अनुभव – श्रितेज खेडेकर

मी राहायला शहरात आहे आणि माझा रेस्टॉरंट चा बिझिनेस आहे. तो सुद्धा तिथेच आहे. माझ्या मामा चे गाव कोकणात आहे. लहान पणापासून मला गावाची खूप ओढ असल्याने मी प्रत्येक सुट्टीत गावाला जायचो. अगदी आता सुधा मला तितकीच ओढ आहे. त्यामुळे जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा मी गावाला जात असतो. तसे माझे गाव बरेच जवळ आहे म्हणजे बाय रोड गेले की तीन साडे तीन तासात पोहोचता येते. गावाला माझ्या मामाचे ही रेस्टॉरंट आहे. आणि ते माझ्या मामा चा मुलगा जो माझ्या हून ३-४ वर्षांनी लहान आहे तो चालवतो. त्याची आणि माझी खूप जुनी जोडी आहे. म्हणजे अगदी लहान पणापासून आमचे खूप छान जमते. भरपूर गोष्टी, मजा मस्ती अश्या सोबत घालवलेल्या खूप आठवणी आहेत. 

ही गोष्ट २ वर्षांपूर्वी ची आहे. १५ जून २०१८ ची. शुक्रवार होता. माझ्या रेस्टॉरंट च्याच बिझिनेस च्याच व्यापातून मला २ दिवस वेळ मिळाला म्हणून मी गावाला जाऊन यायचे ठरवले. माझी ४ व्हीलर घेऊन सकाळी लवकरच म्हणजे ८ लई निघालो. आणि ११ ला म्हणजे अवघ्या ३ तासात गावी पोहोचलो. त्या दिवसाचा प्लॅन म्ही अगोदरच फोन वर ठरवला होता की दुपार नंतर आपण गावापासून काही अंतरावर असलेल्या समुद्र किनाऱ्यावर वर जाऊन एन्जॉय करायचे. ती बीच गावापासून साधारण ६० किलोमीटर अंतरावर होता. २ तासाचा प्रवास. गावात पोहोचल्यावर मी नातेवाईकांना भेटलो. बरेच दिवस गावात येणे झाले नव्हते म्हणून ते ही मला भेटायला बोलवत होते त्यामुळे त्यांना भेटून मगच पुढचे काय ते करायचे ठरवले होते. 

त्यांच्याकडेच दुपारचे जेवण वैगरे आटोपले. तो पर्यंत माझ्या मामाच्या मुलाने म्हणजे माझ्या भावाने मेनेजर ला सगळ्या गोष्टी समजावून त्याचे रेस्टॉरंट हॅण्ड ओव्हर केले. आम्ही दोघं संध्याकाळी ४.३० ल बीच वर जायला निघालो. मी स्वतः ड्राईव्ह करत होतो. तसे तर माझ्या भावाला सुद्धा ड्रायव्हिंग चागली येते पण मला ड्रायव्हिंग ची खूप हौस असल्याने मीच गाडी चालवत होतो. जून महिना असला तरी त्या दिवशी पाऊस अजिबात पडला नव्हता. गावातले वातावरण नेहमी सारखे अगदी प्रसन्न वाटत होते. त्या आम्ही दोघेही बऱ्याच दिवसांनी बाहेर एकत्र फिरायला आलो होतो त्यामुळे अगदी खूष होतो. 

या आधी ही आम्ही बऱ्याच वेळा त्या बीच वर फिरायला गेलो होतो पण जास्तीत जास्त संध्याकाळी ७ पर्यंत. त्या आधी आम्ही घरी परतायचो. पण या वेळेस आम्हाला घरून निघायला उशीर झाला होता. त्यामुळे आम्ही साधारण ६.१५ च्याच आसपास बीच वर पोहोचलो. अंधार पडायला नुकताच सुरुवात झाली होती. मस्त वारा सुटला होता आणि आकाशात ढग ही दाटून आले होते. अधून मधून हलकासा गडगडाट ही ऐकू येत होता. जून महिन्यात त्या भागात पर्यटकांचे प्रमाण तसे कमी असते त्यामुळे त्या संध्याकाळी बीच वर तितकीशी वर्दळ नव्हती. तिथलीच गावातली मुलं बाईक घेऊन तिथे फिरत होती. 

आम्ही कार तिथेच कडेला पार्क केली आणि थोडे अतल्या भागात आलो. काही महिन्यांपूर्वीच मी ड्युटी फ्री मधून आणलेली स्कोच ची बॉटल बाहेर काढली आणि गप्पा मारत आम्ही पेग भरू लागलो. तसे भाऊ म्हणाला की आपण कार च्याच बोनेट वर बॉटल आणि ग्लास ठेऊ म्हणजे बरे पडेल. आम्ही कार बो नेट चा वापर अगदी एखाद्या टेबल सारखा करत होतो. गप्पा मारता मारता ८.३० वाजत आले. बीच वर आम्ही दोघेच उरलो होतो. पिण्याचा कार्यक्रम झाल्यामुळे आता आम्हाला भूक लागली होती. त्या भागात हवे तसे चांगले हॉटेल किंवा रेस्टॉरंट नाहीये. पण तिथे खानावळी आहेत. तसे मी माझ्या भावाला म्हणालो की आपण एखाद्या खानावळीत जेवायला जाऊ. आधीच ऑफ सिझन आहे. ती खानावळ लवकर बंद झाली तर आपले जेवायचे वांदे होतील. 

भावाने उरलेली बॉटल तशीच बंद केली, कार च्याच बॉने ट वरचे ग्लास, पाण्याची बॉटल वैगरे सगळे गाडीत ठेवले आणि आम्ही तिथल्या गावाच्या दिशेने निघालो. बीच पासून ते गाव १५ मिनिटांवर असेल. जाताना पाऊस सुरू झाला. तसे मी भावाला म्हणालो बरे झाले आपण वेळेत निघालो नाही तर पावसाने तिथेच गाठले असते आपल्याला. आम्ही पुढच्या काही मिनिटात खानावळीत पोहोचलो. मनसोक्त मत्साहार केला आणि साधारण १० ला आम्ही खानावळीतून बाहेर पडलो. माझा भाऊ मला म्हणाला की आपली स्कोच अजुन बाकी आहे. मी त्याला म्हणालो की एकदा जेवायला बसलो की मला पुन्हा प्यायला होत नाही रे.. त्यावर तो म्हणाला की तू नको घेऊस पण मला कंपनी तर देशील की नाही. तसे मी ठीक आहे म्हंटले.

पण इथे गावात असे इथे पिणे बरोबर नाही म्हणून मी म्हणालो की आपण परत बीच वर जाऊ तसे ही तिथे इतक्या रात्री कोणीही नसते. आम्ही पुन्हा एकदा बीच वर जायला निघालो. नुकताच पाऊस पडून गेल्यामुळे वातावरणात गारवा पसरला होता. मंद वारा सुटला होता आणि त्यात समुद्राच्या संथ लाटांचा आवाज ऐकू येत होता. आम्ही येणार अगोदरच तिथे कुत्र्यांचा घोळका उभा होता. ५-६ कुत्रे असतील. आमच्या पासून काही अंतरावरच उभे होते. भावाने पुन्हा पिण्याचा कार्यक्रम सुरू केला. मी मुद्दामून पुन्हा प्यायलो नाही कारण मला पुन्हा ड्राईव्ह करून गावात जायचे होते. आमच्या गप्पा सुरू झाल्या आणि त्यातच २ तास निघून गेले. जवळपास १२.१५ झाले असतील. वेळ लक्षात आली तसे मी भावाला म्हणालो की आता बस कर खूप उशीर झालाय आपल्याला निघायला हवे. 

अजुन गावात पोहोचायला आपल्याला बरेच ड्राईव्ह करून जावे लागणार आहे. भाऊ आधीच धुंदीत होता म्हणून अजुन थोडा वेळ थांबायचा आग्रह करू लागला. तो म्हणाला की एक तर आपल्याला बिझिनेस मधून असा वेळ चुकून कधी तरी मिळतो त्यात तू कुठे घरी जायची घाई करतोय. त्यावर मी म्हणालो हो तुझे ही म्हणणे बरोबर आहे. आमचे बोलणे चालू असतानाच अचानक आमच्या जवळ उभे असलेले कुत्रे एका दिशेला पाहून भुंकू लागले. गेले २ तास जे कुत्रे एकदाही भुंकले नव्हते ते अचानक विचित्र आवाजात भुंकू लागले. त्यांचा तो आवाज त्या शांत वातावरणात अजुनच भयाण वाटत होता. आम्ही दोघं ही दचकून त्या दिशेने पाहू लागलो. सुरुवातीला मला वाटले की कदाचित एका दुसऱ्या कुत्र्याला पाहून भुंकत असतील पण त्यांच्या समोर तसे काहीच दिसत नव्हते. 

बघता बघता अचानक वाऱ्याचा वेग वाढला आणि वातावरणात कमालीचा गारवा पसरू लागला. पुढे जे घडले ते अतिशय विचित्र होते. ते कुत्रे भुंकत भुंकत मागे सरकू लागले जसे कोणी अदृश्य शक्ती त्यांना मागे सरकायला भाग पाडते य. मी भावाला काही बोलणार तितक्यात तोच मला म्हणाला “चल गाडी काढ इथून पटकन”. मला त्याच्या आवाजातली भीती लगेच जाणवली. आम्ही कार बोने ट वरचे सगळे साहित्य तसेच सोडून गाडीत बसलो आणि मी कार सुरू केली. गिअर टाकला आणि गाडी अक्सिल रेट केली. पण कार चे टायर जागेवरच फिरू लागले आणि कार काही जागची हलत नव्हती. मला बऱ्याच वर्षांचा ड्रायव्हिंग चा अनुभव असल्याने मला माहित होते की कार चे टायर जागेवरच जास्त फिरले तर वाळूत रुतून बसे ल. 

मी विचार करत असतानाच माझे लक्ष बाजूला असलेल्या त्या कुत्र्या कडे गेले. ते सगळे कुत्रे आता आमच्या कार च्याच मागच्या दिशेला बघून भुंकत होते. मी ही रियर व्ह्यू मिरर मधून मागे पाहिले आणि माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. माझे संपूर्ण शरीर अगदी थंड पडले आणि माझे हात पाय थरथरू लागले. मागच्या टेल लाईट मुळे पडणाऱ्या प्रकशात दिसले की हिरव्या रंगाची साडी नेसलेली, केस मोकळे सोडलेली एक बाई आमच्या गाडीच्या मागे उभी आहे. तिच्या कपाळावरचे कुंकू पसरले होते, केस अगदी विसक ट ले होते. डोळे अगदी पांढरे फ ट्टक पडले होते. तिचे ते भयाण रूप पाहून माझे तर संपूर्ण आवसान च गळून पडले होते. 

तितक्यात तिने गाडीच्या मागे जोराने हात आपटून प्रहार केला. ती नंतर तसे प्रहार करून तिच्या हातातल्या बांगड्या फोडू लागली. हा भयानक प्रकार पाहून माझी विचारशक्ती च संपली होती. माझ्या भावाने ही मागे वळुन पाहिले आणि त्याची चढलेली सगळी एका क्षणात उतरली. बांगड्यांचा फुटण्याचा तो आवाज अगदी स्पष्ट ऐकू येत होता. मी आमच्या कुलदैवत चे नाव घेतले आणि कार मध्ये असलेल्या गणपती च्याच मूर्तीकडे बघून पुन्हा एकदा गे अर टाकला आणि जोरात गाडी एक्सी ल रेट केली. तशी झटक्यात च आमची कार तिथून निघाली. मी अतिशय वेगात कार चालवत होतो. मी भीतीने मिरर ही बाजूला फिरवला कारण मला पुन्हा मागे अजिबात पाहायचे नव्हते. 

हृदयाची धड धड थांबायचे नाव घेत नव्हती. रस्त्यात एखादे वळत आले की पुन्हा तीच भीती दाटून यायची “ती बाई पुन्हा दिसली तर…?”. तो ६० किलोमीटर चाई प्रवास मला अक्षरशः ६०० किलोमीटर चा वाटत होता. कधी एकदा घरी पोहोचतो असे झाले होते. आम्ही त्या रात्री २ च्याच सुमारास आमच्या गावात शिरलो तसे सगळ्यात आधी मी कार गावातल्या दत्त मंदिराजवळ थांबवली. बाहेरून च हात जोडले आणि मग घरी गेलो. त्या रात्री आम्ही दोघेही झोपू शकलो नाही. डोळे बंद करायला गेलो तर ती बाई पुन्हा दिसेल या भीतीने आम्ही ती संपूर्ण रात्र जागून काढली. दुसऱ्या दिवशी सकाळीच कुलदैवत ला जाऊन नारळ दिला. माझ्या जीवनातला हा प्रसंग मी कधी ही विसरू शकणार नाही. 

This Post Has 2 Comments

  1. Mansi gawas

    Bhari dengar ahe story 😍😘

  2. Mansi gawas

    Kadakkkkk

Leave a Reply