अनुभव – अथर्व पेरवी

आम्ही सगळे दिवाळीच्या सुट्टीत गावाला गेलो होतो. आमच्या गावाला काही फटाके वगैरे फोडत नाहीत. फक्त दिवे पेटवून दिवाळी साजरी केली जाते. आम्ही सगळी भावंडं खूप दिवसांनी एकत्र आलो होतो. त्यामुळे खूप मजा करायचे ठरवले. आम्ही रात्रभर गच्चीवर गेम खेळायचो किंवा गप्पा मारत बसायचो. सगळे एकत्र आल्यावर झोप कसली येणार. अगदी पाहत होई पर्यंत आम्ही मजा करायचो. पण अश्याच एका रात्री जे घडले ते आता नुसते आठवले तरी अंगावर सरसरून काटा येतो. त्या रात्री आम्ही रोजच्या प्रमाणे जेवण आटोपून गच्ची वर गेम खेळत बसलो होतो. काही वेळानंतर आमच्यातल्या मोठा भावाला म्हणजे प्रतीक ला शौचास ला जायचे होते पण आम्ही त्याला तो एक गेम संपे पर्यंत जाऊच दिले नाही. पण नंतर मात्र तो खाली गेला. तो येईपर्यंत आम्ही त्याची वाट पाहत बसलो होतो. सहज म्हणून मोबाईल पहिला तर माझ्या फोन ची बॅटरी लो झाली होती. म्हणून मग मी सुद्धा खाली फोन चार्जिंग ला लावण्यासाठी गेलो. 

तिथून पुन्हा वर येताना मनात एक विचार आला. प्रतीक ला जाऊन घाबरवले तर.. मी धावत वर जाऊन लगेच सगळ्यांना प्लॅन सांगितला. आम्ही ठरवल्या प्रमाणे सगळे खाली आलो आणि टॉयलेट च्याच दरवाज्यासमोर उभे राहिलो. मुद्दामून चित्र विचित्र आवाज काढू लागलो. पण आतून प्रतीक चा काहीच प्रतिसाद येत नव्हता. खूप वेळ प्रयत्न करून ही तो काहीच बोलत नव्हता. आम्ही एक दोन वेळा दरवाजा ही हलवून पहिला पण त्याने कसलाच प्रतिसाद दिला नाही. शेवटी पुन्हा आम्ही गच्चीवर आलो. काही वेळा नंतर प्रतीक धावतच गच्चीवर आला आणि आम्हाला चिडून बोलू लागला “तुम्हाला अक्कल आहे ना.. काय असले फालतू प्रँक करता.. मी किती घाबरलो होतो..” आम्ही त्याचे असे बोलणे ऐकून जोर जोरात हसू लागलो. आमचा प्लॅन यशस्वी झाला होता. पण मला एक प्रश्न पडला होता तो म्हणजे तो जर घाबरला होता तर काहीच कसे बोलला नाहीस.. साधी हालचाल ही नाही. मी त्याला हे विचारणार तेवढ्यात तो जे म्हणाला ते ऐकून आम्ही पूर्णपणे गोंधळलो. 

तो म्हणाला “अरे मी तुम्हाला आतून आवाज देत होतो.. तरीही तुमच्या पैकी कोणी काहीच बोलत नव्हते.. आणि बांगड्या पैंजण तुम्ही कुठून आणले..” मी झटकन त्याला विचारले “बांगड्या कुठून आणल्या म्हणजे..? असे काय विचारतोय..” त्यावर तो जे म्हणाल ते ऐकून मात्र मी पुरता हादरून गेलो. ती सांगू लागला.. “मी जेव्हा आत होतो तेव्हा मला बाहेरून बांगड्यांचा आणि पैंजण चा आवाज येत होता.. नंतर अचानक आतला बल्ब लुकलुकु लागला.. तुम्हाला मी आवाज दिला तर तुम्हीही काहीच बोलला नाहीत मग मात्र मी जरा घाबरलो..” आम्ही त्याला काही विचारणार तितक्यात तो त्याचे वाक्य पूर्ण करत म्हणाला “एकतर उद्या आई उठल्यावर आपल्याला ओरडणार आहे.. बाहेरून धावत येताना पायाला सगळा चिखल लागला, पण मी घाबरलो होतो म्हणून पाय नीट न पुसता तसाच धावत वर आलो. सगळी लादी आणि जिना खराब झालाय.. ” तेव्हड्यात मला लक्षात आले की तो घरातल्या नाही तर घरा बाहेर मागच्या बाजूला असलेल्या शौचालयात गेला होता. 

पण आम्ही तर आतल्या बाथरूम जवळ होतो. मग प्रतीक ला बाहेर कसले आवाज ऐकू येत होते. त्यात आतल्या बाथरूम चा दरवाजा आतून बंद कसा.. आम्ही सगळे एकमेकांकडे घाबरलेल्या नजरेने पाहू लागलो. प्रतीक आमच्याकडे पाहत च होता. कोणाला काहीच सुचत नव्हते. आम्ही प्रतीक ला घडलेले सगळे व्यवस्थित सांगितले. सगळे ऐकून तो अजूनच घाबरला. महत्त्वाचे म्हणजे जर प्रतीक बाहेर गेला होता तर मग घरातल्या बाथरूम मध्ये नक्की कोण होत. आम्ही शेवटी खाली जाऊन पाहण्याचे ठरवले की नक्की आत कोण आहे. मला पूर्ण खात्री होती की जेव्हा आम्ही दरवाजा वाजवत होतो तेव्हा तो आतून नक्कीच बंद होता. आम्ही सगळे एकत्र खाली दरवाजा समोर आलो. मी दरवाजा वाजवला आणि आवाज दिला ,” कोण आहे ,कोण आहे आत ” पण आतून कोणीही काही बोलले नाही. दरवाजा तसाच बंदच होता. शेवटी न राहवून मी तो दरवाजा जोर लावून आत ढकलायचा प्रयात केला. पण मला असे वाटू लागले की तो आतून कोणी तरी घट्ट पकडुन ठेवला य. 

बराच वेळ प्रयत्न केल्यानंतर एका क्षणाला तो दरवाजा अगदी सहज उघडला. आणि आतले दृश्य पाहून मी जोरात ओरडलो. तसे घरातले सगळे जण झोपेतून उठले आणि आमच्या दिशेने धावत आले. आतले दृश्य पाहून ते ही घाबरले. आत एक बोका मरून पडला होता. सगळीकडे रक्ताचा सडा पडला होता. त्या बोक्याला कोणी तरी अतिशय निर्घृण पद्धतीने मारले होते. त्याचे चारही पाय कापले होते , पोट फाटून आतड्या बाहेर काढल्या होत्या. मान ही वाकडी झाली होती जसे कोणी तरी निर्दयी पणे ती पिळून मोडली आहे.. हे नक्की काय झालंय काहीच कळत नव्हते. आमच्या घरातल्यांनी आम्हाला झोपायला सांगितले, आम्ही सुद्धा काही न बोलता झोपी गेलो. तेव्हा पासून मनात खूप प्रश्न आहेत पण त्यांची उत्तर अजुनही मिळालेली नाहीत. प्रतीक सोबत नक्की काय घडले, ती दरवाजा आतून बंद कसा होता, प्रतीक ला ऐकू आलेले आवाज फक्त भास होता की अजुन काही.. अश्याच कित्येक प्रश्न मला आजही अनुत्तरीत आहेत. 

This Post Has One Comment

  1. Neha Gurav

    Tumcha stories khar ch khup khup deep asatat. Etkya ki, ratri aiktana band dolya samor drushya ubh rahat tya ghatnech. Kadhi ghata madhala rasta, tr kadhi junya abadone office kiva residensial buildings… Mage nuktich tumchi ek new post pahili utube vr silver button khup abhinandan. Me kadachit tumcha tya fans paiki asen jine tumchi ek hi story aikaychi sodali nahiy. Pn majhi favourite mhanal tr “CHAHUL” ch. U know what’s the best thing about ur channel. Tyat kadhi unnecessary cha adds nastat. Without disturbance aapan tya story cha aat jau shakato. Tumhi khup aadhi bolelat I think tumhi kahi mean comments na reply krtana ullekh kelelat ki, ya channel vr tumhi kadhi promotional adds dakhvat nhit and still u stick on ur words it’s really rare. Tushar Kamble (TK Ji) tumcha aavaj aikun barych daa prashna yeto kase disat asala tumhi. ky age asel, married un married. Pn hech feeling khup bhari ahe. Naav asun Anamik rahan. Hech carry karal pudhe as apeksha. Pure krte aata nahitr evadha motha nibandh vachayla tumhala vel asel ki nhi mahiti nhi. Good night. Take care and stay blessed.. 🤘🏻☺️🌃

Leave a Reply