मी एक टेक्स्ट टाईल इंजिनियर आहे. हा अनुभव मला कॉलेज मध्ये शिकत असताना आला होय. माझ्या कॉलेज ची इमारत चार मजले होती. आणि माझे क्लास रूम तिसऱ्या मजल्यावर होत. त्या मजल्यावर फक्त दोन च क्लास रूम होते. एक आमचा आणि ऐक फॅशन डिझाईन शिकणाऱ्यांचा. पण त्या ४ फ्लोअर पैकी तिसरा फ्लोअर सोडून कोणत्याच फ्लोअर ला दरवाजा नव्हता. आमची लेक्चर्स संध्याकाळी खूप उशिरा पर्यंत चालायची त्यामुळे एक्सट्रा लेक्चर असले की अंधार पडायच्या आत आम्हाला सेकंड फ्लोअर वर शिफ्ट करायचे. आणि तो फ्लोअर बंद करायचे. खर तर तसे का करायचे हा विचार माझ्या मनात कधी आला नव्हता. कारण मला वाटायचे की संध्याकाळी संपूर्ण कॉलेज चालू ठेवून काही उपयोग नाही आणि तसे ही बहुतेक कॉलेज रिकामे व्हायचे.

त्यामुळे सगळे बंद करायला खूप वेळ लागत असेल म्हणून हळु हळू ते काही मजले बंद करत असतील. एकदा त्या फ्लोअर वर फक्त आमचेच लेक्चर सुरू होते. आणि त्याच वेळेला पाण्याच्या मोटर चे काम चालू होते. त्यामुळे कॉलेज मध्ये पाणी येत नव्हत. शेवटचे लेक्चर असल्यामुळे ते संपायला नेहमी पेक्षा जरा जास्तच उशीर झाला. निघाल्यावर मी माझ्या मैत्रिणीला बोलले की मला जरा केस बांधायचे आहेत तर मी वॉश रूम ला जाणार आहे तू येतेस का. त्यावर ती बोलली की नाही, तू जाऊन ये मी थांबते तुझ्यासाठी. आता ती सोबत येत नाही म्हंटल्यावर मी एकटीच तिथे गेले. एव्हाना संपूर्ण कॉलेज कॅम्पस रिकामा झाला होता आणि त्या मजल्यावर ही कोणी नव्हते. आमचे शेवटचे लेक्चर संपल्यामुळे क्लास मधली सगळी मुलं मुली निघून गेले होते. 

मी आमच्या वॉश रूम मध्ये आले. सुरुवातीला १ मोठा आरसा होता आणि मग आत तीन रूम होत्या साहजिक च प्रत्येकाला दरवाजा होता. मी केस बांधून बाहेर आले तसे आतून पाण्याचा आवाज ऐकू आला. मला वाटले की मोटर चे काम पूर्ण झाले असेल आणि पाणी आले असेल. म्हणून मी आत पाहायला गेले. तो आवाज पहिल्या रूम मधून येत होता. म्हणून मी दरवाजा उघडून तो नळ बंद केला आणि बाहेर पडू लागले. तितक्यात दुसऱ्या रूम मधून नळाचा आवाज येऊ लागला. म्हणून मग मी परत आत जाऊन नळ बंद केला आणि लगेच पुढच्या क्षणी तिसऱ्या रूम मधला ही नळ सुरू झाला म्हणून तो ही बंद केला. मनात केले की मी नसते तर हे तिन्ही नळ सुरू च होते आणि बरेच पाणी वाया गेले असते.

तिन्ही नळ बंद करून मी दरवाजा बंद केला आणि तिथून बाहेर पडू लागले तसे पुढच्या क्षणी अचानक तिन्ही नळ पुन्हा सुरू झाले. भीती ने मी एकदम शहारले कारण मी स्वतः तिन्ही नळ नीट बंद केले होते. त्या वॉश रूम मध्ये च काय पण त्या संपूर्ण फ्लोअर वर माझ्या शिवाय दुसरे कोणीच नव्हते. माझ्या अंगावर भीती ने सरसरून काटा येऊन गेला. घाबरल्यामुळे मी धावतच बाहेर आले. माझ्या दोन मैत्रिणी तिथे उभ्या होत्या. त्यांना मी घडलेला प्रसंग सांगितला. त्या दोघी ही म्हणाल्या की घाबरु नकोस आपण जाऊन बघून येऊ. आम्ही तिघी पुन्हा तिथे गेलो, मी बाहेरच थांबले. त्या दोघींनी आत जाऊन पाहिलं तर नळाला पाणी आलंच नव्हतं. त्या बाहेर येऊन मला सांगू लागल्या की तुला भास झाला असेल. मी त्यांना समजावून सांगू लागले पण मी इतकी घाबरले होते की मला रडू आले. 

त्याच वेळेला कॉलेज चा शिपाई फ्लोअर बंद करायला आला. मला रडताना पाहून तो विचारपूस करू लागला की काय झालं. त्यावर मी त्याला ही सगळे सांगितले. तेव्हा तो जे काही म्हणाला ते ऐकून आम्ही तिघी ही प्रचंड घाबरलो. तो म्हणाला की तुमचे एक्स्ट्रा लेक्चर असले तुम्हाला दुसऱ्या फ्लोअर वर उगाच शिफ्ट करत नाहीत कारण तो फ्लोअर हॉन्टेड आहे. त्या फ्लोअर चे काम चालू असताना ३ कामगार पडून मेले होते त्या नंतर खूप जणांना भयानक अनुभव यायला लागले म्हणून अंधार पाडण्या आधी आणि कॅम्पस रिकामा होण्या आधी आम्हाला तो फ्लोअर रिकामा करून लॉक करायला सांगतात.

Leave a Reply