लेखक – पवन भालेराव
मि एक बिझनेसमँन आहे … म्हणजे नेटवर्क मार्केटिँग करतो … होय तेच दोन मानसे जोडायची आणि त्यांता दोन दोन जोडायला लावायची म्हणजे झाले करोड पती . माझी टीम तयार होत होती . कामाची सुरवात ही मस्त झाली होती . मी नविनच या बिझनेस मधे उतरलो होतो म्हणुन जोश ही खुप होता . मि पुर्ण ऊत्स्हाने कामाला सुरुवात केली .आता तर मी स्वताः ला करोड पती च समजायला लागलो होतो .असच मि एक दिवस फेसबुक ला बिझनेस बद्दल पोस्ट टाकली आणि खाली माझा नंबर हि दिला होता . तसेच खुप मँसेज येऊ लागले. पण त्यातील एका मँसेजने माझे लक्ष वेधुन घेतले तो एक मुली चा मँसेज होता … अन्नु… या नावाने होता तो मँसेज
मला तुमच्या बिजनेस मधे आवड आहे मला ही काम करायचे आहे मि तुम्हाला काँल करु शकते का …
अस लीहील होत त्या मँसेज मध्ये.
मि काहिहि विचार न करता लगेच होकार दिला
…थोड्याच वेळात मोबाईल ची घंटी वाजली.
हँलो … हा पवन सर बोलत आहात का …
तिचा तो गोड आवाज अगदी माझ्या कानाला गुदगुल्या करुन सरळ काळजात शिरला …
हो मि पवन च बोलत आहे बोला …
अच्छा मला तुमचा बिजनेस आवडला आहे मला ही काम करायचे आहे तुमच्या बरोबर त्या साठी काय करावे लागेल … ति तिच्या गोड आवाजात बोलत होती …
ठीक आहे तुम्ही तुमचा पत्ता द्या मि आणि आमचे सर आम्ही दोघे येऊ तुम्हाला बिझनेस प्लान सांगायला…
…ठिक आहे तुम्ही आज रात्री नऊ वाजता अनुराधा हवेलीवर या …
येवढे बोलुन तिने फोन काटला . मी तर तीचा गोड आवाज येकुनच घायाळ झालो होतो पण असो ती आमची बिझनेस पार्टनर होणार होती .
मि लगेच राज सरांना फोन करुन सांगीतले ते हि येण्यासाठी तयार झाले .
राज सर म्हणजे माझा मित्रच पण तो या बिझनेस मधे सिनियर होता म्हणुन मि त्याला प्रतेक मिटीँग ला सोबत घेऊन जायचो .
ठरल्या प्रमाने राज आणि मी आम्ही दोघे मोटर सायकल घेवुन रात्रिचे सुमारे आठ वाजता निघालो अनुराधा हवेली कडे.
मि समोर चालवत होतो . हवेतील थंडगार गारव्याला चिरत त्या सुनसान रस्त्यावर आमची गाडी सुसाट वेगाने वार्या सारखी धावत होती .
दोन तासाच अंतर कापल्यावर आम्ही ऐका मोठ्या हवेली जवळ पोहचलो . ईथे आजुबाजूने एक ही घर किँवा गाव दिसत नव्हते .
या भयान रात्री एकटीच भली मोठी ऊभी असलेली हवेली चंद्राच्या प्रकाशात अजुनच भयावह दिसत होती .
त्यावर नाव होत अनुराधा .
आम्ही मोटर सायकल रस्त्याच्या कडेला ठेवुन बंगल्याच्या गेट जवळ गेलो . अस वाटत होत जनु हा गेट कित्तेक दिवसापासुन कोणीच ऊघडला नसावा त्या वर धुळ आणी घान साचली होती.
…अरे पवन हे घर तर खुपच विचित्र दिसत आहे आपन चुकीच्या जागी तर नाही आलो ना … राज बोलला
अहो सर श्रीमंत लोकांची घर असीच असतात तुम्हाला नाही कळायचे चला आत… मि त्यांना समजाऊन सांगीतल
मि गेट ढकलला तसा कररर आवाज सगळ्या अंधारात घुमला .
आम्ही हळु हळु बंगल्याच्या आत शिरलो .
बाहेरुन पडीक दिसणारा बंगला आत मधुन खुप सुंदर चकाचक होता .
अन्नु मँम … आहे का कुणी… अन्नु मँम … मि आवाज दीला .
तेवढ्यातच एक सुंदर स्त्री समोरच्या लांबसडक जिण्यावरुन एक एक पायरी खाली उतरत येऊ लागली .
पोपटी साडी घातलेले ति बाई एखाद्या परी प्रमाने दिसत होती.
जनु एखादी विषारी नागीन सळसळत उतरावी तशी ती जिण्यावरुन खाली येत होती . तिने माझ्यावर नजर फिरविली. तसा नजरे चा बान होऊन खसकन माझ्या काळजात रुतवा अशी तिची तीक्ष्ण नजर …
ती आमच्या जवळ आली …
हाय हँलो झाल राज सर तिला बिजनेस प्लान समजाऊन सांगत होते .
मि मात्र एक टक तिच्या कडच बघत होतो .
ति मधेच माझ्याकडे बघुन स्मीत हास्य करत होती .
तिचे ओठ जनु लाल गुलाबाच्या पाकळ्या प्रमाने दिसत होते . त्यातुन निघनारा गोड आवाज एखाद्या मंधुर संगीता सारखा कानाला आराम देत होता .
तेवढ्यातच
…मि तुमचा बिझनेस करायला तयार आहे पण माझी एक अट आहे … ती म्हणाली
कोणती अट …राज सरांनी विचारल
मि गेल्या तिनशे वर्षा पासुन तहानलेली आहे. माझी तहान विझवनार का …
आम्ही एक मेका कडे बघतच होतो .तेवढ्यातच ती जोर जोराने हसायला लागली …
मला रक्त पाहीजे तुमच …मला रक्ताची तहान लागली आहे…
खी खी खी खी हि हि हि
आता तीने तिचे खरे रुप धारण केले होते . विचकलेले दात बाहेर काढत होती . गुलाबाच्या पाकळ्या प्रमाने दिसनारे तिचे ओठ आता सडलेले दिसत होते त्यातुन पु निघत होता . तिच्या अंगावर मच्छर घोंगावत होते .हे द्रुश्य बघुन तर माझ्या डोक्यात भितीने कंप उडाला .
मला काहीच समजेनास झाल .
कदाचीत हेच तिच खर रुप असाव ..
काळीज ऐवढ्या जोरात धड धड करत होत की जनु आता बंदच पडते की काय अस झाल .
ती हडळ जोर जोराने हसतच होती .
भितीने माझ्या अंगाचा थरकाप ऊडाला . आणि सोबतच राज सरांचा ही
येवढ्यातच तिच्या अंगावरील एक मच्छर राज सरांच्या कानात घुसला
तसे दोन्ही हाताने आपले कान धरुन किँचाळत होता ओरडू लागले . आणि धाडकन जमिनीवर कोसळले .
ते खाली पडून तडफडू लागले आणि त्यांच्या दोन्ही कानातून रक्ताच्या चिळकांड्या उडू लागल्या जणू तो डास नव्हे एखादे धार धार शस्त्र आहे. जे त्यांचा कान पोखरत आत जातय.
…पवन वाचव …पवन वाचव … ते माझ्या कडे मदतीची हाक मारु लागले .
पण मि काहीही करु शकत नव्हतो .
माझ शरीर तर हा सगळा भयाण प्रकार बघुन आधीच सुन्न पडल होत . माझी हातापायाची पुर्ण शक्ती नाहीशी झाली होती .
थोड्याच वेळात राज सरांची ची तडफड शांत झाली कदाचीत त्यांचा प्राण गेला होता . त्यांचे रक्ताळलेले ऊघडे डोळे माझ्या कडेच बघत होते .
अचानक ती बाई धपकन त्यांच्या शरीरावर येऊन बसली. त्यांच्या छाताडावर बसुन जोर जोरान हसु लागली खी़, खी , खी
राज सरांच्या कानातुन निघालेल रक्त त्यांच्या मानेवर साचल होत . हडळीने तिच्या तोँडातुन हात भर लांब जिभ काढली आणि त्याच्या मानेवरच रक्त चाटु लागली . तो किळसवाणा प्रकार मला पाहवत ही नव्हता पण काही केल्या त्यावरून माझी नजरच हटत नव्हती.
ते सगळं रक्त चाटुन झाल्यावर आता तिने माझ्या कडे आपली भेदक नजर वळवली आणि हसु लागली …
आता तुझी पाळी …
ती माझ्याकडे येतच होती की मि अंगातील पुर्ण शक्ती एकवटुन तिथुन पळत सुटलो व दुसर्या खोलीत एका टेबला खाली जाऊन लपलो . ती माझ्या मागेच त्या खोलीत आली मला पुर्ण खोलीत शोधू लागली. .
तिचा तो हसण्याचा विचीत्र आवाज पुर्ण खोलीत घुमत होता … खी खी खी हिक हिक हिक
मि टेबला खाली श्वास रोखुन बसलो होतो . आणि मनातल्या मनात देवाला विनवण्या करत होतो.
…देवा वाचव रे एकदाच मला…
पुन्हा अशी चुक मि कधिच करणार नाही … खड्यात गेली नेटवर्क मार्केटीँग
कोणत्या भानगडीत पडलो मी … देवा वाचव रे बाबा …
तेवढ्यातच माझ लक्श समोर च्या खिडकीतून बाहेर गेल .त्या दरवाज्यातुन मला माझी दुर ऊभी केलेली मोटर सायकल दिसली .
मि हिम्मत करुन तिथुन मोटर सायकल च्या दिशेने पळायला लागलो .
मि मोटर सायकल पर्यंत पोहचलोच होतो की आधीच कशाला तरी माझा पाय अडकला आणी मी जमिनीवर पडलो .
ति हडळ माझ्या मागच होती .झपकन माझ्या छातीवर येवुन बसली . आता तिचा विद्रुप दिसनारा भयावह चेहरा अगदी माझ्या डोळ्या समोर होता .
तिने माझ्या छातीवर बसुन तिच्या तोंडातुन हात भर लांब जिभ बाहेर काढली आणि माझ्या तोँडात घातली .तिची येवढी लांब जिभ माझ्या नरड्याच्या खाली ऊतरली होती.
माझा श्वास गुदमरायला लागला . आणि हळुहळु डोळ्यासमोर अंधारी आली.. आणि पुढच्या क्षणाला खाडकन माझे डोळे उघडले. आजुबाजूला बघितल तर मी माझ्या घरीच झोपुन होतो . अंग घामाने ओल चिंब झाल होत .
म्हणजे मि एवढा वेळ स्वप्नच बघत होतो तर. बापरे किती भयानक होत स्वप्न … तेवढ्यातच मोबाईल ची रिंग वाजली.
राज सरांचा फोन होता . .
…हँलो अरे पवन किती वेळ झाला फोन करतोय मी.. उचलत का नाहीयेस..? चल तयार हो आपल्याला आज मिँटीँग ला जायच आहे.. एका बाई ने बोलावले आहे..
मि दबक्या आवाजातच विचारल कुठे …अनुराधा हवेली..?