अनुभव – श्रध्दा जाधव
साधारण २ वर्षांपूर्वी ची गोष्ट आहे. दिवाळी नंतर ची. आमच्या घरात आम्ही ६ जण राहतो. मी, माझे पती, सासू, दिर, जाऊ आणि त्यांची मुलगी अनुष्का. माझे पती रात्री नेहमी उशिरा घरी यायचे. तो पर्यंत सगळे जेवण आटोपून मी झोपून ही जायचे. मला आमच्या खोलीत एकटे झोपायची सवय होती. आणि ते येऊन माझ्या शेजारी बसले की मला जाग यायची.
मला ३ नणंद आहेत. दिवाळी नंतर सगळ्या लहान नणंद तिच्या सासरी जाणार होती. तिला सोडायला माझी सासू गली होती. मला ३ नणंद आहेत. दिवाळी नंतर सगळ्या लहान नणंद तिच्या सासरी जाणार होती. तिला सोडायला माझी सासू गली होती. त्यामुळे घरात आम्ही ४ च जण होतो. त्या दिवशी यांच्या मित्राची हळद होती त्या मुळे नेहमी पेक्षा ही ते खूप उशिरा घरी येणार होते. जेवण वैगरे आटोपून मी माझ्या खोलीत येऊन झोपले. रात्री चा जवळपास पाऊण वाजला होता. मी अगदी गाढ झोपेत होते.
तितक्यात अचानक माझ्या शेजारी कोणी तरी येऊन बसले. झोपेत असल्यामुळे मी डोळे न उघडता च यांना हाक दिली.. “अहो.. आलात का..” पण मला त्यांनी काहीच प्रतिसाद दिला नाही. म्हणून मग मी डोळे उघडुन पाहिले आणि भीती ने माझे हातपाय च गळून गेले. साधारण १२-१३ वर्षांची एक मुलगी माझ्या बाजूला बेड वर बसली होती. केस अगदी विस्कटलेले होते. डोळे विस्फारून माझ्याकडे अगदी एक टक बघत होती. तिच्या नजरेतून मला राग अगदी स्पष्ट जाणवत होता. मी खरंच खूप घाबरले होते. माझ्या तोंडातून आवाजच फुटत नव्हता. मी धडपडत खोली मधून बाहेर पळत आले आणि दिर, जाऊ यांना उठवले. पण भीती ने माझी वाचाच जणू गेली होती म्हणून मला बराच वेळ त्यांना काही सांगताच आले नाही. जवळपास अर्धा तास मी घाबरून फक्त रडत होते. त्यांनी मला पाणी प्यायला देऊन शांत व्हायला सांगितले. काही वेळा नंतर मी त्यांना घडलेला प्रकार सांगितला.
त्या दिवशी मला नीट झोप ही लागली नाही. दुसऱ्या दिवशी मात्र मला खूप ताप भरला होता. बऱ्याच दिवसांनंतर मला कळले की आमच्या वाड्यात एक वेडी मुलगी राहायची, तिने त्याचं खोलीत प्राण सोडला होता जिथे मी रोज झोपायचे. त्या नंतर मात्र मी घरच्यांना सांगून खोली बदलून घेतली. माझ्या सोबत घडलेला प्रसंग निव्वळ एक भास होता की खरंच तसे काही झाले होते हे मात्र मला कधीच समजले नाही.