अनुभव – अनुज तराळकर

अनुभव माझ्या बालपणी चा आहे. मी शाळेत शिकत असताना चा. त्या वेळी मी गावी यात्रे ला गेलो होतो. गावी माझे काका असायचे त्यांच्या घरी राहायला जायचो. ते एका जुन्या बिल्डिंग मधल्या फ्लॅट मध्ये राहायचे. बिल्डिंग खूपच जुनी होती जी रात्रीच्या वेळी भयानक दिसायची. यात्रेच्या दिवशी मी शाळा आटोपून घरी आलो आणि तिथून थेट आम्ही गावी पोहोचलो. माझ्या आत्ते बहिणी ही आल्या होत्या. पोहोचे पर्यंत रात्र झाली म्हणून गेल्या गेल्या आम्ही थोडे फ्रेश होऊन थेट जेवायला बसलो. आमच्या रोजच्या गोष्टीबद्दल चर्चा सुरू झाल्या. कोण काय करतंय वैगरे.. आमच्या गप्पा बराच वेळ चालल्या. वेळ माहीत नाही पण बरीच रात्र झाली होती. तितक्यात अचानक बिल्डिंग ची लाईट गेली आणि फ्लॅट मध्ये गडद आधार पसरला. खिडकीचा पडदा की बंद होता त्यामुळे तो अंधार जास्तच जाणवू लागला. पडदा सरकवल्यावर हलकासा प्रकाश आत आला. मला खूप झोप येत होती म्हणून मी माझ्या दोन्ही बहिणींना म्हणालो की मी आत जातो झोपायला, तुम्ही पण माझ्या सोबत या कारण खूप अंधार आहे आणि काही दिसत नाहीये. त्या दोघी ही माझ्या सोबत आल्या.. जसे आम्ही बेडरूम मध्ये आलो तसे माझे लक्ष बेडरूम च्या बाल्कनी मध्ये गेले. बाहेरून येणाऱ्या स्ट्रीट लाईटच्या प्रकाशात दिसले की तिथे कोणी तरी उभ आहे. पण अंधार असल्यामुळे नीट दिसत नव्हत. 

हो पण कोणी तरी होत एवढं मात्र नक्की. मी त्या दिशेला एक टक पाहत राहिलो तसे माझ्या बहिणींचे लक्ष ही तिथे गेले. मला वाटले की घरातली एखादी वस्तू जसे सतरंजी वैगरे गोळा करून उभी ठेवली असेल त्यामुळे कोणी उभ असल्याचा भास होतोय. मी त्याकडे दुर्लक्ष करून आत आलो. हे सगळे अवघ्या ३-४ सेकंदात घडले. पण जसे मी त्या रूम मध्ये आलो तसे ते जे काही होत ते अचानक बाल्कनी मधून रूम मध्ये आमच्या दिशेने आले आणि एक विचित्र आवाज ओरडले. अंधार असल्यामुळे अगदी स्पष्ट दिसले नाही पण बाहेरून येणाऱ्या पुसटश्या प्रकाशात त्याचा आकार दिसला. जाणवले की त्याला धार धार नखे आहेत, संपूर्ण शरीरावर केस आहेत आणि तो काळीज पिळवटून टाकणारा जीवघेणा आवाज. मी आणि माझ्या दोन्ही बहिणी इतक्या घाबरल्या की आम्ही उलट धावत पहिल्या खोलीत आलो आणि रडू लागलो. पण माझ्या आई वडिलांनी सांगितले की आम्हाला आतून कसलाही आवाज आला नाही. तुम्हाला भास झाला असेल. आम्ही त्यांच्या सोबत तिथेच पहिल्या खोलीत बसून राहिलो. अर्धा पाऊण तासाने लाईट आली तसे माझे काका बेडरूम च्या बाल्कनी मध्ये पाहायला आले पण तिथे कोणीही नव्हते. आम्ही कोणीही घरच्यांना पटवून देऊ शकलो नाही की तो आमचा भास किंवा भ्रम नव्हता. आम्ही तिघांनीही ते जे काही होत ते प्रत्यक्ष पाहिलं होत.. अनुभवलं होत. आजही तो आवाज माझ्या कानात घुमतो. जो मी कधीही विसरू शकणार नाही. 

Leave a Reply