ही घटना आपल्या चॅनेल च्या एका सबस्क्राईबर ने पाठवली आहे. घटना त्याच्या घरात घडलेली असल्याने त्याने त्याचे नाव गुपित ठेवण्याची विनंती केली आहे. 

ही गोष्ट माझ्या स्वतःच्या घरात घडलेली असून या अनुभवानंतर भूत प्रेत आत्मा वगरे या गोष्टी कुठेतरी असाव्यात यावर माझा विश्वास थोडा वाढला. 

२००८ सालात आलेला हा अनुभव आजही अंगावर काटे येण्यास पुरेसा आहे. माझे घर व माझ्या काकाचे घर समोरासमोर हाकेच्या अंतरावर होते. त्यादिवशी होळी होती . मी ऑफिसातून ७ वाजता घरी आलो असेन तितक्यात मला काकाच्या घरातून वहिनींनी नारळ फोडून देण्याआठी हाक दिली. मी घरात गेलो, वहिनी नेहमीपेक्षा थोड्या वेगळ्याच वागत होत्या खूप शांत शांत होत्या. माझ्या हातात काहीही न बोलता नारळ आणि कोयता दिला आणि किचनमधून हॉलमध्ये निघून गेल्या. होळी सणाकरता त्यांनी हिरवी साडी वैगरे नेसली होती आणि त्यांचे ते गप्प बसणे मला विक्षिप्त असेच वाटले पण मी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि नारळ फोडून माझ्या घरी निघून गेलो. मी गेलो असेन तितक्यात दादा सुद्धा घरी आला. आमच्या मैदानात भव्य होळी उभारतात त्यामुळे ती पाहण्यास मी मैदानात आलो. आणि तेवढ्यातच दादा मैदानात धावत आला आणि आम्हाला सर्वाना बोलावून घेतले. आम्ही सर्व धावत घरी आलो तर वहिनी वेगळ्याच आवाजात ओरडत होत्या. दादा घरात येताच त्यांनी त्याच्या अंगावर सर्व भांडी फेकून मारण्यास सुरू केले होते त्यामुळे तोदेखील थोडा घाबरला होता. त्यात वहिनी ४ महिन्याच्या गरोदरपणात असल्याने आमची भीती अजूनच वाढली होती. 

नंतर वहिनी खाली झोपून जोरजोरात स्वतःचे पाय पोटजवळ आपटून घेत होती. आमच्या घरात काही जुन्या जाणत्या बायका आल्या त्यांनी वहिनींचे हात पाय पकडून ठेवले. त्यातल्या एका बाईने तिला विचारले काय हवंय तुला? का आली आहेस तिच्या अंगात? त्यावर तिने उत्तर दिले मला हे मूल हवंय. आम्ही सर्व चक्रावून गेलो आणि कळेना काय करावे. 

त्याच रात्री माझी आजी तिला एका भोंदू बाबाकडे घेऊन गेली. त्याने फार प्रयत्न केले परंतु काहीही झाले नाही शेवटी त्याने केस पकडून भिंतीवर आपटण्याचा उपाय देखील केला तरीही काहीही झाले नाही पण वाहिनीचे डोके मात्र टेंगुळ येऊन चांगलेच सुजले. दुसऱ्या दिवशी रंगपंचमी होती त्या दिवशी आजी वहिनीला घेऊन घरी आली. पूर्ण दिवस वहिनी झोपूनच होत्या. जसे संध्याकाळ झाली तसे त्यांचे पुन्हा आदल्या दिवशीप्रमाणेच वागणे सुरू झाले. आता मात्र आम्ही सर्व हताश होतो..काय करावं काहीच सुचत नव्हते आणि फक्त बघत राहण्यावाचून आमच्या कोणाकडेच काहीही पर्याय नव्हता. रात्री १२.३० वाजता आमच्या चाळीतील एका बाईने ठाण्यातील लोकमान्य नगर येथील एका गायबाबांबद्दल सांगितले. आम्ही लागलीच तेथे जायचे ठरवले. गायबाबा यांना हे नाव पडण्याचे कारण मला तिथे गेल्यावर कळाले. त्यांच्याजवळ ४ गाई होत्या आणि अनेक कुत्रे.

शंकराचे मंदिर ठाण्यात सर्वत्र पसरले. असो..

त्यावेळी रात्रीचे २ वाजले होते आम्ही गायबाबांना उठवले आणि मग त्यांनी आम्हाला मंदिरात जावयास सांगितलं. आम्ही मंदिरात प्रवेश करताच झोपलेल्या गाई उठून हंबरडा फोडू लागल्या..बाहेर कुत्रे जोरजोरात भुंकू लागले. कुत्र्यांचे भुंकणे ठीक पण गाईही हंबरडा फोडत होत्या जे पाहून मी चक्रावून गेलो. त्या मंदिरात एक शंकराची ४ ते ५ फुटी मूर्ती  आहे आणि त्या बाजूस एक मोठे माणसाच्या तोंडाएवढे त्रिशूल. बाबा मंदिरात आले आणि वहिनीचे डोके त्या त्रिशूळला बांधून विचारले कोण आहेस ? कशाकरता आली आहेस..तेव्हा तिने सांगितले माझे नाव शीतल मी काही महिन्यापूर्वीच रेल्वेत जीव दिला होता कोपरी ब्रिज वरून उडी मारून. माझ्या घरच्यांनी माझ्या प्रेमविवाहास कडाडून विरोध केल्याने मला ते पाऊल उचलावे लागले होते. आणि हिच्या अंगात येण्याचे कारण इतकेच मला कोणत्याही प्रेमविवाह झालेल्यानं खुश राहू द्यायचे नाहीय. 

खूप जणांना ही एक भाकडकथा वाटेल मला सुद्धा तेव्हा हे एक असच काहीतरी वाटत होतं मग दुसऱ्याच दिवशी शीतलने सांगितलेल्या पत्त्यावर जाऊन मी सहज चौकशी केली असता ती खरच तिथेच राहत असल्याचे कळाले म्हणजे जी कोणी व्यक्ती वाहिनीच्या अंगात आली होती ती खरच एक इच्छा अपूर्ण राहिलेली भटकत असलेली आत्मा होती. ठाण्यातील कोपरी ब्रिज हे फार जुने आणि आत्महत्या करण्याचे हॉट स्पॉट. अनेकांनी येथे आपली जीवन यात्रा संपवली आहे आणि हा ब्रिज माझ्या घरापासून हाकेच्या अंतरावरच असल्याने या ब्रिजबद्दल खूप गोष्टी आम्हाला ठाऊक होत्या. त्या गायबाबांकडून आल्यानंतर पुढील १ ते २ महिने वहिनी एकदम ओक्के होत्या आणि आता त्यांच्या पोटातील बाळ ६ महिन्याचे झाले होते. 

तो २००८ चा मे महिना होता..दादाच्या लहान मुलाच्या लग्नाची धामधूम सुरू होती. लग्नकार्य असल्याने सर्वच नातेवाईक घरी होते. हळदीची रात्र होती..आणि हळदी समारंभ सुरू असतानाच अचानक वाहिनीच्या अंगात पुन्हा आले आणि त्या विचित्र वागू लागल्या. आम्ही सर्व पुन्हा वहिनींना घेऊन गायबाबा कडे जाण्याच ठरवले..कार मध्ये सर्व बसत असतानाच आत्या ओरडली थांबा मीपण येते. गाडीमध्ये वहिनींना बसवले असता त्या बोलू लागल्या मी पूर्ण बरी आहे तरी का नुसतं त्या बाबांकडे नेत आहेत. वहिनी खरचं बोलत होत्या कारण शीतलची आत्मा आता त्यांचा शरीरात नव्हतीच. पण तेव्हा एक गोष्ट झाली ती म्हणजे जेव्हा वहिनीला त्या बाबांनी त्रिशूलाला बांधले तेव्हा अचानक आत्या ओरडली..आणि विक्षिप्त वेगळ्याच आवाजात हसू लागली. बाबानी वहिनीला मोकळे केले आणि आत्याला त्रिशूलाला बांधले तेव्हा कळले की एकच आत्मा दोघांचा शरीरात आळीपाळीने प्रवेश करत होती. आत्याच्या अंगात येण्याचे कारण विचारले असता तिने संपूर्ण घरातील नाती तोडण्यास आलेली असे सांगितले..तेव्हा आम्हाला कळले की जेव्हा जेव्हा आत्या ठाण्यातील आमच्या घरी यायची तेव्हा तेव्हा तिच्या अंगात येत असे आणि अंगात आल्यावर ती सर्वांना घालून पाडून बोलत. आम्हाला अंगात देवी येत असावी असे वाटायचे आणि आम्ही दुर्लक्ष करायचो. माझी आई मात्र नेहमी बोलत असे ही देवी असूच शकत नाही कारण देवी असती तर देवाधर्माच्या कार्य करणाऱ्यास ती इतकं घालून पाडून कधीच बोलणार नाही. ज्यामुळे आत्याच्या नवऱ्यास आणि मुलास माझ्या आईबद्दल राग निर्माण होत होता. आणि आम्हाला त्यांचाबद्दल. जर त्यादिवशी आत्या आमच्या सोबत आली नसती तर कदाचीत काहीही वाईट घडू शकलं असत. 

त्या दिवसांनंतर आत्याच्या आणि वाहिनीच्या कधीही अंगात आले नाही. वाहिनीनि तीन महिन्यांनी एका सुंदर मुलाला जन्म दिला..आज ते सुखी वैवाहिक जीवन जगत आहेत. 

Leave a Reply