लेखक – प्रथम शहा

“हो बाबा , आलेचं मी आपल्या सोसाइटी जवळचं आहे, आलेचं पाच मिनिटात” एवढे बोलून पुजाने आपल्या बाबांचा फोन कट केला. तशी रात्र बरीचं झाली होती, थंड असे वातवरण होते. पूजा ज्या सोसाइटीत रहात होती ती सोसाइटी तशी सामसुमचं होती. ती गेट मधून आत शिरली. एकटीच त्या विंग च्या दिशेने चालत होती. तितक्यातचं तिला आपल्या मागे एक विचित्र आवाज आला. जणू एखादे चाक गरागरा फिरतयं असा तो आवाज होता. तिने पटकन मागे वळून पाहिले पण मागे काहीचं नव्हते. आपल्याला कसलातरी भास झाला असावा म्हणुन ती पुढे चालु लागली. पुढच्याचं क्षणी तिला तो आवाज परत आला. ” अरे कोण आहे? ” वैतागतचं ती मागे वळली व तिच्या पायाखालची जमीनचं सरकली. एक रिकामी काळ्या रंगाची व्हीलचेअर तिच्या दिशेने वेगात येत होती. त्या लोखंडी व्हीलचेअरच्या चाकात लाईटिंग होती. हे पहाताचं पूजाला आता चांगलाचं घाम फुटला. ती पळतचं लिफ्ट कडे आली. जोर जोरात लिफ्ट चे बटण दाबू लागली पण लिफ्ट वरच्या मजल्यावरून खाली यायला वेळ लागत होता. ती प्रचंड घाबरली होती, तिच्या हृदयचे ठोके वाढू लागले. तेवढ्यातचं ती व्हीलचेअर मागून आली आणि जणू तिच्या अंगावर फेकली गेली. तो आघात इतका भीषण होता की ती लिफ्ट च्या दरवाज्यावर आपटली आणि त्या आघाताने अक्षरशः चिरडली गेली. डोकं फुटून रक्तस्त्राव इतका झाला की तिथेच तिचा प्राण गेला. अवघ्या काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं. 

एखादी जड लोखंडी व्हील चेअर एखाद्याच्या अंगावर जोरात आदळावी व त्या व्यक्तीचा संपुर्ण चेंदामेंदा व्हाव्हा ही संकल्पनाचं मुळात भयावह आहे. त्या आवाजाने सारे सोसाइटीचे लोक तेथे जमा झाले. पण ती व्हील चेअर तिथे दिसत नव्हती.. कोणीतरी पूजाच्या बाबांना फोन केला व पूजाबद्द्ल खबर दिली. ते जिन्याने धावतच खाली आले आणि आपल्या मुलीची अवस्था पाहून धाय मोकून रडू लागले. नक्की काय झाले, कसे झाले ही गोष्ट अजूनही कोणाला माहित नव्हती. दुसऱ्या दिवशी ही गोष्ट अनिकेत व सुभाषला कळाली. अनिकेत आणि सुभाष पूजाचे फार चांगले मित्र होते. ते दोघे ही सरकारी जॉब करायचे. जॉबमुळे दोघेही आपल्या कुटुंबापासून दुरचं रायचे  अनिकेत ला सुट्टी असल्यामुळे तो घरीच होता. एकटेपणा त्याला सतत खात होता आणि त्यात पुजाचे अकस्मात जाणे. तिच्या आठवणींनी त्याच्या डोळ्यातले अश्रू थांबतच नव्हते. सारखी त्याला पूजाची आठवण येत होती. तेवढ्यातचं त्याला सुभाषचा फोन आला. सुभाष देखील रडक्या आवाजात बोलला ” काय रे अन्या! आपल्या पूजा बद्दल असे अचानक कसे झाले यार..”

त्याचे हे वाक्य ऐकुन अनिकेतच्या अश्रूनाचाही बांध फुटला “हो रे , आपली Best Friend आपल्याला सोडून गेली.. असे कसे झाले मला काहीच कळत नाहीये.. आज मी तिच्या बाबांना भेटायला जाणार आहे , संध्याकाळी निघतोय , तू पण येतोस का माझ्याबरोबर ? “

” इच्छा तर खूप आहे रे माझी, पण काय करू माझी तब्बेत ठीक नाहीये.

मी सांगायला विसरलो तुला, मला एक दिवस ऍडमिट व्हायला सांगितले आहे हॉस्पिटलमध्ये , आज रात्रीपर्यंत डिस्चार्ज मिळेल. तू जाऊन काकांना भेटून ये, मी नंतर जाऊन भेटतो.”

इतकं बोलून सुभाषने फोन ठेवला. संध्याकाळचे 7 वाजले होते. अनिकेत आपल्या कार ने एकटाचं पूजाच्या घरच्यांना भेटायला निघाला. तसा प्रवास बराच लांबचा होता. तास दीड तास होत आला तसे अनिकेत ला झोप येऊ लागली म्हणून अनिकेत ने सुभाष ला फोन केला. स्पीकर मोडवर ठेवत फोन शेजारच्या सीटवर ठेऊन दिला. त्यांच्या गप्पा बराच वेळ झाला तरी सुद्धा सुरूच होत्या. तितक्यात अचानक गाडी आवाज करत बंद पडली. अनिकेत ला काही कळले नाही की अचानक असा काय बिघाड झाला. त्याने आजू बाजूला पाहिले तर रस्ता अगदी निर्मनुष्य होता. त्याची गाडी अश्या ठिकाणी येऊन बंद पडली होती जिथे दूर दूर पर्यंत वस्ती दिसत नव्हती. त्यांनी गाडीच्या दरवाज्याची काच खाली केली तसे रात किड्यांची किर्र किर्र कानावर पडली. त्याला लक्षात आले की गाडी एका पूलावर येऊन बंद पडली आहे. 

” अरे यार ! या गाडीला काय झाले ” असं पुट पुटतच गाडीच्या बाहेर उतरतचं अनिकेत म्हणाला. रात्रीचे 9 वगैरे वाजले असावे , तेथे त्या रस्त्यावर कोणी मेकॅनिक ही सापडणार नव्हता. सुभाषचा फोन चालूच होता , ” हॅलो! हॅलो काय रे अनिकेत काय झालं?” सुभाषने विचारले.

” अरे बघ ना , या गाडीलाही आताचं बंद पडायचे होते, थांब जरा होल्ड कर मी बोनेट चेक करून येतो ” येवढे म्हणत अनिकेत कारचे बोनेट उघडून चेक करू लागला. तितक्यात त्याला कसलासा आवाज आला. त्या अंधाऱ्या रस्त्यावर तो आवाज फार विचित्र जाणवत होता. त्याने मागे वळून पाहिले आणि सर्रकन त्याच्या अंगावर काटाचं आला. एक व्हील चेअर त्याच्या दिशेने वेगात येत होती. त्या व्हील चेअर च्या चाकातली लाईटिंग बघुन त्याने आपल्या भुवया उंचावल्या. त्याचे अंग थरथर कापू लागले, काही क्षणात तो भीती ने घामाघूम झाला. त्या व्हील चेअर कडे पाहुन त्याला काहीतरी आठवले.

” मला माफ कर , प्लीज , सॉरी , मला माफ कर ” त्या धावत्या व्हील चेअर कडे पाहुन अनिकेत जोरजोरात ओरडू लागला.

” काय रे अनिकेत, काय झालं, का ओरडतोय?” सुभाषचा फोन चालूचं होता. तितक्यात अनिकेतने सुभाषला जोरात ओरडून म्हणाला, ” सुभाष, ऐक माझं , तो परत आलाय, तो कोणालाचं नाही सोडणार”. अनिकेतचे हे वाक्य संपताचं त्या व्हील चेअर ने अनिकेतला जोरात धक्का दिला व तो पुलावरुन उलटून थेट खाली कोसळला. सुभाषला मात्र या सगळ्या पासून अनभिज्ञ होता, तितक्यात त्याचा फोन ही कट झाला आणि त्या परिसरात एक जीवघेणी शांतता पसरली. 

दुसऱ्या दिवशी सकाळी..  सुभाष आपल्या घरी आराम करत होता. त्याला डिस्चार्ज जरी मिळाला असला तरी थोडीशी कणकण जाणवत होती. म्हणून त्याने आरामासाठी दोन – तीन दिवस रजा घ्यायची ठरवली होती. काल रात्री अनिकेतचे ते कोड्यात टाकणारे वाक्य सारखे त्याच्या डोक्यात घुमत होते. त्यात त्याचा फोन ही नॉट रीचेबल येत होता. त्या दिवशी त्याची मैत्रीण नीलम त्याला भेटायला त्याच्या घरी आली. नीलम पत्रकार होती. सुभाषची तब्बेत वगैरे जाणुन घ्यायला ती घरी आली होती. तशी तिची अनिकेत व पूजाशी चांगली ओळख होती. सुभाष ने च तिची ओळख करून दिली होती. आता सुभाषची मैत्रीण म्हणजे तिची अनिकेत आणि पूजाशी मैत्री आलीचं. तिचं अधून मधून त्या दोघांशी बोलण ही व्हायचं. काही वेळ गप्पा झाल्यावर सुभाष चा निरोप घेऊन तू ऑफिस मध्ये आली. नाईट शिफ्ट असल्यामुळे ऑफिस मध्ये जास्त लोक नव्हती. ती आपल्या कामात व्यस्त होती. तितक्यात तिच्या केबिन जवळची खिडकी ची काच तडकू लागली. बाहेर वारा तर वाहत नव्हता त्यामुळे तिला जरा नवल वाटलं. ती उठून पाहणार तितक्यात डेस्क वरच्या कीबोर्ड ची बटण आपोआप दाबली जाऊ लागली. ती झटकन डेस्क पासून दूर झाली. हे काही तरी भयानक घडतंय हे कळू लागलं होत. तिथून बाहेर निघणार तितक्यात तिचे लक्ष खिडकीतून बाहेर गेले. तर तीच व्हील चेअर नजरेस पडली आणि तिच्या अगदी कानाजवळ एक आवाज घुमला “मी कोणालाचं सोडणार नाही. ” 

नीलम ऑफिस मधून पळत च सुटली व कशीबशी पडत – धडपडत बाहेर आली. तिच्या नशिबाने तिला लगेच रिक्षा मिळाली आणि ती आपल्या घरी आली. घरात शिरल्या शिरल्या लगेच तिच्या मित्राला म्हणजे सुभाषला फोन केला. ती प्रचंड घाबरली होती व घाबरतचं म्हणाली, ” हॅलो सुभाष , अरे तो परत आलाय .”

सुभाषने वैतागतचं विचारले, ” काय गं नीलम, कोण परत आलय? काय बोलतेय तू..? “

धापा टाकत च नीलम म्हणाली , ” मनोहर “

” मनोहर , मनोहर कसा येऊ शकतो , तो तर मेलायं ना ” सुभाष म्हणाला.

” हो , दोन वर्षांपूर्वीची घटना विसरलास का सुभाष?” नीलम म्हणाली.

तसे एका क्षणात सगळा घटना क्रम पुन्हा सुभाष च्या डोळ्यांसमोर आला.

मुळात मनोहर , पूजा , अनिकेत , सुभाष आणि नीलम हे दहावीच्या एकाच बॅचचे. सारेजण अगदीचं जीवाला जीव देणारे होते. मनोहर बालपणापासूनचं अपंग होता. तो अपंग असल्या मुळे तो दहावीपर्यंतचं शिकला व नंतरचे शिक्षण त्याला घेताचं आले नाही.त्याच्या मित्रांनी त्याला लाईटिंगची व्हील चेअर गिफ्ट केली होती. पण मनोहर च्या नशिबी काही भलतेच लिहून ठेवले होते. त्याच्या आई – बाबांचे अकस्मात निधन झाले आणी मनोहर अनाथ झाला. त्याला जवळचे असे कोणीचं नव्हते. मग ते चार मित्रचं त्याचा परिवार बनले. त्याची बँकेची व इतर महत्त्वाची कामे ppमनोहर त्याच्या मित्रांकडून करून घ्यायचा. मनोहरची आर्थिक स्थिती खूप चांगली होती. भर भक्कम शेती होती त्याची. त्याच्या नातेवाईकांचा त्या शेतीवर डोळा होता पण ती जमीनचं मनोहरच्या आयुष्याचा आधार होती. आणि ही गोष्ट त्याच्या मित्रांनाही ठाऊक होती. सगळं काही सुरळीत चालू होत पण नियतीच्या मनात मात्र काही वेगळंच होत. पूजाच्या मनात एक असुरी विचार आला आणि आपल्या इतर मित्रांना ही तिने त्यात सामील करून घेतले. पूजा ने या मागचे खरे कारण सांगितले नाही पण मनोहर ची शेत जमीन आपल्या नावावर केल्यामुळे आपले आयुष्य बदलेल, सगळे मार्ग सोपे होतील हे मात्र मित्रांना चांगले पटवून दिले. एके रात्री त्याच्या मित्रांनी मनोहर ला फसवून जमिनीच्या कागद पत्रांवर सही करून घेतली. मनोहर ने विश्वासाने काही न बघता त्यावर सही केली. 

पण हे सगळे इतक्यावरच थांबणार नव्हते. तिने मनोहर ला घराच्या जिन्यावरून खाली ढकलून दिले. डोक्याला जबर मार लागल्यामुळे त्याने जागीच प्राण सोडला. आपल्या जिवाला जीव लावणारे मित्र या थराला जाऊन आपला जीव घेऊ शकतील याचा त्याने स्वप्नात हि विचार केला नसावा. 

सुभाष ला कळून चुकले की तो सूड घ्यायला परत आलाय. त्याने घाबरून नीलम चा फोन कट केला. तितक्यात तिच्या घराचे दार कोणीतरी ठोठावले. तिने डुअर होल मधून पाहिले तर घराबाहेर तीच व्हील चेअर येऊन थांबली होती. ती दबक्या पावलांनी मागे सरकू लागली. पण पुढच्याच क्षणी तिच्या घराचे दार आपोआप उघडले गेले. घरातले दिवे अचानक बंद झाले.. तसे त्या संधीचा फायदा घेत ती धावत सुटली व टेरेसवर आली. तिथे तिला जरा हायसे वाटले. पण त्याचा काही छ फायदा नव्हता कारण केलेल्या गुन्ह्याची शिक्षा तिला मिळणार होती. अचानक कुठून तरी ती व्हील चेअर तिच्या वर झेपावली आणि ती टेरेसवरुन थेट खाली कोसळली. जागच्या जागीच तिचा मृत्यू झाला. 

इथे  सुभाषलाही हे कळून चुकले होते कि, मनोहर परत आलाय आणि आता त्याची काही खैर नाही. त्याला कल्पना होती की, मनोहरने पूजा व अनिकेतला संपवले आणि आतापर्यंत कदाचित नीलमचा ही जीव गेला असावा. आता पुढचा नंबर त्याचा होता. या विचारानेचं तो अर्ध मला झाला होता. आपण केलेल्या पापाचा, गुन्ह्याचा त्याला पश्चाताप होऊ लागला.. कधी काय होईल सांगता येत नव्हते म्हणून त्याने एका मांत्रिकाला आपल्या घरी बोलावले. त्या मांत्रिकाला सगळा प्रकार समजावून सांगितला. त्यावर तो मांत्रिक म्हणाला ” तू निश्चिंत हो , मी तुला काही होऊ देणार नाही, एक विधी करावा लागेल आणि तू त्या जीवघेण्या चक्रातून कायमचा बाहेर पडशील ” 

असे म्हणत मांत्रिकाने सुभाषभोवती भस्माचे एक रिंगण आखले. सुभाषला माहिती होते कि, ती व्हील चेअर तेथेही येणार होती पण मांत्रिकाच्या सांगण्याने तो निश्चिंत झाला होता. जसे त्याला काही होणार नाही. किंवा तो मांत्रिक काही होऊ देणार नाही. 

विधी ला सुरुवात करणार तोच विचित्र हसण्याचा आवाज येऊ लागला. सुभाष ला कळायला वेळ लागला नाही की तो आवाज मनोहरचाचं होता.

पुढे जे घडले ते अनाकलनीय होते. ती व्हील चेअर त्याच्या घराच्या आतल्या खोलीतून त्यांच्यापाशी आली. जणू ती तिथेच होती. सुभाष भीतीने थरथर कापू लागला.

मांत्रिकाने जोरजोरात मंत्र पुटपुटण्यास सुरुवात केली. मांत्रिक रिंगणाबाहेर होता व सुभाष भस्माच्या रिंगणात. 

एक अनामिक शक्ती त्या रिंगणा ला ओलांडू पाहत होती.

सुभाष चा जीव घेण्या साठी ती व्हील चेअर त्या रिंगणात प्रवेश करु शकत नव्हती.

” तू काहीचं करु शकत नाहीस त्याला ” मांत्रिक मोठ्या आवाजात म्हणाला.

रिंगणात असलेला सुभाष निश्चिंत झाला होता, त्याच्या चेहऱ्यावर एक खुनशी हास्य पसरले. 

तसे त्या घरात एक आवाज घूमला ” मी माझा बदला घेऊन च जाणार..”

इतके बोलून मनोहर च्या आत्म्याने सारी शक्ती पणाला लावली. अख्खे घर हादरू लागले, वस्तू खाली पडू लागल्या. त्या रिंगणाच्या थेट वर एक काचेचे वजनदार झुंबर होते. जसे घर हदरू लागले तसे ते झुंबरही हलू लागले व बघताचं क्षणी ते धाडकन खाली सुभाषच्या अंगावर पडले. तो रक्ताने न्हाऊन निघाला. घरभर काचा पसरल्या होत्या आणि प्रचंड प्रमाणात रक्तही वाहत होते. हे सारे पाहुन मांत्रिक घाबरून पळून गेला. सुभाषने शेवटी जीव सोडला. 

सुभाष च्या मृत्यू सोबत च मनोहरचा बदला पूर्ण झाला होता आणि त्याच्या आत्म्याला कायमची मुक्ती मिळाली होती.

Leave a Reply