लेखक : किरण पांडुरंग पवार

उन्हाळ्याचे दिवसं नुकतेच सरत आले होते आणि पावसाळा वेशीवर येऊन थांबला होता. त्या दिवसात माझा मित्रं कुणाल चा इंजिनीअरिंगच्या शेवटाच्या वर्षाचा निकाल लागला होता आणि त्याचे हे यश आम्ही मित्रांनी एकत्र साजरे करायचे ठरवले . तसे संकेत हा नेहमी आम्हाला त्याच्या गावाबद्दल ( कोकणाबद्दलं ) सांगायचा म्हणून आम्ही मित्रांनी संकेतच्या गावी जाण्याचे ठरवले. आम्ही ७ जण म्हणजे मी ; अक्षय ; गौरव ; निलेश ; शुभम ; संकेत आणि कुणाल असे सगळ्यांनी आप आपल्या दुचाकीने जाण्याचे निश्चित केले होते पण इतक्या लांब दूचाकीने प्रवास करणे योग्य नाही म्हणून घरच्यांनी आम्हाला चारचाकीने जाण्याचा आग्रह धरला. आमच्या पैकी संकेतला गाडयांबद्दलं बरच काही कळायचं म्हणून गाडी ची व्यवस्था करण्याची जबाबदारी आम्ही त्याला दिली. आम्ही रात्री निघायचा बेत आखला. घरच्यांचा विरोध होता पण त्याला न जुमानता आम्ही रात्री १० नंतरच प्रवासाला सुरुवात करायचे पक्के केले. सगळ्यांनी संकेत च्या घरी भेटायचे ठरले. तो गाडी त्याच्या घरीच घेऊन येणार होता. आम्ही सगळ्यांनी ९-९.३० पर्यंत जेवणं आटोपली आणि बरोबर १० च्या सुमारास आप आपले सामान घेऊन त्याच्या घरी पोहोचलो. निघताना आम्ही गाडी व्यवस्थित चेक करुन घेतली होती. आणि संकेत ने आणलेली गाडी ही तशी चांगल्या अवस्थेत होती. आमचा प्रवास सुरू झाला. गाडीत मंद आवाजात एक गाणं ही लावलं होत. सगळे मित्र असल्यामुळे मजा मस्करी सुरू होती. कधी एका मित्राची खेचायचो तर कधी दुसऱ्या मित्राची. प्रवास अगदी हसत खेळत सुरू होता पण तो जास्त काळ टिकला नाही. कदाचित नियतीच्या मनात तसे नसावे. कारण जसे आम्ही प्रवासाला सुरुवात केली तसे चित्र विचित्र अनुभव यायला सुरुवात झाली.. 

आम्ही निघताना गाडीचे दिवे व्यवस्थित तपासून पाहिले होते पण अवघे काही किलोमिटर गेलो असू आणि ते अचानक बंद – चालू होऊ लागले. मी संकेत ला म्हणालो की काय झाले, बॅटरी चेक नाही केली का.. पण तो म्हणाला की संपूर्ण गाडी चेक करून च आणली आहे. आम्हाला वाटले की असेल काही कारण आणि काही वेळाने ठीक होतील दिवे. पण साधारण तासा भराच्या प्रवासानंतर ते ठीक होऊन सुरू होण्या ऐवजी पूर्ण पणे बंद झाले.. वेळेचे माहीत नाही पण मध्य रात्र उलटून गेली असावी. आता पुढे जाणं शक्य नव्हत. आम्ही गाडी रस्त्याच्या कडेला घेऊन थांबवली. सगळे खाली उतरलो आणि संकेत बोने ट उघडुन बॅटरी तपासू करू लागला. आम्ही त्याच्या बाजूला च उभे होतो.. पण त्याला विशेष बिघाड झाल्याचे काही दिसले नाही म्हणून तो म्हणाला की बॅटरीचा काहीतरी प्रॉब्लेम असेल. कधी कधी मल फंक्शन होते बॅटरी आणि असा प्रॉब्लेम होतो. त्याने बहुतेक काही तरी सांगून वेळ मारून नेली असे मला वाटले. तो म्हणाला की मी सावकाश गाडी चालवतो तुम्ही घाबरु नका. पुन्हा सगळे गाडीत बसलो आणि प्रवासाला सुरुवात केली. आधीच रस्त्याला जेमतेम लाईट होते त्यामुळे संकेत कसा गाडी चालवत होता त्याचे त्यालाच माहीत. परिस्थिती पाहता प्रवासात मज्जा करण्याची प्रत्येकाची इच्छाच निघून गेली. काही वेळ गप्पा करून झाल्यावर सगळे झोपून गेले. संकेत बिचारा एकटाच जागा राहून गाडी चालवत होता. एव्हाना त्या रस्त्यावरची वाहन ही दिसेनाशी झाली होती. अधून मधून एखादा मालवाहू ट्रक अथवा चारचाकी जोरात निघून जायची. त्या व्यतिरिक्त वातावरण अगदी शांत होत.   तितक्यात एक जोरात आवाज आला आणि सगळे खाडकन झोपेतून जागे झाले. आम्ही सगळेच झोपेतून जागे झालो. 

अक्षय घाबरतच म्हणाला “काय रे कायं झाल कसला आवाज होता हा ?..”

संकेत म्हणाला “काय नाही खड्डा असेल बहुतेक..”

आम्ही सगळेच म्हणालो ” नाही नाही काय तरी पडलं गाडीतलं..गाडी थांबव..”

त्यावर संकेत चिडून च म्हणाला ” वेडे झालात का.. मी सांगतोय ना खड्डा होता.. आणि इतक्या अंधारात थांबवू का गाडी..? 

मी बाहेर एक नजर टाकली आणि अंगावर काटाच आला.. बाहेर मिट्ट काळोख होता.. आम्ही अश्या ठिकाणी होतो जिथे दूर दूर वर कोणतीही वस्ती नव्हती. आम्ही पुढे त्याला काहीच सांगितले नाही. तो तसेच काही किलोमिटर गाडी अगदी हळु वेगात पुढे नेत राहिला. पण तितक्यात टायर फुटण्याचा आवाज आला आणि नियंत्रण सुटून गाडी एका बाजूला जाऊ लागली. वेग काही जास्त नव्हता त्यामुळे काही झाले नाही. आता मात्र गाडी थांबवून टायर बदलाण्या शिवाय दुसरा पर्याय नव्हता. संकेत ने ब्रेक मारला आणि गाडी थांबवली. गाडीच्या इंजिन चा आवाज जसा थांबला तशी त्या परिसरातील जीवघेणी शांतता जाणवू लागली. संकेत म्हणाला ” आपल्या कडे स्टेपनी आहे मी १० मिनीटात टायर बदलतो घाबरु नका “. इतकं म्हणून त्याने दरवाजा उघडला आणि गाडीच्या मागे स्टेपणी काढायला गेला. तो खाली वाकला आणि जवळजवळ ओरडलाच.. “अरे स्टेपनी कुठयं ?” त्याचे ते वाक्य ऐकून आम्ही झपाझप खाली उतरलो. मी म्हणालो “तूला बोललो होतो आम्ही काही तरी पडलं गाडीतलं.. पण तू ऐकले नाहीस. स्तेपणीच पडली.. आता काय करायचं अंधारात. तसा संकेत म्हणाला ” करतो काही तरी थांब “. पण त्या निर्जन रस्त्यावर कोणाची मदत मिळेल ही आशा करणं ही मूर्ख पणाच लक्षण होत. संकेत ही आम्हाला धीर द्यायला फक्त काही तरी बोलला. पण तरीही जवळ जवळ तासभर आम्ही मदतीची अपेक्षा करत तसेच अंधारात उभे होतो. पण तितक्यात कुठून कोण जाणे पण एक माणूस तिथे आला आणि म्हणाला ” काय मदत करु का बाळांनो”. 

आम्ही त्याच्याकडे पाहतच राहिलो. कारण एखाद्या मेकॅनिक सारखे कपडे त्याने घातले होते. त्याला ग्रीस चे डाग ही लागले होते. पण आम्ही त्या ठिकाणी अडकून पडल्यामुळे त्याला काही प्रश्न ने विचारता सगळा प्रॉब्लेम सांगितला. त्याने १० मिनिटात बॅटरी चा प्रॉब्लेम ठीक करून दिला. पण पंक्चर झालेल्या टायर बद्दल ही आम्ही सांगितले. तसे तो म्हणाला मी आलो लगेच. बघता बघता आमच्या समोरून अंधारात मागच्या दिशेने चालत निघून गेला. आणि अवघ्या ५ मिनिटात एक टायर हातात घेऊन आला. जणू आमच्याच गाडीतून पडलेले असावे. आम्ही सगळे आ वासून फक्त त्याच्याकडे पाहत होतो. त्याने गाडीतले पाने काढून टायर बदलले. संकेत ने त्याला पैसे देऊ केले पण त्याने ते नाकारले. आम्ही त्याला पुढे काही विचारणार इतक्यात तो म्हणाला की उशीर झालाय.. आणि पुन्हा अंधारात गुडूप होऊन गेला. माझ्या मनात सतत शंका येत होती इतक्या रात्री अंधारात तो माणूस कुठून आला कारण तिथे आजूबाजूला कुठेच घर किवा गॅरेज दिसत नव्हतं. मी संकेत ला विचारले त्यावर तो म्हणाला ” जाउ देना काय फरकं पडतो जो कोणी होता आपली मदत केली त्याने.. पैसे देऊ केले पण ते ही नाकारले, असेल इथे कुठे तरी राहत आपल्याला काय करायचे आहे..” मी ही जास्त विचार न करता तो विषय तिथेच सोडून दिला.. आम्ही पुन्हा प्रवासाला सुरुवात केली. खर तर एव्हाना आम्ही पोहचायला हवं होत पण खूपच ऊशीरं झाला होता म्हणून संकेत ने आम्ही नको नको म्हणतं असताना गाडी कच्चा रस्त्याला घेतली. गाडी चा वेग वाढवला त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात खूप धूळ उडत होती.. त्यामुळे बाजूचे काही नीट दिसत ही नव्हते. 

त्या रस्त्यावर आम्हाला अर्धा तास झाला आणि मला जाणवले की आम्ही फिरून फिरून पुन्हा त्याच ठिकाणी येतोय. तिथे एक मोठे वडाचे झाड होते, त्यामुळेच मला कळले की आम्ही बराच वेळ झाला एकाच रस्त्यावर फिरतोय. चकवा लागला होता बहुतेक आम्हाला.. मी संकेत ला म्हणालो की सगळ्यात आधी गाडीचा वेग कमी कर आणि सरळ जात रहा.. अजिबात वळण घेऊ नकोस. सुदैवाने आम्ही त्या चकव्या तून लगेच बाहेर पडलो पण हा प्रवास आम्हाला अजुन काय दाखवणार होता याची आम्हाला कल्पना ही नव्हती. मी वेळ पाहिली तर ३.३० वाजून गेले होते. आम्ही संकेत ला म्हणालो की एखादे हॉटेल, ढाबा किंवा टपरी वैगरे दिसली तर थांबव. आम्ही हे बोलत नाही तितक्यात डाव्या बाजूला एक ढाबा नजरेस पडला. संकेत ने अगदी समोर गाडी पार्क केली. आम्ही आळस देत बाहेर पडलो. तितक्यात गौरव म्हणाला की चल जरा आपण लघवी करून येऊ.. इथे धाब्यावर शौचालय दिसत नाहीये.. मी त्याच्या सोबत मागच्या बाजूला गेलो. मोबाईल चा फ्लॅश लाईट सुरू होता.  मागे गेल्यावर कळले की एक ओढा आहे तिथे. आम्ही ओढ्याच्या जवळ जात थोडे खाली उतरलो. गौरव माझ्या पुढे होते आणि मी त्याच्या मागून चालत होतो. तो जसा खाली उतरला त्याच्या दुप्पट वेगात जोरात धावत वर आला आणि माझा हात खेचून मला वर यायला खुणावल. मला काही कळलेच नाही याला अचानक काय झाले. त्याचा चेहरा पहिला तर ती प्रचंड घाबरला होता. त्याला इतके घाबरलेले मी कधीही पाहिले नव्हते म्हणून मी त्याच्या मागे धावतच पुन्हा गाडी जवळ आलो. इतर मित्र आत जाऊन बसण्याच्या तयारीत होते. तसा गौरव ओरडुन म्हणाला ” आपण आत्ताच्या आत्ता इथून निघतोय.. गाडीत बसा.. संकेत पटकन गाडी काढ इथून.. “

त्याला असे घाबरलेले पाहून आम्ही सगळेच दचकलो. काय झाले विचारू लागलो पण तो त्या भागातून निघायला सांगत होता. संकेत ने जास्त विचारपूस न करता गाडी काढली. पुढे २ तास आम्ही मध्ये कुठेच गाडी थांबवली नाही. सकाळी ६ वाजता आम्ही मित्राच्या घरी पोहोचलो. तो पर्यंत गौरव जरा शांत झाला होता. त्याने जे सांगितले ते ऐकून आमची दातखीळ च बसली. तो म्हणाला ” अरे मी आणि किरण ओढ्या कडे लघवी करायला गेलो होतो. माझ्या मोबाईल चा फ्लॅश लाईट सुरू होता.. त्याच्याच प्रकाशात त्या ओढ्याच्या पलीकडे एक मुलगी उभी दिसली. मुलगी काय.. काही तरी भयानक होत ते.. तिचा चेहरा कशाने तरी चिरल्यागतं वाटतं होता. जबडा अगदी लांबलचक होता ज्यातून रक्त येत होत. आणि सगळ्या भयंकर गोष्ट म्हणजे ती आमच्याकडे च एक टक बघत त्या ओढ्याच्या पाण्यावरून तरंगत येत होती.. खर सांगायचं तर मी पण गौरव सोबतच होतो पण मला ओढ्या पलीकडे अंधाराशिवायं कोणीच दिसलं नव्हतं..

Leave a Reply