अनुभव क्रमांक – १ – अमोल मधुसूदन खाडे
हा अनुभव आपल्या चॅनल चे सबस्क्राईब र अमोल खाडे यांनी पाठवला आहे. मी एका सोसायटी मध्ये राहायचो.असे सगळे बालपण तिथेच त्याच सोसायटी मध्ये गेले. मी आता ३८ वर्षांचा आहे. माझ्या आयुष्यात आत्तापर्यंत ४ वेळा भुताटकी चे अनुभव आले आहेत. त्यापैकी हा सर्वात पहिला अनुभव.
मी जेव्हा ७ वर्षाचा होतो तेव्हा हा पहिला प्रसंग माझ्या आयुष्यात घडला. हा प्रसंग मला अगदी चांगलाच लक्षात आहे. ती दिवाळीची शेवटची रात्र होती. मी उरलेले सगळे फटाके फोडून आकाशाकडे टक लावून बघत होतो कारण मला आकाशात उंच जाऊन फुटणारे वेगवेगळ्या प्रकारचे फटाके म्हणजे रोकेट्स, पॅराशूट वगरे फॅन्सी आयट म बघायला खूप आवडायचं. मी लहान असल्यामुळे मला आई-बाबा रॉकेट वैगरे लावू देत नसतं. त्यामुळे अश्या फटाक्यांच तेव्हा खूप कुतूहल वाटायचं.
आमच्या घराच्या चारही बाजूला मोठी झाडें असल्यामुळे मी गच्चीवर गेलो कारण थोडं आकाश मोठ दिसत असल्यामुळे मला इतरांनी उडवलेले बाण जास्त चांगल्या प्रकारे दिसत होते, थोडावेळ बघून झाल्यावर मी कंटाळलो. मी घरी आईला विचारले आणि समोरच्या रस्त्यावर सायकल चालवायला गेलो. आईनी बजावलं होतं कि जास्त लांब जायचं नाही. थोड्यावेळ सायकल चालवताना डोक्यात एक विचार आला आणि मी जवळच असलेल्या एका शाळेच्या मैदानात सायकल चालवायला गेलो. तिथे गोल गोल फेऱ्या मारायला लागलो. ते मैदान खूप मोठं होत आणि मैदानाच्या वर भलं मोठं मोकळ आकाश असल्यामुळे मला वेगवेगळ्या प्रकारचे एकापेक्षा एक भारी फटाके बघायला मिळत होते. ते पाहून मला तिथून निघण्याच भानाच राहिले नाही.
सायकल चालवताना माझे सर्व लक्ष वरती आकाशाकडे होत. रात्रीचे 11-11:30 वाजले असतील मला नीट आठवत नाही. रस्त्यावर कोणीच नव्हतं. फेऱ्या मारता मारता वेळ कसा निघून गेला समजलंच नाही. आता फटाके पण खूप कमी फुटत होते. सगळीकडे एकदम शुकशुकाट पसरला होता. एखाद दुसरा फटाका मधूनच फुटायचा आणि मग पुन्हा तो परिसर अगदी शांत व्हायचा. तेव्हाच माझे लक्ष समोर गेले. समोरून कोणी तरी चालत येत होत. अंधार असल्यामुळे नीटस काही दिसत नव्हत. मी ही सायकल चालवत त्याच दिशेने जात होते. जवळ आल्यावर कळले की ती एक बाई आहे. तिथे फिक्कट रंगाची साडी नेसली होती. रस्त्यावरच्या पुसट श्या पडणाऱ्या प्रकाशात जाणवले की तिने चश्मा घातला आहे.
मी जेव्हा तिच्या अगदी जवळून गेलो तेव्हा तिने मला हाक दिली. हाक म्हणत येणार नाही पण एखाद्या अनोळखी व्यक्तीला आपण बोलवताना जसे करतो ना तसे. मी तिच्याकडे फारसे लक्ष दिले नाही आणि आपल्याच धुंदीत पुढे गेलो. मी त्या मैदानाला फेऱ्या मारत असल्याने ती बाई परत माझ्या समोरून येताना दिसली. मी तिला क्रॉस करून थोडे पुढे गेलो आणि तिने पुन्हा मला हाक दिली. या वेळी मात्र मी लगेच ब्रेक लाऊन उतरून मागे बघितले. पण मागे कोणीही नव्हत. मी सायकल तशीच टाकून थोडे मागे आलो आणि आजूबाजूला पाहू लागलो. पण त्या परिसरात माझ्या शिवाय दुसरे कोणीही नव्हते.
लहान असलो तरी हा प्रकार लक्षत यायला मला जास्त वेळ लागला नाही आणि मग काय… एखाद्या सायकल शर्यतीत भाग घेतलेल्या स्पर्धका सारखा पूर्ण जोर लावत सुसाट सायकल चालवत घरी आलो. सायकल स्टॅन्ड ला न लावता तशीच सोडून दिली आणि आईला जाऊन सर्व गोष्ट सांगितली. आई आधीच रागात होती पण माझं हे बोलण ऐकून ती शांत झाली आणि म्हणाली कि कदाचित ती बाई रस्त्याच्या बाजूला लपली असेल. खरं तर तिने विषय बदलला होता. पण मला माहित होतं कि ते पूर्ण मोकळे मैदान होते आणि त्या रस्त्याच्या बाजूला दिव्याच्या प्रकाशात छोटी रोपटी, गवत वैगरे लपण्यासारखं काहीच नव्हतं…
अनुभव क्रमांक – २ – रूचिकेत रघुवीर
अनुभव माझ्या मामा सोबत घडला होता. मे महिन्यात मी मामा च्याच गावाला गेलो होतो. माझे ३ मामा आहेत. २ मामा एकाच गावात तर एक मामा त्यांच्या गावापासून ३ किलोमीटर वर असलेल्या एका दुसऱ्या गावात राहतो. त्या दिवशी एक मामा त्याच्या फॅमिली सोबत संध्याकाळी आला होता. उशीर झाला म्हणून तो म्हणाला की आम्ही जेऊन मगच निघू. जेवण आटोपल्यावर सगळे गप्पा करत बसले आणि वेळ कसा निघून गेला कळलेच नाही. रात्रीचे ११ वाजत आले होते. लहान मामा ने आज ची रात्र काढून उद्या जायचा आग्रह केला पण मोठा मामा म्हणाला की जवळच जायचे आहे म्हणून बाईक वरून ते घरी जायला निघाले. गावाचा परिसर असल्यामुळे सगळी कडे शुकशुकाट पसरला होता. काही मिनिटात त्यांनी गावाची वेस ओलांडली.
तितक्यात त्यांना समोरून एक रिक्षा येताना दिसली. मामा ला थोडे आश्चर्य वाटले की इतक्या रात्री त्या भागात कोणत्याही रिक्षा नसतात. त्यात अशी रिक्षा मामाने कधीच कुठे ही पहिली नव्हती. त्या रिक्षा ला लायटिंग वैगरे केली होती. मामा ने बाईक चा वेग कमी केला. त्या रिक्षा मध्ये एक बाई बसली होती. समोरून जाताना मामा ने पाहिले की ती बाई त्याच्याच कडे पाहून स्मित हास्य करतेय. त्याला काही उमगले नाही. ती बाई एखाद्या अप्सरे समान सुंदर होती. त्याच्या मनात विचार येऊन गेला की एवढ्या रात्री ही बाई ते ही अश्या या रिक्षात कुठे चालली आहे. त्याला काही गोष्टी पटेनाष्या झाल्या होत्या. ती रिक्षा समोरून पास झाल्यावर त्याने समोरच्या आरशात पाहिले पण ती रिक्षा बरीच लांब गेली होती. पुढच्या तासाभरात ते घरी पोहोचले. तसे त्याने मामी ला न राहवून विचारले “ती रिक्षा कशी होती ना.. संपूर्ण लाईट स् ने सजवलेली.. त्यात एक बाई पण होती. त्या गावात ती रिक्षा कुठे गेली असेल ग..”
मामी जे पुढे म्हणाली ते ऐकुन मात्र मामा ला घामच फुटला. ती म्हणाली की कोणती रिक्षा.. कशा बद्दल बोलता य.. आपल्याला जाताना रस्त्यात एकही वाहन दिसले नाही.. तिचे बोलणे ऐकून मामा ला त्या रात्री काही नीट झोप लागली नाही. दुसऱ्या दिवशी त्याने मोठ्या मामा ला फोन करून या प्रकाराबद्दल सांगितले तेव्हा तो म्हणाला की त्या शेवटच्या वळणाला ती रिक्षा आणि त्यात एक सुंदर बाई दिसते पण ती कोण आहे, कुठून येते हे कोणाला ही माहीत नाही. गावकऱ्यांनी खूप शोधायचा प्रयत्न केला पण तिच्या बद्दल चे गूढ अजूनही कायम आहे..
अनुभव क्रमांक – ३ – श्लोक
गोष्ट याच वर्षातल्या जानेवारी महिन्यातील आहे. आम्ही दार वर्षी प्रमाणे ट्रीप प्लॅन केली होती आणि या वेळेस आम्ही गोव्याला जाणार होतो. ४ दिवस सुट्टी काढून तिथे ३ नाईट स्टे चा प्लॅन केला. एका मित्राने काही दिवसांपूर्वीच ट्रेन ची तिकिटं बुक करून ठेवली होती त्यामुळे सगळे अगदी सेट होते.
२ दिवस आम्ही एका बीच जवळ च्याच हॉटेल मध्ये थांबलो आणि नंतर तिथून काही अंतरावर असलेल्या एका दुसऱ्या ठिकाणी जाणार होतो. ते २ दिवस अगदी मजेत गेले. भरपूर फिरलो आणि अगदी मनसोक्त मजा केली. त्या रात्री आम्ही ५ मित्र बीच वर चालत गेलो. पिण्याचा कार्यक्रम चालू होता. त्यामुळे १-२ तास कसे गेले कळलेच नाही. एव्हाना रात्रीचे २ वाजत आले होते. आमच्या मधला एक मित्र पिणारा नव्हता. म्हणजे तो कधीच काही घ्यायचा नाही. त्याने आम्हाला सुचवले की आपण या बीच वरून चालत जाऊया. इथून पुढे काही अंतरावर लगेच दुसरा बीच आहे.
आम्हीही लगेच तयार झालो. समुद्राच्या लाटांचा मंद आवाज येत होता. वातावरणात गारवा होताच. आम्ही चालायला सुरुवात केली. आम्ही बीच च्याच आतल्या भागातून चालत निघालो होतो. त्यामुळे बऱ्यापैकी अंधार होता. आमच्यातला एक मित्र सौरभ ला लघवी ला जायचे होते म्हणून तो अजुन थोडे आत गेला. तो पर्यंत आम्ही थोडे पुढे चालत आलो होतो. इतक्या रात्री त्या भागात आमच्या शिवाय कोणीही दिसत नव्हते. पर्यटनाचा परिसर असला तरी या अश्या वेळी अगदी जीवघेणी शांतता पसरली होती. एव्हाना चालत आम्ही त्या दोन बीच च्याच अगदी मधोमध आलो असू.
तितक्यात एक १५-१६ वर्षांची मुलगी अगदी आमच्या मागे येऊन चालू लागली. मी एक एक करत खुणावत सगळ्या मित्रांना सावध केले. रात्री २.३० च्याच सुमारास त्या निर्मनुष्य बीच वर ती मुलगी कुठून आणि कशी आली, आमच्या मागून येऊन का चालते य याबद्दल कळायला काहीच मार्ग नव्हता. आमच्या सगळ्यांची नशा एका क्षणात उतरली होती. हा भयानक प्रकार काय आहे ते उमगत नव्हते. आम्हा ५ मित्रांशिवय ती एकटीच आमच्या अगदी मागून चालत आमचा पाठलाग करत होती. मागे वळून पाहण्याची कोणाचीही हिम्मत होत नव्हती.
कधी एकदा ती अंधारी वाट संपणार आहे याची मी वाट पाहत होतो. आमच्या चालण्याचा वेग नकळत वाढला होता. त्या शांत वातावरणात मला समुद्राच्या खळ खळणाऱ्या लाटांचा संथ आवाज आणि माझ्या हृदयाची धडधड अगदी स्पष्ट ऐकू येत होती. आम्हाला समोर एका हॉटेल सारख्या इमारतीतून येणारा प्रकाश दिसत होता. की देवाचा धावा करू लागलो. कधी एकदा या सगळ्यातून बाहेर पडतो असे झाले होते. काही वेळात आम्ही त्या बीच वरून बाहेर मुख्य रस्त्यावर आलो.
मित्राने मागे वळून पाहिले पण आमच्या मागे कोणीही नव्हते. ती मुलगी कुठे तरी दिसेनाशी झाली होती. आम्ही पहाटे हॉटेल रूम वर गेल्यावर तिथल्या हॉटेल मालकाशी विचारपूस केली पण त्याला या भयानक प्रकाराबद्दल काही कल्पना नव्हती. त्या रात्री देवाच्या कृपेने आम्ही वाचलो. आजही ती रात्र आठवली की त्या मुलीचा चेहरा नजरेसमोर येतो आणि अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाहीत.