अनुभव – स्वप्नील बांदल

मी माझ्या प्रेयसी ला बऱ्याच दिवसांनी भेटायला जाणार होतो.. काही महिन्यांपूर्वी च ती दुसऱ्या शहरात शिफ्ट झाली होती. सगळे प्लॅनिंग झाले होते. त्या दिवशी ऑफिस मधून थोडे लवकर निघून संध्याकाळी ६ ची बस पकडायची आणि थेट तिला त्या शहरात भेटायला जायचे. मी खूप खूष होतो कारण बऱ्याच महिन्यांनी तिला भेटणार होतो. पण त्या दिवशी ही नेहमी प्रमाणे ऑफिस मधून निघायला उशीर झाला. जवळपास ८ वाजले. बस ने जाण्यापेक्षा बाईक ने गेलो तर बरे पडेल आणि लवकर ही पोहोचता येईल असा विचार केला. तसे पटकन मित्राला फोन लावला आणि विचारले की माझ्यासोबत येशील का. त्याने तर मला वेड्यात च काढले. कारण मी रात्री बाईक ने प्रवास करणार होतो आणि मला कुठून कसे जायचे याबद्द्ल काहीही माहीत नव्हते. 

त्यात डिसेंबर महिना असल्याने बरीच थंडी होती. आणि त्याला रस्ता माहीत होता. घाटातून जाणारा निर्मनुष्य रस्ता. त्यामुळे त्याने साफ नकार दिला आणि मला ही जाऊ नकोस असे सांगितले. पण मी मात्र भलत्याच जोमात होतो म्हणून सोबत २ जॅकेट्स आणि hand ग्लोज वैगरे सगळे घेऊन एकटाच निघालो. मला रस्ता अजिबात माहीत नव्हता पण जायचे तर होतेच. शहरातून बाहेर पडे पर्यंत १० वाजून गेले. हळु हळु वर्दळ कमी होताना जाणवू लागली. मी सतत काही किलोमीटर अंतर पार केल्यानंतर गाडी थांबवून लोकांना रस्ता विचारात होतो. जे कोणी रस्त्यात भेटत होते ते म्हणत होते की इतक्या रात्री एकट्याने निघाला आहात काळजी घ्या. पण मी त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत पुढे जायचो.

साधारण ११ च्या सुमारास मी एका ढाब्यावर जेवायला थांबलो. अर्ध्या तासात मी जेवण वैगरे आटोपले. आता थंडी ने ही जोर धरला होता. तो गारवा अगदी असह्य वाटत होता पण तरीही मी तिथून बाहेर पडलो आणि पुढच्या प्रवासाला लागलो. काही वेळात मी घाटाच्या वळणावळणाच्या रस्त्याला लागलो. समोर फक्त दोन च गोष्टी दिसत होत्या. मिट्ट काळोख आणि त्या काळोखाला भेदणारा माझ्या बाईकच्या हेड लाईट चा प्रकाश. थंडी असल्यामुळे धुके गडद होत चालले होते. अधून मधून एखादा मालवाहू ट्रक बाजूने निघून जायचा आणि मग पुन्हा काही वेळा साठी सगळे शांत व्हायचे. मला हा प्रवास नकोस होऊ लागला होता. वेळ पहिली नाही पण बहुतेक तास उलटून गेला होता म्हणजे १२-१२.३० झाले असावेत. आता तर त्या निर्जन रस्त्यावर माझ्या बाईक शिवाय एकही वाहन दिसत नव्हते.

मी एखादी टपरी वैगरे दिसतेय का ते पाहू लागलो आणि रस्त्याच्या कडेला एक टपरी दृष्टीस पडली. मी तिथे गाडी थांबवली आणि वेळ पहिली. बरोबर १ वाजला होता. त्या टपरीवर मी २ गरम कटिंग चहा प्यायलो तेव्हा कुठे अंगात तरतरी आल्यासारखे वाटले. तिथे टपरी वाला आणि माझ्या व्यतिरिक्त अजुन २ माणसं बसली होती. मी त्यांना पुन्हा रस्ता विचारला. तसे ते तिघेही माझ्याकडे एक टक पाहू लागले. त्यातला एक म्हणाला “अरे बाबा या रस्त्यावर संध्याकाळनंतर एक दुचाकी वाहन ही दिसत नाही. आणि रात्री ११ नंतर तर रस्त्यावर एकही वाहन नसते. तू कसा काय एकटाच निघालास या रस्त्याने?”. तसे मी त्यांना म्हणालो “अर्जंट होते म्हणून एकटाच निघालो. त्या टपरी वाल्याला पैसे देऊन मी बाईक स्टार्ट करत असताना तो माणूस पुन्हा म्हणाला “आता जाणार च आहेस तर रस्त्यात मध्ये कुठे थांबू नकोस”. मी हो म्हणालो आणि पुन्हा रस्त्याला लागलो. 

त्या माणसाचे विचार डोक्यात सतत घोळू लागले. तो असे का म्हणाला असेल. विनाकारण एक अनामिक भीती मनात घर करू लागली. माझ्या बाईक चा वेग वाढतच चालला होता. ठराविक अंतरावर असलेल्या स्ट्रीट हेड लाईट च्या प्रकाशात माझ्याच बाईक ची सावली दिसायची आणि कोणी तरी आपल्या सोबत असल्याचा भास व्हायचा. आता रात्रीचे २ वाजून गेले होते. बोचऱ्या थंडी ने तर कहर केला होता. संपूर्ण गारठून गेलो होतो. आणि तितक्यात समोरून कोणीतरी सर्रकन वाऱ्याच्या वेगाने निघून गेले. काय होत ते..? हृदय भीतीने धड धडू लागले. त्या वाऱ्याच्या आवाजा सोबत माझ्या हृदयाची धडधड मला स्पष्ट ऐकू येत होती. आत्ता एका क्षणासाठी समोरून खरच कोणी गेलं की फक्त भास झालं होता.. मी गाडीचा वेग अजुन च वाढवला. तसा मागून एक कर्णकर्कश आवाज कानावर पडला. 

आता मात्र मी प्रचंड घाबरलो. त्या माणसाचे बोलणे आठवू लागले की रस्त्यात मध्ये थांबू नकोस. नकळत माझ्या बाईक चा वेग वाढतच चालला होता. काही वेळा नंतर तो आवाज ऐकू येईनासा झालं. गाडी एका विचित्र चढण असलेल्या घाटाच्या रस्त्याला लागली. इतक्या वेळ न थांबता सतत आल्याने बाईक चे इंजिन गरम झाले होते. त्यामुळे जे व्हायला नको होते तेच झाले. त्या निर्जन घाटाच्या चढण असलेल्या रस्त्यावर माझी गाडी बंद पडली. मिट्ट अंधार आणि त्यात रस्त्याच्या दुतर्फा गर्द झाडी. गेल्या तासाभरात एकही वाहन दिसले नव्हते त्यामुळे यापुढे ही कोणाची मदत मिळेल याची शाश्वती नव्हती. तरीही मी बाईक ढकलत रस्त्याच्या एका कडेला आणली आणि तिथेच स्तब्ध झालो. मी अर्धा मिटर जरी बाईक पुढे नेली असती तर गेलोच असतो. कारण माझ्यापासून २ पावलं अंतरावर खूप मोठी खोल दरी होती. ते दृश्य पाहून मला धडकीच भरली. 

एकही वाहन दिसत नव्हते. शेवटी बाईक कशी तरी ढकलत घेऊन जाऊ लागलो. पण असे वाटू लागले की बाईक मागून कोणी तरी खेचतेय. त्यात काही वेळा पूर्वी आलेला तो विचित्र आवाज पुन्हा येऊ लागला आणि माझ्या शरीरातला उरला सुरला त्राण ही संपला. मागे वळून पाहण्याची हिम्मत होत नव्हती. मी पूर्ण ताकदीनिशी बाईक ढकलण्याचा प्रयत्न करत होतो. माझ्या पायाला बाईक चा कोणता तरी भाग घासत होता पण मी त्या कडे दुर्लक्ष करत होतो. माझ्या मागे काय होते काय माहीत पण या सगळ्यातून सुटण्यासाठी देवाकडे प्रार्थना करू लागलो. माझ्या पायाला जे काही घासत होते त्यामुळे आता त्या ठिकाणी जखम होऊन रक्त यायला लागले. मी देवाचा धावा सुरूच ठेवला होता आणि पुढच्या काही अंतरावर मला एक घर दिसले. तसा जीवात जीव आला. मी सगळा त्राण एकत्र करून गाडी ढकलू लागलो. जसे त्या जागे जवळ आलो तसे मला दिसले की ते एक हॉटेल आहे. मी गाडी तशीच टाकून त्या हॉटेल च्या आवारात जाऊन पडलो. 

तिथल्या लोकांनी मला उचलून आत आणले. तोंडावर पाणी वैगरे मारले. मी जवळपास २ बॉटल पाणी प्यायलो असेन. ते मला धीर देऊ लागले. काही वेळा नंतर मी शुध्दी त आलो आणि त्यांना घडलेला प्रकार सांगितला. तेव्हा ते मला म्हणाले की या घाटात रात्री कोणी प्रवास करत नाही. इथे चित्र विचित्र आवाज ऐकू येतात आणि वाहनांचे अपघात होतात. मी रात्री एकट्याने निघून मूर्खपणा केलाय हे मला कळून चुकले होते. मी ती रात्र तिथेच थांबलो आणि दुसऱ्या दिवशी पहाटे निघालो. पुढचे दोन दिवस मला ताप भरला होता. त्या नंतर मात्र मी कानाला खडा लावला. असा भयानक जीवघेणा प्रवास मी माझ्या उभ्या आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही. 

Leave a Reply