अनुभव – आयुष

अनुभव एप्रिल २०२२ मध्ये आला होता म्हणजे अवघ्या काही महिन्यांपूर्वी. मी राहायला मुंबईत आहे. पण एप्रिल महिन्यात परीक्षा संपल्यामुळे गावी जायचे ठरले होते. मी आणि माझा भाऊ आम्ही रात्री मुंबई वरून निघालो आणि पहाटे ५ च्या दरम्यान गावी पोहोचलो. गावी माझी आजी राहायची. जवळपास २ वर्षानंतर आजीला भेटून खूप बरं वाटलं. दिवस भर मस्त गाव भर फिरून संध्याकाळी घरी आलो. आजी जेवण बनवून आमच्या शेजारी एका घरात घेऊन जात होती. शेजारी एक म्हातारी बाई राहायची. आजीपेक्षा वयाने बरीच मोठी असेल. आजी मला म्हणाली की तिला कधी एकटीला रात्री झोपायला भीती वाटली तर मी सोबत म्हणून जाते. आज तू आला आहेस तर त्यांच्याकडे झोपायला जा. मी तिला समजावले की मला अस दुसऱ्याच्या घरी जाऊन झोपायला नाही आवडतं. पण ती माझे काही ऐकत नव्हते. त्या म्हाताऱ्या बाईंचं नाव निरा होत. तीच घर गावातल्या इतर जुन्या घरांसारखच होत. मी काही तिच्या घरी झोपायला गेलो नाही. ५-६ दिवस गेले असतील. एके रात्री मला अचानक जाग आली. वेळ पाहिली तर १ वाजून गेला होता. तितक्यात फोन वाजला. नंतर लक्षात आले की मी चुकून १ वाजता चा अलार्म लावला होता. तो बंद करून मी झोपायला जाणार तेवढ्यात मला पैंजण चा आवाज येऊ लागला. मनात केले ” नाही.. भास होतोय बहुतेक..” मी दुर्लक्ष करून झोपायचा प्रयत्न करू लागलो. पण तितक्यात पुन्हा तो आवाज येऊ लागला आणि कळले की हा माझा भास नाहीये. 

मी झटकन उठून बसलो. जसा उठलो तसे स्वयंपाक घरातून भांडी पडायचा आवाज आला. काय आहे ते पाहायला मी गेलो आणि स्वयंपाक घरातला दिवा लावून आत आलो. पण जाणवले की स्वयंपाक घरात तर सगळी भांडी जागच्या जागी आहेत मग काही क्षणापूर्वी आवाज कसला आला. तितक्यात अचानक दिव्याचे बटण कोणी तरी बंद केले आणि अंगावर सर्रकन काटा येऊन गेला. स्वयंपाक घरात मिट्ट अंधार पसरला. तितक्यात मला जाणवले की माझ्या समोरून कोणीतरी चालत येतय. भीती ने माझे हातपाय लटपटू लागले. अंधारात चाचपडत मी दिव्याचे बटण शोधू लागलो. बऱ्याच प्रयत्नानंतर मला बटण सापडले आणि मी दिवा लावला. अचानक समोर लक्ष गेले आणि काळीज भीती ने धड धडू लागले. समोर एक बाई मान खाली घालून उभी दिसली. ते दृश्य पाहून मला भोवळ आली आणि मी जागीच बेशुद्ध पडलो. सकाळी आजी ने उठवल्यावर मला जाग आली. ती मला विचारू लागली की इथे काय करतोय, इथे झोपला होतास की काय..? मला रात्रीचा भयानक प्रसंग आठवला तसे मी आजीला सगळे काही सांगितले. त्यावर आजी म्हणाली की काल अमावस्या होती आणि एरव्ही ही असे रात्रीचे उठून घरात फिरू नकोस. पण मला आज पर्यंत समजू शकले नाही की ती बाई नक्की कोण होती.. 

Leave a Reply