अनुभव – तनिष्क बागडे

संध्यकाळ ची आरती उरकली, संध्याकाळ ची कसली रात्रीचीच म्हणायला काही हरकत नाही. कारण गेले काही दिवस दुकानातून घरी येई पर्यंत उशीर व्हायचा, त्या मुळे सगळी पूजा वगैरे आटोपे पर्यंत कधी 8:00 वाजून जायचे कळायचं ही नाही. त्या मुळे पुढच्या सगळ्याच गोष्टींना उशीर. दुकानातून घरी येऊन जेवण व्हायचं. मी आणि माझा मित्र दररोज रात्री जेवण झाल्यावर भेटतो आणि फेऱ्या मारत मारत गप्पा मारायची आम्हाला सवय आहे. हा आमचा दिनक्रम. माझ्या मित्राचं नाव सार्थक. तसा वयानी माझ्या पेक्षा लहान, पण आमच्या गप्पा मात्र खूप छान रंगायच्या त्या मुळे बोलता बोलता किती लांब निघून जायचो कळायचचं नाही. सार्थक ला फोटोग्राफी ची खूप आवड होती आणि नुकताच त्याने नवीन स्मार्ट फोन घेतल्या मुळे आम्ही ठरवलं की आज फिरता फिरता एक मस्त लोकेशन शोधून नाईट फोटो ग्राफी करायची. त्या दिवशी ही दुकानात आरती ला उशीर झाल्या मुळे मला घरी जायला ही वेळ झाला. आणि मग जेवण ही उशिरा आटोपले. आमची भेट ही साधारण 10:30- 11:00 च्या दरम्यान झाली. आम्ही नेहमी सारखेच गप्पा मारत मारत कधी लांब निघून आलो कळलचं नाहीं. एका निर्मनुष्य ठिकाणी आम्ही येऊन पोहचलो होतो. त्या दिवशी नेमका वादळी पाऊस झाल्या मुळे हवेत तसा गारवा होताच. पण आम्ही ज्या ठिकाणी आलो होतो तिथे जास्तच जाणवत होता. त्या रस्त्या ला एक स्ट्रीट लाईट सोडून दुसरा कोणता प्रकाशाचा स्त्रोत न्हवता. रस्त्याच्या दुतर्फा हिरवी गार झाडी. त्यामुळे हेच ते लोकेशन जिथे फोटो काढता येतील असे ठरवायला वेळ लागला नाही. याहून उत्तम ठिकाण आता मिळेल असे आम्हाला वाटत नव्हते. 

त्यामुळे आम्ही दोघांनी ठरवलं की इथेच फोटो काढायचे. पण का कुणास ठाउक, तिथे एक अस्वस्थता जाणवत होती. एक अनामिक भीती वाटत होती. थंड वातावरण आणि तिकडच्या गडद अंधरामुळे असावं कदाचित अस वाटल. त्या स्ट्रीट लाईटच्या उजेडा व्यतिरिक्त आजू बाजूला अगदीच गडद अंधार पसरला होता. पण मी जास्त लक्ष न देता फोटो साठी वेग वेगळे अँगल सेट करून बघू लागलो. त्याचा नवीन फोन काढण्या आध मी माझा फोन सार्थक कडे देऊन त्याला माझे काही फोटोज् click करायला सांगितले. पण अवघे ५-६ मिनिट झाले असतील, त्यात काय ते १०-१२ फोटो निघाले आणि अचानक फोन low battery चे नोटीफिकेशन देऊ लागला. हे जरा विचित्रच होतं कारण घरून निघताना मी फोन full charge करून निघालो होतो. आणि माझ्या फोन ला बॅटरी छा असा कोणताच प्रॉब्लेम नव्हता. मी जरा विचारातच पडलो. पण तितक्यात सार्थक नी त्याचा नवीन फोन काढला आणि एका झाडाच्या मुळाशी ठेऊन कॅमेरा ऍडजस्ट करू लागला आणि म्हणाला ” पुरे झाले आता तुझे एकट्याचे फोटो, आता आपण टायमर लाऊन दोघांचे फोटो काढू.. ” त्याने मला तिथेच च्या कॅमेरा कडे पाठ करून उभा राहायला सांगितलं. आणि तो त्याच्या कॅमेरा मध्ये टायमर मोड सेट करायला गेला. पुढे जे घडलं ते खूप भयानक होत.. जे मी उभ्या आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही. टायमर मोड सेट करून तो लगेच माझ्या बाजूला येऊन उभा राहिला. फोटो जरा चांगला यावा म्हणून मी त्याच्या खांद्यावर हात ठेवला.आणि त्याच्या खांद्याला स्पर्श करताच मी एकदम दचकलो. त्याचे अंग खूपच थंडगार पडले होते. म्हणजे आपलं नॉर्मल बॉडी टेंपरेचर असत ना त्यापेक्षा खूपच कमी वाटलं. 

मला वाटलं की कदाचित गारव्या मुळे असावे म्हणून मी दुर्लक्ष केलं. आणि त्याला काही विचारले नाही. १० सेकंदाने फोटो क्लिक झाला असेल असे समजून मी मागे वळलो आणि इतक्यात फोन ठेवलेल्या झाडाच्या मागून सार्थक चाच आवाज आला ” अग आई.. इथे जवळच आहोत.. येतो अर्ध्या पाऊण तासात..” तो त्याच्या जुन्या फोन वर आई शी बोलत होता. तो जरा घाईतच माझ्या जवळ आला आणि म्हणाला ” खूप उशीर झालाय रे, चल पटकन फोटो काढू आणि निघू..”  माझ्या अंगावर सर्रकन काटा येऊन गेला. मी जरा गोंधळलो आणि त्याला विचारलं ” अरे अस काय बोलतोय, आत्ताच तर टायमर सेट करून काढला ना फोटो..” त्यावर तो हसतच म्हणाला ” काहीही काय, आईचा फोन आला म्हणून मी कधी पासून इथेच झाडाच्या मागे उभा राहून बोलत होतो.. ” त्याचे हे वाक्य ऐकून अंगावर शहारे आले. कारण हा जर तिथे उभा होता तर मग फोटो काढायला माझ्या बाजूला कोण आलं होत..? मी माझा हात कोणाच्या खांद्यावर ठेवला होता..? कारण संपूर्ण परिसरात आम्हा दोघांना सोडले तर कोणीही नव्हते. मग मागच्या २ मिनिटांत जे घडले ते काय होत. माझ्या डोक्यात असंख्य प्रश्नांनी काहूर माजवलं होत.  ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्या निघालेल्या फोटो मध्ये होती. मी त्याचा फोन हातात घेऊन त्याच्या नकळत जोरात स्क्रोल करत तो फोटो पाहिला. ते दृश्य माझ्या कल्पनाशक्ती च्या पलीकडचं होतं. मी एका क्षणाचा ही विलंब न करता सार्थक ला घेऊन तिथून घरची वाट धरली. सार्थक अनेक प्रश्न करू लागला पण मी त्या वेळी मी कोणत्या ही प्रश्र्नांची उत्तरं देण्याच्या मनःस्थितीत नव्हतो. 

मला सतत आमचा कोणी तरी पाठलाग करतंय अस जाणवत होतं. पण आता मागे वळून पहायचं नाही असं मनात धरून आम्ही पावलांचा वेग वाढवला. सार्थक चे प्रश्न चालूच होते. मी त्याला ” घरी पोहोचून सगळं सांगतो!” असं म्हणुन शांत केलं. पण तो सतत मला विचारात होता की तिथून अस अचानक निघायला काय झालं. बहुतेक त्याने माझा चेहऱ्यावरची भीती हेरली होती. आम्ही त्या भागातून बाहेर पडतो ना पडतो  तितक्यात कोणी तरी पाठून म्हणून हाक मारली “सार्थक “. मी सार्थक च्या खांद्या वर हात ठेऊन त्याला म्हंटल.. आता काही झालं तरी मागे वळून पहायचं नाही. माझ्या त्या एका वाक्याने त्याला जे समजायचे ते तो समजून गेला. बहुतेक एव्हाना त्याला ही हा प्रकार कळून चुकला होता. त्यामुळे तो ही गपचुप चालू लागला. आम्ही दोघांनी ही चालण्याचा वेग वाढवला होता. आता त्याच्या नाही तरी माझ्या नावाने ही हाक सुरू झाल्या. सर्वात विचित्र गोष्ट म्हणजे ती हाक कधी अगदी जवळून ऐकू यायची जसे आमच्या मागेच एका पावलावर कोणी तरी आहे.. तर पुढच्या क्षणी ती हाक लांबून मारल्या सारखं वाटत होतं. आम्ही दोघं ही जीव मुठीत धरून झपाझप पावले टाकत पुढे जात होतो. काही अंतरा नंतर रस्त्यात एक दुर्गा परमेश्वरी चं अतिशय जागृत व प्राचीन मंदिर आहे. नवरात्र असल्या मुळे तिथे जगरणाचा व आरती चा कार्यक्रम असतो. रात्री प्रहाराची आरती व्हायची वेळ झाली आणि मंदिरात नगाडे व घंटानाद होऊ लागला. हे ऐकून आमच्या जीवात जीव आला. आम्ही सरळ मंदिराकडे धाव घेतली. आरती सुरु होताच शंखनाद झाला आणि आम्ही सुटकेचा श्वास घेतला.

आता ते जे काही होतं ते लांब लांब पर्यंत कुठे ही जाणवत न्हवतं. आम्ही दोघं ही आरती मधे कधी तल्लीन झालो कळलंच नाही. आरती झाल्या वर आम्ही देवी आई पुढे साष्टांग दंडवत करत आई ने आमचं रक्षण केल्या बद्दल आभार मानले. तिथून थेट घरी पोहोचताच दमल्या मुळे दोघं ही लवकर झोपी गेलो. पण तो फोटो सार्थक च्या फोन मधून डिलीट करायचे राहून च गेलं. दुसऱ्या दिवशी जेव्हा त्याचा फोन घेऊन मी तो फोटो पुन्हा पाहिला तेव्हा ही तितकाच शहरलो. कारणं त्या फोटो मध्ये माझ्या बाजूला कोणी तरी उभ होतं.. सार्थक सारखीच शरीर यष्टी, मी त्याचा खंद्या वर हात ही ठेवला होता. माझ्या पेक्षा सार्थक जास्त गोंधळात पडला होता. तो एकच म्हणत होता हे शक्यच नाही, मी तर तेव्हा आईशी बोलत होतो.. त्याला विश्वास च बसत नव्हता. आम्हाला अगदी आज पर्यंत या गोष्टीचं गुद्ग उलगडा नाहीये.  ते नक्की काय होतं? त्या परिसरात तर त्या वेळी आम्ही दोघच होतो…. मग ती फोटो मधली व्यक्ती? कुठून आली आणि कुठे गेली? ते ही अगदी क्षणार्धात. तो नक्कीच काही तरी भयानक प्रकार होता. आजही कधी त्या प्रसंगाची आठवण काढली तरी अंगावर काटा येतो. आमचं नशीब बलवत्तर की त्या फेऱ्यातून आम्ही वाचलो नाही तर वेळ आणि काळ दोन्ही ही आले होतं..

Leave a Reply