अनुभव – मीना

अनुभव माझ्या ऑफिस मध्ये एक काम करणारी ताई आहे तिच्या मित्राला आला होता. तिचा मित्र अलिबाग ला एका बँड मध्ये कशिओ वाजवायचे काम करायचा. त्याला एकदा बाहेरच्या गावातून हळदीची ऑर्डर मिळाली होती. काही कामानिमित्त त्याला उशीर होणार होता म्हणून त्याच्या बँड मधली इतर मित्र मंडळी पुढे निघून गेली. तो एकटा जाणार नव्हता म्हणून काही काळजी नव्हती. त्याचे काम आटोपून तो आणि त्याचे भाऊजी दुचाकी वरून घरून त्या गावी जायला निघाले. त्यांना निघायला बराच उशीर झाला होता आणि त्यात भाऊजी दारूच्या नशेत होते. जाताना वाटेत उंच सुरू ची झाडं लागणार होती.

त्यात बरीच रात्र झाली होती. त्या रस्त्याला स्ट्रीट लाईटस् असून नसल्या सारखे म्हणून त्याला जरा टेन्शन आलं होत. प्रत्येक क्षणाला थंडीचा जोर वाढत चालला होता. त्यात यांची दुचाकी भरधाव वेगात पुढे जात होती. सुटलेला थंडगार वारा अंगावर शहारे आणत होता. समुद्र त्या रस्त्या पासून अगदी जवळ असल्यामुळे लाटांचा मंद आवाज कानावर पडत होता. अधून मधून स्ट्रीट लाईट मुळे त्या लाटा ही नजरेस पडत होत्या. अचानक त्याला काही तरी विचित्र जाणवले आणि नकळत पणे त्याचे लक्ष तिथे गेले. समुद्राच्या पाण्यातून काही लोक बाहेर धावत येताना दिसली. ते बरेच लांब असले तरीही ती लोक उंचीने खूप मोठी वाटत होती. ८-९ फूट उंच. काही वेळासाठी त्याला कळलेच नाही की तो काय पाहतोय.

त्यांच्या धावण्याचा वेग असामान्य होता. आणि सगळ्यात भयानक म्हणजे ती लोकं त्यांच्या दुचाकी च्या दिशेने धावत येत होती. मागे बसलेले भाऊजी अजूनही दारूच्या नशेत होते. हा प्रकार काय आहे याचा विचार न करता त्याने दुचाकीचा वेग वाढवला. दुचाकी जोरात एक्सी लरेट केल्यामुळे जोरात झटका जाणवला तसे भाऊजी नी अनेक प्रश्न विचारायला सुरुवात केली. पण याच्या तोंडून भीतीमुळे एक शब्द ही फुटत नव्हता. त्याने वळुन पाहिले तर ती लोक त्यांच्या बरोबर मागे च धावत होती.

पण रस्त्याच्या एका वळणावर ती सगळी लोक एकाएकी थांबली आणि एका किळसवाण्या आवाजात ओरडू लागली. बहुतेक त्यांची हद्द संपली असावी. तितक्यात त्याचे लक्ष लगेच त्याच्या दुचाकीच्या आरशाला बांधलेल्या देवीच्या ओढणी कडे गेले आणि त्याने एक दीर्घ श्वास घेतला. लग्न घरी पोहोचे पर्यंत त्याने दुचाकी चा वेग अजिबात कमी केला नाही. तिथे पोहोचताच लग्न घरातील देव्हाऱ्यात जाऊन ते बेशुद्ध पडला. पूर्ण रात्र तिथे देव्हाऱ्यात च झोपला. त्याच्या भाऊजी ना मात्र प्रश्न च पडला होता. त्याचे नशीब चांगले म्हणून देवी आई च्या कृपेने तो वाचला नाही तर काही अभद्र होऊन बसल असत.

Leave a Reply