अनुभव – कौस्तुभ बुरळे

मी सध्या कॉलेज मध्ये आहे. आणि कॉलेज जवळच्याच एका छोट्याश्या हॉस्टेल मध्ये राहतो. आम्ही एकूण दहा मुलं आहोत. एकूण ५ रूम आहेत त्यामुळे रूम मध्ये प्रत्येकी 2 मुलं. काही महिन्यांपूर्वी ची ही गोष्ट आहे. शनिवारी कॉलेज आटोपून आम्ही रूम वर आलो. माझा रूममेट संध्याकाळी 5.30 वाजता त्याच्या गावी जायला निघाला. दुसऱ्या दिवशी रविवार ची सुट्टी असल्याने आम्ही सगळ्यांनी रात्री जागून कॉमेडी मूवी पाहण्याचा प्लॅन केला. 

मी माझ्या रूममेट मित्राला सोडायला गेलो होतो आणि येताना मस्त काही स्नॅक्स वगरे घेऊन आलो. आम्ही जेवण वैगरे आटोपून 12.30 वाजता सारे जमलो आणि मुवी सुरू केला. अंदाजे अडीच झाले असतील. स्नॅक्स खाल्ल्यामुळे हात तेलकट झाले होते म्हणून मी हात धुण्यासाठी रूम च्या बाहेर बेसिन जवळ गेलो. हात धुता धुता माझ लक्ष वॉशरूम च्याच दारा जवळ गेल. दार उघडं होतं. मी आत जाऊन पाहिलं पण तिथे कोणीही नव्हते. म्हणून मी बाहेर येऊन दार बंद केलं आणि तिथला लाईट बंद केला. 

पुन्हा रूम मध्ये जाण्यासाठी पाठ फिरवली आणि एक विचित्र आवाज कानावर पडला “ए…..” मला वाटलं कोणी तरी माझी टिंगल करतंय. म्हणून मी लक्ष दिलं नाही आणि तिथून बाहेर पडलो. पण पुन्हा तोच भरडा आवाज कानावर पडला. ह्या वेळेस नुसता आवाज नव्हता तर मला प्रश्न होता ” ए कोण आहे तिकडे ?”..तो आवाज ऐकून माझी वाचाच बंद झाली. काही समजेनासे झाले. मी धावतच माझ्या रूम वर गेलो आणि दार लावून पूर्ण रात्र तसाच बसून राहिलो.

सकाळी ही घटना मी माझ्या मित्रांना सांगितली. ते मला समजावून सांगत होते की तुला भास झाला असेल पण मला व्यवस्थित माहीत आहे की तो मुळीच भास नव्हता.

Leave a Reply