अनुभव माझ्या काकांना आला होता. गोष्ट आहे साधारण १९७७ साल ची एका गावातली घडलेली. माझ्या आजोबांनी घराच्या वरच्या भागात एक देऊळ बांधून अंबिका देवीची स्थापना केली होती. आणि तिची खूप मनापासून भक्ती करत असत. तेव्हा माझे वडील, काका सगळे लहान होते. शाळेत शिकत होते. माझ्या काकाची शाळेत परीक्षा सुरू होती. त्यामुळे ते त्यांच्या शिक्षकांकडे अभ्यासासाठी जायचे. दिवसभर अभ्यास करायचे आणि मग रात्री घरी यायचे. आमचं आणि त्यांचं घर जवळपास अरध्या तासावर होत. त्या दिवशी ही ते नेहमी प्रमाणे त्यांच्याकडे अभ्यासाला गेले. पण घरी परत यायला त्यांना खूपच उशीर झाला. चालत जाण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता कारण गावात इतक्या रात्री कोणते वाहन नसायचे. ते घरी यायला निघाले. संपूर्ण गाव निद्रेच्या आहारी गेले होते. त्यामुळे वाट अगदीच सामसूम झाली होती. अधून मधून दुरून कुठून तरी कोल्हेकुई ऐकू यायची आणि अंगावर शहारा यायचा. दहा बारा मिनिटांचे अंतर पार केल्या नंतर अचानक वातावरणात बदल जाणवू लागला. उन्हाळ्याचे दिवस होते तरीही गोठवून टाकणारा गारवा पसरला. तितक्यात त्यांना असे वाटले की त्यांच्या डाव्या बाजूने कोणी तरी चालत आहे. चालण्याचा वेग वाढवला पण त्याने काही फरक पडला नाही. शेवटी त्यांनी हिम्मत करून बाजूला पाहिले आणि त्यांच्या पाया खालची जमीनच सरकली. 

एक शिर नसलेले धड त्यांच्या बाजूने चालत होते. त्यांचं सर्वांग शहारले. इतके दिवस गावात बोलल्या जाणाऱ्या गोष्टी आठवल्या. मानकाप्या. हो मान काप्या होता तो. रक्ताने बरबटलेला. त्यांच्या प्रत्येक पावलासोबत त्या मान काप्या च्या चालण्याचा ही आवाज काकांच्या मनात धडकी भरवत होता. बरीच रात्र झालीय, रस्ता अगदी सामसूम झालाय, या वेळी आपल्या मदतीला कोणी येईल असे ही त्यांना वाटत नव्हते. पण तितक्यात त्यांना उजव्या बाजूला कोणी तरी चालत असल्याचे जाणवले. आणि बघता बघता त्यांच्या मनातली भीती एकदम नाहीशी झाली. त्यांनी त्या दिशेला पाहिले. एक तेजस्वी स्त्री भासत होती ती. काकांना कळायला वेळ लागला नाही की साक्षात देवी अंबिका आपल्या रक्षणासाठी धावून आली आहे. त्यांचे भय कुठल्या कुठे पळाले. ते चालत सुखरूप आपल्या घरी पोहोचले. घरी आल्यावर त्यांनी आजोबांना घडलेला प्रकार सांगितला. तसे माझ्या आजी ने देवी ला नारळ चढवून आभार मानले. साक्षात अंबिका देवी माझ्या काकाला वाचवण्यासाठी तिथे प्रकट झाली होती. त्या प्रसंगानंतर फक्त अजोबाच नाही तर घरातले सगळेच देवीची मनोभावे पूजा करू लागली. 

Leave a Reply