अनुभव – श्रीकांत पाटील
प्रसंग आहे २३ नोव्हेंबर २०२० चा. मी माझ्या प्रियेसी ला प्रियंका ला भेटण्यासाठी गावी कोल्हापूर ला गेलो होतो गेलो होतो. आणि तिथून आम्ही कोकणात गणपती पुळे ला जायचं ठरवलं. तसे आम्ही या आधी चार पाच वेळा कोकणात जाऊन आलो होतो पण परतीचा प्रवास शक्यतो अंधार पडायच्या आतच केला होता. 23 नोव्हेंबर ला आम्ही सकाळी कोल्हापूर हून निघालो. पूर्ण दिवस आम्ही गणपतीपुळे आणि तिथल्या समुद्र किनाऱ्यावर वर घालवला. पण त्यात आम्हाला परतीचा प्रवास हा घाटातून करायचा आहे याचा विसर पडला. समुद्र किनाऱ्यावरून वरून आम्ही संध्याकाळी सूर्यास्त बघून निघालो. 7 वाजत आले होते आणि आम्हाला जवळपास 130km चा प्रवास करून घरी पोहचायचे होते. साधारण पणे ४ तासांचा प्रवास होता. उशीर झाला होता म्हणून मी थोडा बाईक चा स्पीड वाढवला. २ तासांच्या प्रवासानंतर थांबून विश्रांती घ्यायचे ठरवले. म्हणून आम्ही चहा पिण्यासाठी थांबलो. तिथल्या एका माणसाने आमची विचारपूस केली की कुठे चालला आहात इतक्या रात्री. त्यावर आम्ही त्यांना बोललो की कोल्हापूर ला परतीचा प्रवास करतोय. तर तो आम्हाला म्हणाला की इथून पुढे जाताना घाट लागतो, त्या रस्त्यावर कुठे मध्ये थांबू नका. सरळ निघून जा. १५ मिनिटांच्या विश्रांती नंतर आम्ही जायला निघालो तेव्हा तो माणूस आमच्याकडे विचित्र नजरेने पाहत होता.
प्रियंका ला आता थोडी भीती वाटायला लागली होती. कारण बराच उशीर झाला होता आणि दोघांच्या ही घरून कॉल्स यायला सुरुवात झाली होती. साधारण सव्वा नऊ ला आम्ही घाटात पोहोचलो. रस्ता एरव्ही पेक्षा सामसूम वाटत होता. एक वेगळीच शांतता जाणवत होती. अधून मधून एखादा ट्रक बाजूने पास व्हायचा. त्या व्यतिरिक्त दुसरी वाहने दिसत नव्हती. काही वेळानंतर एका वळणावर एक आजोबा रस्त्याच्या बाजूला रडताना दिसले. मी बाइकचा वेग कमी केला आणि प्रियंका ला म्हणालो “काय झालं असेल ग, काही मदत हवी असेल का..? आपण थांबून विचारुया का..?” मी बाईक चा ब्रेक मारला. त्यांच्या पासून काही अंतरावर गाडी थांबवली आणि लांबूनच विचारले ” काय झालं बाबा, तुम्ही रडताय का..? काही मदत हवी आहे का..?” तसे ते एकदम रडायचे थांबले आणि काही कळायच्या आत आमच्या कडे धावत सुटले. हातात एक मोठी काठी होती त्यांच्या. प्रियंका घाबरून ओरडली आणि म्हणाली “चल पटकन इकडून..” मी पटकन स्टार्टर मारून गाडी सुरू केली आणि काही सेकंदात तिथून जोरात घेतली. पुढे गेल्या गेल्या साईड मिरर मध्ये पाहिले तर मागे कोणीच नव्हते. खात्री करायला म्हणून मी स्वतः मागे वळून पाहिले तर ते आजोबा कुठे तरी दिसेनासे झाले. मागे कोणीही नव्हते. ते अवघ्या काही सेकंदात गेले कुठे. आता मात्र आम्ही दोघंही घाबरलो. मी बाईक चा वेग आणखीन वाढवला.
देवाचे नाव घेत आम्ही त्या घाटातून बाहेर पडलो. बराच वेळ घडलेला प्रसंग डोक्यातून जातच नव्हता. घाटातून बाहेर आल्यावर एक चायनीज कॉर्नर दिसले. तिथे गाडी नेऊन थांबवली. प्रियंका खूप घाबरली होती. तुला पाहून तिथल्या एका काकूंनी विचारपूस केली त्यावर वाट्याला आलेल्या प्रसंगाचे वर्णन करून सांगितले. त्यावर त्या म्हणाल्या की तो वृद्ध माणूस त्या घरात बऱ्याच लोकांना दिसतो म्हणून त्या रस्त्याने असे बाईक वरून कोणी प्रवास करत नाही. जाता जाता रात्रीचा प्रवास करणे टाळा असा त्यांनी सल्ला दिला.