अनुभव क्रमांक – १ – विपुल महाडिक

हा अनुभव माझ्या आईच्या गावातला आहे. त्या गावात एक मुलगी नवीनच लग्न करून आली होती. तिला येऊन साधारण ८-९ महिने झाले असावेत. ते उन्हाळ्याचे दिवस होते. गावात पाणी टंचाई होती त्यामुळे जास्तीत जास्त पाणी कुठून आणि कसं मिळेल ह्याकडे सगळ्यांचे लक्ष असायचे. नेहमी प्रमाणे जेवण वैगरे आटोपून त्या रात्री सगळे झोपी गेले. पहाटे उजाडण्या आधीच तिला जाग आली तसे ती उठून हंडा आणि कळशी घेऊन विहिरीवर पाणी आणायला गेली. 

विहीर गावापासून साधारण एक किलोमीटर च्याच अंतरावर होती. त्यामुळे घरातून बाहेर पडल्यावर १५-२० मिनिटात ती थेट विहिरी जवळ येऊन पोहोचली. पण तिची चाहूल लागल्यामुळे सासू ची झोपमोड झाली. काही वेळ उलटला. ती पाणी भरून घरी आली तसे सासू ने विचारले की कुठे गेली होतीस अचानक उठून. तसे ती म्हणाली “आई पहाट झालीय, म्हणून पाणी भरायला गेले होते. विहीर वर तर बायकांची गर्दी झाली होती पाणी भरायला”. तसे तिची सासू म्हणाली “अग काय बोलतेस, काळ वेळ कळते की नाही तुला?.. किती वाजलेत बघ जरा”. तिने घड्याळ्यात पाहिले आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकली. घड्याळात चक्क २ वाजले होते. 

तिने विचारले की आई मग विहिरीवर त्या सगळ्या बाया कोण होत्या. तसे सासू म्हणाली “अग त्या बाया नव्हत्या.. त्या जखिणी होत्या. तू थोडक्यात वाचलीस..”..

अनुभव क्रमांक – २ – स्वप्निल पगाडे

हा अनुभव आपल्या चॅनल चे सबस्क्राईब र स्वप्निल पगाडे यांनी पाठवला आहे.

मी सुट्ट्यांमध्ये गावी गेलो होतो. माझे गाव औरंगाबाद पासून साधारण ५३ किलोमीटर वर आहे. गावी येऊन थोडेच दिवस झाले होते. त्या रात्री आम्ही सगळे झोपायची तयारी करत होतो. बराच उशीर झाला होता. तितक्यात माझे आजोबा धावत च आले आणि दारावर धापा टाकत लवकर दार उघडा म्हणून आम्हाला सांगू लागले. मी लगेच जाऊन दरवाजा उघडला तसे ते आत शिरले आणि झटकन दरवाजा लाऊन घेतला. त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड भीती दाटून आली होती. ते मला म्हणाले की दरवाजा नीट लाऊन घे, तो आला तर मला घेऊन जाईल. 

त्यांचे असे बोलणे ऐकून आम्ही सुद्धा खरच घाबरलो. आम्ही त्यांना खूप विचारायचा प्रयत्न केला पण तो येईल आणि मला घेऊन जाईल इतकेच बोलत होते. काही कळायला मार्ग नव्हता की नक्की काय झालंय. बघता बघता त्यांची तब्येत बिघडली. आम्ही नंतर काही दिवस घरात कसलाच विषय काढला नाही. साधारण ४ दिवसांनी आजोबांची तब्येत चांगली झाली. आणि त्यांनी त्या रात्री काय घडले ते सांगायला सुरुवात केली. 

मी त्या रात्री शेतीला पाणी सोडायला गेलो आणि येताना मला रस्त्यात एक बोकडाच पिल्लू दिसलं. मी जोरात आवाज देऊन विचारलं हे बोकड कोणाचं आहे.. पण इतक्या रात्री कोण प्रतिसाद देणार अस समजून मी विचार केला की घरी पाहुणे आले आहेत, उद्या मस्तपैकी मटणाचा बेत करू. तसे मी त्या बोकडाला पकडले आणि आपल्या खांद्यावर धरून चालू लागलो. जस जसे मी पुढे चालत जात होतो तसे मला त्या बोकडाचे अधिकच वजन लागत होते. असं वाटत होत की आपोआप त्याच वजन वाढतं य. हळू हळू त्याच्या ओरडण्याचा आवाज ही बदलत चालला होता. तसे मला जाणवले की हा काही तरी विचित्र प्रकार दिसतोय. म्हणून त्या बोकडा ला मी तसेच फेकले आणि घराकडे धाव घेतली. मागून माझ्या नावाने हाका ऐकू येत होत्या पण मी अजिबात वळून पाहिले नाही. 

हा अनुभव इतरांना आलेल्या बऱ्याच अनुभवान सारखा आहे. मला खात्री आहे की तुम्ही ही हा असा अनुभव बऱ्याच वेळा ऐकला असेल खास करून आजी आजोबांकडून. कधी कधी वाटतं असे अनुभव नेहमी सारखे कसे असू शकतात. साम्य असण्याचे काही तरी कारण नक्कीच असावे.. 

अनुभव क्रमांक – ३ – चैतन्य पाटील

मी आणि माझे ५ मित्र आम्ही मागच्या वर्षी २६  नोव्हेंबर ला थंड हवेच्या ठिकाणी फिरायला गेलो होतो. आमचे खास काही नियोजन झाले नव्हते. सकाळी १० ला निघालो होतो आणि प्रवासात ट्रॅफिक लागल्यामुळे पोहोचायला बराच उशीर झाला. आम्ही संध्याकाळी साधारण ७ ला तिथे पोहोचलो. भरपूर थंडी जाणवत होती. आणि आम्ही अगदी सिझन मध्ये आल्यामुळे आम्हाला राहायला कुठे रूम च मिळत नव्हती.

आम्ही होतो त्या परिसरातील सगळी हॉटेल्स पाहून झाली. एकही रूम मिळाली नाही. पण थोड्या उशिरा का होईना त्या रात्री आम्हाला एक बंगला भाड्यावर मिळाला. म्हणजे तिथल्या च एका माणसाने सुचवले होते. तो बंगला त्या जागेपासून बराच लांब होता. आम्ही त्या रस्त्याने जायला निघालो तसे कळले की तो बंगला अगदी डोंगराला लागून आहे. अर्धा तास ड्राईव्ह केल्यावर आम्ही गर्द झाडीच्या रस्त्याला लागलो. रात्र झाल्यामुळे त्या रस्त्याला कोणीही दिसत नव्हते. 

पण अचानक तू निर्जन रस्त्यावर आम्हाला एक मुलगी चालत जात असताना दिसली. आम्ही तिच्या जवळ जाऊन गाडी थांबवली आणि तिला लिफ्ट साठी विचारले. आम्ही सगळी मुलं असूनही तिने जास्त विचार न करता हो म्हंटले आणि गाडीत अगदी मागच्या सीट वर जाऊन बसली. आम्ही तशीच गाडी चालवत राहिलो. तसे आम्हाला अजुन एक मुलगी रस्त्यात दिसली. आमची गाडी तिच्या जवळ जाऊ लागली तसे तिचा चेहरा नजरेस पडला आणि आमची बोलतीच बंद झाली. ती तीच मुलगी होती जीला आम्ही काही वेळा पूर्वी लिफ्ट दिली होती. माझ्या मित्राने करकचून ब्रेक मारला आणि आम्ही सगळ्यांनी मागे वळून पाहिले. तिथे कोणीही नव्हते.

मी मित्राला म्हणालो गाडी चा वेग वाढव. तसे त्याने गाडी जोरात घेतली. त्याचे लक्ष साईड मिरर मध्ये गेले. ती मुलगी गाडीच्या मागे धावत येत होती. आम्ही सगळ्यांनी देवाचे नामस्मरण सुरू केले आणि कसे बसे त्या बंगल्या जवळ येऊन पोहोचलो. आता आल्यावर त्या बंगल्याच्या मालकाने विचारपूस केली. कारण त्याला आमच्या चेहऱ्यावरची भीती स्पष्ट जाणवत होती की काही तरी नक्की झालेय. तसे आम्ही त्याला घडलेला सगळा प्रकार सांगितला. त्यावर तो म्हणाला की आज अमावस्या आहे आणि या परिसरात असे प्रकार घडत असतात. तुम्ही आत जाऊन शांतपणे झोपून जा खूप उशीर झालाय. 

पण इतक्यावरच सगळे थांबले नाही. त्या बंगल्यात ही आम्हाला मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकू येत होता. ती रात्र आम्ही कशी बशी काढली आणि सकाळी तो बंगला सोडून आम्ही वस्तीच्या ठिकाणी एक रूम घेतली. पण आमच्यातल्या दोघांना तोपर्यंत ताप भरला होता. त्यामुळे ती ट्रीप हवी तशी झालीच नाही. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. येताना ही आम्ही बरेच घाबरलो होतो. पण कसे बसे घरी येऊन पोहोचलो. आमच्या सोबत नक्की काय घडले त्या रात्री, ती मुलगी कोण होती, ती आम्हाला का दिसली होती हे प्रश्न आम्हाला अजूनही अनुत्तरित आहेत.

Leave a Reply