अनुभव – यश नागभिडे

ही घटना माझ्या आई सोबत 20 वर्षांपूर्वी घडली होती. तेव्हा तिचं लग्न होऊन 1-1.5 वर्ष झाल होतं. ती आणि माझ्या आईची मोठी बहीण हाकेच्या अंतरावर राहायच्या. माझ्या आईची एक माउशी होती. तिचा या दोघींवर खूप जीव होता. माऊ शी दिसायला खूप सुंदर होती. पण तिचा नवरा म्हणजे माझ्या आईचे माऊसांजी खूप सौंशय यी होते. त्यांच्यात रोज काही ना काही कारणांनी भांडणं व्हायची. 

एके दिवशी सकाळी त्यांचं कडाक्याचं भांडणं झाल. वैतागून माऊशीने अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेतल. शेजारच्या लोकांनी कशी बशी आग विझवली आणि त्यांना हॉस्पिटल ला नेल. पण तिथे पोहोचे पर्यंत त्यांनी जीव सोडला होता. पण रस्त्यातून जाताना त्यांच्या तोंडून फक्त दोनच शब्द पुन्हा पुन्हा ऐकू येत होते. अनिता आणि सुनीता. म्हणजे माझी मोठी आई आणि आई.

तिच्या मृत्यू बद्दल माझ्या आई ला कोणीही काही सांगितल नव्हत कारण तिला नुकताच बाळं झालं होत. माझ्या मोठ्या भावाचा जन्म झाला होता. माझी मोठी आई ही तिच्या अंत्यविधी ला गेली नाही कारण तीच्याने ते भाजलेलं प्रेत बघवल नसतं.

ह्या नंतर मोठ्या आईला आणि माझ्या आईला विचित्र अनुभव यायला सुरुवात झाली. माझी आई त्या रात्री बाथरूम ला गेली तेव्हा तीला बाथरूम मध्ये काही जळताना दिसले. ती दचकून जोरात ओरडली. घरात सारे जागे झाले आणि तिला शांत करू लागले. माझ्या आजीने तिला धीर देत पाणी दिलं. पण तिला जे काही दिसलं होत ते पाहून उरलेली रात्र ती काही झोपू शकली नाही. सकाळ होताच माझी मोठी आई तिला भेटायला आली आणि सांगू लागली. “अगं काल मावशी माझ्या स्वप्नात आली होती माझा गळा दाबत होती.” 

त्या नंतर सगळ्यांनी आई ला माऊ शी च्या मृत्यू बद्दल सांगणं भाग होत. सगळे कळल्यानंतर आई ला ही समजले की रात्री बाथरूम मध्ये तिला जे दिसले तो भास नव्हता. पण हे सगळं इतक्यावरच थांबणार नव्हत. त्या दोघीं सोबत ह्या असल्या घटना रोज घडत होत्या. कधी स्वप्नात ती त्यांच्या अंगावर पेटती साडी टाकायची तर कधी गळा दाबायची. असेच एके रात्री माझी मोठी आई झोपेतून ओरडत उठली आणि म्हणाली की मावशी ने तिच्या मांडीवर जळती साडी फेकली आणि तिच्या पायांना खूप आग होतेय. त्या दोघीही भीतीच्या सावटाखाली होत्या. यातून सुटण्याचा काही मार्गच सापड त नव्हता.

तेव्हा त्या त्यांच्या गावातला एका व्यक्ती कडे गेल्या जो हे सगळे जाणून होता. त्याला सगळा प्रकार सांगितला. त्यावर त्याने हे सगळे का घडतेय याचे कारण सांगितले. त्या दोघीही तिच्या अंत यात्रेला जाऊ शकल्या नाहीत आणि म्हणूनच ती रोज स्वप्नात येऊन त्रास देतेय. त्यांनी उपाय सुचवला की आप आपल्या घरी पित्रांसाठी पूजा करावी ज्यामुळे माऊ शी च्या आत्म्याला मुक्ती मिळेल. त्यांनी सांगितल्या प्रमाणे केल. त्या नंतर मात्र मावशी कधी त्यांच्या स्वप्नात आली नाही..

Leave a Reply