अनुभव – प्रशांत गुरव

ही घटना माझ्या आजोबंसोबत घडली होती. माझे आजोबा पूर्वीपासूनच गावाला स्थायिक. त्यांना शेतीची खूप आवड होती त्यामुळे आमच्‍याकडे तेव्‍हा ९-१० गुरेढोरे होती. आमच्‍या आजोबांचे गुरावर फार प्रेम होत. असच एकदा गुरांमधला मोतीया नावाचा बैल अचानक आजारी पडला. मोतियावर आजोबांचा खुप जीव होता. आजोबाना त्याला नक्की काय झाल आहे हे बहुतेक कळले म्हणून ते आजीला म्हणाले की मोतियासाठी औषध आणायला मला पलीकडच्या वाडीत वैद्याकडे जावे लागेल. भर दुपारची वेळ होती. आजी त्यांना सांगू लागली की भर दुपारी जाऊ नका, संध्याकाळी ४ नंतर जा पण आजोबांनी तिचे काही ऐकले नाही. एका हातात कापडी पिशवी आणि दुसऱ्या हातात काठी घेऊन ते वेद्याकडे जायला निघाले. आजीने पुन्हा त्यांना अडवले आणि म्हणाली की भर दुपारी त्या वाटेने जाऊ नका. तसे ते हो म्हणून घराबाहेर पडले. बऱ्याच वेळाच्या पायपिटी नंतर त्यांना ती वाट लागली. ती वाट म्हणजे पलीकडल्या वाडीत लवकर जाण्यासाठी कच्चा रस्ता होता. त्या वाटेवर चालायला सुरुवात केली तसे त्यांना आजीचे वाक्य ही आठवले पण ते त्यांनी मनावर घेतले नाही. 

दुपारचे २ वाजले होते. त्या वाटेवर एक चिट पाखरू ही दिसत नव्हत. पण आजोबांना काही अंतर चालल्यावर वाटेत समोरणेक लहान मुलगी त्यांच्या पुढे चालताना दिसली. त्यांना कळले नाही की अचानक ही या वाटेवर कशी आली. ते मनात म्हणाले ” एवढीशी पोर.. बघा भर दुपारी चाललीये या वाटेवरून आणि आमच्या ह्या म्हणतात या वाटेवरून एकट्याने जाऊ नका..”. ते स्वतःशीच हसले. कोणीतरी सोबत आहे म्हणून त्यांना बरे वाटले. आजोबांनी त्या मुलीला हाक दिली “ए पोरी.. एवढ्या दुपारची खय चाललीस, खयल्या वडीतली तू..” पण तिने काहीच प्रतिसाद दिला नाही. इतकेच काय तर ती साधी थांबली ही नाही की तिने मागे वळून पाहिले ही नाही. आजोबांना थोड आश्चर्य वाटलं. कारण तिने ऐकून न ऐकल्यासारखे केले होते. काही अंतर पुढे गेल्या नंतर वाटेत एक वळण आले आणि ती मुलगी रस्ता सोडून सुकलेल्या गवताच्या पायवाटेवरून चालू लागली. आजोबा हे बघताच जरा दचकले कारण ती ज्या पायवाटेने पुढे जात होती त्या वाटेत पुढे एक स्मशान होते. आजोबा त्या मुलीला पुन्हा आवाज देउ लागले. “ए पोरी तीकडे खय चाललस तीकडे जाऊ नको”. पण ती मुलगी तिच्याच तंद्रीत पुढे चालत जात होती. आजोबा काही पावले तिच्या मागे गेले पण नंतर एका जागी स्तब्ध उभे राहून तिला फक्त पाहू लागले. 

चालत चालत ती मुलगी स्मशानाच्या गेट जवळ पोहोचली अंक ते गेट हळुवार पणे आपोआप उघडले गेले. ती मुलगी हळु हळू चालत आत गेली आणि आजोबांच्या डोळ्यांदेखत दिसेनाशी झाली. जणू हवेत कुठेतरी विरून वेळी. ते भयाण दृश्य पाहून काय करावं काय नाही त्यांना काहीच सुचत नव्हत. ते खूप घाबरले आणि आल्या पावली मागे फिरले. काही वेळात ते घरी पोहोचले आणि त्यांची शुद्ध हरपली. या घटने नंतर त्यांना ३-४ दिवस खूप ताप भरला होता. आजही त्या वाटेवर दिवसाही जास्त कोणी फिरकत नाही. 

Leave a Reply