हा अनुभव गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात आला होता. ते पावसाळ्याचे दिवस होते. गणेशोत्सव ही जवळ आला होता. आमच्या भागात खूप उत्साहाने गणपती आणत असत. मी मंडळाचा कार्यकर्ता असल्यामुळे आम्ही सगळ्यांनी वर्गणी वैगरे गोळा करायला सुरुवात केली होती. मी मंडळाचा कार्यकर्ता असल्यामुळे वर्गणी देखील गोळा करायला सुरुवात केली होती. पण डेकोरेशन साठी मला सुट्टी टाकायची होती. आवाज जाऊन TL ला सुट्टी च सांगतोच असं तोंडातल्या तोंडात बडबडत मी तयारी करून संध्याकाळी पावणे पसह ला बाहेर पडलो. त्या दिवशी शुक्रवार होता. मी एका इंटरनॅशनल KPO मध्ये कामाला असल्याने माझी नाईट शिफ्ट हि कायम असायची. माझी ड्युटी संध्याकाळी ६.३० ते २.३० असायची. बाईक वरून जाताना माझ्या मनात खूप आनंद होत होता. कारण गणपती असणायला फक्त २ दिवस उरले होते.  

त्यात आज शुक्रवार आणि मग २ दिवस सुट्टी या विचाराने माझा काम करण्याचा मूड च निघून गेला होता. तसाही शुक्रवार म्हणजे आमचा फन फ्रायडे. इतर दिसवांपेक्षा शुक्रवारी मात्र काम करायला आम्हाला मजा येत असे. मी आणि माझे ऑफिस मधले मित्र विकी,आदी, अनिकेत आणि अरविंद आम्ही ड्युटी संपल्यावर २.३० वाजता आदी ची गाडी घेऊन बीचज वर फिरायला जायचो. महिन्यातून एक दोन फेऱ्या तर नक्की व्हायच्या. दुसऱ्या दिवशी सुट्टी असायची त्यामुळे घरी यायची काही घाई नसायची. सगळे जग निद्रेच्या आहारी गेले असताना सामसूम रस्त्यावरून फिरत आम्ही बीच वर जायचो. आणि मग पहाटे तिचेच चहा नाश्ता करून पुन्हा ऑफिस ला यायचो आणि मग आप-आपल्या गाड्या घेऊन घरी जायचो. 

ठरल्या प्रमाणे आम्ही सगळे जण आदी ची गाडी घेऊन निघालो. मस्त गाणी ऐकत, गप्पा मारत आम्ही बीच चा एक राउंड मारला. त्या रात्री वातावरण ढगाळ वाटत असले तरी पाऊस नव्हता. म्हणून आम्ही तिथेच एखादी चहा ची टपरी चालू आहे का हे पाहू लागलो. आम्ही गाडीतून उतरलो असू आणि तितक्यात जोरदार पावसाची सर आली. आम्ही कसे बसे धावत येऊन पुन्हा गाडीत बसलो. आमचा दिनक्रम झाल्यामुळे आम्ही पुन्हा ऑफिस ला जाऊन आप आपल्या गाड्या घेऊन घरी जाणार होतो. आम्ही नेहमी हायवे ने ऑफिस ला जायचो पण त्या दिवशी आदी गाडी रिवर्स घेत म्हणाला “मस्त पाऊस पडतोय.. आपण टाईमपास करत आतल्या रस्त्याने जाऊ”. गाडी आदीच चालवत असल्यामुळे आम्हाला काही विरोध नव्हता, कारण त्याला सगळे रस्ते माहित होते. आम्ही त्या रस्त्याने जायला निघालो. 

काही वेळात पावसाची जोर ओसरला म्हणून आम्ही गाडी च्या विंडो अर्ध्याच खाली केल्या. थंडगार वारा आत येत होता. वातावरण अगदी शांत वाटत होत. मी सगळ्यांना म्हणालो “काय भारी वातावरण आहे यार..” तितक्यात आमच्याच ऑफिस मधल्या एका मित्राची गाडी आम्हाला दिसली. आदी ने मुद्दामून त्याला ओव्हरटेक करून पुढे जात चिडवून दाखवले. तसे काही मिनिटात तो पुन्हा आम्हाला ओव्हरटेक करून पुढे निघून गेला. तितक्यात आदी म्हणाला ईथुन डाव्या बाजूने एक रास्ता आहे.. गावातून.. आपण या रस्त्याने गेलो तर ऑफिस ला सगळ्यात आधी पोहोचू. आम्ही सगळ्यांनी घे गाडी तिथूनच म्हणत होकार दिला. आदी ने गाडी डाव्या बाजूला वाळवंट त्या रस्त्यावर घेतली. गावाकडचा असल्यामुळे रस्ता अरुंद वाटत होता.  

रात्रीचे ३.३० व्हायला आले होते. त्या अरुंद रस्त्यावर बराच अंधार होता. विजेचे खांब असून नसल्यासारखे होते. म्हणजे २ खांबांमध्ये इतके इतर होते ही मधल्या भागात बराच अंधार दिसत होता. रस्त्याच्या डाव्या बाजूला खाजणा चा भाग होता. म्हणजे समुद्र किंवा एखाद्या खाडी चे पाणी साचून दलदल सारखे तयार होते तसे. आदी ने गाडी स्लो केली आणि आम्हाला मुद्दामून घाबरवू लागला. तितक्यात आमच्या सोबत असलेल्या विकी ला समोर एका लाईट च्या खांबा खाली कोणी तरी बसलेले दिसले. थोडे जवळ गेल्यावर कळले की साधारण सत्तरी गाठलेली एक म्हातारी बाई त्या लाईट च्या खांबाला धरून खाली बसली आहे. विकी म्हणाला “अरे आपण तिला मदत करायला हवी यार..” तितक्यात मला काय वाटले काय माहीत मी पटकन म्हणालो “मला वाटतं आपण इथे थांबणे बरोबर नाही”..

तितक्यात अनिकेत म्हणाला “काय घाबरता यार तुम्ही.. चला विचारू त्यांना.. बघू काय मदत हवी आहे का..”. तेवढ्यात आदी ने स्पष्ट केले “हे बघा.. जे काही विचारायचे आहे ते गाडीतून विचारा”. आदी ने गाडी त्या म्हाताऱ्या बाईच्या थोड अलीकडे नेऊन थांबवली. आम्ही तिच्याकडे निरखून पाहू लागलो. हिरव्या रंगाची साडी, कपाळावर लाल भडक कुंकू लावलं होत. गळ्यात मंगळसूत्र होत. ती म्हातारी च पावसामुळे पूर्ण भिजली होती. त्या विजेच्या खांबाला धरून खाली बसली होती. विकी ने गाडीची काच खाली केली आणि तिला विचारले “आजी तुम्ही रस्ता चुकलात का?”.. तिने विकी कडे पाहिले पण काहीच बोलली नाही. तसे विकी ने पुन्हा विचारले “अहो आजी घाबरु नका.. आम्ही तुमची मदत करू.. तुम्ही काही खाल्लय का?..” 

आम्ही सगळे तिच्या उत्तराची वाट पाहत होतो. पण ती फक्त मान खाली घालून बसली होती. काहीही बोलत नव्हती. विकी ने पुन्हा प्रश्न विचारायला सुरुवात केली. “आजी तुम्ही कुणाकडे आला आहात. रस्ता चुकला आहात का. तुमच्या कडे कोणता पत्ता किंवा नंबर आहे का. आम्ही तुम्हाला फोन लावून देतो म्हणजे ते तुम्हाला घ्यायला येतील. इतके सगळे प्रश्न विचारून ही समोरून कसलाच प्रतिसाद आला नव्हता. ढग पुन्हा दाटून आले होते. हलकासा गडगडाट ही होत होता. त्यामुळे आता पुन्हा मुसळधार पाऊस सुरू होणार असे वाटू लागले. मी विकी च्याच खांद्यावर हात ठेवत हळूच म्हणालो “चल निघू यात”. तसे विकी ने शेवटचा प्रयत्न म्हणून पुन्हा विचारले “आजी बघा पाऊस पडणार आहे. तुम्ही आधीच भिजला आहात. अजुन भिजलात तर नक्कीच आजारी पडाल”. तेवढ्यात अरविंद ने पाण्याची बाटली पुढे करत विकी ला दिली आणि म्हणाला “अरे पाणी दे त्यांना. तहान लागली असेल”.

हे पाणी घ्या आजी. तहान लागली असेल ना?” बाटली चे झाकण उघडून त्याने बाटली पुढे केली. त्या म्हातारीने वर पाहिले आणि गाडी कडे पाहत जोरात थुंकली. ती विचित्र आवाजात ओरडली आणि पुढे जे घडले त्याची आम्ही स्वप्नात ही कधी कल्पना केली नव्हती. ती डोके अतिशय जोरात फिरवू लागली. तिचे डोळे संपूर्ण पांढरे पडले होते. दोन्ही हातानी तिने तिचे डोके पकडले आणि वर आकाशात पाहू लागली. आम्ही हा सगळा प्रकार पाहून प्रचंड घाबरलो. मी आणि विकी आदी ला म्हणालो “अरे.. बघतोय काय गाडी काढ पटकन”. आदी ने थरथरत्या हाताने स्टार्टर दिला आणि गाडी सुरू केली. पुढच्या काही सेकंदात आदी म्हणाला की मागे बघा कोणी आहे का. आमची कोणाचीही मागे पहायची हिम्मत होत नव्हती. तरीही हिम्मत एकवटून मी मागे पाहिले पण त्या निर्जन रस्त्यावर कोणीही नव्हते. मी त्या विजेच्या खांबाकडे नीट निरखून पाहिले पण तिथे ही कोणी नव्हते. 

आम्ही ऑफिस ला पोहोचलो. एकमेकांशी एक शब्द ही न बोलता आप आपल्या गाड्या घेतल्या आणि थेट घरी आलो. मी घरी येऊन स्वतःलाच समजावले. झाले गेले विसरून जाऊ आणि गणेशोत्सवाच्या तयारी ला लागू. त्याच्याच गडबडीत २-३ दिवस गेले पण त्या गोष्टीचा इतक्या लवकर विसर पडणे शक्य नव्हते. सुट्टी संपल्यानंतर मंगळवारी ऑफिस ला आलो. त्या भागात राहणारा एक जण आमच्या ऑफिस मध्ये होता. त्याला आम्ही लंच ब्रेक मध्ये भेटून घडलेला सगळा प्रकार सांगितला. तेव्हा त्याने आम्हाला एक फोटो दाखवला. तो पेपर मध्ये आलेल्या एका बातमीचा होता. काही दिवसांपूर्वी एक म्हातारी बाई गावावरून आली होती. ती रस्ता चुकली असावी म्हणून २-३ तास त्या रस्त्यावर भटकत होती. काही लोकांना तिने पत्ता विचारला पण तिला काही रस्ता सापडत नव्हता. ती रस्त्या कडेला एका विजेच्या खांब जवळ बसली होती. पण तिचे दुर्दैव. एका भरदाव वेगाने येणार गाडी ने तिला चिरडले आणि ती जागीच ठार झाली. 

हा सगळा प्रकार ऐकुन आम्ही निशब्द झालो होतो. माझा या असल्या गोष्टींवर कधीही विश्वास नव्हता पण हा अनुभव आठवला की अंगावर शहारे आल्या शिवाय राहत नाही. त्या नंतर आम्ही निश्चित केले की असे रात्री अप रात्री ड्राईव्ह ला जायचे नाही. काय माहित आपल्यासाठी पुढे काय वाढून ठेवले असेल.

Leave a Reply