अनुभव – अभिषेक बांदल (रॉयल ट्रेकर्स)

आजपर्यंत आपण ऐकलेले अनुभव बरेच जुने होते म्हणजे काही वर्षांपूर्वीचे. नुकताच घडलेले अनुभव ही तुम्ही आपल्या चॅनल वर ऐकले असतील तसाच हा एक भयानक अनुभव आहे. हा प्रसंग मागच्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात ला आहे. म्हणजे लॉकडाऊन होण्या आधी चा. मी एक वी लॉ गर आहे. जास्त करून ट्रेकिंग चे वी लॉ ग करतो. आज पर्यंत मी बरेच वी लॉ ग केले आहेत. कधी कल्पनाही केली नव्हती की असे ही घडू शकते म्हणून हा वी लॉग मात्र आम्हाला आमच्या आयुष्यात कायम लक्षात राहील. आमचा रॉयल ट्रेकर्स नावाचा ग्रुप आहे. आम्ही जवळपास ३ दिवसाची तयारी करून निघालो होतो. एकूण ४ जण होतो मी, ओमकार, शैलेश आणि मो न्या. ओमकार ला आम्ही फॉर्मल म्हणायचो. ४ जण असल्यामुळे आमच्याकडे २ बाईक स होत्या.

एक दिवस गॅप घेऊन मग त्याच भागातल्या दुसऱ्या गडावर ट्रेकिंग चा ही प्लॅन केला होता. ठरल्याप्रमाणे आम्ही पहिल्या गडावर ट्रेक ला गेलो. ट्रेक वैगरे करून आम्ही रात्र गडावर काढली आणि पहाटे ७ च्या सुमारास आम्ही गड उतार झालो. त्या दिवशी आम्ही तिथल्याच भागात फिरलो. व्हिडिओ वैगरे शूट करून एडिटिंग ही त्याच दिवशी केले आणि व्हिडिओ देखील पोस्ट केला. त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही पुन्हा एक ट्रेकिंग ला जायचा प्लॅन केला होता. तिथून काही किलोमीटर च्याच अंतरावर एक दुसरा किल्ला होता. आमची संपूर्ण तयारी आधीच झाली होती त्यामुळे अगदी वेळेत आम्ही त्या गडाच्या पायथ्याशी येऊन पोहोचलो. 

पण तिघे गेल्यावर १ वाईट बातमी कळाली की काही वेळा पूर्वी एका मुलीचा खुंटी च्या वाटेवरून पडून मृत्यू झालाय. तिथले गावकरी आम्हाला ही अडवत होते म्हणत होते की तुम्ही नका जाऊ पण आम्ही त्यांना समजवले की आम्ही योग्य ती काळजी आणि खबरदारी घेऊ. त्यांना न जुमानता आम्ही ट्रेकिंग ला सुरुवात केली. परमेश्वराच्या कृपेने सगळे सुरळीत झाले. आम्ही गड उतार होई पर्यंत संध्या काळचे ७ वाजत आले होते.. आमच्या कडे बाईक स्स होत्या त्यामुळे प्रवासाची काही चिंता नव्हती. पण आम्हाला बराच लांब पल्ल गाठायचा होता. ओमकार माझ्या सोबत बाईक वर होता तर मो न्या आणि शैलेश दुसऱ्या बाईक वर होते. माझ्याकडे त्यांच्यापेक्षा जरा चांगली बाईक होती. 

मी बाईक चालवत होतो म्हणून मी वेगात पुढे निघून गेलो. साधारण ९ वाजून गेले होते. आम्ही जवळपास २ तास गाडी चालवत होतो. निघताना मी तोंडात चींगम चघळत निघालो होतो. बराच वेळ चघळून झाले होते म्हणून ते फेकण्यासाठी मी गाडी रस्त्याच्या कडेला घेतली. गाडी थांबवून मी हेल्मेट काढले आणि न पाहताच थुंकलो. पण नंतर लक्षात आले की तिथे कोणी तरी उतारा काढून ठेवला आहे. इतकेच नाही तर साडी, नारळाची ओटी वैगरे काढून ठेवली होती. लक्ष न दिल्यामुळे मी चुकून त्याच्यावर थूंकलो. ओमकार ने ही ते पाहिले आणि तो मला ओरडला सुद्धा. मी त्याला सॉरी म्हणत तिथून गाडी काढली. गाडी नेहमी प्रमाणे पुन्हा वेगात घेतली. बरेच पुढे आल्यामुळे अजुन तरी आमच्या सोबतची गाडी आमच्या बरोबर आली नव्हती. साधारण १-२ किलोमीटर पुढे आलो असू. तितक्यात मला असे जाणवले की माझ्या मांडीवर काही तरी घासून गेले. 

नुसते घासून गेले नाही तर मला कापल्या सारखे वाटले आणि त्या जागी टच टचू लागले. मी फॉर्मल ला म्हणजे ओमकारला चिडून च म्हणालो “काय रे.. नीट बस ना.. नख कसली मारतोय.. तुझे नख लागले मला जोरात..”. तसे तो म्हणाला “अरे मी का मारू नख.. काहीही बोलू नकोस”. या शुल्लक गोष्टी वरून आमच्यात वाद सुरू झाला. का कोण जाणे मला खूप राग आला होता म्हणून मी त्याला चिडून च म्हणालो “तू माझ्या मागे बसूच नकोस.. शैलेश बसेल माझ्या मागे.” असे म्हणतच गाडी पुन्हा रस्त्या च्या कडेला घेऊ लागलो. तितक्यात मला पुन्हा त्याच जागेवर काही तरी घासले. यावेळेस इतक्या जोरात की माझी जिन्स थोडी फाटली आणि रक्त येऊ लागले. एव्हाना मी गाडी रस्त्याकडेला नेऊन थांबवली होती. मी गाडी वरून खाली उतरलो, हेल्मेट काढून गाडीला अडकवले आणि ओमकार ला म्हणालो “जरा मोबाईल चा फ्लॅश लाऊन बघ काय झालेय.. मला खूप च चुर चुर तेय आता..”.

त्याने खिशातून मोबाईल काढला आणि फ्लॅश ऑन करून पाहू लागला. पायाला बरीच जखम झाली होती. काय लागले होते तेच कळत नव्हते. रस्त्याच्या आजूबाजूला झाडी झुडपे असे काही नव्हते त्यामुळे एखादे काट्याचे खोपटे वैगरे पायाला घासून गेले असेल असे ही वाटत नव्हते. मी आजू बाजूला पहिले. तो परिसर अगदी निर्मनुष्य वाटत होता. दूर दूर वर कोणती ही वस्ती द्दृष्टीस पडत नव्हती. आम्ही तिथे रस्त्याकडे ला थांबलो होतो तेव्हा पासून मला खूप च अस्वस्थ वाटू लागलं होत. फॉर्मल सोबत म्हणजे ओमकार सोबत मी आधीच भांडलो होतो त्यामुळे त्याच्याशी जास्त बोलत नव्हतो. पण मी त्याच्याकडे पाहिले तर त्याच्या ही चेहऱ्यावरचे हावभाव वेगळे वाटत होते. बहुतेक त्याला ही माझ्या सारखे अस्वस्थ वाटत असणार पण आमच्यात वाद झाल्यामुळे तो माझ्याशी बोलणे टाळत होता. आमच्या बरोबरची गाडी येई पर्यंत आम्ही तिथेच थांबलो. १०-१५ मिनिट झाले असतील. तितक्यात ओमकार च्या पाठीला काही तरी लागले तसा तो अचानक थोडा पुढे सरकला.

हलकासा आवाजही झाला. असे वाटले की ओमकार ला कोणी तरी जोरात मारले. आम्ही जिथे उभे होतो तिथे आसपास एखादे झाड किंवा झाडाची फांदी वैगरे असे काही नव्हते. त्यामुळे मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागलो. एका क्षणासाठी मला कळले नाही की आवाज नक्की कसला आला कारण आम्ही दोघेही तिथे शांत पण उभे होतो. पण तितक्यात तो म्हणाला ” मला पाठीत काही तरी लागले जोरात..” तसे मला वाटले की हा मुद्दामून नाटकं करतोय. मी त्याच्याशी काहीच बोललो नाही. तितक्यात शैलेश आणि मो न्या येताना दिसले. पण ते जसे जवळ आले तसे दिसले की ते दोघेही खूप घाबरले आहेत. मी त्याला काही विचारणार तसे तो एक शिवी हासड तच बोलला “गाडी वर बसा आणि इथून निघा आधी.. थांबू नका आपण आता डायरेक्ट वस्ती दिसली की थांबू”. 

मला काही कळलेच नाही. शैलेश ने आमच्या जवळ गाडी थांबवली नाही. फक्त गाडी हळु करून ते एक वाक्य बोलला आणि पुढे निघून गेला. तसे ओमकार म्हणाला “काही तरी झालेय बहुतेक.. गाडी काढ पटकन”. पुढचे काही तास आम्ही गाडी चालवत राहिलो. थोडा वस्ती चा परिसर दिसू लागला तसा जीवात जीव आला. शैलेश च्याच गाडी ला क्रॉस करून आम्ही पुढे आलो होतो. मी गाडी एका मेडिकल स्टोअर जवळ थांबवली आणि मलम पट्टी करायला समान घेतले. फॉर्मल म्हणजे ओमकार माझ्यावर जरा नाराजच होता कारण मी त्याला चिडून बोललो होतो. मी तिथेच माझ्या पायाची जखम धुवून घेतली आणि त्यावर मलम लाऊन पट्टी बांधू लागलो. तितक्यात शैलेश आणि मो न्या मागून आले. मो न्या तर सरळ येऊन माझ्या गळ्या तच पडला आणि भीती ने रडू लागला. 

मी त्याला शांत करतच म्हणालो “काय झाले यार.. शैलेश काय चालू आहे तुमचे.. मो न्या ला काय झाले आहे इतके घाबरायला.. तुम्ही आता तरी काही सांगाल का..?”.. शैलेश ने आम्हाला जे सांगितले ते ऐकुन माझ्या पायाखालची जमीनच सरकली. तो म्हणाला की आम्हाला ५-५ मिनिटाच्या अंतरावर एक बाई सतत दिसत होती. कधी रस्त्याच्या डाव्या बाजूला तरी कधी उजव्या बाजूला. कधी गाडीच्या मागे धावत होती तर कधी पुढे. तिने मो न्याच्या पायाला नख देखील मारली. म्हणून तो खूप घाबरला य. आम्ही बोलत असतानाच ओमकार ने जॅकेट काढले. बहुतेक त्याला वेदना होत होत्या. आम्ही पाहिले की त्याच्या जॅकेट ला रक्त लागलेय. आम्ही त्याला शर्ट काढायला सांगितले. त्याच्या पाठीवर हाताच्या पंजाचा ठसा उमटला होता. इतक्या जोरात कोणी तरी हात मारला होता की त्याला जखम होऊन त्यातून रक्तस्त्राव सुरू झाला होता. 

त्याची अवस्था पाहून मला त्याची खूप दया आली आणि वाईट ही वाटले. कारण मी विनाकारण त्याची काहीही चूक नसताना त्याच्यावर ओरडलो. नंतर बऱ्याच वेळ वाद ही घातला. या सगळ्या धावपळीत त्याचा मोबाईल ही कुठे तरी पडला. आम्ही केलेल्या ट्रेक चे व्हिडिओ त्याच्या मोबाईल च्याच मेमरी कार्ड मध्ये होते. हे सगळे माझ्या मुळे झाले होते. त्या ठिकाणी मी गाडी थांबवली नसती आणि मुख्य म्हणजे न पाहता थुंक लो नसतो तर हे सगळे झाले नसते. मला आज ही तो प्रसंग आठवला की वाईट वाटत. ओमकार वर विनाकारण ओरडलो , रागावलो. त्या वेळी शैलेश वेळेवर तिथे आला नसता आणि आम्हाला तिथून निघायला सांगितले नसते तर काय झालं असत. 

ही ट्रीप आम्हा रॉयल ट्रेकर ग्रुपला कायमची लक्षात राहील.

Leave a Reply