अनुभव – शुभम मुळीक

ही गोष्ट माझ्या मित्राच्या गावची, साताऱ्याची असून तुकाराम नावाच्या व्यक्ती सोबत घडली होती. घटना खूप वर्षांपूर्वीची आहे पण कधीही न विसरता येण्यासारखी. त्याकाळी बहुतेक लोक शेती करत. त्याचप्रमाणे तुकाराम ही शेती करायचा. पूर्ण दिवस शेतात राबायचा. त्याचे लग्न झाले नव्हते म्हणून घरी कोणी नसायचे. घर शेतापासून जरा लांबच होते. त्यामुळे नेहमी घरी यायचा नाही आणि रात्री शेतात च झोपायचा. जेणेकरून त्याला शेताला पाणी द्यायला सोपे जायचे.

त्या रात्री मात्र तो घरी आला होता आणि पहाटे उजाडण्या आधी शेताला पाणी द्यायला निघाला. वाटेत एक चिंचेचे झाड लागायचे. तो रोज अनुभवत होता की त्या झाडा जवळून जाताना आपल्या नावाने हाका ऐकू येतात. हाकामारी म्हणतात ना तसेच काहीसे. त्या दिवशी पहाटे तो त्या झाडा जवळून जात असताना पुन्हा तेच घडले. जसे तो त्या झाडापाशी पोहोचला तसे त्याला पुन्हा हाका ऐकू येऊ लागल्या. आज त्या हकांचा ओघ खूप वाढला होता. असे वाटत होते की कोणत्याही स्पर्शा विना ती त्याला ओढतेय. न राहवून त्याला मागे काय आहे हे पहायची इच्छा होत होती पण कसा बसा स य्य म ठेऊन मागे न पाहता तो शेतात निघून गेला. 

आता मात्र त्याने या गोष्टीचा छडा लावायचा ठरवला. दुसऱ्या दिवशी तो गावदेवी च्या मंदिरात गेला. आणि तिथल्या पुजाऱ्या ला रोज घडत असलेला प्रकार सांगितला. त्यावर ते म्हणाले की “तू अगदी वेळेवर आलास, आज अमावस्या आहे. आज ती झाडावरून खाली उत् रेल. आणि काय करेल हे सांगता येणार नाही. तुझ्या जिवाला धोका आहे.”. त्याने उपाय विचारला त्यावर ते म्हणाले की “हो, एक उपाय आहे..

त्यांनी एक सुरी घेतली आणि देवीच्या पायावर ठेवून मंत्र पुटपुटले. त्या सुरीला एक धागा बांधला आणि तुकारामाच्या हातात देत म्हणाले जर ती बाई खाली आली तर तिच्या नकळत तिच्या साडीचा एक तुकडा काप आणि लपवून ठेव. ती पुन्हा माणसात येईल. एक लक्षात घे की असे करताना तिला अजिबात कळता कामा नये आणि तो कापलेला तुकडा पुन्हा तिच्या हाती लागू द्यायचा नाही.चुकून ही तिच्या हाती तो तुकडा लागला तर.. इतक्यात तुकाराम मध्येच वाक्य तोडत म्हणाला “एवढेच ना, करतो ना मी”.. त्याने पुजाऱ्याचे वाक्य पूर्ण ऐकलेच नाही आणि तसाच मंदिरातून बाहेर पडला.

ठरल्या प्रमाणे तो रात्री शेतात जायला निघाला. आपण धाडसी आहोत हे त्याला माहीत होत पण तरीही मनात कुठे तरी भय दाटून आल्यासारखं वाटत होत. दुरूनच त्याने झाडावर नजर टाकली तशी एक पुसटशी आकृती खाली सरपटत येताना जाणवू लागली. त्याच्या अंगावर सर्रकन काटा येऊन गेला. जस जसा तो जवळ येऊ लागला तशी ती आकृती स्पष्ट होऊ लागली. फाटलेली आणि चुर्गळलेली मळ कट साडी, लांबसडक मोकळे केस, चेहरा केसांमुळे झाकला गेला होता.

ती एका क्षणात त्याच्या समोर येऊन उभी ठाकली. तसे त्याचे हृदय भीतीने धड धडू लागले, संपूर्ण शरीरातला त्राण च संपला. त्या बाई ने त्याचा हात पकडला आणि दुसऱ्या हाताने त्याची मान पकडली. पण अंगातली सगळी शक्ती एकटवून त्याने खिशातली सुरी काढून तिच्या साडी च एक तुकडा कापला आणि आपल्या खिशात लपवून ठेवला.

पुढच्याच क्षणी त्या बाईची शुध्द हरपली आणि ती जमिनीवर कोसळली. बघता बघता तिचे संपूर्ण रूप पालटले. ती एखाद्या साध्या बाई सारखी दिसू लागली. आणि काही क्षणात तिने डोळे उघडले.a मी कुठे आहे, तुम्ही कोण आहात विचारू लागली. तुकारामा ला काही उमजत नव्हते. तो कसलाही विचार न करता तिथून जायला निघाला. पण त्या बाईने त्याचे पाय पकडले आणि त्याला विनवणी करू लागली. त्याला तिची दया आली आणि तो तिला आपल्या घरी घेऊन आला. 

काही काळ उलटला. सगळे सुरळीत झाले होते. ती त्याला घरकामात आणि शेतात मदत करू लागली. गावकरी मात्र बुचकळ्यात पडले होते की ही कोण बाई आणि याच्या घरी कशी. पण तुकारामा ला या सगळ्या गोष्टींचा फरक पडत नव्हता. हळू हळू काळाच्या ओघाने सगळ्या गोष्टींचा विसर पडू लागला आणि तो तिच्यात गुंतू लागला. त्या दोघांनी लग्न करायचे ठरवले आणि गावातल्या लोकांची तोंड ही कुजबु जायची  बंद झाली. त्यांच्या सुखी संसाराला सुरुवात झाली. कालांतराने त्यांना पुत्रप्राप्ती झाली. सगळ अगदी सुरळीत चाललं होत. अश्याच एका सणा ला त्यांच्या घराची साफ सफाई चालू होती.

सहज म्हणून तिने माळावरच्या वस्तू काढायला सुरुवात केली. तिथल्या एका मडक्यात काय आहे म्हणून बघायला हात घातला आणि विपरीत घडले. त्याने तिच्या साडी चा तुकडा त्याच मडक्यात लपवून ठेवला होता. जसा त्या तुकड्याला तिच्या हाताचा स्पर्श झाला तिचे संपूर्ण रूप एका क्षणात पालटले. तोच भयानक अवतार. तुकाराम ला कळतच धावत तिच्या जवळ आला. पण तितक्यात मडक्यात लपवलेली ली सुरी काढून तिने त्याच्या तोंडावरून सर्रकन फिरवली आणि त्यांचे डोके पकडून भिंतीवर आदळले. ती पुन्हा त्या शक्तीच्या आधीन झाली होती.

तुकाराम ला रक्ताच्या थारोळ्यात तसेच टाकून ती घराबाहेर निघून गेली. त्या नंतर ती पुन्हा कधीच दिसली नाही. काही वर्षांनंतर तुकरा मा लाही देवांद्या झाली. आज त्यांचा मुलगा २८ वर्षांचा आहे. पण तो आता या सगळ्या बद्दल बोलणे आवर्जून टाळतो.

Leave a Reply