अनुभव – मंगेश शिंदे

ही घटना लॉक डाऊन च्या काळातली आहे. आमच्या भागात एक झपाटलेली जागा आहे जिला “ टाकीचा इरा” म्हणतात. ते पावसाळ्याचे दिवस होते. त्यामुळे ईऱ्याला चिंबोऱ्या आल्या होत्या. दर वेळी रात्री आम्ही चिंबोरी पकडायला जात असत. तसेच त्या दिवशी ही मी, माझे काका आणि दादा आम्ही तिघे गेलो. मी आणि माझा दादा नवीन होतो पण माझे काका गावचे असल्याने त्यांना बराच अनुभव होता आणि काही अश्या गोष्टी माहीत होत्या ज्या कधी आम्ही ऐकल्याही नसतील. गणेशोत्सवाचे चे दिवस होते. विसर्जनाला एक दिवस बाकी होता. आम्ही सगळे आदल्या रात्री चिंबो ऱ्या पकडायला गेलो. माझे बाबा सांगत होते की आजच्या दिवस थांबा, उद्या गणपती विसर्जन झाले की जा पण आम्ही काही त्यांचे ऐकले नाही. बॅटरी, पिशव्या वैगरे घेऊन आम्ही काकांसोबत निघालो. रात्रीचा साधारण एक वाजला होता.

पावसाची रिप रिप सुरूच होती. काही वेळात आम्ही टाकीच्या इऱ्या जवळ येऊन पोहोचलो. ही तीच जागा जिथे काही अमानवीय गोष्टींचं वास्तव्य होत. गावातली लोक म्हणायची की इथे भयानक गोष्टी घडतात पण मला आणि दादाला त्यावर अजिबात विश्वास नव्हता. तिथे चिंबोड्या शोधत असताना आम्हाला अचानक कसला तरी आवाज आला. जसे कोणी तरी दुरून किंचाळी मारली असावी. आम्ही जास्त काही लक्ष दिलं नाही. आम्ही जवळपास अर्धा पाऊण तास चींबोरी शोधत फिरत होती पण एकही मिळाली नाही. शेवटी कंटाळून आम्ही निघायची तयारी करू लागलो तेवढ्यात एक विचित्र प्रकार घडला. अचानक ई ऱ्या मधून एका पाठोपाठ एक अश्या चींबोऱ्या यायला लागल्या. मी आणि दादा पटापट पकडुन पिशवीत भरू लागलो. 

काकांना मात्र शंका आली त्यामुळे ते तसेच उभे राहून तो प्रकार पाहू लागले. अवघ्या ३-४ मिनिटात संपूर्ण पिशवी भरली. तितक्यात काकांचे लक्ष समोरच्या आंब्याच्या झाडावर गेले आणि त्यांनी आम्हाला दोघांना हि खुणावले. ते फक्त दबक्या आवाजात म्हणाले “चला, भरपूर झाले, आता आपल्याला जायला हवे. “ आम्ही ही जास्त काही न बोलता आवरत घेतलं आणि त्यांच्या सोबत तिथून जाऊ लागलो. काका एरव्ही पेक्षा जरा जोरात चालत होते म्हणून मी त्यांना विचारले “ काका एवढे जोरात का चालताय, पिशव्या जड आहेत हळु चला..” पण ते काहीच बोलले नाहीत. १० मिनिटांनंतर दादा ने ही त्यांना सांगितले पण ते एकही अवाक्षर न काढता झपाझप पावले टाकत पुढे सरकत होते. जसे आम्ही आमच्या घराजवळ आलो तसे एका झटक्यात पिशवी रिकामी झाली. जणू कुठून फाटली असावी आणि सगळ्या चिंबोट्या खाली पडल्या असाव्या.

मी झटकन पाहिले पण पिशवी फाटली नव्हती. तरीही त्यात एकही चिंबोरी नव्हती. मी काकांना नकळत विचारलं “ अहो काका, मी आणि दादा ने इतक्या चिंबोऱ्या पकडलेल्या. कुठे गेल्या सगळ्या..?” त्यावर ते आम्हाला आधी घरी घेऊन गेले. घरी पोहोचतच बसवले आणि नंतर सगळा प्रकार सांगितला. त्यांना त्या आंब्याच्या झाडावर काही तरी बसलेलं दिसलं. जणू एखादा छलावा म्हणजे चकवा. चिंबोऱ्यांचा अभास निर्माण करून ते आम्हाला अडकवत होत त्याच्या जाळ्यात. इतकेच नाही तर जेव्हा आम्ही तिथून निघालो तेव्हा ते आमच्या सोबत च होत. म्हणून काका काहीच बोलत नव्हते आमच्याशी. काका हे ही म्हणाले की हा अनुभव गावातल्या बऱ्याच लोकांना आला आहे. शक्यतो लोकं त्या रस्त्याने जाण्याचे टाळतात पण दुसऱ्या गावी जाण्यासाठी हा एक च रस्ता असल्याने नाईलाजाने तिथून च जावे लागते.. 

Leave a Reply