अनुभव १ – चैतन्य पाटील

माझे आजोबा आता ह्या जगात नाहीत. हा अनुभव त्यांना साधारण २५-३० वर्षांपूर्वी आला होता. 

त्या काळी ते एका कंपनीत कामाला होते. आता कंपनी म्हंटले की कोणत्याही शिफ्ट मध्ये काम करायला लागायचे. त्यांचा एक मित्र ही त्याच्या सोबतच कामाला होता. दोघे एकाच गावात राहायचे. त्यांच्या मित्राची मोटार सायकल असल्यामुळे ते नेहमी एकत्र जायचे. त्या दिवशी त्यांना दुसरी शिफ्ट होती म्हणून रात्री बऱ्याच उशिरा निघाले. त्यात मित्र आजारी असल्यामुळे तो ही रजेवर होता. आता मित्र नाही म्हंटल्यावर एकटे घरी जावे लागणार होते. आर्थिक चणचण असल्यामुळे त्यांनी काही अंतर रिक्षा आणि मग पुढे उतरून चालत जायचे ठरवले. 

बरीच रात्र झाल्यामुळे रिक्षा मिळायला बराच वेळ लागला. एका स्टॉप पर्यंत ते रिक्षाने आले आणि तिथे उतरले. त्यांना घरी जाण्यासाठी दोन रस्ते होते. त्यांनी शॉर्ट कट निवडला जेणेकरून घरी लवकर पोहोचता येईल. जो रस्ता निवडला होता तो पाइपलाइन मार्गे, एक अंधारी खाडी म्हणजे पुल ओलांडून जावे लागणार होते. एव्हाना सगळीकडे शुकशुकाट झाला होता. रस्त्यावर एकही वाहन दिसत नव्हते. ते मुख्य रस्ता ओलांडून त्या शॉर्टकट च्याच रस्त्याला लागले. म्हणावा तसा रस्ता नव्हता म्हणजे गल्लीबोळ असतात तशी वाट होती. काही मिनिट चालल्यावर त्यांना त्या समोर त्या वाटेच्या मधोमध एक मुलगा उभा दिसला. 

एका क्षणासाठी ते दाचकलेच. त्यांना विचित्र वाटले की इतक्या रात्री या निर्मनुष्य रस्त्यावर हा मुलगा असा काय उभा आहे. त्यांनी तिरक्या नजरेने त्याच्याकडे पाहिले तर तो मुलगा त्यांच्याकडे एक टक पाहत होता. त्यांनी झटकन नजर वळवून पुढे पाहिले आणि त्याच्या बाजूने चालत पुढे निघाले. पण काही अंतर ओलांडल्यावर त्यांना तोच मुलगा रस्त्याच्या मधोमध उभा दिसला. आता मात्र त्यांना हा प्रकार वेगळाच आहे हे लक्षात आले. त्यांनी पावलांचा वेग वाढवला. आणि काही वेळात भीतीने ते धावतच सुटले. धावताना ठेच लागून ते खाली पडले. त्यांनी स्वतःला कसे बसे सावरले आणि ते उठून उभे राहिले तर तोच मुलगा त्याच्या अगदी समोर उभा होता.

पण आता तो खूप उंच आणि धिप्पाड वाटत होता. काही कळायच्या आत त्याने आजोबांना मारायला सुरुवात केली. आजोबा कसे बसे त्याच्या तावडीतून सुटून पळत घरी आले. पण झालेल्या दुखापतीमुळे त्यांना पुढचे काही दिवस दवाखान्यात काढावे लागले. त्या नंतर मात्र नाईट शिफ्ट करावी लागत असल्याने त्यांनी त्या कंपनीत काम करणे सोडून दिले. 

अनुभव २ – अविनाश क्षीरसागर

शिक्षण चालू असताना स्वप्नाली हॉस्टेल मध्ये राहायची. हॉस्टेल म्हंटले की रूम शेअरिंग आले. एका रूम मध्ये तिधी जनी असायच्या. आणि एकाच वर्षातल्या असे काही नाही. त्यामुळे सगळ्यांच्या परीक्षा वेगवेगळ्या वेळी आणि दिवशी व्हायच्या. आणि परीक्षा संपल्या की सगळ्या मुली आप आपल्या घरी निघून जायच्या. नेमकी स्वप्नाली ची परीक्षा उशिरा व्हायची आणि तिला एकटीला थांबायला लागायचे. 

त्या वर्षीही तसेच झाले. तिचा शेवटचा पेपर होता. रात्री जागून अभ्यास करत असताना तिला झोप लागली. तिला असे वाटले की कोणी तरी आपल्याला इथून जायला सांगत आहे. ती झटकन उठून बसली. तिला स्वप्नात कोणी तरी दिसले होते आणि या खोलीतून बाहेर जायला सांगत होते. पण कोण ते तिला आठवत नव्हते. कधी कधी आपल्याला पूर्ण स्वप्न आठवत नाही अगदी तसेच तिच्या बाबतीत घडले. तिला अशी विचित्र स्वप्न पडली की ती मैत्रिणीच्या खोलीत अभ्यासाला जायची आणि कधी कधी तिथेच झोपायची. 

काही महिने उलटले. शेवटच्या वर्षाच्या परीक्षा चालू होत्या. आणि या वेळेस ही तिच्या बरोबर रूम शेअर करणाऱ्या दोन्ही मुलींच्या परीक्षा तिच्या आधीच संपल्या म्हणून त्या घरी निघून गेल्या. खरे तर त्या दिवशी जवळपास सगळ्या मुली घरी निघून गेल्या होत्या. स्वप्नाली हॉस्टेल वर एकटीच होती. तिला मात्र या बद्दल अजिबात कल्पना नव्हती. अभ्यास वैगरे आटोपून ती रात्री शांत पणे झोपली. आणि तिला पुन्हा विचित्र स्वप्न पडले.

हॉस्टेल पूर्ण रिकामे झाले. तिच्या शिवाय त्या hostel मध्ये कोणीच नव्हते. स्वप्नाली अभ्यास करत बसली होती आणि अचानक दरवाजा वाजला. तिने दरवाजा उघडला तर समोर एक बाई उभी होती. तिने या आधी तिला कधीही पाहिले नव्हते. ती काही विचारणार इतक्यात ती म्हणाली की एकटी का थांबली आहेस इथे. निघून जा इथून.. स्वप्नाली ने जास्त काही न बोलता दुर्लक्ष करत दरवाजा बंद केला. पण पुन्हा दार वाजले म्हणून तिने लगेच दार उघडले आणि समोर कोणीही नव्हते. तितक्यात ती झटकन झोपेतून जागी झाली. हे सगळे स्वप्न होते तर… 

दुसऱ्या दिवशी स्वप्नाली लय कळले की कालची रात्र मी संपूर्ण हॉस्टेल मध्ये एकटीच होते. तिने तिथल्या काम करणाऱ्या काकूंना रात्री पडलेल्या स्वप्न बद्दल सांगितले. तेव्हा त्या म्हणल्या की त्यांना ही अशी स्वप्न पडता त. पण स्वप्नाली ला असे वाटायचे की तिची आजी तिला सावध करायला आली असावी. कारण तो आवाज अगदी तिच्या आजी सारखा होता.

अनुभव ३ – शांतनू फुसे

ही घटना माझ्या मित्रा सोबत घडलेली होती.. तो खेडेगावात राहायचं पण चांगलं शिक्षण वैगर झाल्याने नोकरी साठी राहायचा. बरेच दिवस गावात जाणे झाले नव्हते म्हणून त्याने ३-४ दिवस लागोपाठ सुट्टी आल्यामुळे गावी जाऊन यायचे ठरवले. त्या दिवशी सगळे काम आटोपून संध्याकाळी बाईक ने गावी जायला निघाला. काही तासात तो शहराच्या बाहेर पडून गावाला जाण्याच्या रस्त्याला लागला. 

एव्हाना १० वाजत आले होते. रस्ता अगदी सामसूम झाला होता. त्याच्या बाईक शिवाय दुसरे एकही वाहन दृष्टीस पडत नव्हते. तासाभरात तो गावाच्या वेशी जवळ पोहोचला. तिथेच एक स्मशानभूमी होती. भीती वाटण्याचे कारण नव्हते कारण त्यालाच लागून एक कट्टा होता आणि मित्रांसोबत तो तिथे नेहमी गप्पा करत बसायचा. तिथून जात असताना त्याला त्याच्या नावाने हाक ऐकू आली. एखाद्या जुन्या मित्राने मला पाहून हाक मारली असेल म्हणून मी पटकन गाडी थांबवली. 

हेल्मेट घातले असूनही त्याला हाक ऐकू आली म्हणून नवलच वाटले. त्याने मागे वळून पाहिले तर त्याच्या मित्राची बहीण जी त्याची वर्ग मैत्रीण ही होती ती उभी दिसली. तिला पाहून तो जरा गोंधळलाच. ती त्याला म्हणाली की मला गावात घेऊन चल. त्याने ही हो बस म्हणत बाईक स्टार्ट केली. रस्त्यात त्याने तिची विचारपूस करण्याचा प्रयत्न केला पण ती शांत बसून होती. त्याला वाटले की हेल्मेट घातल्यामुळे तिला बोलणे ऐकू गेले नसणार म्हणून त्याने दुर्लक्ष केलं. 

गावात आल्यावर तिने इशारा करत गाडी थांबवायला सांगितली. त्याने ही पटकन बाईक थांबवली. तशी ती उतरली आणि त्याच्याकडे एक कटाक्ष टाकत काहीही न बोलता तिथून चालत घराच्या दिशेने निघून गेली. तो ही जास्त विचार न करता त्याच्या घरी निघून गेला. उशिरा पोहोचल्यामुळे त्याने जेवण आटोपले आणि झोपून गेला. सकाळी उठून नेहमी प्रमाणे बाहेर कट्यावर गेला. त्याचे काही मित्र तिथे होतेच. बऱ्याच दिवसांनी भेटल्यामुळे त्याच्या गप्पा सुरू झाल्या आणि बोलता बोलता त्याने काल मित्राच्या बहिणी ला लिफ्ट दिल्याचे सांगितले. 

त्या नंतर त्याला जी गोष्ट कळली ती ऐकुन तो सुन्न च झाला. तिने ज्या मुलीला लिफ्ट दिली होती ती दोन दिवसांपूर्वी सर्प दंशामुळे वारली होती. . 

https://www.youtube.com/watch?v=aahvhpkJDqw

Leave a Reply