अनुभव – अविनाश गोरे

ही गोष्ट माझ्या होणाऱ्या बायकोच्या गावातली आहे. बऱ्याच वर्षांपूर्वीची. रत्नागिरी जिल्ह्यातील एका छोट्याश्या गावातली. गावात तिच्या आत्त्याच्या घरा शेजारी एक कुटुंब राहायचं. त्या व्यक्तीचं काही वर्षांपूर्वी लग्न झालं होत. घरात तो व्यक्ती, त्याची बायको आणि त्याची आई असे तिघे राहायचे. त्या आजी च म्हणजे त्या व्यक्तीच्या आई च वय खूप झालेलं म्हणून तिला चालता फिरता यायचं नाही. एकाच ठिकाणी झोपून रहायची. जास्त जेवायची ही नाही. दिवसातून १-२ वेळा जेमतेम काही खाल्ले तर तेवढेच. घरात कोणी पाहुणे आले की जास्त बोलत सुद्धा नसत. बरेच महिने उलटले आणि तिची अवस्था दिवसेंदिवस ढासळत गेली. गावात त्यांच्या जवळच शेजारी लग्न कार्य होते. लग्नाच्या एक दिवस आधी सगळ्या बायका लग्नाची तयारी करण्यासाठी त्यांच्या घरी जमल्या होत्या. जेवणाची सगळी लगबग सुरू होती. वेग वेगळ्या प्रकारच्या भाज्या कापण सुरू होत म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी घाई नको व्हायला.

रात्र भर गप्पा वैगरे करत त्यांनी २-३ प्रकारच्या भाज्या साफ करून, कापून मोठ्या भांड्यात भरून सगळी भांडी एका खोलीत ठेवून दिली. आणि आप आपल्या घरी झोपायला निघून गेल्या. मध्य रात्र उलटून गेली होती. २ वाजत आले असावेत. तितक्यात त्या खोलीतून कसलासा आवाज येऊन लागला म्हणून तो व्यक्ती आणि त्याची बायको झोपेतून उठले आणि त्या खोलीत पाहायला गेले. आणि तिथले ते विचित्र आणि किळसवाणे दृश्य पाहतच राहिले. ती आजी जी जागेवरून उठत ही नव्हती, जिला चालत ही येत नव्हते ती उठून त्या खोलीत आली होती आणि त्या भाज्या कच्च्या खात होती. त्या दोघांनाही काहीच कळत नव्हत की आपण नक्की काय पाहतोय. कारण ज्या प्रकारे ती भाज्या खात होती ते खूपच अमानवीय वाटत होत. त्यांनी कसं बस तिला सावरलं पण तो पर्यंत लग्न कार्यासाठी आणलेल्या ३-४ किलो भाज्यांपैकी तिने अर्ध्या भाज्या कच्च्या खाऊन टाकल्या होत्या. 

दुसऱ्या दिवशी पहाटे जाऊन त्यांनी नवीन भाज्या आणल्या आणि कोणी येण्या आधी दीड दोन तासात सगळ्या भाज्या कापून तयार ठेवल्या. तेवढ्या पुरता त्यांनी वेळ मारून नेली खरी पण हे सगळं इतक्यावरच थांबल नाही. दोन दिवसांनी पुन्हा असाच प्रकार घडला. या वेळी घरात होत नव्हत जेवण, भाज्या जे काही हाताला लागेल ते ती आजी खाऊ लागली. अचानक काय झालंय हे त्या दोघांनाही उमगत नव्हत. काही दिवस असेच गेले आणि हा प्रकार वाढतच गेला. शेवटी त्या माणसाने आपल्या स्वतःच्या आई ला बांधून ठेवलं जेणेकरून ती खोलीतून बाहेर येणार नाही. पण तरीही ती बांधलेले हात पाय सोडून बाहेर यायची आणि घरातलं सगळ अन्न संपवून टाकायची. नंतर तर त्याने तिच्या खोलीला कुलूप लावयचे ठरवले. एके रात्री तिला तिच्या खाटेला बांधून बाहेरून दाराला कडी आणि कुलूप लावले आणि ते दोघे ही गाढ झोपून गेले.

काही वेळा नंतर अचानक घराच्या मुख्य दारावर धापा पडू लागल्या. हे दोघं ही धडपडून उठले आणि धावत जाऊन दार उघडले. काही गावकरी त्यांना सांगायला आले होते की ती आजी गावात फिरते य, बाहेर वाळत घातलेले कपडे फाडून टाकतेय, लोकांच्या घरात घुसून हाताला लागेल ते खातेय. हे ऐकून त्यांचा विश्वास च बसला नाही. पण ते गावकरी त्यांना दाखवायला एका घरात घेऊन गेले तेव्हा त्यांना विश्वास बसला. इतके बांधल्यावर ही स्वतःला कसे सोडवायची ते कळायचं नाही. पण तिच्या खोलीची खिडकी तोडून ती बाहेर जायची.. तिला तीन चार जणांनी मिळून कसे बसे घरी आणले. पण नंतर हा प्रकार रोजच घडू लागला. दोरीने बांधा की साखळदंडाने. ती आजी त्यातून ही सुटून जायची आणि घरा बाहेर पडायची. कसं घडतय हे त्या दोघांनाही उमगत नव्हत. शेवटी जेव्हा गावकऱ्यांना त्रास असह्य झाला तेव्हा एका जाणकार माणसाला बोलावले गेले. त्याने घरा जवळ जाताच ओळखले की हे जे काही आहे ते खूप भयानक आणि विचित्र आहे. 

त्याने घरात जाण्या ऐवजी बाहेरच थांबून त्याच्या जवळच्या पुडीतून अंगारा काढला. त्यावर मंत्र म्हणत तो त्या घरा कडे पाहून फुंकला. असे करताच आत असणारी आजी एका क्षणात कोलमडून पडली आणि जागीच गेली. ती खूप च अशक्त, बारीक झाली होती, जणू काही फक्त सांगाडा च शिल्लक राहिला आहे. हा सगळा प्रकार घरात असणाऱ्या तिच्या मुलाने आणि सुनेने पाहिला. त्या जाणकार माणसाने सांगितले की या बाई ला मरून बरेच महिने झाले आहेत, तिच्या शरीरात दुसरच कोणी वास करत होत. ही भयाण गोष्ट आजही तिथले गावकरी सांगतात. 

Leave a Reply