आपण आपल्या जीवनात कळत नकळतं अस काही करून जातो ज्याचा आपल्याला पत्ता सुद्धा नसतो पण आपण एक खूप मोठी चूक केलेली असते हे जेव्हा कळत तेव्हा खूप उशीर झालेला असतो. धर्मेश त्याची evening shift करून घरी जायला निघाला. निघताना त्याला एका रस्त्याच्या आड नेहमी एक मध्यम वयाची बाई फळ विकताना दिसायची. पण आज ती बाई तिथे नव्हती. हे बघून धर्मेश ला आश्चर्य वाटलं. कारण कसही आणि काहीही झालं तरी ती बाई नेहमी फळ विकायला तिथे यायची. पण आज ती तिथे नाही हे बघून त्याला चुकल्या सारखं वाटलं. असेच 3-४ दिवस झाले पण ती बाई तिथे परत दिसली नाही. न राहवून त्याने तिथे चौकशी केली तेव्हा समजलं के 5 दिवसांपूर्वी एक भरधाव वेगात आलेल्या 4चाकी गाडीने तिला उडवलं होत. आणि त्या अपघातात तिचा जागीच मृत्यू झाला होता. तिला तीच असं कोणी नव्हतं. म्हणून तिचे अंत्य विधी ही नीट झाले नाही. हे ऐकून धर्मेश ला धक्काच बसला. पण नंतर ही त्या गोष्टीचा विचार त्याच्या मनातून जातं नव्हता. त्याला कारण ही तसेच होते. 

धर्मेश ची ही अवस्था बघून त्याची बायको जानव्ही ही काळजी करू लागली. त्याचा कल बदलावा म्हणून त्या रात्री त्याच्याशी बोलून नक्की काय झालेय हे जाणून घायचे ठरवले..

“धर्मेश तू त्या बाई चा एवढा का विचार करतोय? अरे जाणाऱ्या व्यक्तीला कोणी नाही थांबवू शकत. “

तसे धर्मेश सांगू लागला

“तुला आठवत मागच्या वर्षी माझा आणि विशाल चा bike var accident झाला होता? तो त्याच रस्त्यावर झाला होता. तेव्हा जर तिथे ती बाई नसती तर आज मी आणि विशाल या जगात नसतो. वेळेवर तिने ऍम्ब्युलन्स मागवली आम्हा दोघांना हॉस्पिटल मध्ये वेळेत admit केल. म्हणून आज आम्ही जिवंत आहोत..आता तिच व्यक्ती या जगात नाही.. खरंच मला खूप वाईट वाटतंय तिच्या साठी.”

हे ऐकून जानव्ही च्या डोळ्यां समोर ते सगळे दृश्य परत आले. लग्नाच्या 4 मही न्या आधी धर्मेश चा accident zala, sobat mitra hi hota पण त्या दोघांना admit करणारी बाई लगेच कुठे निघून गेली कोणालाच कळले नाही.

त्या कटू आठवणीतून जान्हवी भानावर येत म्हणाली

“तसे म्हणायला गेले तर तिचे माझ्यावर ही खूप उपकार आहेत. नाहीतर तुला गमावण मला सहन झालंच नसतं. ऐक ना आपण या vacation मध्ये बाहेर कुठे तरी हील स्टेशन ला जाऊया. माझी एक मैत्रीण म्हणत होती तिथे एक बंगला आहे त्याचा मालक अगदी कमी किमतीत मध्ये विकतोय.आपण जाऊन बघूयाका?”

धर्मेश ने मान हलवून होकार दिला

साधारण आठवड्या नंतर ते दोघे ठरलेल्या ठिकाणी जायला निघाले. प्रवासात थकवा असा विशेष जाणवला नाही. पण तिथे जाऊन बघितल तर तो परिसर जरा विचित्र वाटत होता. त्या व्यक्तीला जानव्ही ने कॉल केला. तसे तो म्हणाला

“तुम्ही थोडा वेळ थांबा मी चावी घेऊन येतोय. १५-२० मिनिट लागतील “

तसे धर्मेश आणि जानव्ही त्याची वाट बघत तिथेच थांबले. जानव्ही बंगल्याचा परिसर न्याहाळू लागली. तो बंगला तसा मोठा होता. चालता चालता जानवी बंगल्या च्या मागे आली. तिथे एक विहीर होती. त्या विहिरीवर लोखंडी जाळी चढवली होती. जानव्ही त्या विहिरी जवळ जाऊ लागली तसा तीला कसला तरी कुबट उग्र वास यायला लागला. आश्चर्य म्हणजे तिथे जवळपासची जागा पूर्ण रिकामी होती. कुंपण सोडल तर समोर काहीच दिसत नव्हतं. सहज म्हणून ती विहिरीत डोकावून बघणार तितक्यात तिच्या केसां मधून कोणीतरी हाथ फिरवत मागे गेलं असं जाणवलं. सोबत थंड बर्फ ठेवावा तसा स्पर्श तीला तिच्या मानेवर जाणवला. तिने दचकून मागे पाहिलं तर मागे कोणीच नव्हतं.

तसे जान्हवी पुन्हा बंगल्याच्या गेट जवळ आली आणि धर्मेश ला काही सांगणार तितक्यात बंगल्याचा मालक तिथे आला.

” मी जनार्दन, या बंगल्या चा मालक, सॉरी हा जरा उशीर झाला. अहो काय करणार रस्ता खूप खराब आहे ना म्हणून गाडी चावायला होत नाही त्या रस्त्यावर.”

तो त्या दोघांना घेऊन बंगल्याच्या दारावर आला. आपल्या खिश्यातून एक चावी कडून त्याने तो दार उघडले. दार उघडताच आतून एक थंड हवेची झुळूक आली. तो बंगला बऱ्याच काळापासून बंद असल्या कारणाने त्याच्यात ठिकठिकाणी जाळोखी जमा झाली होती.. सगळीकडे धुळीचे थर च्या थर साचले होते. ते बघून धर्मेश थोडा चिडला आणि बोलला, “अहो काय हे? थोडी साफ सफाई तरी करायची ना.”

तसे जान्हवी म्हणाली “अरे जाऊ दे ना आता, तू का उगाच चिडतोस.”

धर्मेश ला शांत करत त्याला आत घेऊन गेली. आतून बंगला तसा मोठा होता, मोठा हॉल आणि 4 खोल्या असलेला बंगला एवढ्या कमी किमतीत मिळतोय याच धर्मेश आणि जानव्ही ला आश्चर्य वाटत होत. एक खटकणारी बाब म्हणजे म्हणजे तो माणूस बंगला दाखवायला आत आलाच नाही. दरवाजा उघडून दिला आणि म्हणाला ” तुम्ही बंगला बघा आतमध्ये network milat नाही मला एक call करायचा आहे.” जानव्ही ने काही लक्ष दिल नाही पण धर्मेश ला जरा वेगळंच वाटलं. जस तो व्यक्ती मुद्दाम आत येत नाहीये. दोघांनी पूर्ण बंगला पहिला आणि त्यांना तो आवडला सुद्धा. पण त्यांना हे कुठे माहित होत के हे त्यांचं येणाऱ्या संकटा कडच पाहिलं पाऊल आहे..

धर्मेश आणि जानव्ही ला तो बंगला आवडला होत. लागलेच त्यांनी सगळी चौकशी करून त्या बंगल्या साठी लागणारे पैसे भरले आणि बंगल्याचे काम केले. पण त्यांनी त्या बंगल्याचा इतिहास जाणून घेण्याचे कष्ट अज्जीबात केले नाही. धर्मेश चा देवपुजेवर विश्वास नव्हता. म्हणून घरात कोणतीच देवपूजा झाली नाही. त्या बंगल्याच सगळ काम आवरल्या नंतर त्यांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना एक छोटीशी पार्टी दिली. पार्टी खूप वेळ चालली सगळे enjoy करत होते. मग धर्मेश चा मित्र खालिद सिगारेट ओढायला म्हणून बंगल्याच्या मागच्या बाजूला गेला. तस तो परिसर जानव्हीने आधीच साफ करून त्या विहिरी त ही साफ सफाई करून घेतली होत. खालिद सिगारेट ओढत असाच इथे तिथे बघत होता. एवढ्यात त्याला त्याच्या डाव्या बाजूने कोणीतरी धावत गेल्याचा भास झालं. खालिदच लक्ष लगेच त्या ठिकाणी गेलं. त्याच काळीज भीतीनं धड धडु लागलं. “कौन हैं? अरे यार डराओ मत. अर्णव तू हैं क्या? ” त्यांचा एक मित्र अर्णव त्याला ही सवय होती लोकांना घाबरायची. खालिद पुढे गेला आणि बंगल्याच्या भिंती कडे पोहोचला. पण तिथे कोणीच नव्हतं. तस पुन्हा त्याच्या मागून जोरात कोणीतरी अतिशय वेगात पळत गेलं. आता मात्र तो घाबरला त्याने त्याची सिगारेट तशी फेकून तो बंगल्यात आला. आत आल्या नंतर जसा तो मागे वळला तशी त्याला दारात एक गडद आकृती उभी दिसली. तो ओरडला आणि आत धावत आला. “वहा कुछ हैं मैने देखा कोई खडा हैं दरवाजे पर.” धर्मेश ला वाटलं के कोणीतरी चोरी करायच्या उद्देशाने आल असणार. तस तो त्याच्या काही मित्रांना घेऊन तिथे गेला. पण मागे कोणीच नव्हतं. सगळी कडे शोधून सुद्धा कोणीच सापडल नाही.

तसे धर्मेश म्हणाला – कोणीच नाही आहे रे इथे. मग हा खालिद कोणाला बघून घाबरला?

त्यावर त्याचा मित्र बोलला, “अरे तो तर आधीच डरपोक आहे. मला वाटतं त्या झाडाला बघून घाबरला असेल.”

असं बोलून धर्मेश च्या मित्राने समोर बोट दाखवलं. समोरच झाड एका माणसा सारख भासत होत. तसा सगळ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आणि हसत घराच्या आत आले.

आत येऊन सगळे खालिद ला बोलू लागले, “अरे क्या डरपोक हैं रे तू. वहा एक पेड हैं उसे देखकर डर गया तू?”

असं बोलून हॉल मध्ये चांगलाच हशा पिकला. पार्टी संपायला रात्रीचे 1.30 वाजले. सगळे नंतर आपल्या आपल्या घरी जायला निघाले. आता बंगल्यात जानव्ही आणि धर्मेश होते. पार्टी मध्ये झालेला थकवा एवढा होता के त्यांना लगेंच झोप लागली. काही वेळ उलटला असेल. जानव्हीला अचानक मधेच जाग आली. तिच्या घशाला कोरड पडली होती म्हणून ती पाणी प्यायला म्हणून बेडरूम मधून बाहेर आली. घड्याळात पाहिलं तर रात्रीचे 3 वाजले होते. जानव्ही किचन च्या दिशेने गेली. माठातुन पाणी घेताना तीला जाणवलं की कोणीतरी मागे उभ आहे. जानव्ही ने झटकन मागे वळून पहिले पण तिथे कोणीच नव्हतं. भास झाला असेल असं समजून तिने त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केल. पाणी पिऊन ती मागे वळली आणि समोरचे दृश्य पाहून हादरून च गेली. एका अंधाऱ्या कोपऱ्यात तीच गडद आकृती उभी होती. तीला बघून जानव्हीच्या अंगावर सर कण काटा उभा राही ला. ती आकृती तब्बल एक फूट हवेत तरंगत होती. तिच्या अंगावरुन पाण्याचे थेंब पडत होते. अंग पूर्ण भिजल्यासारख वाटत होत. जान्हवी मात्र जागीच खिळली होती. ती काही करणार तितक्यात ती आकृती जान्हवीच्या अंगावर झेपावली. तसे जानव्ही जोरात किंचाळली आणि भीतीने ओरडू लागली. तिचा आवाज ऐकून धर्मेश खडबडून जागा झाला. आणि बेडरूम मधून धावत आला. जानव्ही भिंतीला टेकून आपल्या चेहऱ्यावर हाथ ठेऊन ओरडत होती. धर्मेश ने तीला शांत केले आणि विचारले ” काय झालं ग का ओरडतेस?”

जानव्ही प्रचंड घाबरली होती तिने धर्मेश ला मिठी मारली आणि घाबरलेल्या स्वरात बोलू लागली,”ती मला मारून टाकेल. ती मला मारून टाकेल धर्मेश” समोरच्या भिंतीकडे न बघता फक्त बोट दाखवून जानव्ही बोलत होती. पण धर्मेश ला कोणीच दिसत नव्हतं.

धर्मेश – अग कोण? तिथे कोणीच नाही आहे. तू काय बोलतेस? कोण दिसलं तूला? तू आधी शांत हो बघू.. 

धर्मेश चे शब्द ऐकताच तिने त्या कोपऱ्या कडे नजर वळवली. काही मिनिटां पूर्वी जिथे ती आकृती होती तिथे आता कोणीच नव्हतं. जानव्ही ला शांत करून धर्मेश बेडरूम मध्ये घेऊन गेला. काही वेळा नंतर जान्हवी ला गाढ झोप लागली. सकाळी 9 वाजताना तिला जाग आली. रात्री घडलं सगळं आठवत होत. अस्वस्थ वाटत होतं. बेडवर बसूनच ती विचार करू लागली. काल जे दिसल ते खरं होत की फक्त एक भास?

जानव्ही त्याच विचारात बेडरूम मधून बाहेर आली. धर्मेश ने घर आधीच आवरून ठेवलं होत. तिने धर्मेश ला आवाज दिला पण तिच्या हाकेला प्रतिसाद आला नाही. किचन मध्ये बघितलं तर धर्मेश तिथे ही नव्हता. त्याला call करायला म्हणून तिने mobile उचलला तर त्याच्यावर धर्मेश चा message होता. _मी बाजारात जातोय तासाभरात येईन. _ जानव्ही ला आता घरात एकट राहायला भिती वाटत होती. तिने अंघोळ केली आणि सगळं आटपून घरातलं काम करायला घेतलं. बंगल्याच्या आजूबाजूला लावलेल्या झाडांना पाणी देत कधी ती मागच्या विहिरी कडे आली तिलाच समजलं नाही. तिथे येताच तीला एका बाईच्या रडायचा आवाज येऊ लागला. कालच्या प्रसंगातून जान्हवी सावरली नव्हती आणि त्यात भर म्हणून हा आवाज. तीला तो आवाज विहिरीतून येत असल्याचं जाणवलं. हिम्मत करून ती विहिरीकडे चालत जाऊ लागली. आत डोकावणा र तितक्यात तिच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला. तिने घाबरून मागे पाहिलं. धर्मेश आला होता. तो तीला बंगल्याच्या पुढच्या दराने आत घेऊन गेला. 

ते दोघे अजून काही दिवस त्या बंगल्यात राहणार होते. म्हणून धर्मेश ने आधीच तशी तयारी केली होती. त्या रात्री धर्मेश ला अचानक जाग आली. का कोण जाणे पण त्याला अस्वस्थ वाटत होत. जान्हवी गाढ झोपेत होती. तो बेडवरुन उठला आणि सिगारेट ओढायला म्हणून बाहेर आला. हॉल मध्ये आल्यावर धर्मेश ने सिगारेट च्याच पाकिटातून एक सिगारेट काढत तोंडत धरली आणि लय टर ने पेटवत ओढू लागला. इथे आल्यापासून घडणाऱ्या गोष्टींचा विचार करत असतानाच त्याला समोरच्या खोलीतून त्याच्या नावाची हाक ऐकू आली. तो एका क्षणासाठी स्तब्ध झाला आणि आवाजाच्या दिशेने पाहू लागला. कारण त्या घरात ते दोघे सोडून बाकी कोणीही नव्हते. वरून ज्या खोलीतून आवाज आला त्या खोली ला बाहेरून कडी होती. काही मिनिट तो तसाच पाहत राहिला आणि नंतर भास समजून त्याच्याकडे दुर्लक्ष केल. पण काही वेळात पुन्हा तशीच हाक ऐकू आली आणि त्याला कळून चुकले की आपल्याला खरंच कोणी तरी हाक मार तय. पण रात्री 2.30 वाजता आपल्याला कोण आवाज देणार? तो त्याच्या जागेवरून उठला, त्याने दरवाजा कडे बघून विचारलं,”कोण आहे? कोण आहे तिथे?” पण आतून काहीच प्रतिसाद आला नाही. घाबरतच त्या खोलीची कडी उघडून तो आत गेला. रूमच्या चारही बाजूनी नजर फिरवून बघितलं तर कोणीच नव्हतं. 

पण तितक्यात त्याच लक्ष खोली मध्ये असलेल्या आरश्यावर गेलं आणि त्यातलं प्रतिबिंब पाहून विजेचा तीव्र झटका लागावा तसा तो हादरला. त्या आरश्यात ती फळ वाली बाई उभी होती जी चा car accident मध्ये मृत्यू झालं होता. त्याला काही उमगणार तितक्यात ताडकन झोपेतून तो जागा झाला आणि बेडवर उठून बसला. हे सगळं स्वप्न होत. त्याच्या जीवात जीव आला. पण तो पूर्ण घामाघूम झाला होता. कारण या आधी त्याला असं जीवघेणं स्वप्न कधीच पडलं नव्हतं. नकळत पणे त्याची नजर बाजूला गेली आणि तो दचकला. जानव्ही तिथे नव्हती. त्याने आवाज दिला,”जान्हवी कुठे आहेस तू? जानव्ही?” एवढा वेळ आवाज देऊन सुद्धा जानव्ही ने काही प्रतिसाद दिला नाही. आता मात्र धर्मेश च्या मनात भीती दाटू लागली होती.. तो बेडरूम मधून बाहेर आला आणि त्याला जानव्ही हॉल मध्ये जमिनीवर पडलेली दिसली. तिला उठवायचा प्रयत्न केला पण ती बेशुध्द झाली होती. त्याने तीला उचलून बाजूच्या सोफ्यावर झोपवलं. तिच्या डोळ्यांवर पाणी मारून शुद्धीत आणलं. शुद्धीत येताच जानव्ही ओरडू लागली,”मी ती नाही आहे. आम्हाला नको मारुस. आम्हाला नको मारुस प्लिज.” तो तिला शांत करायचा प्रयत्न करू लागला,” अग काय बडबडतेस तू? कोणी नाही आहे मी आहे बघ इथे शांत हो. कोणी नाही आहे बघ तर इथे.” तशी जानव्ही थोडी शांत झाली. धर्मेश तीला त्यांच्या बेडरूम मध्ये घेऊन गेला. तिला पाणी दिल.

धर्मेश – काय झालं होत तुला? तू बेशुद्ध कशी झालीस? आणि हॉल मध्ये काय करत होतीस?

त्याचे बोलणे ऐकून जानव्ही रडायला लागली. रडता रडता तिने या बंगल्यात आल्या पासूनचे सगळे अनुभव त्याला सांगितले. तीला कसबस शांत करत धर्मेश ने झोपवलं. त्याला ही काही समजत नव्हतं की या घरात काय होतय? त्याने ठरवलं काहीही करून याच्या मागची करणे शोधून काढायची. ती रात्र त्यांनी कशीबशी त्या बंगल्यात काढली. सकाळ होताच धर्मेश ने त्याच्या जवळचा मित्र विशालला फोन करून भेटायला बोलवले. विशाल ला घडलेला सगळा प्रकार सांगितला. जानव्ही सुद्धा खूप घाबरली होती. विशाल ने सगळे शांतपणे ऐकून घेतले आणि सांगितले,”हे बघ धर्मेश. मला माहित आहे तुझा देवावर आणि भूतांवर विश्वास नाही. पण तुझ्या बोलण्यावरून एकंदरीत मला असे वाटतेय की या बंगल्यात काहीतरी अमानवीय शक्ती आहेत आणि कदाचित म्हणून च तुम्हांला हे सगळं जाणवतेय.” विशालच हे बोलण ऐकून धर्मेश थोड चिडून च म्हणाला ,”अरे काय फालतुगिरी बोलतोय तू? हे भूत पिशांच्च काही नसतं यार. असं पण असू शकत ना की हा बंगला मिळवण्यासाठी कोणीतरी आम्हाला घाबरवत असेल? किव्हा चोर असतील जे आम्हाला लुटायच्या प्रयत्नात असतील?” विशाल ला त्याच हे उत्तर अपेक्षित होत. कारण विशाल आणि धर्मेश खूप जुने मित्र होते. त्यामुळे त्याला धर्मेश चा स्वभाव चांगलाच माहीत होता. 

विशालने त्याला शांत करत समजावण्याचा प्रयत्न करू लागला ,”अरे चोर लुटारू असते तर त्यांनी त्याच काम आता पर्यंत केल सुद्धा असत. त्यांना जर तुम्हाला लुटायच असत तर आत्ता परियंत तुमचं घर साफ करून गेले असते ते. तू जरा विचार कर. तुला तेच स्वप्न कस पडलं ज्याच्या बद्दल तुला खूप वाईट वाटतं? तू सांगितल्या प्रमाणे तो माणूस प्रत्येक वेळेला तुम्हाला बाहेरच भेटला. तो बंगल्या त का नाही आला? एवढंच नाही तर तो माणूस पहिल्यांदा बंगला दाखवताना ही आत का नाही आला?” धर्मेश ला हे सगळं पटत नव्हतं पण विशाल आणि जानव्ही साठी तो तयार झाला. आणि या सगळ्याचा सोक्ष मोक्ष लावायचा असे ठरवून त्यांचा शोध सुरू झाला.

बंगल्यात घडत असलेल्या घटनांचा शोध घेण्याचे पक्के झाल्यावर विशाल म्हणाला, “ठीक आहे ! आता सर्वात आधी आपल्याला त्या व्यक्तीला भेटावं लागेल ज्याने तुम्हाला हा बंगला विकला. कारण त्याने हा बंगला कमी किमतीत विकला याचा अर्थ त्याला माहित असणार की या बंगल्याचा इतिहास नेमका काय आहे तो. विशालच बोलण ऐकून धर्मेश ने जनार्धन ला लगेच call केला. पण त्याने काही call उचलला नाही. विशालने त्याचा नंबर मागितला आणि त्याला फोन करून पाहिला पण त्याचा सुद्धा फोन जनार्दन ने उचलला नाही. मग धर्मेश ने जाऊन कपाटातून घराची कागापत्रे काढली आणि त्यावर असलेल्या पत्त्यावर हे तिघेही पोहोचले. जनार्धन ला कळून चुकले की हे त्याच्या कडे का आलेत? त्यांना बघून जनार्धन ने दार जोरात लाऊन घेतले. तसे धर्मेश आणि विशाल दार जोरात वाजवायला लागले.

धर्मेश त्याला सांगू लागला ” जनार्धन भाऊ दार उघडा प्लीज. आम्हाला तुमची मदत हवी आहे दार उघडा.

नाही निघा इथून मला काही नाही बोलायचं तुमच्या बरोबर. निघा इथून.

हे ऐकताच धर्मेश आणि विशाल रागाने त्या दरवाजाकडे बघू लागले. दोघांनी दारावर जोरदार प्रहार करायला सुरवात केली. तसें आजूबाजूचे लोक जमा होऊ लागले. 3-4 फटके मारल्यावर ते दार उघडले. जनार्धन सोफ्याच्या मागे लपून बसला होता. बाहेरचे लोक बोलायला लागले,”परत याने कोणाचे तरी पैसे खाल्ले वाटतं?” विशालने जाऊन जनार्धन ला बाहेर काढले. तो खूप घाबरलेला होता. त्यांच्या तावडीतून सुटून तो बाहेर जाऊ लागला पण विशाल आणि धर्मेशने त्याला घट्ट पकडून ठेवले.

धर्मेश रागातच म्हणाला ” कायरे हरामखोर? नीट बोललो ते समजलं नाही का तुला? गप गुमान बस इथे.

असं बोलून त्याला सोफ्यावर बसवलं. विशाल आणि धर्मेश यांना रागात बघून जनार्दन घाबरून गेला होता. विशाल ने त्याला प्रश्न विचारला, “त्या बंगल्या बद्दल काय माहित आहे तुला? ” त्यावर जनार्दन घाबरत बोलला,”कोणता बंगला? मला काही समजलं नाही!” 

रागात येऊन धर्मेश ने त्याला कानाखाली मारली. तसे तो बोलू लागला,” मारू नका सांगतो. 8 महिन्यापूर्वी एक माणूस आला होता माझ्याकडे. त्याने मला एक बंगला offer केला. कमी किमतीत मिळत होता म्हणून मी तो घेतला. पण नंतर समजलं की त्या बंगल्यात एक अतृप्त आत्मा आहे. मला तिने खूप छळल. त्या बंगल्यामुळे माझी बायको सुद्धा सोडून गेली मला. नंतर मी तो बंगला सोडून इथे आलो. मला तो बंगला नको होता म्हणून मी तो तुम्हाला विकला.” 

विशाल ने त्याला विचारले,”कोण होता तो माणूस? कुठे भेटेल आम्हाला?”

जनार्दन बोलला,”माझ्याकडे त्याचा पत्ता नाही पण तो कर्नाटक मधल्या एका गावाच्या सरपांच्याचा त्याचा मेहुणा आहे.”

आता या तिघांना कर्नाटक ला जाणे शक्य नव्हतं आणि जनार्धनच्या बोलण्यावर ते विश्वास सुद्धा ठेऊ शकत नव्हते. विशाल, धर्मेश आणि जान्हवी खिन्न मनाने त्याच्या घरा बाहेर पडले. आता पुढे काय करावं हे कोणालाच समजत नव्हते. पर्याय नसल्याने ते तिघे पुन्हा त्याच बंगल्यात आले. जानव्ही तर आत जायला सुद्धा घाबरत होती. धर्मेश ने तीला धीर दिला आणि तिघेहि आत गेले. त्या दिवशी विशाल सुद्धा तिथेच थांबला. बघता बघता रात्र झाली. जेवण वगैरे उरकून तिघे झोपायला गेले. विशाल हॉल मध्ये तर धर्मेश आणि जानव्ही त्यांच्या बेडरूम मध्ये झोपले. दिवसभराच्या धावपळीमुळे त्यांना लगेच झोप लागली. तेवढ्यात काहीतरी पडण्याचा आवाज आला आणि विशाल ने डोळे उघडले. त्याने आजूबाजूला पाहिलं तर कोणीच नव्हत. विशाल उठुन बसला. त्याला अचानक हवेत गारवा वाटू लागला. ऐन एप्रिल महिन्यात एवढा गारवा असणं ते ही इतक्या लगेच अशक्य वाटत होत. त्याला काहीतरी विपरीत घडणार आहे याची चाहूल लागली होती. विशाल तसाच घाबरलेल्या अवस्थेत उठून उभा राहीला.

विशाल- कोण आहे? कोण आहे इथे? धर्मेश जानव्ही? कोण आहे?

तितक्यात विशाल ला बाईच्या रडण्याचा आवाज येऊ आला. तो आवाज ऐकून तो बराच घाबरला. पण त्या आवाजाचा वेध घेत तो बंगल्याच्या मागच्या बाजूला आला. आवाज त्या विहिरीतून येत होता. अंगात असलेली सगळी हिम्मत एकवटून तो विहिरी कडे गेला. त्याने विहिरीत डोकावून पाहिलं तसे भीतीने त्याचे काळीज छाती फाडून बाहेर येतंय की काय असे वाटू लागले. कारण विहिरीत ती होती. तीच जी या बंगल्यात न जाणे कधी पासून आहे. ती विशाल कडे भेदक नजरेने एकटक पाहत होती. तिला पाहून विशाल जमिनीवर कोसळला. त्याच्या शरीरातला सगळा त्राण च संपला होता.

तेवढ्यात त्या विहिरीतुन 2 हात बाहेर आले. एखादी घोरपड जशी सरपटत येते तशी ती आकृती विहिरीतून बाहेर येत विशाल कडे सरकू लागली. जस जशी ती जवळ येत होती तसा तिचा चेहरा स्पष्ट होत होता. काळा कुट्ट कुजलेला चेहरा, विस्कटलेले केस आणि मळलेले कपडे. तिला बघून विशाल ने ओरडायचा प्रयत्न केला पण त्याची वाचाच बंद झाली होती. तो कसाबसा उठला आणि बंगल्याच्या दिशेने धावत सुटला. त्याने धर्मेश आणि जानव्ही ला उठवलं. ते दोघे उठताच विशाल त्यांना घरा बाहेर घेऊन जाऊ लागला. धर्मेश ला समजत नव्हतं के विशाल नेमक काय करतोय? कारण या आधी त्याने विशाल ला एवढं घाबरलेल कधीच पाहिलं नव्हतं. ते तिघे हॉल मधे आले. ती आकृती दारात त्यांची वाट अडवून उभी होती. घाबरून सगळे मागच्या दरवाजा कडे पळाले. पण दरवाजा बाहेरून बंद होता. त्या तिघांना आपला जीव वाचायचे काही संकेत दिसत नव्हते. जानव्ही चे सगळे अवसान च गळून पडले होते. तिने जोरजोरात रडायला सुरवात केली.

धर्मेश ला काही सुचेना स झालं तस त्याने विचारायला सुरुवात केली ” का आली आहेस तू? कोण आहेस तू? का छळतेस आम्हाला? आम्ही काही बिघडवल आहे का तुझं?”

तितक्यात जणू भूकंप आल्यासारखे सगळे हादरू लागले. तिघे ही एकमेकांचा आधार घेऊन हॉल च्या मधोमध उभे होते आणि या सगळ्यातून बाहेर पडायचा प्रयत्न करत होते. पण या सगळ्यातून सुटण्याचा त्यांना कोणताच मार्ग दिसत नव्हता. विशाल हिम्मत करून पुढे सरसावला पण हात पाय जखडल्यासारखा स्वतःवर चा ताबा सुटून तो २-३ फूट हवेत तरंगू लागला. त्या अमानवीय शक्तीने त्याला वश केले होते. त्याची अशी अवस्था पाहून धर्मेश पुढे आला तसे पुढच्या क्षणी विशाल जमिनीवर कोसळला आणि एक जीवघेणी शांतता पसरली. धर्मेश ने जराही वेळ न दवडता जान्हवी च्या मदतीने विशाल ला उचलून बाहेर न्यायचा प्रयत्न करू लागले. अचानक कोणी तरी दार उघडले. जगण्याचे सगळे मार्ग संपले असताना अचानक समोर जनार्दन ला पाहिले आणि आशेचा एक किरण दिसला. त्याने पटकन विशाल ला गाडीत ठेवले आणि चौघेही त्या बंगल्याच्या परिसरातून बाहेर पडले. जनार्धन ला बघून धर्मेश आणि जानव्ही दोघेही बुचकळ्यात पडले झाले होते. 

गाडी चालवत असून सुद्धा धर्मेशच लक्ष मागे बसलेल्या जनार्दन कडे जातं होत. त्याच्या चेहऱ्यावर अपराधी भाव पाहून धर्मेशला आश्चर्य वाटलं. जनार्दन बोलला “येणारा डावा turn घ्या. तिथून माझे घर 5 मिनिटांवर आहे आज माझ्या घरी थांबा.” त्याच बोलण ऐकून जानव्ही बोलली,”आणि विशाल भाऊजी? त्यांचं काय?”

मी फक्त तुम्हा दोघांना नाही तर सगळ्यांना बोलतोय. तुम्ही घ्या डावीकडे आता. त्यांच्याकडे काही पर्याय नव्हता. धर्मेश ने गाडी जनार्दन च्या घराच्या दिशेने घेतली. थोड्याच वेळात ते जनार्धन च्या घरी पोहोचले. विशाल ला त्यांनी त्याच्या सोफ्यावर झोपवलं. जनार्दन ने त्यांच्या परिचयाच्या डॉक्टरला बोलावलं. त्याने येऊन विशालवर उपचार केले.

रात्रीचे 2 वाजत आले होते. डॉक्टर त्यांचं काम करून निघत होते तेव्हा त्यांनी धर्मेश ला सांगितलं,”तस काळजी करण्या सारखं काही नाही आहे तो येईल शुद्धीत. तस मला वाटतंय के तो कशाला तरी घाबरून बेशुद्ध झाला. तुम्हाला काही माहित आहे का?” धर्मेश ने नकारार्थी मान हलवली. तसे डॉक्टर ठीक आहे म्हणत निघून गेले. धर्मेश ने दरवाजा लावला आणि आत आला. आता धर्मेश जनार्दन कडे एकटक बघू लागला. त्याला समजलं तो त्याच्याकडे का पाहतोय ते. आता मात्र त्याला त्या बंगल्याचा इतिहास सांगणे भाग होते. त्यामुळे त्याने दीर्घ श्वास घेऊन सगळे सांगायला सुरुवात केली.

जनार्दन समोर आता कोणताही पर्याय नसल्याने त्या बंगल्याचा इतिहास सांगायला सुरुवात केली.. मी खोटं म्हणालो तुम्हाला..  घर माझ्या आई बाबांचं होत. घरात मी, आई, बाबा आणि माझा मोठा दादा आणि वहिनी असे 5 जण होतो. सरिता वाहिनी खूप चांगली होती. मला अगदी तिच्या छोट्या भावासारखी माया करायची. लहानपणा पासून जेवढं एक भाऊ म्हणून दादाने प्रेम नाही दिल ते माझ्या वहिनीने तिचा छोटा भाऊ म्हणून दिल. दादाला दारू आणि जुगार या दोन गोष्टींचा खूप नाद होता. माझे आई बाबा पण वहिनीला विनाकारण हिण वायचे. कारण त्यांच्या लग्नाला 5 वर्षे झाली पण वहिनीला बाळ होत नव्हत.. त्यात दादाच असं वागण. वहिनीला खूप त्रास व्हायचा पण ती दाखवायची नाही. एक दिवस मला विदेशी कंपनी मधून नोकरी साठी मोठी संधी चालून आली.. तेव्हा सर्वात जास्त वहिनी खुश होती. पण माझ्या आईबाबा आणि दादाला त्याच काहीच कौतुक नव्हतं. माझा परदेशी जाण्याचा सगळा खर्च दादाने केला खरा, पण तो सुद्धा व्याजाच्या लालसेने. मी परदेशी निघून गेलो आणि जाण्याआधी वहिनीला पाहिलं ते शेवटचं. त्या नंतर मला कधीच ती दिसली नाही. काही वर्षांनंतर मी भारतात परत आलो. 

वहिनी घरी नव्हती. तिच्या जागी कोणी दुसरीच बाई होती. मी आई ला विचारलं तसे आई बोलली की मागच्या वर्षी तिचा विहिरीत पडून मृत्यू झाला. मला हे ऐकून अक्षरशः धक्का बसला. मी आई ला म्हणालो की इतकी मोठी गोष्ट मला सांगणे तुम्हा सर्वांना महत्त्वाचे वाटले नाही का.? त्यावर आईने उडवाउडविची उत्तर दिली की तुला सांगुन तू येणार होतास का..? आणि इथे येऊन गेलेल्या व्यक्तीला पुन्हा आणणार होतास का..? आईचे असे बोलणे ऐकून मला खूप वाईट वाटले. नंतर काही दिवसांनी दुर्दैवाने माझ्या आईचा ही तसाच विहिरीत पडून मृत्यू झाला. बाबा तर घराच्या छता वरून पडले आणि अंथरुणात कायमचे खिळले. कालांतराने त्यांचं सुद्धा निधन झालं. दादा त्याच्या दुसऱ्या बायकोला ला घेऊन दुसरीकडे राहायला गेला. मग मी एकटाच त्या बंगल्यात राहायला लागलो. पण मला विचित्र अनुभव यायला लागले. तसे मी तो बंगला विकायचे ठरवले आणि तुम्ही तो पहिला, तुम्हाला तो आवडला. मग काय मी लवकरात लवकर व्यवहार पूर्ण करून त्या बंगल्यापासून माझी सुटका करून घेतली. 

हे सगळं ऐकून जानव्ही ने विचारलं,” मग त्या दिवशी तुम्ही आम्हाला खोटं का सांगितलं? की हा बंगला तुम्ही दुसऱ्या कोणाकडून विकत घेतला होता..”

तसे जनार्दन पुन्हा सांगू लागला “माफ करा मला.. पण मी आधीच घाबरलो होतो. कारण मला ते घर सोडल्यावर सुद्धा कधी कधी वाहिनी स्वप्नात यायची. मी त्याच पडणाऱ्या स्वप्नामुळे घाबरलो होतो. पण नंतर मला समजलं की मी तुम्हाला या सगळ्यात ओढून खूप मोठी चूक केली आहे. म्हणून मी तुम्हाला वाचवायला आलो. तसे मी ऐकले आहे की एखाद्या चांगल्या व्यक्तीवर अन्याय झाला आणि त्यात जर त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर तीला मुक्ती नाही मिळत. जर आपल्याला हे सगळं थांबवायचं असेल तर वहिनीला या जगातुन मुक्ती द्यावी लागणार. मला माहित आहे या सगळ्यात तुम्ही माझी मदत नाही करणार..

हे ऐकून धर्मेश बोलला,” अहो जनार्दन भाऊ हे काय बोलताय? आम्हाला जेव्हा जगण्याची सगळी दार बंद झाली तेव्हा तुम्हीच आलात आम्हाला वाचवायला. आता या सगळ्यामध्ये आम्ही तुमची मदत करू..

धर्मेशचे शब्द ऐकून जनार्दन ला जरा आधार वाटला. 

दुसऱ्या दिवशी विशाल ला जाग आली. जाग येताच त्याने ने धर्मेश ला आवाज दिला. विशालचा आवाज ऐकून ते तिघेही धावत त्याच्या जवळ आले. विशाल ला शुद्धीत आलेलं बघून धर्मेश च्या जीवात जीव आला. त्याने कालच्या रात्री बद्दल विचारलं तस जानव्ही ने घडलेला सगळा प्रकार सांगितला. हे ऐकून विशाल त्याच्या विचारात हरवून गेला. त्याला भानावर आणून धर्मेश ने त्याला धीर दिला.

जनार्दन ने त्यांना एक गोष्ट सुचवली, “माझ्या घरा पासून 5 किलोमीटर वर एक दत्त मंदिर आहे. त्यात मंदिरातला पूजारी आपली मदत नक्कीच करू शकतो.” धर्मेश ला या सगळ्या गोष्टी पटत नव्हत्या कारण त्याच्या आईचे दुःखद निधन झाल्यापासून तो कधीच कोणत्याही मंदिरात गेला नव्हता. देवावरचा त्याचा विश्वास पूर्णपणे उडाला होता. जानव्ही हे सगळं जाणून होती. म्हणून तिने सांगितले, “धर्मेश तूला नको असेल तर असुंदे.. आपण दुसरा मार्ग काढू काही तरी.” पण धर्मेश ला सुद्धा कळून चुकले होते की या संकटातून त्यांची तिथेच सुटका होऊ शकते. म्हणून तो त्यांच्या बरोबर जायला तयार झाला.

विशाल ला तसंच जनार्दन च्या घरी आराम करत थांबायला सांगून ते तिघेही दत्त मंदिरात गेले. मंदिराच्या आत जाताना धर्मेश चे पाय उचलत नव्हते. कारण त्याने खूप वर्षांपासून नास्तिक पणा मुळे देवळाची पायरी चढली नव्हती. पण आज कोणता पर्याय नसल्याने त्याला हे करावे लागले. त्या मंदिरातले पूजारी हे जनार्दन चे खूप चांगले मित्र होते. घडला प्रकार त्याने ने पुजारीना सांगितला. त्यावर पुजारी म्हणाले,” मला तुमच्या बंगल्यात घेऊन चला. तिथे जाऊनच मी सांगू शकतो के मी तुमची मदत करू शकेन की नाही?”

पुजारीना घेऊन ते बंगल्याकडे निघाले. जाताना त्यांनी विशाल ला सोबत घेतलं. गाडी बंगल्याबाहेर रस्त्यावरच थांबवली. जसे त्यांनी बंगल्याच्या आवारात प्रवेश केला तसे त्यांना नकारातमक शक्तीची जाणीव होऊ लागली. तसे ते तिथेच गेटवर थांबले. त्यांनी त्यांच्या बॅगेतील स्फटिक माळ काढून जप सुरु केला. जप सुरू ठेवूनच ते बंगल्यात शिरले. आत जाताच क्षणी त्यांना एका ठिकाण हून कुजबुज ऐकू आली. तसाच जप करत ते एका दरवाजा कडे गेले. त्या दरवाजाला एका वेगळ्याच नजरेने बघत विचारले “या खोलीत काय आहे?”

तसे जान्हवी म्हणाली ,”ती स्टोअर रूम आहे. त्यात सगळं जून सामान आहे. जे या बंगल्यात होत. कधीतरी गरज पडली तर लागेल म्हणून ठेवल होत.”

तसे पुजारी मागच्या दाराकडे चालत गेले. तिथून बाहेर जाऊन त्या विहिरी कडे एक टक पाहत राहिले. एका क्षणाला ते अचानक मागे फिरून बंगल्या बाहेर आले. तसे सगळे जण त्यांच्या मागे आले. जनार्दन ने त्यांना विचारले ,”काय झालं? अचानक बाहेर का आलात?” तसे ते म्हणाले, “ही कोणी साधीसुधी आत्मा नाही. ती पेटून उठली आहे. सुड घ्यायचा आहे तीला. आणि तो घेतल्याशिवाय ती नाही जाणार.” एवढं सांगून पुजारी तिथून निघून गेले. 

पण जाता जाता एका माणसाचा नंबर त्यांनी जनार्दन ला पाठवला होता आणि सांगितले होते की “हा माणूस तुमची मदत करू शकतो त्याला आजच बोलावून घ्या मी त्याला सगळ सांगून ठेवतो.” जनार्दन ने वेळ न घालवता त्या व्यक्तीला call केला. तसे तो व्यक्ती म्हणाला संद्याकाळी 6 वाजे पर्यंत येतो मला पत्ता पाठवा.

ठरल्या प्रमाणे तो व्यक्ती ठीक 6 वाजताना आला. दाराची बेल वाजवली तसे जानव्ही ने दार उघडलं. समोर एक पस्तीशीतला तरुण उभा होता. अंगावर साधे शर्ट पॅन्ट आणि पाठीवर एक बॅग होती. त्याला बघून हे वाटतच नव्हतं के तो कोणी तंत्र मंत्र वैगरे करणारा असावा. जानव्ही ने त्यां माणसाला आत बोलावलं. त्याच्या बरोबर अजुन एक जण होता अगदी त्याच्या सारखा पेहेराव असलेला. बंगल्यात येताच त्याची नजर प्रत्येक कोपऱ्यात फिरू लागली. 

काहीच न बोलता तो धर्मेश च्या बाजूला असलेल्या त्या दरवाजा कडे पाहू लागला ज्या बद्दल धर्मेश ला स्वप्नात दिसलं होत. त्या रूम चा दरवाजा उघडून तो आत शिरला. विशाल ने त्याच्या बरोबर आलेल्या व्यक्तीला त्यांची ओळख विचारली, ” कोण आहात तुम्ही दोघे? आणि अचानक असे आत का शिरलात?”

विशाल कडे बघून स्मितहास्य करत तो इसम बोलला,” माझ नाव विघ्नेश आणि हा जयवंत. आम्ही इथे त्या पुजारी काकांच्या सांगण्या वरून आलोय. मला जाणवतेय. तुमच्या बंगल्यात जे काही आहे ते खरच खूप भयंकर आहे. एक अशी आत्मा इथे अडकली आहे जी फक्त सुड घेण्यासाठी इथे थांबली आहे.”. थोड्याच वेळात जयवंत ने सगळ्यांना मागच्या बाजूला बोलावलं. तो पर्यंत अंधार पडायला सुरुवात झाली होती. जयवंत मागच्या विहिरी कडे एकटक बघत होता. त्याने विघ्नेश ला इशारा केला तस विघ्नेश ने त्याच्या हातात bag मधला एक नारळ, हळद आणि एक बाटली दिली ज्यात पाण्या सारख काहीतरी भरलेलं होत. त्यातील पाणी आणि हळद त्या नारळावर टाकून तो नारळ विहिरीवर ठेवला. ठेवताच क्षणी तो नारळ जागीच वळू लागला आणि सरकत तिथून विहिरीत पडला. सर्वांची नजर त्या विहिरी कडे होती. तसें सरपटत ती आकृती विहिरीतुन बाहेर येऊ लागली आणि तिने आपल खरं रूप सगळ्यांना दाखवलं. बाकी सगळे धड धडत्या काळजाने समोर चे दृश्य पाहत होते. तसे त्या आकृतीने बोलायला सूरूवात केली, “जनार्दन”..

जनार्दन ला हे ऐकून समजलं की ही त्याची लाडकी वाहिनी आहे. हिम्मत करून तो पुढे आला आणि त्याने विचारले,” वहिनी अग काय करून घेतलंयस हे? का जीव दिलास? माझा पण विचार नाही केलास तू?” 

समोर काय घडतंय हे कोणालाच समजत नव्हतं. विघ्नेश ला समजलं की तो नारळ हे त्या आत्म्याला दिलेला दिलासा होता. त्यामुळे ती समोर येऊन संवाद साधू शकते य. जनार्दन चा प्रश्न ऐकून ती बोलायला लागली, “मला पण जायचं नव्हतं रे पण मी माझ्या घरातल्यांना नकोशी झाले होते मग मी तरी काय करणार होते? मला नको असताना सुद्धा तुझ्या आई बाबा आणि दादाने मिळून या विहिरीत फेकून मारून टाकलं. माझ्या सोबत माझ्या बाळाला सुद्धा मारलं रे त्यांनी. मी गरोदर होते हे सांगून सुद्धा हे बाळ माझ नाही असं सांगून मला खूप मारलं त्यांनी, आणि जेव्हा मी बेशुध्द झाले तेव्हा मला या विहिरीत फेकून दिल.” तिच्या तोंडून हे सगळं ऐकून जनार्दन आणि बाकी सगळे निशब्द झाले होते. कारण जनार्दन ला त्याच्या घरच्यांनी सांगितलेलं कारण हे वेगळंच होत.

तीच सगळं बोलण ऐकून जयवंत ने प्रश्न केला, “मग तू यांना त्रास का देतेस?” 

त्यावर तिच उत्तर आलं,” हे माझं घर आहे त्यांना कोणी हक्क दिला माझ्या घरी राहायचा?” 

 तू एक गोष्ट विसरतेस तू आता या जगात नाहीस. तू आता इथली नाहीस. तू सुड घेण्याच्या भावनेने इथे थांबली आहेस” 

” ते माझ्या घरात माझ्या मर्जी विरुद्ध राहत आहेत. माझ घर मी कोणालाच देणार नाही.” तिचे हे शब्द ऐकताच जयवंत ने त्याच्या खिशात असलेली एक बाटली काढली आणि त्यातले द्रव्य तिच्या अंगावर टाकले. गरम तेल ओतल्यावर जशी त्वचा भाजली जाते तशी जाते तशी तिची अवस्था होत होती. तीला होणारा त्रास जनार्दन ला सहन होत नव्हता.. तसे त्याने जयवंत ला थांबायला सांगितले. तसा जयवंत थोडा रागात च जनार्दन कडे बघू लागला. 

जनार्धन ने तिला पुन्हा विचारले,” अग वहिनी तू असे का करतेस? तू नव्हतीस अशी कधी. काय हवंय आहे तूला?” जनार्धन ला रडू कोसळलं. तस स्वतःला आवरून तो पुढे बोलला, “वहिनी या आधी मी तुझं सगळं ऐकलंना. आज माझं ऐक ना. माझ्या साठी तू माझी मोठी बहीण आहेस ना? मग थांबव हा अट्टाहास आणि मुक्त हो या सगळ्यातून.”

त्यावर ती म्हणाली ” माझी मुक्ती तेव्हाच होईल जेव्हा तो शेवटचा व्यक्ती मरेल. त्याचा मृत्यू माझ्याच हाती लिहिला आहे. एका आईला त्याने तिच्या बाळा सोबत मारून टाकलं. त्याची शिक्षा त्याला झालीच पाहिजे. त्याला इथे बोलवा. मग मी बघेन माझं काय ते.” एवढं बोलून ती पुन्हा विहिरीत निघून गेली.

हा सगळा प्रकार झाल्या नंतर ते घरात आले. जयवंत आणि विघ्नेश काही तरी विचार करत होते. तसंच जयवंतने सगळ्यांना सांगितलं, “आपल्या कडे एक पर्याय आहे. ज्या व्यक्ती बद्दल ती बोलत होती त्याने येऊन तिची माफी मागून तिच्या नावाचं श्राद्ध घालावं. मग ५०% तरी शक्यता आहे ज्याने तिची मुक्ती hoil.” पण नियतीला बहुतेक वेगळंच काही मान्य होत. ठरल्या प्रमाणे जनार्दन ने त्याच्या मोठ्या भावाला फोन करून बंगल्यावर यायला सांगितले. त्याला माहित होत की तो चुकूनही इथे पुन्हा येणार नाही. म्हणून त्याने एक मोठी अडचण आली आहे आणि आपल्या बंगल्यावर जप्ती येणार आहे असे सांगितले. तसे त्याचा भाऊ यायला तयार झाला यायला.

दुसऱ्या दिवशी संद्याकाळी ठीक जनार्धन चा मोठा भाऊ जगन्नाथ तिथे आला. त्याने बंगल्याच्या गेटवर गाडी थांबवली. तो आत यायला घाबरत होता. पण हिम्मत करून कसा बसा आत आला. त्याच्या समोर धर्मेश, जानव्ही, विशाल, जनार्दन, जयवंत आणि विघ्नेश हे सगळे उभे होते. 

जगन्नाथने जनार्दन ला विचारले, “जन्या काय प्रकार आहे? मला खोटं का सांगितलं? आणि तू हा बंगला विकला होतास ना मग ही जप्तीची काय भानगड आहे?” जगन्नाथ चे प्रश्न संपताच त्याच्या मागचा बंगल्याचा दरवाजा जोरात आदळून बंद झाला. सगळ्या वस्तू हादरु लागल्या. तितक्यात विशाल विचित्र मुद्रा करून जगन्नाथ कडे पाहून बोलू लागला ” आलात? किती वाट पाहायला लावली तुम्ही? गेली कित्येक वर्ष मी तुमची वाट पाहतेय.” 

विशाल कडे बघत जगन्नाथ घाबरत बोलू लागला, “कोण आहेस तू? आणि असा काय बोलतोयस?”

अहो मला नाही ओळखलंत? मी सरिता. आठवत नाही का तुम्हाला? त्या रात्री मला तुम्ही विहिरीत फेकून पळून गेलात. मी ओरडत होते हाथ पाय जोडत होते पण तुम्ही तिघांनीही ऐकलं नाही. माझी शुद्ध हरपे पर्यंत मारत राहिलात. माझ्या पोटात तुमचं बाळ होत हे माहित असून सुद्धा. बाबांनी हुंडा दिला नाही म्हणून तुमच्या आई बाबांनी माझ्यावर नाही नाही ते अन्याय केले..

एवढं बोलून तिने ने डाव्या हाथाने जगन्नाथ चा गळा पकडला आणि समोरच्या भिंतीवर जोरात फेकून दिले. जगन्नाथ भिंतीवर आपटून खाली पडला. हा सगळा प्रकार पाहून जान्हवी ला भोवळ आली आणि ती जागीच खाली कोसळली. 

विघ्नेश आणि जयवंत तिच्या आणि जगन्नाथ च्या मधे उभे राहिले. जयवंत आणि विघ्नेश ने त्यांच्याकडं चे द्रव्य तिच्या अंगावर फेकले तसे ती वेदनेने कळवळू लागली.. तिला रोखण्याचा अतोनात प्रयत्न चालू होता. पण एका आई च्या आत्म्यास ते हरवू शकले नाही. त्याच गडबडीत जगन्नाथ ने दरवाजा कडे धाव घेतली. पण त्याच्या समोर विशाल उभा राहिला. त्याने पुन्हा जगन्नाथ चा गळा पकडला. आणि त्याला दरवाज्यापासून दूर फेकले. जगन्नाथ हातापाया पडून गयावया करू लागला,” मला माफ कर मला माफ कर. मी चुकलो. मला नको मारुस.” तस ती म्हणाली,” का माफ करायच तूला? तुम्ही मला मारलात. माझ्या बाळाला मारलात का माफ करू तुम्हाला? माझी ताई कुठे आहे? काय केलस तिच्या बरोबर तू? “

जगन्नाथ म्हणाला,”माफ कर मला. मला नाही माहित कुठे आहे ती.” हे ऐकताच विशाल मधल्या सरिता ने जगन्नाथ ला एक जोरात कानाखाली लगावली तसा जगन्नाथ सांगू लागला, “सांगतो सांगतो. 4 महिन्या पूर्वी मीच तीला गाडीने उडवलं. ती तिच्या फळाच्या गाडीवर होती. तिने मला धमकी दिली होती गुन्हा मान्य नाही केलास तर कोर्टात केस करेन. त्याच रागात मी तीला कायमच संपवलं.” हे ऐकताच धर्मेश ला ती बाई आठवली.

त्याला कळून चुकलं के ही तिच बाई जी त्या car accident मधे मारली गेली. तितक्यात तिने विशाल च शरीर सोडल. तसा विशाल सुद्धा बेशुद्ध झाला. जयवंत आणि विघ्नेश विशाल ला घेऊन धर्मेश कडे आले. आता सरिता ला सगळे पाहू शकत होते. जनार्धन हे सगळे बघत होता. तो पुढे जाऊन हात जोडून विनंती करू लागला,”वहिनी थांबव हे सगळ. नको करुस असं. तू पण असं केलस तर त्यांच्या आणि तुझ्यात काय फरक राहणार? शांत हो. जाऊंदे सगळ शांत हो तू. ” सरिता ने त्याच्याकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर करुणा दाटून आली होती. आणि एका एकी बंगल्याचा दरवाजा उघडला. सरिताने जगन्नाथ कडे पाहिलं आणि जोरात ओरडली, “निघून जा. ” जगन्नाथ तिथून धावत बाहेर गेला आणि त्याची गाडी काढून तिथून निघून गेला. 

सगळं काही शांत झालं. सरिता ने एक नजर बेशुद्ध पडलेल्या जानव्ही वर टाकली. आणि मग धर्मेश कडे बघून बोलली,” हिची आणि तुझ्या होणाऱ्या मुलीची काळजी घे. हे घर नीट सांभाळ” इतकं बोलून ती घराच्या दारातून बाहेर जात दिसेनाशी झाली. 

जयवंत आणि विघ्नेश ने सांगितले, “आता काळजी नका करू हे घर मुक्त झालंय. फक्त तुम्ही या घराची नीट काळजी घ्या. असं म्हणून त्यांचा निरोप घेत ते दोघे निघाले. जनार्धन ने विशाल ला आणि धर्मेश ने जानव्ही ला गाडीत बसवलं आणि डॉक्टर कडे घेऊन जायला म्हणून निघाले. काही अंतर पुढे जाताच त्यांना एका ठिकाणी गर्दी जमलेली दिसली. पोलीस सुद्धा आले होते. एका झाडावर एक गाडी जोरदार आपटली होती आणि गाडीने पेट घेतला होता बहुतेक. आत बसलेला इसम पूर्ण पणे जळून गेला होता. जनार्धन ने मात्र ती गाडी ओळखली. लगेच धर्मेश ला थांबवून तो त्या गाडी कडे धावत गेला. गाडीतून प्रेत बाहेर काढत होते. जनार्धन डोक्यावर हाथ ठेऊन रडायला लागला. त्याला धर्मेश ने सावरले आणि गाडीत बसवले. पोलीस सगळी चौकशी करत होते. तसे धर्मेश चे लक्ष रस्त्याकडे ला गेले. सरिता आणि तिची ताई म्हणजेच ती फळ वाली बाई दोघीही समोर उभ्या दिसल्या आणि बघता बघता माझी समोरून नाहीश्या झाल्या. त्या दोघींनाही मुक्ती मिळाली होती.

पोलिसांनी सांगितल्या प्रमाणे जनार्दन तिथेच थांबला. सगळ काही सुरळीत झालं होत. आज खऱ्या अर्थाने धर्मेश ने हात जोडून देवाचे नाव घेतलं आणि जान्हवी आणि विशाल ला घेऊन दवाखान्यात जायला निघाला..

Leave a Reply