अनुभव – यदनेश

अनुभव २०२१ चा आहे म्हणजे अगदी दीड दोन वर्षांपूर्वीचा. माझ्या फर्स्ट इयर च्या परीक्षा संपून सुट्टी लागली होती. त्या सुट्टी मध्ये मी माझ्या मावशी कडे राहायला गेलो होतो. मावशीचे घर एका छोट्या गावामध्ये आहे. तसे मी अधून मधून सुट्टी असली की मी तिथे जात असतो. माझ्या मावशीचा मुलगा म्हणजे माझा मोठा भाऊ आम्ही खूप मजा करतो. त्या वर्षी ही भावा सोबत खूप फिरलो, मजा मस्ती केली. मी शहरात राहत असल्यामुळे घरीच असायचो आणि कंटाळून जायचो. त्यामुळे मग असे बाहेर कोणा सोबत फिरायला मिळाले की खूप बरे वाटायचे. त्यामुळे एक दीड महिना तिथेच राहिलो. पावसाळ्याचे दिवस होते. सर्व काही व्यवस्थित चाललं होत. पण माझ्या नशिबी काय वाढून ठेवलं आहे याची पुसटशी कल्पनाही मला नव्हती. जेवण झाल्यावर मला शतपावली करायची सवय आहे. रोज रात्री जेवण झाले की माझ्या घराच्या अंगणामध्ये अर्धा एक तास फेऱ्या मारत असतो. शहरात माझे स्वतःचे असे घर आहे आणि आजू बाजूला छोट्या मोठ्या चाळी, लहान घर आहेत. त्या ठिकाणी पूर्वी जंगल होत पण गेल्या काही वर्षात वृक्षतोड होऊन खूप घरे बांधली गेली आहेत. पण गावात राहण्याची मजा काही औरच असते. असो. ती रात्र मला अजूनही आठवतेय. त्या रात्री मी जेवण आटोपून घरा जवळच शतपावली करत होतो. दुसऱ्या दिवशी वट पौर्णिमा होती. घराच्या अंगणात छोटंसं वडाचं झाड आहे. त्यामुळे आई ला पूजा करण्यासाठी दुसरी कडे कुठे जावे लागणार नव्हते. त्या रात्री तिथे च फेऱ्या मारत होतो. विशेष असे काही वाटले नाही. अर्धा पाऊण तास फेऱ्या मारून झाल्यावर मी घरी आलो आणि नेहमी प्रमाणे गाढ झोपून गेलो. 

दुसऱ्या दिवशी जाग आली. उठलो आणि अंघोळ वैगरे करून तयार झालो. सगळे काही ठीक होते. मी बाहेर आलो तर आई अंगणात पूजा करत होती. अजूनही बायका जमल्या होत्या. घरातून बाहेर येऊन अवघे २-३ मिनिट झाली असतील आणि अचानक माझे डोके दुखायला लागले. मी जागीच थांबलो आणि ते दुखणे इतके वाढले की मला असह्य होऊ लागले. खूप जोरात ठणकत होत. मी लगेच आई ला हाक मारून सांगितले की माझे डोके खूपच दुखतय सहन होत नाहीये. ती म्हणाली की तू उठल्यापासून काही खाल्ले नाहीये म्हणून तुला तसे वाटत असेल. मी घरात आलो आणि काही वेळ तसाच बसून राहिलो. एक वेगळ्याच ग्लानीत निघून गेलो. मला कळले नाही की मी कधी जेवायला बसलो ते. पण जसे जेवायला बसलो तसे डोक्यात कळा येऊ लागल्या. मी जेवणाचे ताट तसेच बाजूला सरकवून डोके पकडून बसलो, खूप त्रास होत होता. या आधी मला अशी डोके दुखी कधीच जाणवली नव्हती. तो पर्यंत आई ची पूजा वैगरे आटोपून ती घरात आली आणि तिने मला पाहिले. मी डोक्याला हात लाऊन बसून राहिलो होतो. जेवण सुद्धा जात नव्हते. तितक्यात मला उलटी सारखी वाटू लागली. मी धावत बाथरूम मध्ये गेलो आणि मला उलट्या झाल्या. आई ने वेळ न घालवता मला लगेच डॉक्टरांकडे नेले. त्यांनी मला तपासून पाहिले आणि म्हणाले की याला काहीच झाले नाही, अंगात थोडा ताप आहे. त्यांनी औषधे लिहून दिली आणि आम्ही घरी आलो. पुढचे काही दिवस मी नियमित ती औषधे घेत राहिलो पण माझ्या तब्येतीत काहीच फरक पडत नव्हता. अंगात ताप तर होताच पण वेळी अवेळी डोकं खूप ठणका यचे. जे काही थोड फर खाल्ल असेल ते ही उल्टी येऊन राहायचे नाही. 

एक आठवडा उलटला तरीही मला अजिबात बरे वाटत नव्हते. शरीर पूर्ण गळून गेले होत. नक्की काय झालं य हेच मला आणि माझ्या घरच्यांना कळत नव्हतं. तितक्यात आई ला शंका आली की ह्याला बाहेरच तर काही झाले नसेल ना. कारण घडणाऱ्या गोष्टी हा एक संकेत देण्याचा प्रयत्न करत होत्या बहुतेक. तिने लगेच मावशी शी बोलून घेतले आणि सर्व प्रकार सांगितला. तसे मावशी म्हणाली की गावात एक बाई आहे जी बाहेरचे बघते. आपण घेऊन जाऊ तिच्या कडे, ती नक्की काही तरी उपाय करेल. माझी अवस्था इतकी वाईट झाली होती की आई ने जास्त विचार केला नाही आणि त्या बाई कडे जायचा निर्णय घेतला. कारण सगळ्या गोष्टींपेक्षा तिला माझी काळजी होती. त्याच दिवशी आई आणि मावशी मला त्या बाई कडे दाखवायला घेऊन आली. अगदी साधे घर होते तिचे. फक्त एका खोलीचे. आत आल्यावर तिने मला तिच्या जवळ बसायला सांगितले. तिच्या बाजूला एका भांड्यात धूप अगरबत्ती सारखे काही तरी पेटवले होते. तिने सांगितलेल्या प्रमाणे मी खाली तिच्या बाजूला बसलो तसे तिने माझ्या डोळ्यांत पाहायला सुरुवात केली. काही सेकंदाने तिने एक कोरा कागद घेतला, आपल्या तोंडाशी धरून काही तरी पुटपुटले आणि माझ्या डोक्यापासून वरून खाली फिरवला. मी, आई आणि मावशी तिच्याकडे एकटक पाहत होतो. तसे तिने तो कागद बाजूला असलेल्या त्या धुराजवळ नेला. तिने फक्त हलकेसे त्याला टेकवला आणि लगेच वर उचलला. तिने जसा तो वर उचलला तसे आम्ही तिघे ही आश्चर्याने एकमेकांकडे पाहू लागलो. 

कारण त्या कोऱ्या कागदावर हळु हळु एक चित्र उमटून येत होत. त्याच सोबत काही अक्षर उठून दिसू लागली. माझी तर चांगलीच टरकली होती. आम्ही तो विचित्र प्रकार धड धडत्या काळजाने पाहत होतो. काही मिनिटांनी त्या कोऱ्या कागदावर एक चित्र उमटल ज्यात एक घर आणि एक मुलगा होता. मला कळायला वेळ लागला नाही की ते घर म्हणजे माझे घर आणि तो मुलगा म्हणजे मी.. त्या खाली उमटलेल्या अक्षरांचा मात्र काही अर्थ लागत नव्हता. मोडी लिपी असते तसे भासत होते. त्या बाईला त्या चित्राचा आणि त्या खाली उमटलेल्या शब्दांचा अर्थ लागला. ती म्हणाली ” तुमच्या घरा जवळ २ वर्षांपूर्वी एकाचा मृत्यू झाला होता, त्याचा आत्मा तिथेच भटकतो य जो याच्या मागे लागलाय. अजुन याच्या शरीरावर त्याला ताबा मिळवता आला नाहीये पण त्याचे प्रयत्न सुरूच आहेत. याचे शरीर जितके कमकुवत होत जाईल तितकेच त्या आत्म्याला याच्या शरीरावर नियंत्रण मिळवण्या स सोपे जाईल..” त्या बाईच्या तोंडातून बाहेर पडलेली वाक्य ऐकून माझ्यातला होता नव्हता तो त्राण ही संपला. आई ने घाबरतच तिला विचारले ” यातून बाहेर काढायला काय उपाय करावा लागेल. आम्ही काहीही करायला तयार आहोत..” त्यावर ती बाई काही बोलली नाही, तिने तिच्या जवळची एक माळ माझ्या गळ्यात घातली आणि सांगितले की ही माळ अशीच गळ्यात घालून ठेवायची. आई आणि मावशीने तिचे आभार मानले आणि आम्ही घरी आलो. सगळ्यांना वाटले की माझी तब्येत आता बरी होईल पण २-३ दिवस झाले तरी माझ्यात तसू भर ही फरक जाणवत नव्हता. त्या बाई ने जे काही केले, आम्ही जे काही पाहिले ते विचित्र होत. 

त्या नंतर आई ने गणपती ला नवस केला जेणेकरून माझी प्रकृती चांगली व्हावी. दुसऱ्या दिवशी मंगळवार होता. त्या दिवशी सकाळी उठलो आणि मला असे जाणवले की जसे काही झालेच नाही. ना ताप होता, ना डोके ठणकणे, ना कसला थकवा. सगळे काही एका रात्रीत झाले होते असे मी तरी म्हणेन. त्या विघ्नहर्त्या ने आई ची प्रार्थना ऐकली आणि माझ्यावरचं हे संकट हे विघ्न दूर केलं.. हे सगळ जवळपास एक महिना सुरू होतो पण शेवटी त्याच्या कृपे मुळेच मी बरा झालो, माझ्या तब्येतीत सुधारणा झाली. 

Leave a Reply