अनुभव – निखिल पांडे

मी अकोल्याचा राहणारा आहे. शिकण्यासाठी नागपूर ला आलो होतो. मी सध्या डेंटल स्टडी करतोय. तिथे आम्ही एका सोसायटी मध्ये ३ बी एच के फ्लॅट घेऊन राहत होतो. एकूण ६ जण होतो म्हणजे मी, कपिल, आदित्य, मंगेश, अनिकेत आणि यश. सगळेच डेंटल च्या दुसऱ्या वर्षाला शिकत होतो. पावसाळ्याचे दिवस होते. त्या दिवशी अगदी मुसळधार पाऊस सुरू होता जो थांबायचे नाव च घेत नव्हता. अगदी विजेच्या कडकडाटासह वादळी पाऊस. बरीच रात्र झाली होती. जेवण आटोपून आम्ही सगळे आप आपल्या रूम मध्ये झोपायला गेलो. एका रूम मध्ये दोन लोक रहायची, माझ्या सोबत कपिल नावाचा मित्र असायचा, माझा रूम मेट. नेहमी प्रमाणे रूमचा दरवाजा आणि खिडक्या लाऊन घेतल्या, मेन लाईट बंद करून एक छोटा लाईट सुरू केला जो आम्ही रात्री झोपताना चालू ठेवायचो.

अधून मधून विजेचा कडकडाट ऐकू येत होता आणि सोबत पावसाच्या सरींचा आवाज होताच. पण या सगळ्यात ही काही वेळातच गाढ झोपून गेलो. वेळेचा अंदाज नाही पण मध्य रात्र उलटून गेली असेल. एका जोरात पडलेल्या विजेमुळे गडगडाट झाला आणि माझी झोपमोड झाली. वेळ पाहिली तर १ वाजून गेला होता. तितक्यात समोर लक्ष गेलं तर रूम ची खिडकी उघडी दिसली. मला चांगले लक्षात होते की मी रूम चा दरवाजा आणि खिडक्या दोन्ही बंद करून झोपलो होतो मग अचानक खिडकी कशी उघडली. वादळी वारा पाऊस असला तरीही स्लायडिंग ची खिडकी अशी सहजा सहजी उघडत नाही. कदाचित कपिल ने उघडली असावी असा विचार करून मी उठलो आणि खिडकी पुन्हा बंद करून झोपायला आलो. खिडकी जवळ च एक पुस्तक ठेवायला रॅक होते. 

त्यात आमची सगळी डेंटल स्टडी ची पुस्तके ठेवली होती. त्यातल एक पुसक होत ” फार्माकोलॉजी ” च. ते इतके मोठे आणि जड होते की एका हाताने उचलायला ही जमायचं नाही. त्याच्या बाजूला बरेच सुटे पेपर, लहान हलकी पुस्तक ठेवली होती. मला खूप गाढ झोप लागली. काही वेळा नंतर मला पुन्हा जाग आली आणि या वेळी ढंगाच्या गडगडटामुळे नाही तर एका वेगळ्याच आवाजाने. मी आणि कपिल आम्ही दोघं ही बेड वर झोपलो असलो तरीही माझ्या बाहेरच्या बाजूला जागा होती कारण बेड तसा मोठा होता. एखादे पुस्तक धपकन बेड वर टाकावे तसा आवाज माझा छातीजवळ आला. मी झटकन डोळे उघडले आणि पाहिले तर ते च फार्मा कोलॉजी चे जाड पुस्तक होत. पुन्हा समोर लक्ष गेलं तर ती खिडकी उघडी दिसली. मी झोपेत असल्यामुळे मला लक्षात आले नाही.

मी उठून खिडकी बंद केली, पुस्तक रॅक मध्ये ठेवले आणि पुन्हा येऊन झोपलो. जसे डोळे बंद केले तसा पुन्हा तोच आवाज आला. पुस्तक बेड वर म्हणजे बेडवरच्या गादीवर आपटण्याचा. बघतो तर पुन्हा तेच पुस्तक माझ्या बाजूला होत. आता मात्र माझी भीती ने चांगलीच तांतरली. कपिल तर इतक्या गाढ झोपेत होता की त्याला काहीच माहीत नव्हत. मी रूम मध्ये चौफेर नजर फिरवली. लहान लाईट च्या मंद प्रकाशात कोणीही दिसलं नाही. कशी बशी हिम्मत करून मी पुन्हा उठलो आणि ते पुस्तक रॅक वर ठेऊन आलो. जसे बेड वर पडून डोळे बंद केले तसा पुन्हा एकदा धपकन असा आवाज आला. आता मात्र जे काही घडतय हे विचित्र आहे असे वाटू लागले. मी घाबरून कपिल ला उठवू लागलो आणि सांगू लागलो की हे पुस्तक माझ्या बाजूला येऊन पडतय. एकदा नाही तीन वेळा झालं असच. 

वाऱ्यामुळे उडून कसं येईल इतकं मोठ पुस्तक, त्याच्या बाजूला सुटी कागद आहेत पण ती मात्र तशीच आहेत जागेवर. कपिल मात्र खूप गाढ झोपेत होता, तो झोपेतच बडबडला ” काय बोलतोय वेड्या सारखे.. स्वप्न पाहिले असशील झोप आता..”  हा काही आता उठणार नाही हे नक्की झालं. माझ्या सोबत जे घडतं होत ते खूपच विचित्र होत. अधून मधून वीज पडत असल्यामुळे रूम त्या विजेच्या प्रकशामुळे लख्ख उजळून निघायची. अस वाटायचं की त्या रूम च्या कोपऱ्यात कोणी तरी उभ दिसलं तर..? नुसत्या विचाराने अंगावर भीती पोटी शहारे येऊन गेले. मी देवाचे नाव घेऊ लागलो. अचानक वाटू लागलं की रूम मध्ये आमच्या दोघांशिवाय कोणी तरी आहे. एक अनामिक चाहूल. जणू ते आहे पण दिसत मात्र नाहीये. मी पुन्हा एकदा उठून खिडकी बंद केली अंक देवाचे नाव घेत झोपलो. संपूर्ण रात्र मला काही झोप लागली नाही. सकाळी उठलो तेव्हा अंग खूप जड झाल होत, ताप भरला होता. त्या दिवसा पासून पुस्तकाचे रॅक तिथे ठेवलेच नाही. त्या रात्री घडलेला प्रकार हा माझा भास नक्की च नव्हता. कारण जे मी अनुभवलं ते पूर्ण जागे असताना, शुद्धीत असताना अनुभवलं होत. 

Leave a Reply