचा आवाज येत होता. दोघेही एकमेकांना प्रत्युत्तर करत होते. त्यांच्या मोठ्या आवाजामुळे बाळही घाबरुनं ऊठलं आणि त्याने रडायला सुरवात केली. पण यांचा आवाज इतका होता की त्या बाळाचं रडणं कुणाला ऐकूचं आले नाही. दरवाजा आतून बंद असल्याने बाहेरुन कोणीचं मदत करु शकत नव्हते. शेवटी काही तासांनी आवाज शांत झाला आणि थॉमस अंकल रागाने लालबुंद चेहरा घेऊन तावातावाने निघून गेले. आम्ही त्यांच हे रुप पहिल्यांदाचं बघितलं. काही वेळ सर्वत्र शांतता पसरली. आम्हा सगळ्यांना वाटले की, यांच्यातले वाद आता मिटले… पण असे काहीही झाले नव्हते. 

घरात जेनी आंटी रडत होती. तिचं रडणं स्पष्ट जाणवून देत होतं की त्यांच्यात वादाची किती मोठी ठिणगी पेटली आहे…. तशी ती आपली आसवे पुसत ताडकन ऊठली आणि मनात कोणता तरी निर्धार करुन किचनच्या दिशेने निघाली. जाताना फक्त तिने एकदाच मागे वळून पाहिले, तर बाळ बिचारं रडुन रडुन झोपी गेल होत. तिचा निर्धार झाला होता तिने लगेच स्वतःला सावरल आणि पुढे निघाली. किचनमध्ये आल्यावर तिने आजुबाजुला पाहिले तिला खालच्या रॅकमध्ये रॉकेलने भरलेला कॅन दिसला. तोचं तिने ऊचलला आणि पटापट अंगावर ओतायला सुरवात केली‌, संपूर्ण कॅन रिकामा केला आणि जवळचं असलेला मॅचबॉक्स हातात घेऊन क्षणाचाही विलंब न करता तिने स्वतःला पेटवून घेतले…. आणि एकच भडका उडाला…. क्षणार्धात होत्याच नव्हत झाल. 

याची कुणाला पुसटशीही कल्पना नव्हती. मी सहजचं म्हणून त्यांच्या घरी आले. दरवाजा वाजवणार इतक्यात मला आतून कसला तरी वास आला. म्हणून मी खिडकीतून बघण्याचा प्रयत्न केला तर आतुन काही तरी जळाल्याचा धुर येत होता. मी लगेच शेजाऱ्यांना सांगितले तसे सगळे धावत आले आणि दरवाजा ऊघडण्याचा प्रयत्न करू लागले. अथक प्रयत्नांनी दरवाजा ऊघडला आणि समोरचे दॄश्य पाहून आम्ही सगळे गर्भगळीत झालो. विजेचा झटका लागावा तसे सर्वांग शहारल. जेनी आंटी एखादा वणवा पेटावा त्याप्रमाणे पेटत होती. लगेचच काहींनी पाणी ओतले तरीही आग काही केल्या विझत नव्हती. तर एका काकांनी बेडवर असलेलं ब्लॅंकेट तिच्या अंगावर गुंडाळलं आणि दवाखान्यात घेऊन गेले. 

पण संपूर्ण शरीर जळाल्याने तिचा वाटेतच प्राण गेला. आम्ही तिला पुन्हा घरी घेऊन आलो. कोणालाच आपले अश्रू अनावर झाले नाहीत. तिचं ते निपचित पडलेलं शरीर बघून कोणालाही त्रास होज साहजिक होत. मीचं काय बाकीचे सुद्धा धाय मोकलून रडायला लागले. सगळ्यांच्या रडण्याच्या आवाजाने बाळ ऊठल आणि आपल्या किलबिल्या नजरांनी आपल्या आईला शोधत होत. पण त्याला त्याची आई कुठेच न दिसल्यामुळे तोही रडायला लागला. लगेचच मी त्याला घेतले आणि शांत करायला लागले पण तो काही शांत होत नव्हता. ईतक्यात थॉमस अंकल आले आणि समोरच दृश्य बघून त्यांच्या पायाखालची जमिनच सरकली. त्या धक्क्याने त्यांचे हातपाय गळून गेले आणि त्यांचा तोल गेला. तितक्यात काही पुरुषांनी त्यांना सावरलं‌. 

थोड्या वेळाने पोलिस आले आणि घडलेल्या प्रकाराबद्दल विचारले. नंतर बॉडीचा पंचनामा केला आणि थॉमस अंकलना पोलिस स्टेशनला घेऊन गेले. ईतक्यात जेनीच्या घरचे आले होते. आपल्या मुलीला असे बघून त्यांच तर काळजाचं पाणी पाणीच झालं. पोलिस स्टेशनला त्यांची कसून चौकशी केली.. घरी आल्यानंतर त्यांनी जेनी आंटी चे अंत्यविधी केले. तो दिवस या सगळ्यात च निघून गेला. रात्र झाली… सगळीकडे निरव शांतता पसरली होती. संपूर्ण परिसर निद्रेच्या आहारी गेला होता.. पण मला मात्र झोप येत नव्हती. राहून राहून घडलेल्या प्रकाराची, जेनी आंटीची आठवण येत होती. मी अंथरुणातून उठले आणि बाहेर खिडकीजवळ येऊन बसले. त्यांचे घर आमच्या समोरच्या बिल्डिंग मध्ये होत आणि ते आमच्या खिडकीतून दिसायचे. मी एक टक त्या घराकडे बघत होते. 

तितक्यात मला त्यांच्या घरातून बाळाच्या रडण्याचा आवाज आला. बाळ खूप रडत होत कदाचित त्याला भुक लागली असावी. नंतर घरातल्यांनी त्याला बाटलीतल दूध देऊन शांत केल पण तो शांत होत नव्हता. मला खूप वाईट वाटत होत. तितक्यात मला त्यांच्या खिडकीजवळ कोणीतरी दिसलं.. अंधार असल्यामुळे नीट काही दिसत नव्हत. पण मी परत निरखून पाहिल तर मला एक बाई दिसली. केस मोकळे सोडले होते आणि ती त्या घराकडे हात करुन ऊभी होती. मला काहीच कळत नव्हते ती अशी का उभी आहे.. मला कळायला वेळ लागला नाही की हा प्रकार काही तरी वेगळाच आहे. मी घामाघुम झाले आणि घाबरुन घरात आले. मला घाबरलेलं बघून माझी मोठी बहिण ऊठली आणि मला विचारले, काय गं…. काय झालं एवढ घाबरायला. मी तिला काही न सांगता तिचा हात पकडून खिडकीजवळ घेऊन गेले आणि त्या दिशेला बोट दाखवत म्हणाले, ते बघ…. तिही समोरचं दृश्य पहातच राहिली. 

आम्हाला राहून राहून वाटत होत की ती बाई दुसरी तिसरी कोणी नसून जेनी आंटी आहे म्हणून. बहुतेक ती आपल्या बाळाच्या प्रेमापोटी आली असावी.. बाळ खूपच रडत होत पण ती काहीचं करू शकत नव्हती. आपल बाळ समोर असून सुद्धा ती त्याला घेऊ शकत न सा वी म्हणून ती सारखी त्या खिडकीजवळ फिरत होती. आम्ही दोघेही ती प्रकार धड धडत्या कळजने पाहत होतो. काही वेळाने ती थांबली आणि जवळच्या एका झाडाखाली मान खाली करुन शांत बसली.आम्हाला असे वाटले की तिने तिचे प्रयत्न थांबवले. तिला तिची चुक कळाली होती पण आता त्याचा काहीच फायदा नव्हता. डोळ्याचे पाते लवते न लवते ती अचानक दिसेनाशी झाली. ते भयानक दृश्य पाहून प्रचंड भीती वाटली पण त्याहून जास्त वाईट ही वाटले.. आता पुढे त्या बाळाचं आईवीना कस होणार याची चिंता वाटू लागली.

                  दुसऱ्या दिवशी सकाळी हा घडलेला प्रकार घरी सांगितला आणि घरच्यांना ही त्या बाळासाठी खूप दुःख झाल. सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे काही दिवसानंतर आमच्या भागातल्या लोकांकडून ऐकण्यात आले की, जेनी आंटी त्यांना पण दिसली…. पण तिने कोणालाचं काही केल नाही. जसजसे दिवस पुढे सरकत होते तसतसे लोक सुद्धा आपापल्या कामात व्यस्त होऊ लागले. हळु हळु घटनेचा विसर पडत गेला आणि सर्व काही पूर्वपदावर आले. काही महिन्यांनी थॉमस अंकल सुद्धा आपल्या बाळाला घेऊन परदेशात शिफ्ट झाले.

Leave a Reply