अनुभव – सुजित जाधव

मी राहायला मुंबई येथे आहे. माझे आजोबा हे भगत होते, भूतबाधा, काळी शक्ती यांपासून होणाऱ्या लोकांच्या समस्या सोडवायचे. त्यामुळे खूप लहान असल्यापासून मी हे सगळं अनुभवतो आहे. प्रसंग तेव्हाचा आहे जेव्हा मी ११ वीत होतो. त्या दिवशी मला कॉलेज मधून घरी यायला बराच उशीर झाला होता. कारण मित्राचा वाढदिवस असल्यामुळे तो आम्हाला ट्रीट देणार होता. त्यामुळे घरी परतायला ११.३० वाजून गेले. मी लोकल मधून स्टेशन वर उतरलो आणि बाहेर पडलो. आता उशिरा घरी गेलो की बाबा ओरडणार म्हणून मी जवळच जुनी रेल्वे कॉलनी आहे त्याच्या पडक्या चाळी च्या परिसरातून जाणारा शॉर्टकट निवडला. जेणेकरून लवकर पोहोचता येईल. खरं तर मला त्या वाटेवरुन माझ्या वडिलांनी दिवसा सुद्धा येण्या जाण्यास नकार दिला होता, पण ओरडा कोण खाणार म्हणून मी तिचं वाट निवडली. इतक्या रात्री साहजिक च तिथे कोणी दिसत नव्हत. मी हळु हळू चालत पुढे निघालो. तितक्यात डावीकडच्या एका झोपडीत मला थोडासा प्रकाश दिसला. ते बघून जरा हायस वाटल, मी एकटा नाही. घाबरायची काही गरज नाही. त्या वाटेवर सुकलेल्या पानांचा सडा पसरला होता. ती पान तुडवत मी घराच्या दिशेने निघालो. जसे मी त्या झोपडीच्या थोडे पुढे चालत आलो, मला माझ्या पावला व्यतिरिक्त दुसऱ्या पावलांचा आभास झाला. मी काहीसा दचकलो. 

एके क्षणी चालत चालत झटकन जागीच थाबलो. पण मागचा पावलांचा आवाज काही थांबला नाही. म्हणजे त्या वाटेवर मी एकता नाही कळल्यावर भीतीची एक लहर सर्वांगात उमटून गेली. मी मागे वळून पाहणार तितक्यात एक करडा आवाज कानावर पडला. “पोरा विडी आहे का..?” मला थांबण्यात आणि ते जे कोणी होत त्याला उत्तर देण्यात काडीचा ही रस नव्हता. मी सरळ पुढे चाल मांडली. तसे पुन्हा एक वाक्य कानावर पडलं आणि या वेळेस त्यात राग स्पष्ट जाणवला. “थांब.. विडी दे नाही तर जाऊ देणार नाही..” आता मात्र माझी चांगलीच तांतरली. मला आजोबांनी सांगितले होते की तुला जर अश्या एखाद्या प्रसंगाला सामोरे जावे लागले तर मागे वळून कधीच पाहू नको. एखादी युक्ती लढव आणि त्याला हवं ते दे पण त्याच्या कडे न पाहता. त्या आवाजातली घरघर मला स्पष्ट जाणवत होती. आणि सगळ्यात भयानक म्हणजे तो आवाज माझ्या हळु हळू जवळ येत होता. मी भीतीने संपूर्ण ओला चिंब झालो होतो. असा वाटत होत का आलो मी या वाटेने, वडिलांचे ऐकायला हवे होते. पण आता जो काय मार्ग काढायचा होता तो मला एकट्यालाच काढायचा होता. मी चालता चालता च एक पान उचलले. माझ्या शर्ट चे बटण तोडून एक पातळ धागा खेचून काढला. पान गुंडाळून त्याच्या भोवती तो धागा गुंडाळला म्हणजे तो आकार विडी सारखा वाटेल. 

मी हातात ती खोटी विडी धरून मागे न पाहताच त्याला दाखवली आणि हळूच वाकून खाली मागच्या बाजूला ठेवली. आता मला एक क्षण ही वेळ घालवायचा नव्हता. मी जिवाच्या आकांताने धावत सुटलो. ३-४ मिनिटात मी त्या बंद कॉलनी च्या गेट जवळ पोहोचलो तसा मागून आवाज आला “फसवल मला.. तुझा बाप ही सुटला माझ्या तावडीतुन आणि आता तू ही.. पण आज ना उद्या सापडशी लच..”  मी जीव मुठीत धरून धावत राहिलो आणि घरी पोहोचलो. वडिलांची माफी मागून रडू लागलो. घडलेला सगळा काही प्रकार सांगितला. ते आधी चिडले पण नंतर मला जवळ घेत घेत समजावत म्हणाले “पुन्हा त्या वाटेने कधी जायचे नाही, माझ्यासोबत ही असेच काहीसे घडले होते म्हणून मी तुला ताकीद दिली होती..”. दुसऱ्या दिवशी मला खूप ताप भरला. पुढचे ३-४ दिवस ताप ये जा करायचा. काही दिवसांनंतर मी पूर्ण बरा झालो. त्यांनतर मात्र मी पण केला की काही झालं तरीही पुन्हा त्या वाटेने जाण्याचा स्वप्नात ही विचार करणार नाही. 

Leave a Reply