लेखिका – स्नेहा बसतोडकर वाणी
जर तुम्ही हि कथा वाचली नसेल तर या लिंक वर क्लिक करून वाचू शकता – नरपिशाच्च भयकथा
“कलमाश निमंत्रिका” एके काळचे विद्येचे अतिशय पुरातन असे पुस्तक कित्येक पिढयांपासून विक्रम च्या कुटंबात जपल जायचं. जशी देवांची पूजा होते त्याच प्रमाणे त्या पुस्तकाची ही पूजा केली जायची. कधी ते पुस्तक कोणीही वापरले नाही पण पुस्तकाला हानी झाली तर आपल्या वर काळ ओढवून येईल ह्या भीती नी त्या पुस्तकाला खूप सांभाळून ठेवायचे. विक्रमला नेहमीच त्या पुस्तका बद्दल कुतूहल वाटायचे.
घरात कोणाचेही लक्ष नाही ते बघून त्या पुस्तकात काय आहे हे खूपदा तो वाचत असे. कधी कधी त्याच्या आजोबांकडून त्या पुस्तकाची लिपी समजण्याचे त्यांनी शिकून ही घेतले होते. पण ती काळी विद्या प्रत्यक्षात वापरण्याच्या योग्य क्षणाची तो वाट पाहत होता. कित्येक वर्ष अशीच निघून गेली. विक्रम मोठा झाला. कॉलेज मध्ये शिक्षण घेत असताना त्याचे 2 मित्र बनले जतिन आणि रोहन. पण अजून ही 1 जणा ची कमी होती. अजुन 3 वर्ष योग्य वेळेची वाट पाहता पाहता निघून गेली.
मग एका दिवशी विक्रम ची भेट सागर शी झाली त्याचा पेक्षा 2 वर्ष लहान 1 साधा सरळ मुलगा जो त्याच्याच कॉलेज मध्ये शिकत होता. त्यांनी त्याच्याशी थोडी मैत्री वाढवली. सोबतच आपल्या 2 मित्रांना त्या पुस्तकाबद्दल सांगितले पण पूर्ण सत्य नाही. उचित वेळ निवडून तिन्ही जणांना सोबत घेऊन शेवटी त्यांनी त्याचा काळा हेतू साधला.
त्यातले मंत्र वाचून एका नरपिशाच्चाला आवाहन दिले. त्या तिघांची बळी चढवून असंख्य ताकद आणि जगातले हवे ते सारे सुख मिळवण्यासाठी त्या नरपिशाच्चाने एक एक करून आधी जतिन आणि मग रोहन ह्यांचा जीव घेतला. मृत्यू आधी रोहन ने त्या पुस्तकातली काही चित्रं पाहून आपल्या सोबत खर काय घडलं आणि आपला विश्वासघात झालाय ह्याचा योग्य अर्थ लावून घेतला होता.
ते नरपिशाच्च सागर चा जीव घेण्यात यशस्वी होऊ शकले नाही. बदल्यात सागरनेच त्याला संपवले. पण ह्यात त्या पिशाच्चाचे श्राप स्वतःवर ओढवून घेतले. हळू हळू तो स्वतः नरपिशाच्चामध्ये परिवर्तित झाला. पण वाईट कृत्यातून मिळालेल्या यशाचे व्यसन एकदा लागले की सुटत नाही. विक्रम नी अजुन काही नव्या लोकांना त्याचा जाळ्यात अडकवले ही काळी विद्या पुन्हा त्यांचा वर वापरण्या साठी. पण सागर नरपिशाच्च बनला असला तरीही त्याचे मन साफ आणि निरागस होते.
विक्रम चे काळे कृत्य कळल्याने त्यांनी हे सारे विक्रम च्या मृत्यू नी संपवायचा निश्चय केला. आणि त्या नंतर ते पुस्तक आणि स्वतःला ही संपवून त्यांनी ह्या काळ चक्राला पूर्णविराम दिला.