अनुभव – रणवीर
अनुभव मी आठवीत असताना माझ्या सोबत घडला होता. मी सांगली जिल्ह्यातील एका गावात राहायचो. मी लहानपापासून माझ्या आजीकडे म्हणजे माझ्या आईच्या आईकडे असायचो. उन्हाळा आणि दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये मी नेहमी गावी जायचो. त्या वर्षी ही दिवाळी ला मी गावी गेलो होतो. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी माझ्या चुलत भावाच्या घरी काही कामानिमित्त ड्रिल मशीन लागणार होते. माझ्या वडिलांच्या व्यवसायात अश्या वस्तू लागतातच. म्हणून मग मी आणि माझा मोठा भाऊ रात्री जेवण उरकून त्यांच्या घरी जायला निघालो. आमचे घर गावात होते आणि आमच्या त्यांचे घर हे माळरानात होते. जवळपास २ किलोमिटर चे अंतर असेल. दादाने सोबत सायकल घेतली होती. त्या वाटेवर आम्ही दोघच होतो. कारण त्या काळी रात्री गाव अगदी सामसूम होत असे. त्यात रस्त्याकडे स्ट्रीट लाईट ही जास्त नव्हते. म्हणून रात्री कुठे जायचे म्हंटले की चंद्र प्रकाशात च वाट काढत जावे लागायचे.
आम्ही सोबत टॉर्च घेऊन निघालो होतो पण तीही नीट चालत नव्हती. सेल संपायला आले असावेत म्हणून अगदी डिम पेटत होती म्हणजे नीट प्रकाश ही पडत नव्हता. त्या वाटेवरून जाताना एक स्मशानभूमी लागते. आणि तिथून त्यांचे घर अर्ध्या किलोमिटर वर असेल. डाव्या बाजूला स्मशान आणि उजव्या बाजूला दूरवर पसरलेले शेत. आम्ही जेव्हा तिथून जाऊ लागलो तेव्हा मला दिसले की त्या स्मशानभूमीत कोणाचे तरी प्रेत जळते य. वातावरण असे होते की एखाद्याला भीती वाटणे साहजिक होते. गडद अंधार, निर्मनुष्य वाट आणि बाजूला स्मशानात जळणारे प्रेत. मी दादा ला काहीच बोललो नाही पण त्याच्या नकळत सायकल चा वेग वाढवला. मला त्या दिशेला पाहायचे ही नव्हते पण तरीही तिथे पुन्हा लक्ष गेले. मला जाणवले की ते प्रेत ह लण्याचा प्रयत्न करतेय. मी घाबरून जोरात पायडल मारायला गेलो आणि खटकन आवाज करत सायकल ची चेन निघाली.
आम्ही त्या स्मशानाच्या समोर येऊन थांबलो.
ते प्रेत आमच्यापासून फक्त काही फुटांवर होते. माझे लक्ष तिथेच स्थिरावले होते. त्या प्रेताचा एक पाय चितेवरून हळूच बाहेर निघाला आणि ते भयाण दृश्य पाहून मी प्रचंड घाबरलो. एव्हाना माझ्या दादा ने ही ओळखले होते की इथे थांबलो तर काही खरे नाही. तो कसे तरी करून सायकल ची चेन लावण्याचा प्रयत्न करू लागला. मी त्याला काही बोलणार तितक्यात तोच म्हणाला चल बस पटकन.. त्याने चेन लावलेली पाहून मी पटकन सायकल वर बसलो आणि आम्ही तिथून पुढे निघालो. आम्ही त्यांच्या घरी पोहोचलो, ड्रिल मशीन दिले आणि पुन्हा घराच्या वाटेला लागलो. आम्हाला आता पुन्हा त्याच स्मशानाच्या वाटेने घरी जायचे होते. दादा ने सायकल चा वेग वाढवला पण पुन्हा त्याच ठिकाणी आल्यावर सायकल ची चेन निघाली. आता मात्र आम्हाला पहिल्यापेक्षा जास्त भीती वाटू लागली. दादा चेन लावायचा प्रयत्न करू लागला पण तो ही इतका घाबरला होता की सायकल ची चेन त्याच्या हातून नीट लागतच नव्हती.
माझ्या मनातली भीती क्षणोक्षणी वाढत चालली होती. आम्ही दोघांनी एकमेकांकडे पाहिले आणि सरळ धाव घेतली. दादा ने एका हाताने सायकल चे हॅण्डल मधोमध पकडले होते जेणेकरून त्याला सायकल सांभाळता येईल तर दुसऱ्या हाताने माझा हात घट्ट पकडला. तो धावत असताना मला फक्त एकच वाक्य म्हणाला “घाबरु नकोस मी आहे..”. माझे लक्ष पुन्हा त्या स्मशानात गेले. एव्हाना आगीचा ज्वाळ इतका जाणवत नव्हता. पण मला दिसले की त्यावरचे प्रेत किंवा जे काही उरले आहे ते अजूनही हलण्याचा प्रयत्न करतेय. बहुतेक त्यावरून उठण्याचा प्रयत्न करतेय. ते पाहून माझे हृदय भीती ने धड ध डू लागले. मी दादाला म्हणालो “दादा लवकर.. मला खूप भीती वाटतेय..” आम्ही स्मशानभूमी पासून बरेच लांब आलो. कसे बसे आम्ही घरी पोहोचलो. घरी आल्यावर आईला घडलेली घटना सांगितली. तीही काळजीत पडली आणि मला म्हणाली “पुन्हा रात्री कधी ही त्या वाटेने जाऊ नका.. ती वाट बरी नाही..”. मला आलेला आतापर्यंत चा हा सगळ्यात भयानक अनुभव होता जो आजही मला लक्षात आहे.