अनुभव माझ्या भावाना आला होता. साधारण चार साडे चार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. माझे गाव चारही बाजूंनी नदीने वेढलेले आहे. अगदी एखाद्या बेटासारखे आहे असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही. पूर्वीच्या काळी आमच्या गावातून दुसऱ्या गावी जायला नदीतून प्रवास करावा लागायचा. तेव्हा होडीचा वापर केला जात असे. पण नंतर गावाबाहेर एक पूल झाल्यापासून होडी चा वापर कमी झाला. आम्ही गुरव असल्यामुळे मंदिराची जबाबदारी आमच्या वर आमच्या घरी होती.  मंदिराची जबाबदारी आली की कोणाला ना कोणाला मंदिरात झोपायला जावे लागायचे.. नेहमी माझा चुलत भाऊ जायचा..

त्यावर्षी आमच्या घरी कार्यक्रम असल्यामुळे घरी भरपूर पाहुणे आले होते… घरी एवढ्या सगळ्या पाहुण्यांना झोपायला जागा नव्हती म्हणून माझे भाऊ आणि आत्ते भाऊ असे एकूण ४ जण झोपायला माझ्या चुलत भावासोबत मंदिरात गेले.. माझ्या चुलत भावा चे नाव अनिकेत. अनिकेत सोबत त्याचे गावातले २-३ मित्र ही सोबत होते. माझा भाऊ शुभम , आत्ते भाऊ हृषिकेश, माझे चुलत भाऊ सारंग व अनिकेत आणि चुलत भावाचे ३ मित्र असे एकूण ७ जन होते… जेवण आटोपल्यावर ते थेट मंदिरात गेले. त्यांना झोप लागत नव्हती म्हणून इथल्या तिथल्या गप्पा सुरू होत्या.

भावंडं बऱ्याच महिन्यांनी भेटली होती त्यामुळे गप्पांची मैफिल चांगलीच रंगली होती. कोणाच्या आयुष्यात काय चाललंय हे प्रत्येक जण सांगत होता… बोलता बोलता कधी १:३० वाजले त्यांचं त्यांना कळलं ही नाही… इतक्यात माझा आत्ते भाऊ बोलला की यार एकच ठिकाणी बसून कंटाळा आलाय.. चला जरा मंदिरा बाहेर जाऊन थोडं फिरून येवू.. सगळे तयार झाले आणि मंदिरा मागे गेले.. मध्य रात्र उलटून गेली होती त्यामुळे संपूर्ण गाव निद्रेच्या आहारी गेले होते. वातावरण अगदी शांत झालं होत. 

मंदिरा मागचा परिसर अतिशय रम्य होता. मागूनच संथपणे वाहणारी एक नदी आहे   त्या रात्रीच्या शांत वातावरणात नदीच्या पाण्याचा खळखळाणारा आवाज कानावर पडू लागला.. जो एक वेगळाच दिलासा देत होता. नदीच्या पात्रा पर्यंत जायला १००-१५० पायऱ्या आहेत.. खाली जाताना अंधारात दिसावं म्हणून पायऱ्यांच्या दुतर्फा मोठे दिवे लावले होते.. ते सगळे समोरच दृश्य पहात बसले होते. अधून मधून थंडगार वाऱ्याची झुळूक यायची आणि अंगाला स्पर्श करून जायची.. त्यात बाजूला असणाऱ्या झुडूपांचा सळसळणारा आवाज. 

इतक्यात माझा आत्त्ते भाऊ बोलला की “ही होडी इथे का बांधून ठेवली आहे रे?

यावर अनिकेत म्हणाला की “अरे… आता हीचा वापर करतात तरी कोण?? तो पूल झाल्यापासून हीचा वापर जवळ जवळ बंदच झालाय बघ… पोरं नदीवर पोहायला आली की वापरतात हिला… इथून होडीत बसून पलीकडच्या किनाऱ्यावर जातात आणि तिथून होडीतून उड्या टाकून या बाजूला येतात…. एवढाच तो काय हीचा उपयोग.. ते ही बराच आहे म्हणा.. पोरं वापरतात म्हणून अजून व्यवस्थित आहे अजून होडी.. नाहीतर केव्हाच खराब झाली असती….” 

माझ्या हृषिकेशला काय सुचलं काय माहित. तो बोलला “चला आपण जाऊ या होडीतून पलीकडे” पण अनिकेत पटकन त्याला अडवत म्हणाला “आता नको.. उद्या जाऊ.. आता खूप रात्र झाली आहे” 

यावर हृषिकेश जरा हसत अनिकेत ची चेष्टा करत बोलला ” का?? काय घाबरतो का यायला?? ” 

सगळेच हसू लागले.. अनिकेत थोडं गंभीर आवाजात बोलला “मी नाही घाबरत पण आता २ वाजत आलेत.. तुम्हाला इथलं काही माहीत नाही.. इतक्या उशिरा नको..” पण हृषिकेश काही ऐकेना.. त्याने सगळ्यांना तयार केलं आणि सगळे भरभर पायऱ्या उतरून खाली नदीच्या काठावर आले.. सारंग आणि त्याच्या मित्रांनी होडीचा दोरखंड सोडला आणि सगळे होडीत जाऊन बसले. सारंग आणि अनिकेत होडी चालवत होते..

वातावरण एकदम शांत होत त्यामुळे फक्त होडी चालवत असताना पाण्याचा होणारा मंद आवाज कानावर पडत होता. थंडी चे दिवस होते आणि त्यात पाण्याजवळ असल्याने थंडी वाजत होती.. काही मिनिटात ते सगळे नदीच्या मध्यभागी पोहोचले असतील.. वातावरणात बदल होत असलेला जाणवू लागला.. थंडी अचानक वाढू लागली.. सगळ्यांना काय होतंय हे समजेना.. आधी वाटले की मध्यभागी आलोय आणि वारा लागत असल्यामुळे थंडी जास्त जाणवत असेल. पण खरं कारण ते नव्हते. सगळे अक्षरशः थंडीने कुडकुडू लागले.

तो गारवा अगदी असह्य होऊ लागला. सारंग आणि अनिकेत ला काहीतरी भयानक घडणार आहे याची चाहूल लागली. तस अनिकेत बोलला “सारंग चाल पटकन होडी फिरावं.. आपण मागे जाऊ… या वेळी सगळेच घाबरले होते.. कारण त्याच्या बोलण्याचा रोख सगळ काही सांगून गेला. त्यांनी जशी होडी मागे फिरवली तोच एका मुलीची आर्त किंकाळी त्यांच्या कानावर पडली.. ते सगळे प्रचंड घाबरले..

त्या आवाजा नंतर सगळं शांत झालं असलं तरीही प्रत्येकाचे काळीज भीती ने धढ धडु लागले होते. ते फक्त निर्विकार चेहऱ्याने एकमेकांकडे पाहत होते. आपण नक्की काय ऐकलं हे त्यांना समजायच्या आत तशीच किंकाळी पुन्हा एकदा आसमंतात घुमली… वा वेळी मात्र क्षणाचा ही विलंब न करता सारंग आणि अनिकेत ने होडी जोरात घेतली आणि कसेबसे किनाऱ्यावर पोहोचले… 

खाली उतरण्याचा गडबडीत ते होडी बांधायला विसरले… म्हणून सगळे थांबून होडी बांधायला लागले… अनिकेत जरा संतापलाच.. “सांगत होतो ना… नको जायला इतक्या रात्री.. ” पण सगळे गप्प होते.. हृषिकेश ला मात्र घडलेल्या प्रसंगाचं गांभीर्य नव्हत.. राहून राहून त्याला वाटत होत की कुणीतरी मुद्दाम केलं असावं.. पण इतक्यात त्याची नजर समोर नदीकडे गेली आणि तो सुन्न च झाला.. ते मघाशी जिथे होडी घेऊन गेले होते तिथे एक पांढरट आकृती त्याला दिसू लागली.. जी हळु हळू मानवी आकार घेत होती.

तो डोळ्यांवर ताण देऊन, जरा लक्ष देऊन त्याकडे पाहू लागला तेव्हा त्याला दिसले की तिथे एक मुलगी उभी आहे.. आणि या सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे ती पाण्यावर २-३ फूट उंच वर हवेत तरंगत आहे.. त्याने मित्रांना सांगायला बाजूला पाहिले पण त्याला जाणवले की फक्त तोच नाही तर सगळेच हे भयानक दृश्य धडधडत्या काळजाने पाहत होते. सगळ्यांच्या चेहऱ्यावर चा रंग च उडाला होता. प्रचंड भीती दाटून आली होती. त्यांनी कशीबशी होडी बांधली आणि मंदिराच्या दिशेनं झपाझप पायऱ्या चढत ते पळू लागले… इतक्यात एक किळसवाणा आवाज त्यांच्या कानावर पडला.. अनिकेत म्हणाला “मागे वळून पाहू नका.”

ते धापा टाकत मंदिराच्या गाभाऱ्यात आले.. तसे त्यांना जरा हायस वाटलं.. एवढ्या थंडी मध्ये सुद्धा त्यांना घाम फुटला होता.. कोणीच कोणा सोबत काही बोलत नव्हते. संतापलेला अनिकेत एव्हाना शांत झाला होता. तो एक दीर्घ श्वास घेत सगळ्यांना म्हणाला ” झोपा आता.. काही नाही होणार..” बराच वेळ कोणाला झोप लागली नाही पण दिवस भराच्या थकव्यामुळे पहाटे कधी तरी ते झोपी गेले.. सकाळ झाली तसे आम्ही घरी आलो. घरातील मोठ्या जाणकार माणसांना सगळा प्रसंग सांगितला. 

माझे मोठे चुलत काका खूप चिडले. सगळ्यांना खूप ओरडले. पण आमचे चेहरे पाहून ते शांत होऊन आम्हाला समजावू लागले ” अनोळख्या ठिकाणी रात्री अपरात्री जाणे टाळायचे असते.. २५-३० वर्षांपूर्वी एका १२-१३ वर्षांच्या मुलीचा नदीच्या पाण्यात बुडू न मृत्यु झाला होता. कारण आज पर्यंत कळले नाही पण तेव्हा पासून रात्री अपरात्री ती लोकांना दिसते. त्यांचे बोलणे ऐकून सगळे निशब्द आणि सुन्न झाले होते. माझ्या आजी ने सगळ्यांना देवाचा अंगारा लावला आणि देवाच्या पाया पडून त्यांचे आभार मानायला सांगितले.

Leave a Reply