लेखक – श्रीनाथ बरगे

रात्रीचे दिड वाजले होते. जून महिना नुकताच चालू झाला होता. लॉकडाऊन सुरूच होते, आदित्य हा मात्र लॉकडाऊनला त्रासुन गेला होता.सारखे घरात बसून रहा आणि बाहेर पडले कि आई बाबांंची कटकट. आदित्य त्याच्या बेड वर बसून मोबाईल वर युट्यूबचे व्हिडिओ पाहत असतांना त्याला त्याच्या मित्राचा तेजसचा कॉल आला.. तो म्हणाला अरे आदि काय करतोय? आदित्य त्याला उत्तर देत म्हणाला काही नाही पण जाम बोर होतय,अस वाटतय कधी लॉकडाऊन संपेल आणि आपण पहिल्या सारखी धम्माल करणार.. यावर तेजस म्हणाला “अरे एवढेच ना! तर मग आठवड्या भरानंतर रोहितचे लग्न आहे. आपण तीथे जायला हव. मधेच आदित्य म्हणाला अबे पीश्या याचा आणि लग्नाचा काय संबंध. 

त्यावर तेजस म्हणाला अरे त्याच्या गावाला लग्न आहे आणि गावात कसले लॉकडाऊन तीथे कोन विचारणार? शिवाय त्याच्या घरचेच 10-15 नातेवाईक आहेत. एवढ्यात आदित्य म्हणाला पण आपला कुठे बजट बसतो याच्यात, शिवाय आपल्याला पत्रिकाही नाही. यावर तेजस म्हणाला अरे तुझ वाट्सअप उघडून बघ जरा आत्ताच त्याने पत्रिका पाठवली आहे. आणि या निमित्ताने मित्रांची मैफील ही जमेन. मी आणि तुषार उद्या रात्री निघतोय तु येत आहेस कि नाही? तेजस रागातच म्हणाला. यावर आदित्य म्हणाला ठिक आहे मी उद्या पॅकिंग करतो तु 10 ला मला पीक कर आणि येतांना तुषार ला आधी घेऊन ये तो नेहमी उशीर करतो. यावर तेजसने हो सरकार म्हणत फोण ठेवला.

दुसऱ्या दिवशी आदित्य पॅकिंग करून तेजस आणि तुषारची वाट बघत बसला होता. आजचा दिवस आई बाबांची समजुत काढायला व परवानगी मागण्यात गेला. त्याला त्याच्या बाबांनी खास बजाऊन सांगितले गाव जरी असले तरी मास्क लावूनच ठेवायचे व सॅनीटायजर सारखे वापरायचे आणि प्रवासात काळजी घे. रोहितचे गाव साधारन 400-450 किमी लांब होते. यवतमाळ जवळील पुसद तालुक्यातील ते गाव, गावाचे नावही फार निराळे ‘गुंज’ म्हणे.

आणि जायचा बेत मात्र रात्रीचा कारण तीथे जायला 4 जिल्हे ओलांडावे लागतात. आणि दिवसा ते शक्य नव्हते. रात्री 10 वाजता तेजस त्याची कार घेऊन पीक करायला आला. तेजस आणि तुषार आधीच गाडीत गाने वाजवत, नाईट आऊटचा रोमांचक मुड बनवला होता. तुषारने गाडीत बसताच आता करमतय का वाघ्या? अशी हाक मारली, तेजसने तुझी सगळी ‘जाम बोर होतय ‘ वाली स्टोरी मला सांगितली आहे तुषार म्हणाला. काय राव? तु पण मजा घे आता. आदित्य म्हणाला अरे आदि तुझी चेष्टा नाही करनार तर काय रोहितची करनार. असा तुषार म्हणाला. व आमचा तो रोमांचक प्रवास चालू झाला, आदित्य आणि तेजस पुढे बसले होते आणि तुषार मागे बॅकसीट वर बसला होता. मीत्रां सोबत गप्पा गोष्टी करतांना तो प्रवास फारसा काही लांब जानवत नव्हता. अरध्या पेक्षा जास्त अंतर कापून झाले होते.

आता रात्रीचे दोन वाजले होते, हलक्या हलक्या पावसाच्या सरी कोसळत होत्या. आता मात्र साधारण 80-90 किमी अंतर उरले होते, तुषार गाडीत पेंगायला लागला होता. आदित्य आणि तेजस गप्पा करत होते पाहता पाहता यवतमाळचा घाट आला, पावसाने वेग धरला होता. आदित्य त्याला म्हणाला सावकाश रे बाबा यावर तेजस म्हणाला अरे टेंशन घेऊ नकोस, तुला माझी ड्रायव्हिंग माहित नाही का? आता मात्र जोरदार पावसाने हजेरी लावली होती. त्या वेळेस ते घाट भलतेच विचित्र व भितीदायक वाटत होते, आजूबाजूला घनदाट जंगल होते आणि विविध प्रकारचे श्वापदांचे आवाज ऐकू येत होते. मधेच तेजस म्हणाला काय आदि भीती वाटतेय काय? नाही रे छे! असे आदित्य म्हणाला. थोड्या वेळात घाट पार पडला आणि पुढे तेजसने उजव्या बाजूकडी वळनावरच्या डांबरी रस्त्यावर गाडी चालवायला सुरुवात केली. आदित्य त्याला म्हणाला अरे बाबा या कोणत्या रस्त्याने नेतोयस? अरे मी या आधी ही इकडून आलोय इथुन 40 किमी अंतर कमी पडत शॉर्टकट आहे हे. आपण या रस्त्याने लवकर पोहोचू तेजस म्हणाला. यावर आदित्यने ठीक आहे असे उत्तर दिले.

पावसाने रस्ता चीख्खल मय झाला होता. मुसळधार पाऊस सुरूच होता, आजूबाजूला घनदाट जंगल होते व थोडे लांब अंतरावर अचानक गाडी समोर रानटी जनावरांचा कळप आला. तेजसने ब्रेक मारत गाडी वळवली, गाडी स्लीप झाली व रस्त्याच्या बाजूला जाऊन एका झाडावर जोरदार आदळली. तुषार दचकून उठला व तेजसला म्हणाला ओ खतरो के खिलाडी कशी गाडी चालवताय. त्या अपघातात कोणालाही इजा झाली नव्हती सुदैवाने ते सगळे ठीक होते. मात्र गाडी बंद पडली होती, ते सगळे गाडी बाहेर पडले व कुठे बीगाड आला ते पाहू लागले. तुषार त्याला रागातच म्हणाला अरे कशी गाडी चालवतोस, डोळा लागला होता का काय? आदित्य त्याची मस्करी करत म्हणाला नाही रे गाडी समोर वाघ आला होताना.

तेजस त्याला समजवत म्हणाला नाही रे तुषा अस काहीही झालं नव्हत रानटी जनावरांचा कळप अचानक आला तर गाडी त्यांना ठोकूनये म्हणून ब्रेक मारुन गाडी वळवली त्यात गाडी स्लीप झाली. आता काय करायचे तुषार म्हणाला. यावर आदित्य म्हणाला अरे कॉल ही लागत नाही सिग्नल नाही आहे ईथे. तेजस म्हणला आदित्य तु आणि तुषार जा आणि मदत घेऊन ये मी इथेच थांबतो आणि गाडी चालू करण्याचा प्रयत्न करतो. तेजस कडे 6 राउंड वाले छर्याचे विदेशी बनावटीचे रिव्हालवर होते. व त्यामुळे त्याची चिंता वाटत नव्हती शिवाय तो उत्तम शरीरयष्टी असणारा तरून होता.

आदित्य आणि तुषार मदत आणायला गेले, थोडे दूर गेल्यावर त्यांना जंगलाच्या बाजूने एका टेकडीवर प्रकाश दिसला. पाऊस चांगलाच धोधो कोसळत होता विजांचाही जोरदार कडकडाट सुरु होता , तुषार आदित्यला म्हणाला तिथे त्या टेकडीवर बघ लाईटाचा उजेड दिसतोय चल तिथे विचारुया आणि सिग्नलही मिळेन. हो चल असा प्रतिसाद देत ते दोघेही चालू लागले, टेकडी जवळ आल्यावर त्यांना तीथे लाईटाच्या प्रकाशात एक झोपडी दिसली. त्यांना आता पायपीट करून बराच वेळ झाला होता, साधारण अर्धा तास उलटला होता पण ते दोघे जेवढे अंतर चालत तेवढेच ती झोपडी लांब जात होती असे जानवू लागले. जंगलातून प्राण्यांचे कर्कश आवाजही ऐकू येत होते, एक- दिड तास अशी पायपीट केल्यानंतर ते तीथे पोहचले. ते दोघेही ओलेचिंब झाले होते आदित्यने झोपडीचे दार ठोठावले आतून काहीच प्रतिसाद आला नाही, त्याने जोरदार हाक मारली कोनी आहे का आत? असे म्हणत जोरात दार वाजवले तरी काहीच प्रतिसाद मिळाला नाही.

काही वेळाने झोपडीच्या मागच्या बाजूने जाड व घोगर्या आवजात कोण र तुम्ही? असा प्रश्न विचारात, एक चाळिशीतला माणूस आला. मध्यम उंचीचा दिसायला कुरूप त्याच्या हातावर व माने वर मळाचा थर बसला होता, काळे व पांढरे पट्याचे फाटके शर्ट आणि जाडी एवढी की त्याचे शर्ट काखेतून व पोटाजवळ फाटले होते. त्याच्या अंगाचा घाणेरडा वास येत होता, जनू कित्येक दिवसांपासन त्याने अंघोळ केली नसावी. केस लांब वाढलेले व विस्कटलेले काही ठिकाणी टक्कलही पडले होते, हाताची लांब व घाणेरडी नखे होती आणि त्याच्या हातात एक विचित्र लांब काठी होती असे वाटत होते की प्राण्यांच्या हाडांपासन विशेष रित्या बनवली आहे.

त्या माणसाकडे पाहून प्रश्न पडू लागले हा माणूसच आहे ना? तुषार ने घडलेली सगळी गोष्ट त्याला सांगीतली त्यावर तो माणूस विचित्र हास्य करत म्हणाला चला. व तो काही न बोलता आम्ही सांगितलेल्या जागी जाऊ लागला, त्याने मागे वळुन हाक मारली चला लवकर. तुषार आणि आदित्य त्याच्या मागे जाऊ लागले, चालतांना आदित्य तुषारला म्हणाला तुषा अरे आपल्याला येतांना किती वेळ लागला अर्धा एक तास पण आता या माणसाबरोबर आपण क्षणातच रस्त्याच्या वाटेने लागलोय. यावर तुषार म्हणाला हो रे तु खर बोलतोय काही तरी विचित्र प्रकार दिसतोय. ते दोघेही ओलेचिंब झाले होते चालता चालता तुषारने त्याच्या खिशातले पाकीट व इतर सामान व्यवस्थित ठेवण्यासाठी काढले खिशातले पैसे व हनुमान चालीसा भीजले तर नाही म्हणून तपासू लागला. एवढ्यात तो माणूस चालायचा थांबला आणि जोरात ओरडून म्हणाला ‘ जे काही असेन फेक ते ‘ अचानक त्या माणसा आवाज बदलला व तो एखाद्या श्वापदा सारखा तळमळू लागला.

ते पाहून दोघेही फार घाबरले तुषार मोठ्याने हनुमान चालीसा म्हनू लागला, तो माणूस एखाद्या प्राण्या सारखा ओरडू लागला. त्याचे रुपांतर दानवामध्ये झाले तो कान पकडून जोरात किंचाळत होता, त्याचे शरीर केसाळलेले होते, मोठे नख्या वाले पंजे लांब सुळ्यासारखे दात असे हे भयावह त्याचे खरे रुप होते. तो ओरडत ओरडत झुडपात दिसेनासा झाला. तुषार आणि आदित्य गाडीच्या दिशेने पळू लागले ते गाडी जवळ पोहचले तीथे तेजस रक्ताने भीजून बेशुद्धावस्थेत पडला होता त्याच्या अंगावर नख्यांनी खुपदा वार केले होते. त्याच्या हाताचा मोठा भाग तोडला होता असे वाटत होते त्या दानवाने एका झटक्यात त्याचा हात तोडून खाल्ला .

आजुबाजूने झुडपातून त्याच दानवाचा आवाज येऊ लागला, काय करावे त्यांना सुचेनासे झाले. तुषार तिथे मोठमोठ्याने हनुमान चालीसाचा जाप करू लागला,

त्या दानवाचे अमानवीय हास्य झाडांवरन ऐकू येत होते. काही काळ असाच प्रकार घडला व थोड्या वेळाने त्या रस्त्यावर एक जीप येतांना दिसली, आदित्य त्या जीप च्या दिशेने मदतीसाठी धावू लागला. ती पोलिसाची जीप होती ते पाहताच त्यांनी सुटकेचा निश्वास घेतला, आतून इंस्पेक्टर आले व काय घडतय ते वीचारू लागले घडलेला सर्व प्रकार आदित्यने त्यांना सांगीतला, इंस्पेक्टरने तेजसला गाडीत टाकले व तुषार आदित्यला गाडीत बसवले. गाडी जशी जशी वेग पकडू लागली तसतसा जंगलातून किंचाळ्यांचे आवाज गाडीच्या मागे येऊ लागले, शहरात पोहचताच तो आवाज यायचा थांबला. इंस्पेक्टर म्हणाले थोडक्यात वाचलात तुम्ही ,इंस्पेक्टरने वीचारले तुम्ही त्या बंद रस्त्याने कुठे निघाले होते? लग्नाला चालले होते का?

Leave a Reply