लेखक – अमोल वैद्य

रात्रीची वेळ असल्यामुळे वातावरणामध्ये गारवा अधिकच वाढला होता… त्याचबरोबर गाडीमध्ये एयर कंडीशन ची हवा देखील त्याच्यात भर घालत होती… मला तर थंडीने अगदी हुडहुडी भरली होती… मी केतनला एसी बंद करायला सांगितलं…एसी बंद केल्यानंतर थोड्या वेळाने मी कुठे नॉर्मल झाले… आमची गाडी एका बंगल्या समोर येऊन थांबली… बंगला जरा शहराच्या बाहेरच वाटत होता… वस्ती पासून बराच दूर.. जवळ जवळ जंगलातच.. थंडी वाढल्यामुळे मी आजूबाजूला लक्ष दिलच नव्हतं… पण माझे हात-पाय थंडीने बधीर झाले होते… गेट समोर गाडी उभी करून केतन ने एक दोन वेळेस गाडीचा हॉर्न वाजवला… मी बाहेर एक कटाक्ष0qqqटाकला.. गेट अगदी भव्य वाटत होतं.. गेटच एवढा मोठा आहे तर… बंगला किती मोठा असणार.. माझ्या सहज मनात येऊन गेलं… माझी नजर गेट उघडण्याची वाट पाहत होती.. कधी वॉचमन एकदाच गेट उघडतो असं झालं होतं… काही मिनिट उलटली.. केतन च हॉर्न वाजवण चालूच होत.. तितक्यात कुठून तरी वॉचमन धावत आला आणि त्याने गेट उघडलं… बंगला तर अगदी रात्रीच्या अंधारात एखाद्या राजवाड्या सारखा भासत होता. आमची आलिशान गाडी हळू हळू त्या बंगल्यामध्ये प्रवेश करत होती…

“काय रे,” तुला आम्ही झोपायचे पैसे देतो का, किती वेळ झाला मी हॉर्न वाजवत आहे…” केतन जरा रागातच म्हणाला. 

बिचारा वॉचमन खाली मान घालून उभा होता… त्याच्या व्यतिरिक्त तो तरी दुसरं काय करु शकत होता म्हणा.. केतन ने मला गाडीतच बसून राहायला सांगितलं.. तो मात्र गाडीतून खाली उतरला आणि त्याने वॉचमन च्या अंगावर गाडीची चावी फेकली… तितक्यात बंगल्याचा दरवाजा देखील उघडला गेला… एक बाई दारात जांभया देत उभी होती.. जणू गाढ झोपेतून उठून आली आहे.. तिच्याकडे पाहून वाटत होतं चाळीस-बेचाळीस वर्षाची तरी असावी.. केतन तिच्या जवळ जाऊन तिच्या कानात हळूच काहीतरी पुटपुटला.. ती तशीच लगबगीने बंगल्यामध्ये गेली. तो पुन्हा माझ्याकडे आला आणि मला गाडीच्या खाली उतरण्याचा इशारा केला.. मी हळूच दरवाजा उघडून माझा उजवा पाय जमिनीवर ठेवला.. त्यावेळेस मला असं वाटल… मी एखाद्या बर्फाच्या ढीगाऱ्या वर पाय ठेवला आहे.. अगदी थंडगार वातावरण.. मी पटकन गाडीपासून बाजूला आले. वातावरणामध्ये बदल जाणवू लागला होता.. थंडी अधिकच वाढली होती.. मी समोर बंगल्याच्या दरवाज्याकडे नजर टाकली.. पण मला समोर कोणीच दिसले नाही… मी दोन्ही हाताच्या बोटांनी माझे डोळे चोळले… परत एकदा समोर पाहण्याचा प्रयत्न केला.. तरीही मला समोर कोणी दिसत नव्हते… मला वाटलं केतन माझ्या स्वागताची तयारी करण्यासाठी बंगल्यामध्ये गेला असावा.. मी मनातल्या मनात हसले..

वातावरणातील झालेल्या बदलामुळे माझ्या मनावरील दडपण अजूनच वाढू लागलं.. मी हळूच वरती पाहिलं.. तितक्यात माझी नजर बाजूने येणाऱ्या आवाजाकडे गेली..  झाडांच्या पानाचा सळसळाट वाढला होता… त्याचबरोबर झाडांच्या फांद्याच्या घर्षणामुळे होणारा तो कर्कश आवाज.. वातावरणामध्ये एक नकारात्मक ऊर्जा भासू लागली.. मला खूपच अस्वस्थ वाटू लागलं. आणि एक भयानक गोष्ट जाणवली. माझ्या आजूबाजूला काळाकुट्ट सावल्या आकार घेऊ लागल्या.. तब्बल सहा सावल्या माझ्यासमोर तयार झाल्या होत्या.. आपल्या सोबत नक्की काय घडतंय काहीच कळायला मार्ग नव्हता. केतन ही मला सोडून कुठे निघून गेला ते ही माहीत नव्हत. घडत असलेला प्रकारा मुळे थंडीने कुडकुडत असलेल्या शरीरातून घामाच्या धारा वाहू लागल्या… संपूर्ण शरीर थरथरू लागलं… एकाकी सावल्यांचा विभत्स हसण्याचा आवाज कानावर पडू लागला.. जो प्रत्येक मिनिटाला अधिकच तीव्र होऊ लागला.. आता मात्र माझी भीतीने बोबडीच वळली होती.. एका जागेवर उभे राहणे देखील शक्य होत नव्हतं.. हृदयाचे ठोके प्रचंड प्रमाणात वाढले होते… कदाचित थोड्या वेळात ते बंद देखील होतील असे वाटू लागले.  तितक्यात मला माझ्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवल्याचा भास झाला.  मागे वळून पाहण्याची देखील हिंमत होत नव्हती.. तरीही वळून पाहिले. केतन ने माझ्या डोक्यावर हात ठेवला होता आणि काही तरी पुटपुटत होता. पण तो काय बोलतोय मला काहीही समजत नव्हतं.. पण घाबरले असल्यामुळे त्याला पाहून मी जोरात मोठी मारली आणि ओक्साबोक्शी रडू लागले.. 

त्याने मला सावरले. मला ही त्याच्या मिठीत येऊन विसावले. काही सेकंदाने डोळे उघडले तर सगळे काही शांत वाटत होत. माझ्या सोबत घडलेल्या घटना सत्य होत्या कि भास कळायला मार्ग नव्हता.. पण मी एकदम अशक्त झाले होते. त्याचा आधार घेत चालत होते.. थोड्याच वेळात आम्ही आमच्या बेडरूममध्ये येऊन पोहोचलो.. त्याने मला फ्रेश होऊन येण्यास सांगितले… मी तशीच बाथरूममध्ये गेले.. अजूनही माझ्या सोबत घडलेल्या घटनांमधून पूर्णपणे सावरले नव्हते.. तोंडावर पाणी मारून बाहेर आले. केतन बेडवर माझी वाटच पाहत बसला होता… मी त्याच्या बाजूला जाऊन बसले..

“भैरवी तुझी तब्येत तर बरी आहे ना.. 

मी फक्त मान डोलवून हो म्हणाले. 

तसे तो म्हणाला ” हे बघ बर नसेल वाटत तर तू आराम कर आपण उद्या सकाळी बोलू..” 

त्याच्या बोलण्याने धीर मिळाला.. पण आमच्या लग्नाची आज पहिली रात्र.. ही वेळ माझ्या सोबत झालेल्या घटना त्याला सांगायची नव्हती… त्याला सांगितलं देखील असतं तर त्यांनी माझ्यावर कितपत विश्वास ठेवला असता… 

वाईट स्वप्न म्हणून मी विसरून जाण्याचे ठरवले आणि म्हणाले “

“नाही केतन मी अगदी बरी आहे… असं अचानकच आपल् लग्न झाल्यामुळे जरा मनावर दडपण आलं होतं.. त्याचाच परिणाम असावा.. मी काहीतरी बोलून त्याचं मन राखलं..”

“त्याने हळूच मला त्याच्याजवळ घेतले.. पण त्याला काही तरी जाणवले तसा तो अचानक माझ्यापासुन बाजुला झाला.. आणि मोबाइलमध्ये वेळ पाहिली.. काही वेळ तो मोबाईल मध्ये च होता. मी त्याला विचारणार इतक्यात परत तो माझ्याजवळ येऊन बसला.. आणि मला मिठीत घेतले.. थोड्याच क्षणात आम्ही एकमेकांशी एकरूप झालो.. मनाने आणि शरीराने ही..

झोप कधी लागली कळले नाही. तितक्यात केतन हळूच माझ्या कानात पुटपुटला.. “मी आलोच दहा मिनिटात,” आणि बाहेर निघून गेला. मला कळले नाही की इतक्या रात्री अचानक हा कुठे गेला. एक तर हा बंगला, ही जागा माझ्यासाठी नवीन आहे.. काही वेळ उलटला अंक पुन्हा वातावरणामध्ये बदल होत असलेला जाणवू लागला.. हळूहळू त्या सावल्या पुन्हा माझ्या समोर आकार घेऊ लागल्या.. आता मात्र मी हादरले होते.. कारण काही तासांपूर्वी घडून गेलेला भयाण प्रकार आता पुन्हा माझ्या सोबत घडत होता. पण या वेळेस मला भीती पेक्षा कुतूहल वाटू लागले की हे नक्की काय घडतंय. मी तशीच बेड वर बसून होते. त्या काळ्या सावल्या च रूपांतर अतिशय सुंदर मुलींमध्ये होत होतं.. मी एकटक तिथेच पाहत होते. त्यांच्याकडे पाहून एके क्षणी वाटलं की त्यांचा मला इजा पोहोचवण्याच्या हेतू नसावा.. याच विचारा सोबत मला वाटणारी भीती एकदम कमी झाली. त्यांच्यातली एक मुलगी अचानक बोलू लागली ” “भैरवी तू ज्या मुलासोबत लग्न केले आहे… तो साधा सुधा मुलगा नाही तो एक वाईट शक्तींचा पुजारी आहे.. तुझ्यासारखंच आम्ही त्याच्या रूपाकडे पाहून त्याच्यावर मोहित झालो… अमावस्येच्या रात्री त्याने आमच्या सोबत लग्न केलं.. अगदी तुझ्या सारखंच लगबगीनं.. आम्हाला इथे याच बंगल्यात घेऊन आला.. आमच्या शरीराचा एका रात्री पुरता उपभोग घेऊन आम्हाला संपवलं.. पण खर सत्र त्या नंतर सुरू झालं.. हे बघ अजुनही वेळ गेली नाही…  निघून जा…स्वतःला वाचव..”

“पण त्याने तुम्हाला का मारलं.” मी थोडी घाबरतच म्हणाले.

तशी तीच मुलगी सांगू लागली..

“तुझ्यासारख्याच आम्ही गरीब घरातील आहोत.. आमच्यासोबत काय झालं हे विचारणार कोणीही नव्हतं… त्याच गोष्टीचा फायदा केतन ने घेतला… त्याच्याकडे पैसा, इज्जत , मानसन्मान, प्रतिष्ठा,आहे.. तो जवळपास पंचवीस वर्षाचा वाटतो पण त्याचं खरं वय चाळीस वर्षांहून जास्त आहे.. तू गाडीतून उतरलीस तसे या सगळ्याला सुरुवात झाली. तुझ्या डोक्यावर हात ठेऊन तो अघोरी मंत्र पुटपुटत होता.. तू आता त्याच्या जगात प्रवेश केला आहेस.. तो फक्त शरीराचा उपभोग घेत नाही तर नंतर जीव घेतो. अघोरी विद्येचा वापर करून तो स्वतः तरुण होतो. आम्हा सगळ्यांना मारून त्याने याच बंगल्याच्या मागे पुरल य.”

इतकं सगळं ऐकल्यावर मला त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवण्या शिवाय दुसरा पर्याय ना नव्हता. तो असे करू शकेल, असा असेल हे वाटलं नव्हत पण इथे आल्यापासून घडणाऱ्या विचित्र घटना पुरेश्या होत्या.. त्या धक्क्यामुळे मी शून्यात हरवून गेले होते. पण स्वतःला भानावर आणत म्हणाले 

बंगल्याच्या बाहेर जाण्यासाठी मला एकच मार्ग माहीत आहे.. जर मी त्या मार्गाने गेले.. तर तो मला नक्की अडवेल.. आता तुम्हीच मला बाहेर पडण्याचा मार्ग दाखवा.. मी त्यांना विनंती केली..

“तो दोन मिनिटात रूम मध्ये येईल.. तू लवकर आमच्या मागे ये…”

“मी त्यांच्या पाठोपाठ निघाले.. बंगला संपूर्ण अंधारात बुडाला होता… रात्रीचे तीन वाजले असावेत.. ज्या मुलावर मी निस्वार्थ प्रेम केलं… त्यानेच माझ आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं.. मला अजुनही सारख वाटत होतं… मृत्यू देखील त्याच्या हातूनच यावा..

पण आई वडिलांचे छत्र नसलेली मी..  माझ्या एकुलत्या एक भावासाठी.. राघव साठी मला जगावं लागणार होतं.. यातून काहीही करून बाहेर पडायचा मी निश्चय केला.. 

बंगल्याच्या पाठीमागच्या दारातून मी बंगल्याच्या बाहेर आले… बंगल्याच्या पाठीमागच्या परिसरात असलेल्या घनदाट झाडीमुळे आजूबाजूचं काहीही दिसत नव्हतं.. मी चालायला सुरुवात केली. काही मिनिट तशीच अनवाणी पायांनी चालत राहिले. आणि बंगल्यापासून बऱ्यापैकी दूर आले.. मागे वळून पाहिले तर तो बांगलाही गर्द झाडांच्या मागे दिसेनासा झालं होता. 

थोड्यावेळ बाजूच्या झाडाखाली विश्रांती घेण्याचे ठरवले कारण चालून चालून संपूर्ण शरीरातला त्राण च संपला होता. मी एका झाडाचा आधार घेऊन बसायला गेले तितक्यात माझ्या पाठीत कोणीतरी जोरदार लाथ मारली.. मी जोरात तोंडावर आपटले.. हनुवटी फुटून रक्त वाहू लागले आणि माझ्या तोंडातून वेदनेची एक किंचाळी बाहेर पडली…

स्वतःला सावरत कसेतरी उठून बसले.. मागे केतन उभा होता.. त्याला पाहून आता मात्र मी जगण्याची आशाच सोडून दिली.. माझी ही तीच अवस्था होणार होती जी त्या सहा जणींची झाली होती. 

“भैरवी,” तुला काय वाटलं इतक्या सहजासहजी मी तुला जाऊन देईन.. ह्या सगळ्या परिसरावर माझं राज्य आहे..  माझ्या व्यतिरिक्त कोणीही इथून बाहेर जाऊ शकत नाही…

“त्याच्या चेहऱ्यावर उमटलेलं भयाण हास्य पाहून माझ्या शरीरातला होता नव्हता ती त्राण ही संपला..

जेव्हा तू बंगल्याच्या आवारात उभी होतीस तेव्हाच मला समजलं होतं….तुझ्या सोबत काय घडलं असावं.. हे बघ तुझ्यासाठी मी आधीच सगळी सोय करून ठेवली आहे..

त्याने हात करून मला ती जागा दाखवली.. माझ्या साठी एक खड्डा आधीच खोदून ठेवला होता..

मी त्याच्या समोर दयेची भीक मागू लागले.. “केतन मला मारून तुला काय मिळणार आहे..!!

“तुझं सुंदर रूप.. तुझं आयुष्य.. तू मेल्यानंतर माझं होईल.. तो खुनशी हास्य करत माझ्या जवळ येऊ लागला.

माझ्या शरीरात पळून जाण्याची देखील ताकद उरली नव्हती…

एका झटक्यात त्याने माझे केस गच्च धरून बाजूच्या झाडाच्या खोडावर माझं डोकं आदळलं..

माझ्या डोक्यावर झालेल्या जखमांतुन एक रक्ताची चिळकांडी त्याच्या तोंडावर उडाली.. त्याचा संपूर्ण चेहरा रक्ताने माखला होता.. तो आता एखाद्या राक्षसासारखा दिसत होता.. 

त्याने परत दोन चार वेळेस माझं डोकं झाडाच्या खोडावर आपटलं.. माझ्या डोळ्यासमोर अंधारी येऊ लागली आणि मी जागीच जमिनीवर कोसळले…

माझे डोळे बंद होते.. पण मी आजूबाजूला होणाऱ्या घटना अनुभवू शकत होते…

त्याने माझा एक पाय हातात धरून त्या खणलेल्या खड्ड्यात माझं शरीर फेकून दिलं..

माझ्या शरीरावर माती टाकायला सुरुवात केली… त्या थंडगार मातीचा स्पर्श मला जाणवत होता… पण मला जगायचं होतं.. माझ्या एकुलत्या एक भावासाठी.. राघव साठी… आणि इतकंच नाही तर केतन ला त्याच्या पापाची शिक्षा देण्यासाठी.. खड्डा जास्त खोल नसल्यामुळे एक हात खड्ड्याच्या वरती होता…

हळूहळू माझे शरीर मातीखाली झाकल जाऊ लागलं… डोक्यावरच्या जखमेवर पडणारी थंडगार माती डोक्यातून वाहणारे रक्त थांबवू लागली… ती माती रक्ताने ओली झाली होती… असं वाटत होतं माझ्या डोक्यावर कोणीतरी थंड पाण्याची पट्टी ठेवली आहे…

आता माझे संपूर्ण शरीर मातीखाली गाढले गले.. श्वास गुदमरू लागला.. नाकात, तोंडात माती जाऊ लागली… पण मला जगायचं होतं.. फक्त एकच विचार डोक्यामध्ये घुमत होता.. मला जगायचं होतं…

मी आता बऱ्यापैकी शुद्धीवर आले होते.. फक्त डोळ्यांच्या पापण्या उघडत नव्हत्या… रात किड्यांचा कर्कश आवाज फक्त कानावर पडत होता… थंडगार हवा अंगाला झोंबत होती.. मी सावकाश डोळे उघडण्याचा प्रयत्न करू लागले… अंधार असल्यामुळे आजूबाजूचा परिसर स्पष्ट दिसत नव्हता… कारण चेहऱ्यावर आणि डोळ्यात माती गेली होती. मी डोळे किलकिले करून स्पष्ट पाहण्याचा प्रयत्न करू लागले… तसे माझ्यासमोर एक बाई बसलेली दिसली. काही वेळाने लक्षात आले की माझ्या बाजूला शेकोटी पेटवली आहे.. आणि त्याच उजेडात मला तिचा चेहरा आता स्पष्ट होऊ लागला. त्या बाई ने काळ्या रंगाची साडी नेसलेली होती.. डोक्यावर गोल आकाराचे लालभडक कुंकू लावलेलं… तिचे मळकट केस चेहर्‍याच्या आजूबाजूला हवेमुळे उडत होते.. डोळे शिकार करणाऱ्या वाघिणीप्रमाणे लाल भडक दिसत होते… गळ्यात कवड्याच्या माळा ज्या अगदी पोटापर्यंत लोंबकळत होत्या… याच बाईने मला मृत्युच्या दाढेतून बाहेर काढलं असावं.. डोक्यात विचार चमकून गेला.. परमेश्वराने तिला माझ्या मदतीसाठी पाठवलं.. मी हात पाय हलविण्याचा प्रयत्न करू लागले.. थोडा वेळ प्रयत्न केल्यानंतर मला त्यात यश आलं.. संपूर्ण शरीर वेदनेने ठणकत होतं.. डोक्याला लागलेल्या मारामुळे येत असलेली कळ सोसवत नव्हती. अधून मधून लांडग्यांचा… कोल्ह्यांचा विव्हळण्याचा आवाज कानावर पडत होता…. डोक्याला झालेल्या जखमेतून एक वेदनेची कळ मेंदूपर्यंत गेली.. त्या वेदनेमुळे माझ्या तोंडातून विव्हळण्याचा आवाज बाहेर पडू लागला… मी कसंतरी स्वतःला सावरत उठून बसले… त्या बाईने माझ्या डोक्यावर अंगठा ठेवून डोळे बंद केले आणि काही मंत्र पुटपुटू लागली.. त्या मंत्राच्या प्रभावाने माझ्या शरीरातील वेदना मला जाणवंण कमी होऊ लागलं.

“तुम्ही कोण आहात..” मी थरथरत्या स्वरात त्या बाईला विचारले.. 

तुझ्यासारख्याच एका अभागी मुलीची आई… माझ्या मुलीला तुझ्यासारखाच प्रेमाच्या जाळ्यात ओढुन त्या राक्षसाने तिचा बळी घेतला.. ती देखील तुझ्यासारखीच सुंदर होती… मला लाभलेल्या दैवी सिद्धी मुळे मी गावकऱ्यांची मदत करून माझं आणि माझ्या मुलीचं पोट भरत होते… आमचं हसत खेळत आयुष्य त्या राक्षसाने काही दिवसात उध्वस्त केलं… मी सुड घेण्याचा पूर्ण प्रयत्न केला… पण मी असफल राहिले.. त्या नराधमाने देखील माझ्यासारख्याच अघोरी सिद्धी हस्तगत केल्या आहेत… त्यामुळे मी आतापर्यंत त्याच्या केसालाही धक्का लावू शकले नाही… कदाचित परमेश्वराने त्याचा बदला घेण्यासाठी तुला पाठवल आहे.. तुझ्या डोळ्यात बदल्याची भावना मी पाहू शकते.. राग आहे.. त्याच्या पापाची शिक्षा देण्यासाठीच परमेश्वराने तुझी निवड केली आहे..  मी तुझ्या डोळ्यामध्ये स्पष्टपणे पाहू शकते.. तू जेव्हा त्याच्यासोबत बंगल्यात प्रवेश केला… त्यावेळेस मी बंगल्याच्या बाहेरच उभे होते… घडणाऱ्या विपरीत घटना ची जाणीव मला आधीच झाली होती… बंगल्यात प्रवेश करण्याच्या आधी तुला जे अनुभव आले… तुला दिसलेले दृश्य मी माझ्या मायावी शक्तीने निर्माण केले होते… त्या नराधमाने बळी दिलेल्या मुलींच्या आत्म्याला मी आव्हान केले.. आणि त्यांना तुझ्या मदतीसाठी पाठवलं…. त्यात माझी मुलगी देखील होती..!! त्यांची शक्ती त्याच्या सोबत लढण्यास असमर्थ होती… त्या फक्त तुला संकटातून बाहेर काढू शकत होत्या… पण मध्येच त्या नराधमाने डाव साधला.. तुझा घात केला.. मी दूर वरूनच तुझ्यासोबत घडत असलेले सगळे प्रसंग पाहत होते.. पण मी तुझी मदत करण्यास असमर्थ होते… तुला जेव्हा ओढत त्याने खडय्या मध्ये फेकून दिलं.. तेव्हा माझ्या अंगात रक्त सळसळत होतं… त्याच्या नरडीचा घोट घ्यावा वाटत होता… पण जर मी त्या क्षणी तुझ्या मदतीला आले असते तर माझी देखील अवस्था तुझ्या सारखी झाली आहे असती… त्यामुळे मी स्वतःवरचा संयम ढळू दिला नाही… 

“वाट पाहत होते ती योग्य संधीची.”

तुला खड्ड्यात गाढून तो लगेच तिथून निघून गेला.. मी वेळ न दडवता तुला खड्ड्यातून बाहेर काढले… तुझा श्वास चालू होता… याचा अर्थ तू अजूनही जिवंत आहेस हे मला कळले… मी माझ्या मंत्र सिद्दीने तुझ्या श्वासावर नियंत्रण मिळवलं… शेवटी वाट पहावी लागली.. तुझ्या शुद्धीवर येण्याची… तु शुद्धीवर येई पर्यंत तुझी जगण्याची आशा खूपच कमी होती.. ह्या निर्मनुष्य जंगलामध्ये प्राण्या व्यतिरिक्त कोणीही नाही.. त्यामुळे तुला हॉस्पिटल मध्ये घेऊन जाण्यास मी असमर्थ होते… अजुन एक त्याने तुझ्या भावाला ही कुठे तरी नेलयं.. तुला त्याला ही शोधावे लागणार..

“तुमचं नाव काय आहे… मी त्यांना भावविवश होऊन विचारले.”

“काळुबाई,”

“काळुबाई तुम्ही मला मृत्यूच्या जाळ्यातून बाहेर काढलय.. तुम्ही माझ्यावर केलेले उपकार मी आयुष्यभर विसरु शकणार नाही.. इथून पुढे माझ्या जीवनाचं एकमेव ध्येय आहे.. त्या राक्षसाला संपवणं.. जेणेकरून तो अजुन निष्पाप मुलींचे बळी घेणार नाही.. मी त्याला त्याच्या मृत्यू ची भीक मागायला लावणार.. त्याचा वेदनेने भरलेला आवाज माझ्या कानावर पडल्याशिवाय मला शांती लाभणार नाही… 

“पोरी… अजून रात्र बऱ्यापैकी बाकी आहे… रात्र मोठी असल्यामुळे सूर्य उगवण्यास अजून बराच अवधी शिल्लक आहे.. तो नराधम नशेच्या अवस्थेमध्ये शांत झोपलेला असणार.. त्याचा फायदा तुला घ्यावा लागेल… तू जिवंत असल्याची किंचितही कल्पना त्याच्या ध्यानी मनी नसणार.. हीच त्याला संपवण्याची योग्य संधी आहे… आजची रात्र त्याची शेवटची रात्र… तुझ्या हाताने तुझा आणि माझा बदला तू पूर्ण करणार….  मला वचन दे”,

“काळुबाई मी तुमच्यामुळेच आज जिवंत आहे.. शेवटी तुमचे उपकार फेडण्याची संधी मला मिळाली आहे… त्या संधीचा पुरेपूर फायदा घेऊन मी तुमच्या उपकाराचा मोबदला देणार आहे… तुमच्या चरणावर त्याच शिर धडावेगळे करून ठेवेल.. हे भैरवी वचन आहे..

“केतन सारख्या राक्षसाला परमेश्‍वराने निर्माण केलेल्या पवित्र धरतीवर राहण्याचा काहीही अधिकार नाही.. माझा आज पुनर्जन्म झाला आहे… ह्या जन्माच सार्थक त्याच्या मृत्यूने होणार… त्याला माझ्या हातून ह्या भूतलावरील कोणतीही शक्ती वाचवू शकणार नाही…

मी त्यांचा आशीर्वाद घेतला.. त्यांनीदेखील माझ्या डोक्यावर हात ठेवून मला भरभरून आशीर्वाद दिला,

“भैरवी”, तुझा विजय निश्चित आहे… गरज पडली तर मी देखील तुझ्या मदतीला तयार आहे… जा आणि अंत कर त्या शेतांना चा… ही तलवार मी माझ्याजवळ माझ्या रक्षणासाठी ठेवलेली आहे… लहान आहे पण तुझ्या नक्कीच कमी येईल..

“त्यांनी दिलेली तलवार मी हातात घेतली.. काळ्याकुट्ट अंधारात देखील ती चमकत होती… ती चमक पाहून माझ्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली… शरीरामध्ये वेगळ्याच प्रकारच्या शक्तीचा संचार झाल्यासारखा वाटला…

आम्ही दोघेही बंगल्याच्या दिशेने निघालो… गडद अंधार असल्यामुळे आजूबाजूचा परिसर नीट दिसत नव्हता.. चालायला देखील बराच त्रास होत होता.. पण काळुबाई अगदी बिनधास्त चालत होत्या… बहुतेक हा रस्ता त्यांच्या ओळखीचा असावा… जस..जसं आम्ही बंगल्याच्या जवळ येऊ लागलो.. तस तसे हिंस्त्र प्राण्यांचा आवाज अधिकच वाढू लागला..

त्या बंगल्याच्या कंपाऊंडच्या भिंतीच्या बाहेरच थांबल्या… त्यांनी माझ्यावर एक नजर टाकली.. त्यांच्या नजरेत, माया, आपुलकी, प्रेम सगळंच दिसत होतं..

मी बंगल्याच्या परिसरात येऊन पोहोचले… बंगल्याचा मागचा दरवाजा उघडा होता… बहुतेक केतन बंद करण्याचा विसरला असावा… तो उघडा दरवाजा पाहून माझ्या चेहऱ्यावर हास्य पसरल, डोळ्यात चमक आली..!

मी हळूच बंगल्यामध्ये प्रवेश केला… केतन ची बेडरूम बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावर होती… काहीवेळ मी  बेडरूम मध्ये व्यतीत केल्यामुळे बेडरूम मला चांगल्या प्रकारे माहीत होती…

दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी मी सावकाश पावलं टाकत चालत होते.. नजर आपोआपच चारी बाजूंनी फिरत होती.. मी हळूच बेडरूम समोर येऊन थांबले.. बेडरूम चा अर्धा दरवाजा उघडाच होता.. बेडरूम मध्ये लाल रंगाच्या लाईटचा प्रकाश सगळीकडे पसरला होता.. केतन बेडवर अस्ताव्यस्त पडलेला होता… अगदी गाढ झोपेत… त्याच्या चेहऱ्यावरचे असुरी भाव अजूनही कमी झालेले नव्हते..

मी हळूच त्याच्यासमोर जाऊन उभी राहिले… तो पालथा झोपलेला असल्यामुळे त्याचा एक हात बेडच्या खाली लोंबकळत होता… मी तलवार दोन्ही हाताने गच्च धरली…

शरीरातील पूर्ण शक्ती एकवटून त्याच्या हातावर एक जोरदार तलवारीचा वार केला.. तो वार इतका भीषण होता की त्याच्या शरीरा पासून त्याचा उजवा हात वेगळा झाला.. त्याच्या तोंडातून एक वेदनेने भरलेली किंचाळी बाहेर पडली..

तो गोंधळल्यासारखा आजूबाजूला पाहू लागला.. त्याची नजर त्याच्या शरीरापासून वेगळे झालेल्या हातावर पडली… त्याच्या संपूर्ण शरीराला कंप सुटला होता.. डोळ्यात मृत्यूची भीती दिसत होती.. त्याचं अजुनही लक्ष्य माझ्यावर गेलेलं नव्हतं.. 

तो तसाच बेडवर उठून बसला.. आणि त्याचं लक्ष माझ्या चेहऱ्याकडे गेलं… काही क्षण तो डोळे विस्फारून माझ्याकडे पहात होता… तोंडातून हलकासा वेदनेचा आवाज बाहेर पडत होता… त्याच्या श्वासांची गती अधिकच वाढली होती… डोळ्यात रक्त उतरलं होतं.. त्यामुळे त्याचे डोळे अधिकच लालभडक भासत होते…

“त्याची झालेली अवस्था पाहून तो माझ्यावर वार करेल असं मुळीच वाटत नव्हतं…

“भैरवी,” तू जिवंत कशी राहिली,”तो अस्पष्ट आवाजात म्हणाला,”

“तुला मृत्यू देण्यासाठी,”

“भैरवी मला माफ कर… माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे… तुझं माझ्यावर प्रेम आहे ना, आपण पहिल्यासारखं सोबत राहू, आपण शरीरानेच नाही तर आत्म्याने देखील आता एक झालो आहोत…

“केतन मी देखील तुझ्यासमोर जगण्याची भीक मागत होते.. तू दया दाखवली नाहीस.. पण मला अनंत वेदना देऊन मृत्यूच्या दाढेत ढकललं.. तू एखाद्या निर्लज्ज माणसासारखी जगण्याची भीक मागतो य आता.. लाज वाटत नाही का तुला स्वतःची,”

“तुझ्या सारख्या राक्षसाला जिवंत सोडलं तर तू परत माझ्यासारख्या गरीब मुलीला फसवून तिचा प्राण घेशील,”

“तुझ्या हातून घडलेले सगळे गुन्हे डोळ्यासमोर आण. कारण तुझ्या आयुष्यातला आज शेवटचा दिवस आहे… तुझ्याकडे काही क्षण उरलेले आहेत…

“मी पुन्हा एकदा एक जोरदार वार त्याच्या डाव्या हातावर केला.. त्याचा डावा हात देखील त्याच्या शरीरापासून वेगळा झाला.. त्याच्या जखमेतून एक रक्ताची धार माझ्या चेहर्‍यावर उडाली… माझा संपूर्ण चेहरा रक्ताने माखला होता… दोन्ही हातातून वाहणाऱ्या रक्तामुळे बेडरुममध्ये सगळीकडे रक्ताचा सडा पडला होता… त्या रक्तामध्ये मासाचे तुकडे मिसळले होते जे लालभडक दिसत होते.. त्यात त्या रूम मध्ये लाल रंगाचा प्रकाश.. एखाद्या सामान्य व्यक्तीने ते हृदय पिळवटून टाकणारे दृष्य पाहिलं असतं तर बेशुद्ध पडला असता… मला तर साधी किळस देखील येत नव्हती… उलट एक वेगळीच शांतता वाटत होती…

“राघव सोबत काय केलस तू..

“मी राघव सोबत काहीच नाही केल. त्याला माझ्या मित्रांनी घरी पोहोचवलं होतं.. तो अगदी रडकुंडीला येऊन बोलत होता… त्याचा चेहरा एखाद्या लहान मुलासारखा भासत होता..

“मी परत एक वार त्याच्या पायाच्या पंजावर केला…. तो देखील त्याच्या शरीरापासून वेगळा झाला… आता मात्र त्याच्या तोंडातून वेदनेच्या आवाजा ऐवजी फक्त हवा बाहेर पडत होती… कारण आता तो वेदना सहन करण्याच्या पलीकडे गेला होता. त्याचं लालभडक गरम रक्त माझ्या संपूर्ण शरीरावर उडाल होत..

“भैरवी सांगतो,” पण त्याच्या बदल्यात तुला मला मृत्यू द्यावा लागणार,

“मला मान्य आहे,” मी त्याच क्षणाची वाट पाहत होते.. तू कधी माझ्याकडे मृत्यूची भीक मागणार..

“माझा एक माणूस त्याला घरी घेऊन जाण्या ऐवजी समुद्रकिनाऱ्यावर घेऊन गेला होता…

“आणि तिथेच,”??? तो जोर जोरात हसायला लागला,”

“भैरवी,” ह्या जगाच्या पलीकडे अजूनही जग आहे… त्या जगात मी तुझी वाट पाहत थांबणार आहे… मला तुझ्या डोळ्यात दिसत आहे तू नक्कीच एक ना एक दिवस त्या जगात मला भेटशील.. आणि तो दिवस देखील जवळच आहे…. त्याचा हसण्याचा वेग अजूनच वाढला होता..

“त्याच्या तोंडातील शब्द ऐकून माझा राग अनावर झाला होता.. माझं स्वतःवरचे नियंत्रण पूर्णपणे सुटलं होतं… मी रागाच्या भरात शेवटचा वार त्याच्या मानेवर केला… त्याचं शीर एका क्षणात धडावेगळे झालं… मला कळून चुकलं होतं… राघव ह्या जगात राहिलेला नाही.. हया नराधमाने त्याचा देखील जीव घेतला.. त्याची एकच चूक होती… तो माझा भाऊ होता… त्यामुळे त्याला इतक्या लहान वयात मृत्यूला कवेत घ्यावं लागलं… त्यानी हेच जग देखील आपल्या सुंदर निरागस डोळ्यांनी पाहिलं नव्हतं… 

“त्याचे जमिनीवर सांडलेले रक्त मुठीने मी माझ्या डोक्यावर ओतले… त्याच्या गरम रक्ताच्या स्पर्शाने माझं डोकं शांत झालं.. इतके होऊन माझ्या डोळ्यातून एक अश्रू चा थेंब देखील बाहेर पडला नव्हता…!!

“काहीवेळ मी तशीच रक्ताने माखलेल्या फरशीवर बसून होते… माझा भूतकाळ माझ्या डोळ्यासमोर तरंगत होता.. माझं रूपांतर एका कठोर स्त्रीमध्ये झालं होतं… मनातून मरणाची भीती नाहीशी झाली होती… होणारच,”  एवढा भयंकर मृत्यू माझ्या हाताने त्याला दिला होता… त्याक्षणी माणसावरचा माझा संपूर्ण विश्वास उडाला होता… मला जगायचं होतं फक्त केतन सारख्या राक्षसांचा ह्या जगातून मुळासकट विनाश करण्यासाठी…

  “कोण होता तो,

“माझ्या स्वप्नांचा चुराडा करुन गेला.

त्याच्या वाट्याच दुःख मला देऊन गेला.

“आयुष्याच्या वाटेवर मला अर्ध्यात सोडून गेला,

  “कोण होता तो,

“त्याच्या  प्रत्येक श्वास मला हवा होता…

“त्यानेच माझ्या आयुच्याचा चुराडा केला होता..

“कोण होता तो,’

“जाता…जाता माझा प्राण घेउन गेला,;

“कोण होता तो;

“त्याच्या मृत्यूच पाप माझ्या माथ्यावर थोपून गेला.;

“कोण होता तो’;

‘माझ्या जीवनाशी खेळून गेला.’

“जाता…जाता माला शाप देऊन गेला;??

Leave a Reply