अनुभव – हार्दिक पांचाळ

अनुभव जवळपास २० वर्षां पूर्वीचा आहे जो माझ्या वडिलांसोबत घडला होता. जो त्यांनी मला सांगितला. 

थंडीचा महिना सुरू झाला होता. माझ्या वडिलांनी आणि त्यांच्या ३ मित्रांनी गणपती पुळे ला ट्रीप काढायचा प्लॅन केला. त्यांचे तीन मित्र – प्रसाद, सुनील आणि राजन. ट्रीप ला जाण्याच्या २ दिवस आधी माझ्या आजोबांनी त्यांना सांगितले होते की रात्री चा प्रवास टाळा पण माझ्या वडिलांनी फक्त हो म्हणून त्याकडे दुर्लक्ष केलं. त्यांनी एक फोर व्हीलर भाड्याने बुक केली होती. त्या दिवशी दुपारी जेवण आटोपल्यावर साधारण तासाभराने त्यांनी प्रवास सुरू केला. बऱ्याच दिवसांनी ट्रीप प्लॅन केल्यामुळे खूप मजा मस्ती करत ते निघाले होते. त्यांच्या गप्पा सुरू होत्या. जवळपास तीन – साडे तीन तास प्रवास झाल्यावर ते संध्याकाळी साडे सहा पावणे सात ला एका ढाब्यावर चहा नाश्ता करण्यासाठी थांबले. फ्रेश झाले आणि पुन्हा पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. पहाटेपर्यंत पोहोचू असे ठरले होते. साधारण ९.३० ला ते पुन्हा ते एका ढाब्यावर थांबले. सगळ्यांना खूप भूक लागली होती. पण जास्त वेळ थांबायचे नाही असे ठरवून त्यांनी अर्ध्या तासात जेवण उरकले आणि लगेच जायला निघाले. गाडीत बसण्याआधी वडिलांनी त्या धाब्या वाल्याला पुन्हा एकदा रस्ता विचारून घेतला. त्याने कुठून कसे जायचे ते सांगितले पण त्याचे डोळे काही तरी वेगळेच सांगत होते. 

वडिलांनी विचारले की तुम्ही काही लपवताय का आमच्यापासून. तसे तो म्हणाला “काही नाही.. रस्त्यात कुठे थांबू नका..” ते सगळे मित्र तो असे का म्हणाला हे पाहतच राहिले.. त्यावर तो पुढे म्हणाला “तुम्हाला नाही कळणार.. नवीन आहात तुम्ही..” ठीक आहे थँक यू असे म्हणत त्यांनी त्याचे आभार मानले आणि पुढच्या मार्गाला लागले. रात्र झाली होती त्यामुळे थंडीचा जोर हळु हळू वाढत चालला होता. पुढचा रस्ता जंगल पट्टीतून जाणार होता. २ तासानंतर त्यांनी हायवे सोडला आणि त्या जंगलाच्या रस्त्याला लागले. वडिलांनी वेळ पाहिली तर ११.३० वाजायला आले होते. त्या रस्त्याला लागून जेमतेम अर्धा तास झाला होता. पण सतत ड्रायव्हिंग करून वडील थकले होते म्हणून त्यांनी १० मिनिट थांबून थोडे हात पाय मोकळे करायचा विचार केला. मित्रांनी ही होकार दिला. त्या धाब्याच्याच मालकाचे बोलणे चौघे ही पूर्ण विसरून गेले. एक चांगला स्पॉट बघून त्यांनी गाडी थांबवली आणि ते सगळे खाली उतरले. त्यांच्यामध्ये प्रसाद काका खूप खोडकर होते. त्यांना समोर तीन कुत्रे गुर गुर ताना दिसले म्हणून सहज त्यांनी एक दगड उचलून त्यांच्या दिशेने भिरकावला. 

त्यातला एक कुत्र्याला तो दगड लागला आणि अचानक त्यांचे गुर गुरणे वाढले. ते तीन कुत्रे त्यांच्यापासून अवघ्या काही अंतरावर उभे होते. वडिलांनी पाहिले तर ते त्यांच्या दिशेने पाहून गुर गुरू लागले. त्यांचे डोळे लालभडक दिसत होते. डोळ्याचे पाते लवते न लवते तितक्यात ते त्यांच्या दिशेने पिसाळल्यासारखे धावत सुटले. ते त्यांच्या दिशेने धावत येताना पाहून चौघेही धावत येऊन गाडीत बसले आणि तिथून निघाले. ते त्याला बोलू लागले की उगाच दगड मारला स त्याला.. थोडक्यात वाचलो आपण नाही तर अंगावर धावून आले होते ते. काही वेळ ते गाडीच्या मागे धावत आले आणि नंतर दिसेनासे झाले. अर्धा तास उलटला. रस्त्याच्या दोन्ही बाजूला गर्द झाडी आणि मोठी वृक्ष होती. तसे त्यांना रस्त्याकडेच्या एका झाडामागे उजेड दिसला. त्यांच्यातला एक मित्र म्हणाला की थोड्या वेळ थांबू, कोणीतरी शेकोटी पेटवली आहे असे वाटतेय. थंडीही खूप आहे. जरा वेळ शेकोटी जवळ उभे राहून ऊब घेऊ आणि मग निघू. तसे त्यांनी रस्त्याकडे ला गाडी पार्क केली आणि ते थोडे आतल्या भागात त्या उजेडाच्या दिशेने गेले. तिथे गेल्यावर समोरचे दृश्य पाहून ते चौघेही घाबरले. समोर एका जुन्या पडक्या बाकावर ३ जण बसले होते. सगळ्यात भयानक म्हणजे त्या तिघांचे मुंडकेच नव्हते. 

त्यांची वाचाच बंद झाली. त्यांना एका क्षणासाठी कळलेच नाही की आपण हे काय पाहतोय. त्यातल्या एका मित्राने विचारले “अरे हे काय आहे.. तुम्हाला ही तेच दिसतेय ना जे मला दिसतंय..” ते दबक्या पावलांनी मागे जाऊ लागले आणि तितक्यात त्या बाकावर बसलेल्या एकाला यांची चाहूल लागली. तसे तो उठला आणि त्याने हाताने इशारा केला. हे चौघेही जिवाच्या आकांताने गाडी कडे धावत सुटले. हा भयाण प्रकार पाहून ते प्रचंड घाबरले होते. धावत येऊन ते गाडीत बसले. माझे वडील ड्राईव्ह करत होते. त्यांनी गाडी अगदी वेगात घेतली. पण त्यांना जाणवले की गाडी नीट चालत नाहीये, त्यांनी पटकन मागे वळून पाहिले आणि त्यांना दिसले की मागचे एक टायर पंक्चर झालेय. एका संकटापासून सुटका होत नाही त्यात हा दुसरा व्याप. त्यांना कळून चुकले की आता आपले काही खरे नाही. पण ते काही अंतर गाडी तशीच चालवत राहिले. वडिलांना वाटू लागले की आपण अशीच गाडी चालवत राहिलो तर टायर नक्कीच फाटेल आणि गा ताबा सुटून काही तरी विपरीत घडेल. म्हणून देवाचे नाव घेत त्यांनी गाडी थांबवली आणि टायर बदलण्यासाठी गाडीच्या डिकीत ठेवलेली स्टे पनी घेऊन खाली उतरले. त्यांच्या सोबत त्यांचा अजुन एक मित्र उतरला. 

जॅक लाऊन ते टायर बदलू लागले. देवाचे नाम स्मरण सुरूच होते. १०-१२ मिनिटात त्यांनी टायर बदलले आणि ते गाडीत बसणार तोच मागून एक विचित्र आवाज कानावर पडला. मागे वळून पाहिले तर कोणीही दिसत नव्हते. आत बसलेले मित्र म्हणाले की कोणासाठी थांबला आहात, आपल्याला निघायला हवे इथून.. गाडीत बसल्यावर सुनील काका ने रियर व्ह्यू मिरर मध्ये पाहिले आणि थंडच पडले. त्यांनी सर्वांना खुणवून मागे पाहायला सांगितले. तसे घाबरतच सगळ्यांनी मागे पहिले आणि त्यांच्या शरीरातला जणू सगळा त्राण च निघून गेला. कारण मागे तेच मुंडके नसलेले ३ जण उभे असल्याचे दिसले. वडिलांनी गे अर् बदलला आणि गाडी अतिशय वेगात घेतली आणि सगळ्यांना म्हणाले “आता पुन्हा मागे बघून पाहू नका..” जेव्हा तो जंगल पट्टी चा परिसर संपला तेव्हा मागून विचित्र आवाज ऐकू आला. जो ऐकून त्यांची अजूनच तंतरली. जवळपास ६० किलोमिटर चा पल्ला अजूनही त्यांना ओलांडायचा होता. देवाचे नाव घेत ते गाडी चालवत राहिले. पहाटे ४.३० ला ते गावात पोहोचले. थेट मंदिर गाठले आणि बाप्पा समोर नतमस्तक झाले. तिथल्या पुजाऱ्याने त्यांची अवस्था पाहून त्यांची विचारपूस केली. 

तेव्हा त्यांनी घडलेला सगळा प्रकार सांगितला. ते ही जरा दचकले आणि म्हणाले की हा नारळ समुद्रात वाहून या आणि आल्यावर देवाकडे प्रार्थना करा. त्यांनी नारळ अर्पण केला आणि सांगितल्या प्रमाणे प्रार्थना केली. त्यानंतर त्यांना तिथल्याच लोकांकडून कारण कळले. तो व्यक्ती सांगू लागला.. त्या जंगलाच्या रस्त्यावर बाईक वरून येत असताना ३ तरुण मुलांचा भीषण अपघात झाला होता. एका ट्रक ने उडवले होते आणि इतकेच नाही तर त्या तिघांच्या डोक्यावरून ट्रक गेल्यामुळे ते चिरडले गेले होते. ते जागेवरच गेले. तेव्हा पासून गावातल्या लोकांना बरेच अनुभव आहेत. ते वाटसरु ना त्रास देतात, त्यांचा अपघात घडवून आणतात. त्यांचे आत्मे तिथेच त्या भागात अडकून पडले असावेत. तुमचे नशीब चांगले होते म्हणून तुम्ही सुखरुप सुटलात. तितक्यात राजन काका म्हणाला की आमच्या मागे कुत्रे ही लागले होते, बराच वेळ धावत होते पण नंतर अचानक दिसेनासे झाले. त्यावर ती व्यक्ती म्हणाला की ते कुत्रे नव्हते.. त्या कुत्र्याच्या रूपात तेच तीन अतृप्त आत्मे होते. तुम्ही नक्कीच त्यांना काही तरी त्रास दिला असणार. म्हणून ते तुमच्या मागे लागले. 

नंतर हॉटेल रूम बुक करून ते तीन दिवस तिथे राहिले. घरी परतताना मात्र रात्री चा प्रवास टाळून ते दिवसा घरी आले. 

Leave a Reply