अनुभव – अक्षय चोपाडे

माझ्यासाठी मित्र हेच सर्वकाही आहेत.. माझे जे मित्र आहेत ते अगदी लहानपणापासूनचे. खूपच जिगरी दोस्त. ही घटना आम्ही सगळे एकत्र असतानाची आहे. २०१४ सालची. नुकताच पावसाळा संपत आला होता. आमच्या भागात यंदा पावसाने अगदी जोर दाखवला होता त्यामुळे एरव्ही एकत्र भटकंती करणारे, खेळणारे आम्ही सगळे मित्र घरी बसून वैतागलो होतो. त्यामुळे काही तरी अ ड वेंचर करायचे ठरवत होतो. कोणतीही नवीन गोष्ट करायची म्हंटले की आमचे सगळ्यांचेच लगेच एकमत व्हायचे. या वेळेस ही असेच काही तर ठरवू लागलो. अवघ्या काही मिनिटांत आमचे नक्की झाले. आपल्या गावापासून काही अंतरावर असलेल्या डोंगराळ भागात फिरायला जायचे. 

मी, धमदीप, आशिष आणि महेंद्र आम्ही चौघे जण जाणार होतो. बऱ्याच महिन्यापासून एकत्र बाहेर फिरणे झाले नाही म्हणून मस्त डोंगरावरील हिरवळ पाहून चांगले फोटो वैगरे काढू आणि लहानसे ट्रेकिंग ही होईल ह्या उद्देशाने आम्ही जायचे ठरवले. त्या दिवशी पावसाने जरा उसंत घेतली होती म्हणून दुपारी जेवण वैगरे उरकून आम्ही जाण्याचा बेत आखला. दुपारी सगळे माझ्या घरी जमले आणि आम्ही एकत्र निघालो. आमचे गाव डोंगर रांगा नी वेढले आहे. म्हणजे आमच्या गावाच्या एका गल्ली चा शेवट डोंगराच्या पायथ्याशी होतो. अवघ्या काही मिनिटांत आम्ही डोंगराच्या पायथ्याशी पोहोचलो. मजा मस्ती करत आम्ही डोंगर चढू लागलो. पाऊस पडून गेल्या मुळे सगळी कडे हिरवळ दिसत होती. डोळ्यांना एक वेगळाच थंडावा देत होती. निसर्गाचे सौंदर्य न्याहाळत आमचा प्रवास सुरु होता.

इथे येण्याचा प्लॅन यशस्वी ठरला होता. शेजारील गावाला सलग्न असणाऱ्या डोंगर दऱ्या तून वाट काढत आम्ही चाललो होतो. जसे वरच्या भागावर येऊ लागलो तसे झाडी अधिकच दाट आणि गर्द जाणवू लागली. तिथूनच आमच्या गावचा एक माणूस शेळ्या घेऊन डोंगरावरून खाली येत होता. त्यांनी आम्हाला कुठे चालला आहात म्हणून विचारले तसे आमच्यापैकी एकाने उत्तर दिले “इथेच फिरत आहोत काका..” तसे त्याने सांगितले “ठीक आहे.. जास्त वरच्या खाईत जाऊ नका, आपल्या गावाच्या हद्दीतील तळीचा माळ आहे तिथे फिरायला जा.. पुन्हा एकदा तुमच्या चांगल्यासाठी सांगतो.. जास्त वरच्या खाईत झाडीच्या दिशेनं जाऊ नका तिकडे कोणी जात नाही, तिथली जागा चांगली नाही.. इतके म्हणत तो गावाच्या दिशेने खाली उतरत निघून गेला. 

आम्ही नुसते हो म्हणून पुढे निघालो. तसे ही आम्ही तरणी ताठी पोरं कोणाचं काय ऐकणार.. आणि जरी ऐकले तरी किती मनावर घेणार याची तुम्हाला चांगलीच कल्पना असेल. पाऊस पडून गेल्यावर मुळे वाटेत एक छोटा झरा लागला. आम्ही तिथेच थोडी विश्रांती घेतली.. मनसोक्त फोटो वैगरे काढून घेतले. एकमेकांवर पाणी वैगरे उडवत माझा घेत होतो. थोडा वेळ थांबून आम्ही पुढच्या वाटेला लागलो. पुढे जाण्यासाठी दोन वाटा होत्या. एक म्हणजे आमच्या हद्दीतील तळीचा माळ आणि दुसरी म्हणजे 

पुढच्या गावाला जोडणाऱ्या डोंगरावर ची खाई म्हणजेच दरी..  आम्ही एकमेकांत चर्चा करून कुतुहला पोटी वरच्या खाईत जाण्याचे ठरवले.. एव्हाना आम्ही गावापासून जवळ जवळ ५-६ किलोमीटर आत डोंगराच्या भागात आलो होतो. 

हिरवे गार गावत आणि पावसाने गुळगुळीत झालेले दगड गोटे न्याहाळत आमची वाटचाल सुरू होती. आम्ही काही वेळात त्या खाईत येऊन पोहोचलो. तिथे अतिशय दाट झाडी झुडूप वाढली होती. परिसर जरा वेगळाच वाटत होता. थोड्या वेळ इथेच थांबून आम्ही माघारी परतण्याचा निर्णय घेतला. आणि जाताना आलो त्या वाटेने जाण्याऐवजी समोरच्या वाटेने जाऊन दुसऱ्या गावात खाली उतरू असे ठरवले. म्हणून आम्ही तिथून खालच्या बाजूला अजुन आत गेलो. पुन्हा फोटो वैगर काढणे सुरू झाले. आम्ही सगळेच पूर्ण विसरून गेलो होतो की इथल्या खाईत जाण्यासाठी त्या माणसाने आम्हाला बजावले होते. आमच्या गप्पा सुरू होत्या. तितक्यात धम दीप अचानक मागे वळून पाहू लागला. तसे आम्ही त्याला विचारले की काय झाले रे.. तसे ती म्हणाला “मला मागच्या झुडुपात कसली तरी हालचाल जाणवली.. बहुतेक तिथे आहे काही तरी..”. 

आम्हा सगळ्यांच्या नजरा त्या झुडु पावर स्थिरावल्या. १-२ मिनिट आम्ही तिथून लक्ष हरवले नाही पण काही जाणवले नाही तसे आम्ही त्याला म्हणालो की तुला भास झाला असेल. आमच्या गप्पा पुन्हा सुरू झाल्या. आमच्या गप्पा इतक्या रंगात आल्या होत्या की आम्हाला वेळेचे भान च राहिले नाही. हळु हळु ढग दाटायला सुरुवात झाली. त्या परिसरात काळया कुट्ट ढगांमुळे अंधार जाणवू लागला. बघता बघता पावसाची रीप रिप सुरू झाली. आम्ही लक्ष दिले नाही पण पावसाचा तडाखा जसा वाढला तशी आमची धावाधाव झाली. छत्री वैगरे काहीच न घेता आम्ही निघालो होतो. त्यामुळे आडोसा शोधू लागलो. तितक्यात मला एक मोठे झाड दिसले. मी सगळ्यांना इशारा केला तसे आम्ही धावतच त्या झाडाखाली येऊन अंग चोरुन थांबलो. पाऊस थांबण्याची वाट पाहू लागलो. 

बराच वेळ उलटून गेला पण पाऊस थांबायचे काही नाव घेत नव्हता. त्यात अंधार पडायला सुरुवात झाली होती. त्या खाईत आमच्या चौघा शिवाय कोणीही नव्हते. तितक्यात आम्हाला आमच्या बाजूच्या झाडीतून पुन्हा कसली तरी हालचाल जाणवली. मी तिथे पाहू लागलो पण नीट काही दिसत नव्हते. आशिष म्हणाला ” एखाद कुत्र वैगरे असेल रे.. पावसामुळे झुडुपात जाऊन लपले असेल”. त्याचे ते वाक्य संपते न संपते तसे एक विचित्र आवाज कानावर पडला. तो आवाज त्याच झाडीतून आला. आम्ही चौघही धड धड त्या काळ जाने त्या दिशेला पाहू लागलो. त्या झुडूपाचा घेरा साधारण ८-९ फूट होता. आणि बाजूला मोठे वृक्ष होते. अंधार दाटत आल्यामुळे जेमतेम च दिसत होते. तितक्यात पुन्हा सळसळ जाणवली. आत काही तरी होत. माणसाच्या आकारापेक्षा बरच मोठ. आवाजातली गरगर कोणत्याही प्राण्यांपेक्षा पूर्ण वेगळी वाटत होती. 

तितक्यात ते त्या झुडूपा तून थोड पुढे आले आणि आम्हाला त्याचा चेहरा दिसला. आम्ही जागीच स्तब्ध होऊन आ वाचून पाहतच राहिलो. काय पाहतोय तेच कळत नव्हत. विस्फार लेला जबडा ज्यातून लाळी सारखा चिकट पदार्थ खाली पडत होता. चेहरा अर्धाच दिसत होता. संपूर्ण शरीर दिसत नव्हते पण अंदाज मात्र लावू शकत होतो की त्याचे शरीर अगदी आक्राळ विक्राळ आहे आणि त्या झुडुपात जेमतेम राहतेय. मेंदू बधीर व्हायची पाळी आली होती कारण आम्ही याआधी असे काही कधीच पाहिले नव्हते. तितक्यात धामदीप जोरात ओरडला ” अरे खालच्या दिशेने पळा”. तसे मी भानावर आलो. आम्ही तिथून घाबरून खालच्या दिशेने धावत सुटलो. डोंगर उतार असल्यामुळे आम्ही इतक्या वेगात होतो की जर ठेच लागून पडलो तर गेल्यातच जमा होतो. मी तर प्रचंड घाबरलो होतो.

आम्ही जे काही पाहिले ते आमच्या मागे तर येत नाहीये ना हीच भीती लागून राहिली होती. पण मागे वळून पहायची कोणाचीही हिम्मत होत नव्हती. तितक्यात आशिष ची चप्पल तुटली तसे तो अडखळला. त्याला पळता येईना. मी त्याला सावरत च म्हणालो “थांबू नकोस.. चप्पल हातात घे आणि धावत रहा”. तितक्यात पुन्हा बाजूच्या झाडीतून सळसळ ऐकू आली तसे माझ्या अंगावर भीतीने काटा उभा राहिला. ते आमच्या मागे आले की काय हा विचार करून आम्ही दोघे ही जीवाच्या आकांताने धावत सुटलो. तितक्यात आम्हाला एक पायवाट दिसली. सगळे खाच खळगे आणि झुडपे तुडवत आम्ही खाली उतरण्याचा प्रयत्न करत होतो. काही मिनिटात खालचा डांबरी रस्ता नजरेस पडला तसा जीवात जीव आला. 

काही वेळात आम्ही मुख्य रस्त्याला आलो. आम्ही उतरताना पुढच्या बाजूने उतरलो होतो त्यामुळे दुसऱ्या गावात येऊन पोहोचलो. एखादे वाहन दिसतेय का ते पाहू लागलो. तितक्यात समोरून एक बैलगाडी येताना दिसली. आम्ही खूप दमलो होतो आणि त्यात भीतीने आमची अवस्था खूपच वाईट केली होती. ती बैलगाडी जवळ येताच आतला माणूस म्हणाला “कारे पोरांनो एवढं काय घाबरला य, एवढ दमायला काय झालंय.” खरं त्या वृद्ध माणसाने आमची अवस्था चांगलीच जाणून घेतली होती. आमच्यातील कोणीच काहीच बोलायच्या मनःस्तिथीत न्हवते. तसे त्याने पुढे विचारले “तुम्ही पोर आमच्या गावातली दिसत न्हाय.. आन डोंगराच्या वाटेने कस आलता”. तसे मी म्हणालो “हो.. आम्ही या गावातले नाही..”. 

आम्ही त्याला रस्ता विचारून घेतला आणि पुढे जायला निघणार तितक्यात तो माणूस पुन्हा म्हणाला “तुम्ही इतके घाबरले ले दिसताय, धापा टाक ताय त्यात या डोंगराच्या वाटेने आलाय म्हणजे तुमच्या पाठीमागे खविस लागला व्हता की काय”. आम्ही चौघेही अवाक होऊन त्याच्या कडे पाहू लागलो. तसे तो पुढे म्हणाला “ह्या वरच्या खाईत डोंगरात खविस हाय आस सगळे लोक म्हणत्यात.. तुमाला दिसला काय?”. आम्ही एकमेकांकडे पाहत होतो आणि त्या माणसाला उत्तर न देताच चालू लागलो. तासाभरात आम्ही आमच्या गावात आलो. प्रत्येकाच्या मनात असंख्य प्रश्न होते. नक्की काय पाहिले आपण.. खाविस होता का तो.. असा असतो का..”. मनातच देवाचे आभार मानू लागलो कारण आम्ही या सगळ्यातून सुखरूप बाहेर पडलो. आम्ही आपसात च ठरवले की या गोष्टी बद्दल कुठे ही वाच्यता करायची नाही. जर गावात कळले तर आम्हाला च वेड्यात काढतील, त्यात त्या जागी का गेलात म्हणून शिव्या ऐकाव्या लागतील तो भाग वेगळा. 

त्या रात्री न जेवताच झोपलो. पाय खूप दुखत होते पण डोक्यात एकच विचार घोळत राहिला “आपण खरंच खविसाला पाहिलं का..?”

Leave a Reply