अनुभव – श्रद्धा
हा अनुभव माझ्या काका ला नुकताच म्हणजे ऑगस्ट २०२१ मध्ये आला. माझ्या काका ला काही गूढ विद्या ज्ञात आहेत त्यामुळे कोणी काही बाहेरचे केले असेल तर ते तो बघतो, त्यांना त्यातून बाहेर पडायला मदत करतो, त्यातून मार्ग दाखवतो. अश्याच एका गोष्टी साठी संदेश नावाचा एक व्यक्ती त्यांच्याकडे समस्या घेऊन आला. त्यामुळे खरंच असे काही आहे का की फक्त भास आहेत हे पाहायला त्यांनी त्याच्या घरी जायचे ठरवले. सकाळी मुंबई हून सगळे सामान घेऊ ते आणि त्यांचा सहकारी महेश असे दोघे संदेश कडे जायला निघाले. त्याच्या घरी पोहोचेपर्यंत दुपारचे १२ वाजले होते. विशेष म्हणजे अशी कामे माझे काका अमावस्या किंवा पौर्णिमेच्या दिवशी करतात. कारण अस म्हणतात की त्या वेळी अश्या शक्ती जास्त कार्य रत असतात. त्यामुळे त्यांना शोधून ताब्यात घेणे लवकर जमते. तिथे पोहोचल्यावर काकांनी आपले विधी करायला सुरुवात केली.
संदेश च्याच घराबाहेर मोठे अंगण होते तिथे हे सगळे चालले होते. सुरुवातीला एका कोंबड्यांचा बळी दिला गेला आणि पुढचे काम यशस्वी होण्यासाठी प्रार्थना झाली. बळी देण्याचे मुख्य कारण म्हणजे त्या रक्ताच्या वासावर त्या शक्ती पटकन आकर्षित होतात. सगळे झाल्यावर महेश ला तो कोंबडा घरापासून १-२ किलोमिटर च्याच अंतरावर एका खड्यात गाढून यायला सांगितले. जेणेकरून ती वाईट शक्ती त्या वासावर त्याच्या मागे जाईल आणि तिथेच अडकून पडेल. त्याने तसे केले पण एक मोठी चूक झाली. त्याचे दुर्भाग्य म्हंटले तरी चालेल. तिथून दुसरी कडे निघून जाण्या ऐवजी तो पुन्हा उलट रस्त्याने संदेश च्याच घरी आला. संदेश ला काकांनी सगळे सांगून ठेवले होते म्हणून जसा महेश घरात शिरला तसे पटकन त्याला थांबवले. पण तो पर्यंत खूप उशीर झाला होता. ती वाईट शक्ती पुन्हा त्याच्या सोबत त्या मूळ जागी आली. काकांनी जसे पुढचे विधी सुरू केले तसे लगेच त्यांना त्या शक्तीची जाणीव झाली. आणि बघता बघता ती शक्ती त्यांच्या कामात व्यत्यय आणू लागली.
ते नक्की काय होत माहीत नाही पण त्याच्या मुक्ती साठी भरपूर काही मागू लागले. पण काकांना माहीत होय की जर ह्या शक्तीची एकही इच्छा पूर्ण केली, त्याला हवं ते दिलं तर त्याच्या मागण्या, वाढतच जाणार, त्याला कसलीच मर्यादा राहणार नाही. म्हणून त्यांनी आपल्या विधी सुरूच ठेवल्या आणि जोर जोरात मंत्र उच्चार करू लागले. जेणेकरून त्या शक्तीची ताकद कमी होईल आणि त्यावर नियंत्रण मिळवता येईल. विधी सुरू करून ६ तास झाले होते. संध्याकाळचे ७ वाजले. त्यांचे विधी अजूनही सुरूच होते. एका विशिष्ट क्षणा ची ते वाट पाहत होते. एव्हाना काकांना ही कळून चुकले होते की हे जे काही आहे ते इतक्या सहजा सहजी हे घर सोडणार नाही. त्यांनी आपले सर्व ज्ञान, शक्ती पणाला लाऊन त्या शक्तीवर नियंत्रण मिळवले. सगळे झाल्यावर ते संदेश चा निरोप घेऊन जायला निघाले. तितक्यात सोबत असलेल्या महेश जोरात ओरडला. त्याला खिडकीबाहेर पुन्हा काही तरी दिसले. त्याला ही काही मंत्रोच्चार माहीत असल्याने तो मंत्र म्हणू लागला. महेश ने काकांकडे पाहिले. त्याला कळून चुकले होते की त्यांनी ज्या पिशाच्च वर नियंत्रण मिळवले ते हे नव्हतेच. ते अजूनही मोकळे फिरतेय.