गोष्ट बऱ्याच वर्षांपूर्वीची आहे. माझी आजी साताऱ्या मधल्या एका खेड्यात राहायची. घटना ती तरुण असताना ची आहे. म्हणजे तिचे लग्न होऊन काही वर्ष झाली असतील आणि ती ८ महिन्यांची गरोदर होती तेव्हाची. त्या दिवशी आजोबांचा प्लॅन काही वेगळाच ठरला होता. ते तिला घेऊन सिनेमा बघायला जाणार होते. रात्री चा शो होता. त्यांनी अगदी वेळेवर घरी सांगितले. माझ्या पणजी ला जेव्हा हे समजले तेव्हा तिने साफ नकार दिला. अश्या अवस्थेत रात्री अपरात्री असे बाहेर जाणे बरोबर नव्हते. तिने त्यांना समजावाय चा खूप प्रयत्न केला पण ते त्यांनी पण त्यांनी त्यांच्या आईचे काहीच ऐकले नाही. त्यांच्याकडे त्या काळी सायकल होती. त्यावरच ते सिनेमा पाहायला जायला निघाले. जवळपास ३-४ किलोमिटर चे अंतर असेल. तिला घेऊन ते कसे बसे सिनेमा गृहात येऊन पोहोचले. 

साधारण पावणे तीन तासात सिनेमा संपला आणि ते घरी यायला निघाले. ती सिनेमा गृहाच्या बाहेर येऊन थांबली आणि ते तिथून च काही अंतरावर ठेवलेली सायकल घ्यायला गेले. बराच उशीर झाला होता. कधी एकदा घरी पोहोचतो असे झाले होते. आजोबा सायकल घेऊन येई पर्यंत आजी बाहेर येऊन त्यांची वाट बघत थांबली होती. सहज म्हणून तो परिसर न्याहाळत होती. तो भाग तिकटी चा होता. म्हणजे जिथे ३ रस्ते एकत्र येऊन मिळतात. बरीच रात्र झाल्यामुळे परिसर एकदम शांत होता. तितक्यात तिचे लक्ष रस्त्याच्या एका कोपऱ्यात कडेला गेले. तिथे कोणावरून तरी उतरवून टाकलेली भाकरी त्यावर भात, कांदा, लिंबू, हळद, कूंकु ठेवले होते. जसे तिच्या लक्षात आले तसे झटकन तिने आपली नजर दुसरीकडे फिरवली.. तितक्यात आजोबा सायकल घेऊन आले तसे ते दोघेही घराच्या वाटेला लागले.

ती त्यांना सांगत होती की बराच उशीर झालाय, आपण एवढ्या रात्री यायला नको होत, आई पण म्हणत होत्या पण तुम्ही त्यांचे अजिबात ऐकले नाही..” त्यावर ते अगदी निर्धास्त पणे म्हणाले “तू कशाला काळजी करतेस.. मी आहे ना..?” ती थोडी अवघडलेल्या अवस्थेत च होती. ते म्हणाले “आपण थोडे अंतर इथून चालत जाऊ” तसे तिने होकारार्थी मान डोलावली. त्यांचे बोलणे चालू असतानाच तिने नकळत त्या रस्त्याकडे ला असलेला उतारा ओलांडला. ही गोष्ट दोघांच्याही लक्षात आली नाही. ती काही पावले पुढे चालत गेली आणि एकाएकी जागीच उभी राहिली. आजोबा नकळत पुढे चालत निघून गेले. पण त्यांना जसे लक्षात आले तसे ते पुन्हा मागे आले आणि तिला विचारू लागले “काय ग.. काय झालं.. अशी का अचानक थांबली स”. पण तिने काहीच उत्तर दिले नाही. 

ती तशीच एके जागी उभी राहून कुठे तरी शून्यात पाहत होती. तसे त्यांनी पुन्हा २-३ वेळा विचारून पाहिले पण काहीच उत्तर मिळाले नाही. त्यांना कळेनासे झाले की ही अशी का वागते य. तितक्यात त्यांच्या डोळ्याचे पाते लवते न लवते तसे अचानक ती अतिशय जोरात धावत सुटली. आजोबांना काही क्षण काही समजले च नाही. ते झटकन ओरडले “काय ग.. काय झालं..?” ते लगेच सायकल वर बसून तिच्या मागे निघाले. पण ती इतक्या जोरात धावत गेली की अंधारात नक्की कोणत्या दिशेला गेली हे कळलेच नाही. त्यांच्या मनात नको नको त्या शंका उत्पन्न होऊ लागल्या. आई म्हणत होती तर आई चे ऐकायला हवे होते पण मी हट्ट करून तिला घेऊन आलो. ते विचारात पडले “हिला धड नीट चालता ही येत नव्हते पण आता ही अशी धावत कशी काय सुटली..” त्यांनी बराच वेळ तिला त्या भागात शोधले पण ती कुठे ही दिसत नव्हती. 

ती ज्या दिशेने धावताना शेवटची दिसली होती तो रस्ता घराच्या दिशेने जात होता. त्यांनी घरी जाऊन कोणाला तरी मदतीसाठी घेऊन यायचा विचार केला जेणेकरून तिला शोधता येईल. त्यांचा जीव कासावीस होत होता. ते लगबगीने घरी यायला निघाले आणि थोड्याच वेळात घरी येऊन पोहोचले. आणि पाहतात तर काय ती तिच्या सासूला म्हणजे माझ्या पणजी ला मारत होती. त्यांनी झटकन जाऊन तिला थांबवले आणि विचारले की असे काय वागत आहेस.. काय झालेय.. का मारते य तिला..? तसे ती बोलू लागली. पण तिचा आवाज ऐकून आजोबांच्या पायाखालची जमीनच सरकली. ती एका भरड्या किळसवाण्या आवाजात बोलू लागली ” मी ह्या म्हातारीला बोललो मला भूक लागलीये जेवायले दे तर थेरडी नाही म्हण तीये. ” माझी पणजी तिचे हे रूप पाहून प्रचंड घाबरली होती. त्यांना कळत नव्हते की एका बाईच्या तोंडून हा असा आवाज. 

तिने स्वयंपाकघरात जाऊन जे काही उरलेले अन्न होते ते एका ताटात वाढून आणून दिले. तिने ते ताट पुढ्यात घेऊन असे खायला सुरुवात केली की कित्येक आठवडे तिने काहीच खाल्ले नाहीये. बघता बघता ताटातले जेवण तिने संपवले सुद्धा आणि अजुन जेवणाची मागणी करू लागली.. ते दोघेही तिची अवस्था फक्त पाहत होते. काय करावे काय नाही त्यांना काहीच सुचत नव्हते. सासूने तडक डाळभात शीजत ठेवला. पण अजून काय पहावे लागणार होते याची त्यांना कल्पनाही नव्हती. भात झाल्यावर गार होऊन न देता ती तशीच खाऊ लागली, अवघ्या काही मिनिटांत तो भात ही संपवला तिने. पुन्हा सांगू लागली की मला जेवायला दे. त्यांनी पुन्हा डाळ भात शिजत ठेवला. पण तिला किंवा तिच्यात जे काही होते त्याला भूक असह्य होत होती. ती उठली आणि भात शिजत असलेल्या भांड्यात हात घालून तसेच खाऊ लागली..

माझी पणजी तिची ही अशी भयानक अवस्था पाहून रडू लागली. त्यांना खूपच काळजी वाटत होती. पोटात बाळ आहे आणि हिचे असे हे एवढे गरम खाणे. एकच मार्ग होता. ती लगबगीने देवघरात गेली व देवाचा धावा करू लागली. तितक्यात तिला आठवले की आजच शेजारचे कुटुंब शेगावला जाऊन आले आहे आणि त्यांनी तिथला प्रसाद दिलाय. पटकन तिने देव्हाऱ्यात ठेवलेला तो प्रसादाचा लाडू तिला खायला दिला तसे ती हळु हळु शांत झाली. तिला जी कसली बाधा झाली होती त्यातून तिची सुखरूप पणे सुटका झाली. नंतर असा त्रास पुन्हा तिला कधीही झाला नाही.

Leave a Reply