ही गोष्ट ऑगस्ट २०१७ ची आहे. मी एका स्टूडेंट ऑर्गायझेशन द्वारे इंडोनेशिया s a volentiear म्हणून गेले होते. तिथल्या काही लोकांना इंग्लिश येत नव्हते म्हणून आम्हाला as a buddy म्हणून त्यांनी appoint केले होते. आम्हाला कुठे बाहेर जायचे असेल तर ते सगळ्या कामात आम्हाला मदत करायचे. माझ्या सोबत एक मुलगी होती मेरी नावाची. जरा सायकिक च होती. मी तिथे २ महिने होते पण अगदी शेवट पर्यंत तिने माझ्या पासून एक गोष्ट लपवून ठेवली होती. जी मला भारतात येण्याच्या १ आठवडा आधी कळली. तिला भूत दिसायची म्हणे. इतकेच नव्हे तर ती त्यांच्याशी संवाद साधू शकायची.
आमच्या पूर्ण प्रोजेक्ट मध्ये एक ग्लोबल विलेज म्हणून फेस्ट होते. त्यात आम्हाला पारंपारिक वेशभूषा प्रधान करून आप – आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करायचे होते. मग त्यात नृत्य जेवण सगळे आलेच. जेव्हा आमची या फेस्ट साठी सगळी तयारी चालू होती तेव्हा मेरी तिथे दिसत नव्हती. आम्ही नेहमी सोबत असल्याने मी तिला शोधायला गेले तर ती एके ठिकाणी खाली बसून रडत होती. तिथे आम्ही सगळे जण होतो. तिच्यासोबत एक मैत्रीण सुद्धा होती. ती तिला समजावत होती तरीही मेरी रडायची थांबवत नव्हती. मी तिला विचारले की इतके रडायला काय झाले त्यावर ही ती काहीच बोलली नाही. मला वाटले की वयक्तिक जीवनात काही घडले असेल, बॉयफ्रेंड सोबत भांडण वैगरे.. त्यामुळे काही सांगत नाही असे समजून मी तिला जास्त आग्रह केला नाही. नंतर मी माझ्या कामात व्यस्त ही झाले आणि काही वेळाने त्या प्रसंगाचा विसर ही पडला.
त्याच रात्री आम्ही काही मित्र मैत्रिणी माझ्या होस्ट फॅमिली च्या घरी आलो होतो. रात्रीचे साधारण ११-११.३० झाले होते. आम्ही ५-६ जण हॉल मध्ये बसून गप्पा मारत होतो. तेव्हा बोलता बोलता विषय निघाला आणि मेरी ने रडण्याचे खरे कारण सांगितले. आम्ही अगदी लक्ष देऊन ऐकू लागलो तसे तिने घडलेला प्रकार सांगायला सुरुवात केली. फेस्ट ची तयारी करत असताना मी माझ्या मैत्रिणी सोबत वॉश रूम ला गेले होते. माझ्या आधी एक मुलगी वॉश रूम ला गेली होती पण तिच्या व्यतिरिक्त तिथे कोणीही नव्हते.
सुरुवातीला काही जाणवले नाही पण काही मिनिटांनी मला माझ्या मागून कसलीशी हालचाल जाणवली. मागे कोणी तरी होत. एक पांढरट आकृती. तशी चाहूल लागताच माझ्या अंगावर शहारे उमटून गेले. मी थोडे मागे वळून पाहिले आणि माझी वाचाच बंद झाली. ती आकृती जमिनी पासून ४-५ फूट उंचीवर हवेत तरंगत होती. कपडे पूर्ण रक्ताने माखले होते. लांबसडक विस्फारले ले केस आणि अतिशय भयाण रूप. त्या आकृती ने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि जवळ येऊन कानात हळूच पुटपुटली “मला तू हवी आहेस”. तोपर्यंत माझ्या शरीरातला त्राण च संपला होता.. अर्धांगवायू चा झटका आल्या सारखे हात पाय गळून पडले होते. काय करावे काही सुचत नव्हते.
तेवढ्यात वॉश रूम मध्ये गेलेली ती मुलगी बाहेर आली. मी मात्र तशीच विजेचा तीव्र झटका लागल्या सारखी तिथे निशब्द उभे होते. तिने मला पाहिले आणि हात लाऊन विचारले तसे मी क्षणात भानावर आले. मी तिचा हात घट्ट पकडून तिच्या सोबत च बाहेर आले. पण बाहेर आल्यावर मात्र भीतीमुळे मला रडू कोसळले. मी तेव्हा इतकी घाबरले होते की कोणाला काही सांगण्याच्या मनःस्थितीत च नव्हते. तुम्हाला माहितीये ती आकृती नक्की कोण होती ते ?. तिचा हा प्रश्न तिच्या चेहऱ्यावरील भीती अगदी स्पष्ट दर्शवत होता. आम्ही सगळे तिच्याकडे घाबरलेल्या अवस्थेत पाहू लागलो. तसे ती म्हणाली “पोंती अनक”. मला त्या शब्दाचा अर्थ कळला नाही. पण लगेच मी गुगल सर्च करुन पहिले आणि तिच्या रडण्यामागचे भयानक कारण उमगले.
पॉंती अनाक म्हणजे पौराणिक इंडोनेशियातली एक अतृप्त आत्मा. मी जेव्हा इंटरनेट वर तिची माहिती आणि वर्णन वाचले तेव्हा मेरी ने केलेले वर्णन अगदी तंतोतंत जुळले. या सगळ्यांवर कितपत विश्वास ठेवावा हेच कळत नव्हते. आम्ही सगळे शांत बसून होतो. तितक्यात दरवाज्याकडे तिरक्या नजरेने पाहत मेरी म्हणाली “ती.. ती दरवाज्या बाहेर उभी आहे”. दरवाजा उघडाच होता म्हणून मी डोकावून पाहण्याचा प्रयत्न केला पण मला कोणीच दिसले नाही. तसे मी तिला काही बोलणार त्या आधीच ती म्हणाली “ती तिथेच उभी आहे. आपल्याला एक टक पाहतेय. आपण तिच्या बद्दल बोलत होतो म्हणून ती आपल्याकडे आकर्षित झाली आहे. आपण तो विषय टाळायला हवा होता”.
आम्ही सगळे घाबरून थरथरायला लागलो होतो. नको ते विचार मनात डोकावून जात होते. ती जर आत आली तर?.. आम्ही तिचा सामना तरी करू शकू का?.. मी मनात देवाचे नाव घेत होते. मी माझ्या मैत्रिणीला घट्ट मिठी मारून बसले होते आणि अगदी रडकुंडीला आले होते. या आधी मी इतके कधीच घाबरले नव्हते. तो प्रसंग कोणाच्याही मनात भीती निर्माण करण्यासाठी पुरेसा होता. साधारण २-३ मिनिटानंतर मेरी म्हणाली की ती गेली इथून. तसे आम्हाला जरा धीर आला. या घटने नंतर मी १ आठवडा कसा बसा त्या घरात काढला. रात्री झोप कधी लागलीच नाही. सतत नको ते भास होत राहिले.
भारतात येण्याच्या आदल्या दिवशी मात्र असे काही घडले जे मी उभ्या आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही. सकाळी निघायचे असल्याने त्या रात्री मी लवकर च झोपले. मी आणि माझी एक मैत्रीण आम्ही दोघी बेड वर झोपलो होतो. रात्र उलटली आणि मला शांत झोपही लागली. गेल्या काही दिवसापासून रात्री झोप लागली नव्हती पण या रात्रीची झोप बराच आराम देऊन गेली. पहाट झाली होती. तसे मला जाणवत होत कारण बाजूच्याच खिडकीतून सूर्याची कोवळी किरणे आत माझ्या अंगावर पडत होती. पण मी डोळे बंद करून तशीच पडून होते. तितक्यात मला माझ्या मानेवर काही तरी जाणवले. मला वाटले की पंख्याच्या वाऱ्यामुळे माझेच केस मानेवर येत आहेत म्हणून मी दुर्लक्ष केलं. पण काही वेळाने पुन्हा काही तरी जाणवले. यावेळी मात्र तो स्पर्श वेगळा वाटला.
तो अभास हळुवार पणे बोटं फिरवल्या चा होता. मी दचकले आणि डोळे उघडले तसे एक आकृती माझ्या अंगावर बसली होती. अगदी विचित्र पणे वळवळत होती. संपूर्ण काळी कुट्ट आकृती पण डोळ्याचा भाग लालबुंद होता. मी नुकतेच झोपेतून उठल्या मुळे नक्की काय करू काय नको हेच सुचत नव्हते. मला कळत होत पण किती हो प्रयत्न करूनही त्या अवस्थेतून उठता येत नव्हत. डोळ्यांवर झोप असली तरी मी एका वेगळ्याच ग्लानीत होते. हळू हळू मी जागे असल्याचा भास कमी होत गेला आणि पुन्हा एकदा गाढ झोप लागली. थोड्या वेळाने भानावर आले आणि झटकन बेड वर उठून बसले. मला वेगळे च वाटतं होते. शब्दात सांगता येणार नाही पण काहीसे अस्वस्थ वाटत होते.
तिथून मेरी मला घ्यायला येणार होती आणि मी तिच्या घरी जाणार होते. कारण तिचे घर ऐ अर् पोर्ट पासून अगदी जवळ होते. आणि फ्लाईट लवकर असल्यामुळे तिच्या घरून निघायला बरे पडणार होते. दुसऱ्या दिवशी निघण्या आधी मेरी ला घडलेला प्रकार सांगितला. मला जाणून घ्यायचे होते की तो माझा भास होता की अजुन काही. पण ती म्हणाली की तो तुझा भास नव्हता. मला त्या घरात ती खूप वेळा दिसली आहे. ती पोंति आनक नव्हती. ती कोणाला काही करत नाही, तुला ही काही केले नाही. फक्त तुला पाहायला आली असावी. आणि तुझा अस्वस्थपणा थोड्या वेळा ने निघून जाईल काळजी करू नकोस. मेरी चे बोलणे ऐकून माझे अंग च गार पडले होते.
मी भारतात परतले. काही दिवस सतत वाटायचे की पुन्हा असे काही घडले तर काय करायचे. पण असा अनुभव पुन्हा मला कधीच आला नाही.