आज चंद्र आकाशात लवकर आला होता..चार दिवसांवरच पौर्णिमा होती,त्यामुळे चांदणे सुद्धा मस्तपैकी पडले होते.समोरील झाडावर सळसळ एकु आली,एक रानमांजर फणसाच्या झाडावर उडी मारुन निघुन गेले..महेष व गणप्या कुठेतरी बाहेर जाण्याच्या तयारीत होते..हातातील सामान बघुन नक्कीच शेजारील गावात जञेसाठी दुकान लावायला जाणार असणार,महेष व गणप्या तसे लहानपणापासुनचे जिगरी दोस्त..एकाचा बांगड्यांचा व दुसऱ्याचा खेळण्यांचा व्यवसाय होता..त्यावेळी गावात राञीच्या वेळी बाहेर गावी जाण्यासाठी सोयीफार कमी असतं त्यामुळे बऱ्याच वेळेला लोक पायी प्रवास करीत..दोघेही बऱ्याच वेळेला जञेला एकञ जायचे..ते गाव तसे लांब होते फार १० कोसांवर वाटेत जाताना जंगल व पलीकडे जाण्यासाठी मध्ये नदी..त्यामुळे ते सर्व सामान पुन्हापुन्हा हाताळत होते..

सर्व शिदोरी बरोबर घेतली आहे ना हे बघत होते.महेषचा बांगड्यांचा व्यवसाय त्यामुळे त्याने जास्त वेळ न दवडता आपले गाठोडे बांधले,गणप्या फार उशीर करीत होता.महेष बोलला..अरे एे गणप्या आटपं कि लवकर सकाळच्याकं पोहचुकं व्हया न्हायतर दुकान लावुक जागा मिळुची न्हाय बगं अरे चलं कि पटकनं..तसा गणप्या लगबगीने उठला आपले सामान बांधुन निघाला.अगं ऐ आयं भाकरतुकडो दे कि लवकरं निघुक उशीर व्होता..आईने भाकर आणुन दिली..दोघे निघाले..वाटेत सावधगिरी म्हणुन दोघांनी जवळ हत्यार घेतली होती,दोघांची घरं तशी गावापासुन लांबच त्यामुळे वाटेत कोणीच नव्हते..दोघेही आडमार्गाने चिंचोळ्या वाटेतुन जातं होते.राञीचे ८:३०वाजतं आले होते..हवेत मंद वारा सुटला होता..पानांची सळसळ चालुचं होती..

रातकिडे किर्रकिर्र करित होते..चिञविचिञ आवाज कानीयेत होते..पायाखालचा पालापाचोळा तुडवित ते दोघेही पुढे सरकतं होते.दोघांचा स्वभाव तसा मजेशीर होता..त्यामुळे गप्पागोष्टी करीत मजेत निघाले होते..गणप्या खास गावरानं शिव्या देत मजेदार किस्से सांगत होता.त्यामुळे दोघातं एकच हश्या पिकत होता..दोघेही चालुन फार थकले होते..त्यामुळे जागा बघुन ते पाणी पिण्यासाठी थांबले..पाणी पिणार एवढ्यात त्यांना दुरुनचं एक आरोळी एकायला आली..गणप्या फार घाबरुन गेला..महेष दगडावर पाय ठेवुन तंबाखु मळतं होता..गणप्या दबक्या आवाजात बोलला..कोण व्होता रे?गणप्या बोलला कोणी नसां रे शेजारील आदिवासी पाड्यातुन आवाज इलो असातं,त्यांचा न्हेहमिचाच हा दिवसभर गाव उंडगायचो नी राञी पाय व्हलंवत नाचायचा..

महेष चा स्वभाव फार गमतीशीर होता..मळलेला तंबाखु गणप्याला देत चलं आता हयसुन असे महेष थोडे तिरक्या स्वरात बोलला.. दोघांनीही गाठोडे घेतले..व प्रवासाला सुरवात केली..गणप्याच्या कानात माञ तिच आरोळी एकु येत होती..ती येक अनामिक चाहुल होती..आपल्या सोबत काय होणार आहे याची दोघांनाही जाणिव नव्हती..समोरील झाडावरुन दोन घुबडं दक्षिणेकडे झेपावली..गणप्या मनातुन खरचं खुप घाबरला होता..त्याला सतत आपल्या मागुन कोणीतरी येत असल्याचा भास होत होता..जंगलप्रवास असल्याने अधिच वातावरण खुप भितीदायक बनले होते..एवढ्यात महेषने समोरुन एक भुजंग झाडीत शिरताना पाहिला..दोघेही दचकले..व थोड्या वेळाने पुन्हा मार्गस्थ झाले..

ज्या ठिकाणी भुजंग दिसला होता तेथुन पुढे मातीत अनेक पावलांचे ठसे उमटलेले त्याना दिसले..येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरुंचे असतील,असे दोघांना वाटले,पण ते जसेजसे पुढे सरकतं होते,तसे ते ठसे नाहिसे होत होते..राञीचे १० वाजले होते अजुन बराच प्रवास करायचा होता..एवढ्यात त्या दोघांनी वाटेत एका वाटसरुला गाठले.त्या वाटसरु सोबत त्याची पत्नी व मुल होते..मुलाला भुक लागल्याने ते खुप रडतं होते..तो वाटसरु बोलला कुठ निघाला रावं तसा गणप्या बोलला हयचं शेजारील गावात जातावं तो पण तिकडेच निघाला होता..त्या दोघांना आपल्या सोबत कोण होते याची जाणिव नव्हती.ते भाकर तुकडा खाण्यासाठी तेथे थांबले.त्या वाटसरुने सोबत आणलेेले तांदुळ शिजवण्यासाठी चुल मांडली..

थोडावेळ विश्रांती घेवुन पुढे निघुया असे ठरले जाळ थोडा लांब केला होता..ते तिघेही गप्पागोष्टी करत होते..मस्त वेळ निघुन जात होता..वारा खुप असल्याने गणप्या विडीचे झुरके मारण्यासाठी थोडा लांब गेला..या दोघांची इकडे मैफिल चांगलीच रंगली होती..गणप्या जवळ पाचीस नव्हती त्यामुळे तो उठुन चुलीजवळ गेला..पण समोरील दृष्य पाहुन त्याचीतर वाचाच बसली..त्या वाटसरुच्या पत्नीने चुलीत पाय घालुन जाळ केला होता..भातावरील झाकण वाफेमुळे उडत होते..तो सर्व प्रकार फार भयानक होता..तिचा चेहरा फार भितीदायक होता..डोले फार आत गेले होते,व जिभ सारखी आत बाहेर होत होती..काय करावे कळेना,दात एका हिस्ञ श्वापदा सारखे होते..

हातापायाची रचना तर एखाद्या पिशाच्चा सारखी होती..तीच्या सोबत अजुन चौघे जण होते..ते हळुहळु त्याच्या जवळ येवु लागले..आसमंतात अनेक किंचाळ्या घुमत होत्या तिचे मुल शेजारील वडाच्या पाडावर बसुन एका पिशाच्चा सोबत खेळत होते..तो काय प्रकार आहे,हे त्याच्या ल‌क्षात येवु लागले..त्या पिशाच्चाने अनेक वाटसरु लोकांना वश करुन मारुन टाकले होते..तोंडातुन गळणाऱ्या रक्ताने सारे स्पष्ट होते..गतजन्मातील अघोरी शापामुळे ते अजुन किती जणांच्या रक्ताचे भुकेले आहे ..हे कळुन चुकले..ते सारे फार भयानक होते..त्या पिशाच्चाने जोरात आरोळी ठोकली तशी परीसरातील वटवाघळे आसमंतात उडुन गेली..

चिञविचिञ हसण्याचा आवाज एकु येत होता गणप्याने तेथुन पळ काढला,तो महेष जवळ आला त्याच्या सोबतच्या वाटसरुने काय झाले म्हणुन विचारले,गणप्या त्याच्याकडे भितीदायक नजरेने बघतं काय नायं असे म्हणत तेथुन पळ काढला..ते सर्वजण त्यांच्या मागेच होते..वाट दिसेल तिकडे हे पळत सुटले..पायाला अनेक जखमा झाल्या होत्या कशाचिही तमा न बाळगता ते सैरवैर त्या जंगलात पळत होते..ती राञ त्यांचा घात करणार होती..राञीचे १२ वाजले होते,घडल्या प्रकाराने त्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता..गणप्या खुप पुढे धावतं होता,समोरुन एक अंधुकषी आकृती त्याने जवळ येताना पाहिली,ते अजुन एक पिशाच्च होते..येणाऱ्या वाटसरुला त्याने मारल असेल कदाचित..

गणप्याने मार्ग बदलला तो मोठ्याने ओरडत पळत होता..महेष सुद्धा मोगोमाग होता..रस्ता चुकल्याने दोघेही त्या जंगलातील त्या भयाण राञी भुलभुलैयात फसले समोर साक्षात मृत्यु उभा होता..कुठे जावे कळेना..दोघेही एकमेकांच्या जवळ उभे होते..पाठीमागुन सोसाट्याचा वारा आला आणि महेष मागे फेकला गेला,गणप्याने जोरात हाक मारली..पण राञीच्या त्या अंधारात तो दिसेनासा झाला..त्याची शेवटची ती आर्त हाक कानी आली..अनेक पिशाच्चानी मिळुन त्याचा ताबा घेतला..महेषचे काय झाले असेल या विचाराने डोळे भितीदायक झाले होते..आणि त्या काळोख्या अंधारातुन रक्ताने माखलेले तोंड घेवुन ते पिशाच्च समोर आले,व कर्कश आवाजात आकाशाकडे बघुन हसु लागले..

तोंडातुन लाळ गळावी तसे रक्तगळत होते,आणि………ती राञ त्या दोघांची शेवटची काळराञ ठरली.दोन दिवस झाले ते परत आले नव्हते..आई खुप काळजीत होती.त्यानंतर शोधाशोध झाली..त्यांचे सामान तेवढे नजरेस पडले..नावाड्याला विचारले तर तो बोलला न्हाय जी रातच्चाला कोणी बी आलं न्हाय..घडला प्रकार फारचं भितीदायक होता..त्या दिवशी काय घडले हे ना त्यांच्या आईला माहित ना जगाला..त्यानंतर आसपासच्या गावातील बरेज जण त्या जंगलात गायब झाल्याच्या घटणा घडल्या…कोणालाचं काही कळतं नव्हते यावरुन ते पिशाच्चा अजुन पुर्णपणे शापातुन मुक्त झालेले नाही हे माञ खरे..

Leave a Reply