अनुभव – स्वप्नील भोसले

हा अनुभव माझ्या अजोबांना 20 ते 25 वर्षांपुर्वी आला होता. लहानपणापासुन खेडे गावात राहत असले तरी त्यांना भुत, पिशाच्च, असल्या गोष्टींवर अजिबात विश्वास नव्हता. कारण अश्या गोष्टी ना कधी त्यांच्या बघण्यात होत्या ना कधी एकण्यात. खेडे गाव म्हटले की त्या काळी एकही वाहन नसायचे. त्यामुळे प्रवास पायीच व्हायचा. घरातील रेशन, भाजीपाला आणायला तालुक्याला जावे लागायचे. दर ४-५ दिवसानी तर कधी आठवड्याला एकदा ते सगळे समान आणायला जायचे. नेहमी प्रमाणे त्या दिवशी माझ्या आजीने आजोबांना शहरात जाऊन भाजीपाला आणण्याचा आग्रह केला. तसे आजोबा म्हणाले की कामातुन वेळ मिळाला कि जाईन.. दुसऱ्या दिवशी कामावर जात असताना रस्त्यात त्यांना त्यांचा मित्र भेटला. जुजबी गप्पा झाल्या. तो सहज म्हणाला “संध्याकाळी माझ्यासोबत तालुक्याला येशील का.. जरा सामान आणायचे आहे.. तू असलास तर सोबत होईल.. त्यावर आजोबा पटकन म्हणाले “अरे मला पण यायचच आहे”. काम आटोपल्यावर एकत्र भेटून निघायचे ठरले. संध्याकाळी ७ च्या सुमारास ते गावातून निघाले. निघायला उशीर झाला होता म्हणून त्यांनी जेवण सुद्धा केले नव्हते. त्यात घरी लवकर यायचे होते. गप्पा मारत दोघे चालत होत. सगळा प्रवास पायीच करायचा होता. 

घनदाट वनातून जाणारा कच्चा रस्ता.. सोबत असल्यामुळे ते अगदी निर्धास्त होते. ते दोघे ही साधारणतः ९ – ९.३० च्या सुमारास तालुक्याला पोहोचले. यायला तसा बराच उशीर झाला होता म्हणून होते नव्हते सामान, भाजीपाला घेतला. आलोच आहोत तर मटण ही घेऊन जाऊ असे आजोबांनी ठरवले. जवळपास तासाभरात त्यांची खरेदी झाली आणि ते दोघे ही परतीच्या प्रवासाला लागले. तालुक्या हून बाहेर निघता निघता कधी वेळ निघून गेला कळलेच नाही. काही अंतराच्या पाय पीटी नंतर ते पुन्हा जंगलाच्या कच्च्या रस्त्याला लागले. एव्हाना ११ वाजत आले होते. त्या दोघांकडे पुरेसे सामान होते आणि ते वजन घेऊन त्यांना अजून बराच लांबचा पल्ला चालत च गाठायचा होता. जंगलाचा भाग संपला आणि ते एका खिंडीजवळ येऊन पोहोचले. एव्हाना ते खूप दमून गेले होते आणि निघताना जेऊन न निघाल्याने भूक ही खूप लागली होती. तितक्यात त्यांना त्या खिंडीत एक पडीक झोपडी दिसली. ते नेहमी या वाटेने यायचे पण या आधी त्यांनी ती झोपडी कधी ही पहिली नव्हती. त्यांना थोडं आश्चर्य च वाटलं. छत बैलांच्या वैरणांनी झाकले होते, भिंतीही पडीक झाल्या होत्या. त्या झोपडीच्या लहानश्या खिडकित एक दिवा विजताना दिसत होता.1

तसे आजोबा त्यांच्या मित्राला म्हणाले “गड्या आज हित जेवन मिळतय का बघुया आन जमल तर हितच एक रात काढु आण सकाळच्याला निगु “. २ तास तास पायपीट करुन दमलेल्या त्यांच्या मित्रानेही होकारार्थी मान डोलावली. ते दोघेही दरवाज्याजवळ येऊन पोहोचले. अन दरवाजा वाजवत हाक दिली “कोणी हाय का आत”. लगेच आतुन आवाज आला “कोन हाय” तो आवाज एका बाईचा होता. क्षणाचाही विलंब न करता तिने दरवाजा उघडला. बाई जरा वयस्करच होती. त्यामुळे त्यांना काही वाटले नाही “कोन हाय तुम्ही आणि काय काम हाय” बाई म्हणाली. त्यावर आजोबा म्हणाले “आम्ही वाटसरु हाऊत शहराकड गेलतो बाजाराला येता येता जरा उशीर झाला अन भुक बी लयी लागलीया.. थोडा आसरा दिलात तर लयी बर होईल..” त्या म्हाताऱ्या बाईने लगेच त्या दोघांना आत घेतले. तुम्ही बसा मी आत जाऊन पिठल भाकरी बनवते अस सांगुन ती आत निघुन गेली. बराच वेळ होला हे दोघे गप्पा मारत होते. भुकने व्याकुळ झालेला मित्र आजोबांना म्हणाला “बघ रे झाल का त्यांच..” आजोबांनाही आता शंका येऊ लागली होती की इतका वेळ कसा काय लागतोय.

आजोबांनी आत डोकावण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना नीटसे काही दिसत नव्हते. त्यांनी दार हळूच आत ढकलले आणि आत जे दृश्य पाहिले ते अतिशय भयाण आणि तितकेच किळसवाणे होते. त्यांची वाचाच बंद झाली. त्या बाई ने तिचे पाय चुलीच्या पेटत्या आगीत घातले होते, जे चर्र चर्र करून पेटत होते. हात चुलीवरच्या भांड्यात, गरम उकळत्या पण्या सारख्या दिसणाऱ्या द्रव्यात घातले होते. हे सगळे भयाण दृश्य पाहून त्यांना कळायला वेळ लागला नाही. ती साधी सुधी बाई नव्हती ती एक हडळ होती. ते कसे बसे स्वतःला सावरत मित्रा जवळ आले. त्याला खुणावू न त्या झोपडी पासून लांब घेऊन आले. आत पाहिलेला भयानक प्रकार मित्राला सांगितला आणि त्या दोघांनी तिथून पळ काढला. जसे तिला त्यांच्या निसटण्याची चाहूल लागली तसे ती चिडली आणि एक कर्णकर्कश आवाज परिसरात घुमला. आजोबा आणि त्यांचा मित्र धापा टाकतच घरी पोहोचले. घरी सगळा प्रकार सांगितला. गावात ही कोणाला ही त्या झोपडाविषयी काहिच माहित नव्हते .गावकर्याॉना सुद्धा.परत कधी त्यांनी पायी प्रवास केला नाही.

Leave a Reply