सार्थक आणि रोशनी आज जवळजवळ पाच वर्षांनी आपल्या गावी आले होते. दोघे नात्याने चुलत भाऊ-बहीण. सार्थक साधारणतः दहा वर्षाचा आणि रोशनी साधारणतः तेरा वर्षाची. 

सार्थकचे वडील विशाल आणि रोशनीचे वडील राजेश. राजेश आणि विशाल दोघे आपला फॅमिली बिझनेस संभाळत होते. बिझनेस मोठा असल्यामुळे त्यांना आपला जास्त वेळ घरापासून दूर घालवावा लागत असे. आज खूप वर्षांनी दोघे एकत्र आपल्या कुटुंबासोबत आपल्या मूळ गावी आले होते. 

गावाच्या थोडं बाहेर त्यांच्या एक मोट्ठा वडिलोपार्जित वाडा होता. वाड्यात राजेश आणि विशालची विधवा आई आणि काका काकू राहायचे. काकाला दोन मुले होती, दोघेही बाहेरगावी शिकायला होती. विशाल आणि राजेश यावेळी सुट्टी काढल्या मूळे मनसोक्त वेळ घालवणार होते. गावात येऊन साधारण एक आठवडा झाला होता. बऱ्याच वर्षांनी गावी आल्यामुळे गावातील प्रत्येक जण त्यांना आपल्या घरी चहपाण्या ला बोलवत होते. काही वेळा सार्थक आणि रोशनी त्यांच्या सोबत गेले, नंतर मात्र ते कंटाळू लागले म्हणून त्यांना घरीच ठेऊन ते जाऊ लागले. 

आजीने सार्थक आणि रोशनी ला सांगितले होते की संपूर्ण गाव फिरलात तरी चालेल पण गावाच्या वेशिवरचे तळे आहे तिथे चुकूनही फिरकू नका.. दोघेही तसे खूप समंजस होते म्हणून त्यांनी आजीचे ऐकले पण फक्त काही दिवस. गावातील जवळ जवळ सर्व भाग, सर्व मनमोहक ठिकाणी पाहून झाली होती. आता उरले होते ते घरापासून काही अंतरावर म्हणजेच गावाच्या वेशीवर असलेले तळे. तिथल्या लहान मुलांकडून बोलता बोलता विषय निघाला आणि त्यांच्या मनात विचार येऊन गेला. आपण एकदा तरी जाऊन तळ पाहून येऊ. असे नक्की काय आहे त्या तळ्या जवळ. 

त्यांनी एक दिवस ठरवला. त्या दिवशी सकाळी विशाल आणि राजेश घरातून लवकर निघाले त्याना बाजूचा गावत असलेल्या मित्रा कडे आमंत्रण होते. मंगळवार असल्याने आजी आणि काकू गणपतीच्या मंदिरात गेले होते. काका सुद्धा शेतीच्या कामासाठी बाहेर गेले होते. 

सार्थक आणि रोशनी अत्ता घरात एकटेच होते. वेळ साधून दोघे तळ्याकडे जाण्यास निघाले. तळ्याकडील वाटेवर एक निरव शांतता पसरली होती. तिथे कोणीही फिरकत नसे. त्या वाटेवर दोन्ही बाजूस मोठ मोठी झाडे होती. शिवाय रस्ता तसा कच्चा होता. साधारणतः दहा मिनिटे चालून झाल्यावर दोघे तळ्याजवळ पोहोचले. तळया जवळील भाग खुप सुन्दर होता. तळ्यात थोडेफार काळपट पाणी होते, सर्वत्र हिरवळ होती. हे सर्व पाहत असताना त्याच्या कानावर काही मुलांच्या खेळण्याचा आवाज आला. 

दोघांनी शोधण्यास सुरुवात केली तसे त्यांना तो आवाज तळ्याच्या दुसऱ्या बाजुने येत असल्याचे समजले. सार्थकने तिथे जाण्याची रोशनी कडे विनंती केली. रोशनीने ती नाईलाजाने मान्य केली. काही वेळात दोघे तळ्याच्या दुसऱ्या टोकाला पोहोचले. समोर एक वडाचे मोठे झाड होते. झाड़ाच्या पारंब्या सोबत काही मुलं खेळत होती. काही वेळापूर्वी जो आवाज येत होता तो याच मुलांचा असावा. पण आता सर्वजन एकदम शांत होते. कोणी कसलाही आवाज करत नव्हते. 

सार्थकने त्यांच्या सोबत बोलण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या पैकी कोणीच सार्थकशी बोलत नव्हते. दूर उभ्या असलेल्या रोशनीला हे सर्व विचित्र वाटत होते. ती धावतच सार्थक जवळ आली आणि त्याला म्हणाली “सार्थक आपण घरी जाऊया.. मला भीती वाटतेय”. पण सार्थक ऐकण्याच्या मनस्थितित नव्हता. सार्थक त्या मुलांसोबत बोलण्याचा प्रयत्न करत असताना सार्थकच्या समोर अचानक एक वडाची पारंबी आली. 

सार्थकने न कळत ती पारम्बी हातात घेतली आणि झोके घेऊ लागला. जवळच उभ्या असलेल्या रोशनीला चाललेला प्रकार खुप विचित्र वाटत होता. काही वेळा पूर्वी येणारा एवढा आवाज अचानक बंद कसा झाला. ती त्याला पुन्हा घरी जाण्यासाठी मनवू लागली आणि तितक्यात आपल्या पाठीमागे कोणीतरी असल्याचे तिला जाणवले. ते बघण्यासाठी रोशनीने मागे पाहिले तर तिच्या मागे ही एक वडाची पार म्बी आली होती. 

बराच वेळ त्याच ठिकाणी उभ्या असलेल्या रोशनीला ही पारांबी आपल्या मागे कधी आली हेच समजले नाही. तिला काय वाटले काय माहिती पण ती अचानक त्या झाडापासून लांब जाऊन उभी राहिली. आणि त्या मुलांना आणि सार्थक ला खेळताना पाहू लागली. बघता बघता त्या मुलांनी हातात असलेल्या परंबी चा फास बनवून गळ्यात गुंडाळली आणि झोके घ्यायला सुरुवात केली. चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचे हावभाव नसलेल्या त्या मुलांना पाहून रोशनी चे डोळे विस्फारले होते. न कळत सार्थक ने ही तेच केले. आपण काय करतोय याचे त्याला कसलेही भान राहिले नव्हते. 

रोशनी धडधडत्या हृदयाने हे भयाण दृश्य पहात होती. ती प्रचंड घाबरली होती. ती धावत सार्थक ला सावध करायला गेली आणि एका एकी सार्थक जमिनीपासून खूप उंचावर खेचला गेला. तिने आजुबाजुला पाहिले तर ती सगळी मुलं आता वेदनेने तडफडत होती. सार्थक ही शरीराला झटके देऊन त्यातून सुटण्याचा प्रयत्न करत होता. पण आता बराच उशीर झाला होता. रोशनी क्षणाचाही विलंब न करता सरळ घराच्या दिशेने धावत सुटली. रडत, धापा टाकत ती घरी येऊन पोहोचली. काकू आणि आजी नुकताच मंदिरातून घरी आल्या होत्या. त्यांना रोशनी ने घडलेला प्रकार सांगितला. 

आजी हंबरडा फोडतच तळ्याच्या दिशेने धावत सुटली. तिच्या सोबत काकी आणि रोशनी ही धावत सुटल्या. त्यांचा आरडा ओरडा ऐकुन सारे गाव गोळा झाले. काही मिनिटात रोशनी , काकू आणि आजी त्या वडाच्या झाड़ा जवळ पोहचले , झाडावर सार्थकचे निपचित शरीर पारम्बिला लटकत होते. सर्वाना कळून चुकले होते सार्थक हे जग कधीच सोडून गेला होता.

सर्वाना हादरा बसला होता, काही वेळात सगळे गावकरी तिथे जमा झाले. त्या झाडावर जाण्याची कोणाचीही हिम्मत नव्हती. काकानी ताबडतोब झाडावर चढून कोयत्याने ती पारंबि कापली.. गावकऱ्यांनी सार्थक चे शरीर हळुवार झेलून खाली जमिनीवर ठेवले. आजी, काकू आणि रोशनी जोर जोरत रडत होते. 

गावातील काही लोक आप अपसात बोलत होते. तेव्हा काही गोष्टी रोशनी च्याच कानावर पडल्या. ही जागा म्हणजे या गावाला मिळालेला श्रापच आहे. आजवर कित्येक लहान मुलांना गिळल य या जागेने. जो कोणी या झाडाच्या पराम्बी सोबत खेळतो, त्याला आपला जीव गमवावाच लागतो. 

बऱ्याच वर्षापूर्वी या झाडाजवळ एक चेटकीण राहत होती. ती लहान मुलाना गोड़ बोलून सम्मोहित करायची आणि नंतर त्यांचा बळी द्यायची..

गावातील मुलं बेपत्ता होऊ लागली होती आणि त्यामुळे गावात खुप भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. खुप प्रयत्न केल्यानंतर शोधाशोध केल्यानंतर हा प्रकार गावातील लोकांच्या लक्षात आला. तेव्हा गावकऱ्यांनी तिला याच झाडाला बांधून जिवंत जाळले होते. असे म्हणतात तेव्हा पासून तिची आत्मा या जागेत वास करते. गावातील लोकांनी झाडाला तोडण्याचा जाळण्याचा बराच प्रयत्न केला, पण ते झाड़ काही केल्या नष्ट झाले नाही. उलट ज्यांनी ते झाड़ तोडण्याचा प्रयत्न केला त्यांचा अकस्मात् मृत्य झाला. तेव्हा पासून या झाडाजवळ कोणीही येत नाही.

रोशनीला आता कळून चुकले होते की जर तिने देखील ती परांबी पकड़ली असती तर आज ती देखील या जगत नसती.

Leave a Reply